|
"कदाचीत" कुथे बघायला मीलेल?
|
Santoshd
| |
| Thursday, December 06, 2007 - 10:19 pm: |
| 
|
Amruta अग ईथे लिंक टाकलीस आता तुलासुद्धा हीतगुज Admin कडुन मेल मीळेल piracy & promotion of link बद्द्. मीसुद्ध हीच लिंक टाकली होती मला मेल आल आणि मेसेजसुद्धा डीलीट केला. 
|
Santoshd
| |
| Friday, December 07, 2007 - 5:34 am: |
| 
|
आजा नचले एकदम छान आहे. माधुरीसमोर खरच कोणी हीरो एकदम झाकोळला गेला असता. डान्स आणि ऍक्टींग काय असते ते माधुरीने या चित्रपटात दाखवुन दील आहे. खरच छान आहे चित्रपट. कदाचीत वरचे बरेच रीव्हु मराठी माणसाचे पाय खेचण्यासारखे आहेत. माधुरीचे बरेच चित्रपट फक्त अनिल कपुरच्या ऍक्टींगसाठी बघीतले पण आता ते परत माधुरीसाठी बघीन 
|
Shravan
| |
| Friday, December 07, 2007 - 3:56 pm: |
| 
|
सकाळ मधले 'कदाचित' चे समिक्षण वाचले (मंदार जोशी) पण सगळी