|
Tiu
| |
| Sunday, December 16, 2007 - 7:15 pm: |
| 
|
जितेंद्र...वय वर्ष ६६ जन्म: एप्रिल १९४२ अमिताभ... जन्म: ऑक्टोबर १९४२
|
Dineshvs
| |
| Monday, December 17, 2007 - 3:07 am: |
| 
|
शामकच्या बायांचे परकर |-) सेहरा मधल्या संध्याच्या, पंख होते तो उड आती रे, या गाण्यामधे जितेंद्र संध्याचा डुप्लिकेट म्हणुन नाचला होता. तो त्याचा पहिला सिनेमा. त्यात मुमताजही होती. मग नवरंग मधे मॉबसीन मधे होता. याच सिनेमात जयश्री गडकरपण मॉबमधे होती.
|
Arch
| |
| Monday, December 17, 2007 - 4:16 am: |
| 
|
दिनेश, मला वाटत गीत गाया पत्थरोंने हा त्याचा पहिला सिनेमा. संध्याबरोबर होता त्याच्यात.
|
Psg
| |
| Monday, December 17, 2007 - 5:04 am: |
| 
|
संध्यापेक्षा मला प्राची जास्त आवडायची. दोघीही उत्तम नाचतात, पण संध्या natural dancer कमी वाटते. कष्ट घेऊन नाचते ती फार. आणि चेहर्यावर अगदी वाईट expressions ! ती नाचाचा आनंद घेत नाही. त्यामानानी प्राचीत talent तितकच आहे आणि चेहर्यावरही गोड भाव परत 'गुजराथी बहू' वगैरे आहेतच. जय ऐवजी रोनित हवा होता.. जीतेंद्रची खरंच कमाल आहे. 'नैनों में सपना' तर श्रीदेवीपण इतकं छान नाही करू शकणार आता!!! 'नच' मधले दोन्ही पेअर्स 'टक्कर के' आहेत. आमिर-अभिषेक मधे अभिषेक चांगला आहे जास्त. राखीचा कधी कधी मूड जातो वाट्टं, तेव्हा फारच बेकार नाचते ती, नाहीतर जबरदस्त आहे. संजीदाही चांगली आहे. पण थोडी जिगर कमी वाटते त्या पेअरकडे. आज मराठी सारेगमप चा 'महाअंतिम' फेरीच्या आधीचा भाग आहे. अनिरुद्ध किंवा सायली ओक पैकी एक बाहेर जाईल आज, मोस्ट्ली अनिरुद्धच असं वाटतंय.
|
Ankyno1
| |
| Monday, December 17, 2007 - 11:29 am: |
| 
|
अनिरुद्ध नाही जणार बहुतेक ३ मुली मेगा फायनल ला नाही येऊ देणार झी वाले त्यामुळे सायली ओक ला बाहेर जावं लागेल असं मला वाटतं सा रे ग म प मधलं शंकर महादेवन चं 'मितवा' केवळ अप्रतीम होतं ते ऐकून मला एकंच प्रश्न पडला... मूळ गाणं त्यानी न गाता त्या पाकी सिन्गर कडून का गाउन घेतलं?
|
Dineshvs
| |
| Monday, December 17, 2007 - 2:21 pm: |
| 
|
आर्च तो हिरो म्हणुन पहिला, शांतारामबापुनी आधी त्याला असे दुय्यम भुमिकेत नाचवुन घेतले होते. आणि गीत गाया पत्थरोने मधे राजश्री होती.
|
Arch
| |
| Monday, December 17, 2007 - 3:37 pm: |
| 
|
हो हो राजश्री होती. संध्यातर त्याच्याहून बरीच मोठ्ठी न?
|
Sayuri
| |
| Tuesday, December 18, 2007 - 12:15 am: |
| 
|
मराठी सारेगमप मधून आऊट कोण झालं आज?
|
Farend
| |
| Tuesday, December 18, 2007 - 1:32 am: |
| 
|
येथे दोन संध्यांबद्दल चर्चा चालू आहे का? वरती पूनमने उल्लेख केलेली व ती सेहरा वगैरे वाली? का तीच आली होती या कार्यक्रमात? तो पंख होते तो वाला डान्स कसला विनोदी वाटतो आता. कदाचित नृत्यकौशल्याच्या दृष्टीने महान असेल पण 'मी पक्षी असते तर' हे नृत्यातून दाखवायचे आहे हे पहिल्या १-२ वाक्यात कळते, मग पुढे प्रत्येक वाक्याला काहीतरी 'पक्षीपणा' करून दाखवलाय तेव्हा मात्र असे वाटते 'कळले आम्हाला, बास आता' गाणे ऐकायला मात्र अतिशय छान आहे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, December 18, 2007 - 3:15 am: |
| 
|
फ़ारेंड, अलिकडे नृत्यस्पर्धेत आली होती ती, संध्या मुद्गल. ती राजस्थानी आहे. साथिया, पेज थ्री, हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लिमिटेड, सारख्या सिनेमात होती ती. या कार्यक्रमात ती खरेच छान नाचायची. दुसरी संध्या म्हणजे कु. विजया देशमुख उर्फ़ सौ. संध्या शांताराम वणकुद्रे. ते पंख होते तो उड आती रे सुंदर आहेच कारण तो भुपाली रागच सुंदर आहे. ( सायोनारा सायोनारा हे गाणे पण त्याच रागातले. ) त्या नाचात ती कबुतराची नक्कल करते असे दाखवलेय. त्यात संध्या आणि मुमताज होत्या, पण लॉंग शॉट मधे जितेंद्र होता. नाहीतरी तो नाच पुरुषी वेशातच केलाय.
|
Himscool
| |
| Tuesday, December 18, 2007 - 3:56 am: |
| 
|
कालच्या सा रे ग म प च्या भागातून सर्वांना अपेक्षित होते तसेच झाले आणि सायली ओक बाहेर पडली... गेल्या वेळेस संजिवनीचा वापर हा निव्वळ फार्स होता... काही झाले तरी तीन मुली मेगा फायनलला कशा काय यऊ देणार हे मिडिया वाले... आणि काल तर अनिरुद्धला सगळ्यात जास्त समस मिळाले... अत्यंत रितसर पणे घडवलेले नाटक होते कालचा सा रे ग म प चा भाग म्हणजे...
|
Jhuluuk
| |
| Tuesday, December 18, 2007 - 9:06 am: |
| 
|
हिम्स, कालचा रिझल्ट इथे पोस्टल्याबद्दल धन्यवाद! आता कोणीतरी एपिसोड बद्दल पण सांगा, कोणकोणती गाणी झाली? कशी झाली? माझा एपिसोड मिसला...
|
Himscool
| |
| Tuesday, December 18, 2007 - 10:32 am: |
| 
|
काल मीही गाणी ऐकली नाहीत.. फक्त रिझल्ट बघितला.. Pretty Woman बघत होतो ना!!!
|
Dineshvs
| |
| Tuesday, December 18, 2007 - 10:43 am: |
| 
|
काल कुणीतरी आशाचे, हवास तु, हवास तु, हे गाणे गायले. निखळ उत्साहाने भरलेल्या या गाण्याचे, त्या गायिकेने रडगाणे करुन टाकले होते. देवकीने पण तेच सांगितले. एकतर स्पर्धकांवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे कुणीच मोकळेपणी गात नाही. उच्चाराबद्दल अजुन परिक्षक नाराज आहेत. काय म्हणुन ऐकायची हि गाणी ? ती सुद्धा सर्व गाणी अगदी मूळ रुपात सहज उपलब्ध असताना !!! कुठल्याच गाण्यात जान नसते. नेमका भाव कुणालाच दाखवता येत नाही. अजुन परिक्षक अक्षरांच्या उच्चाराबद्दल बोलत नाहीत. उदा स या अक्षराचा उच्चार करताना, माईकवर स्स अशी हवा सोडली जाणार नाही, हे बघावे लागते. दोन गाण्यानंतर टिव्ही बंद करुन मी पुस्तक वाचायला घेतले.
|
पूनम अगदी अगदी. झलक मधे मला तरी प्राचीच आवडायची. संध्या डान्स चांगला करते पण चेहरा विचित्र करते. कित्ती गं बाई मी ग्रेट असे भावच नाचतानाही चेहर्यावर असतात. एकूणच नाजूकपणाचा अभाव आहे तिच्यात. आणि त्या नंतरच्या रिऍक्शन्स तर अगदी कृत्रिम रडणे काय अन माझ्याकडून कित्ती त्या अपेक्षा म्हणून गळे काढणे काय. तरी हेमाबाई तिलाच म्हणाल्या होत्या वाटतं की जोपर्यंत स्टेजवर आहात तोपर्यंत असे पवचक्कीसारखे श्वास सोडून दमल्याचं दाखवायचं नसतं. त्यापेक्षा प्राची चियरफुल वाटते नाचते ग्रेसफुली आणि अगदी गोड ऍक्शन्स करते. सारेगमप आणि एकुणच इतर गाण्याचे कार्यक्रम मोठ जोक झालाय. खरंच त्यांना कुणी एसेमेसेस करं का अजूनी? >>मग पुढे प्रत्येक वाक्याला काहीतरी 'पक्षीपणा' करून दाखवलाय तेव्हा मात्र असे वाटते 'कळले आम्हाला, बास आता'
फारेंड अगदी मनातलं बोललास. ती संध्या झलक मधल्या संध्यासारखीच होती. नाच नको पण विचित्र हावभाव आवर अशी.
|
Aashu29
| |
| Tuesday, December 18, 2007 - 4:53 pm: |
| 
|
हेमाबाई तिलाच म्हणाल्या होत्या वाटतं की जोपर्यंत स्टेजवर आहात तोपर्यंत असे पवचक्कीसारखे श्वास सोडून दमल्याचं दाखवायचं नसतं. >>>>>>>>>>>>> हेमाबाइ नाहि संघमित्रा त्या शबाना बेगम होत!
|
Manuswini
| |
| Tuesday, December 18, 2007 - 7:31 pm: |
| 
|
संध्या मृदूल जराही नाजूक वाटत नाही. चेहरा कडक आहे. प्राची तर 'मी बाई नाजूक' अशी आहे. काही गाण्यात तसे दिसणे नाचाला शोभून दिसते. पण passionate,romantic,sensual expressions मध्ये काय मार खाते. हे दोन्ही मेळ असणारे कमीच आहेत झलक मध्ये असे मला वाटते.
|
Manuswini
| |
| Tuesday, December 18, 2007 - 11:49 pm: |
| 
|
दुसरे म्हणजे झलकच्या last episode मध्ये श्यामकच्या troup ने जो पहिल्यांदा नाच करून दाखवीला त्यात 'उगीच' त्या मुलींना केव्ढ्याश्या चड्या घालून तो नाच करवला. विचीत्र वाटते होते. नाच तर बर्यापैकी traditional होता. बीडी पिलाईले रे वगैरेंच्या आधी, सर्वात आधी मुलीचा पाय पकडून काय योगा करवला तीला. कसली creativity होती त्यात, विभीत्सपणा होता.
|
Deepanjali
| |
| Wednesday, December 19, 2007 - 4:55 am: |
| 
|
काल सायली पानसे जास्त चांगली वाटले हिंदी गाण्यात सुध्दा . अनिरुध्द अगदीच avg singer आहे त्यामुळे votes त्यालाच सगळ्यात जास्ती म्हणे ! काहीही !!
|
Ankyno1
| |
| Wednesday, December 19, 2007 - 5:11 am: |
| 
|
विना वाद्यव्रुन्द फेरी मधे वैशाली चा प्रत्येक श्वास ऐकू येत होता... अनिरुद्ध नी 'लगे रहो' फारच पुचाट गायलं काहीच जोश नव्हता त्यात... सायलीचा अवाज लहान मुलीचाच वाटतो
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|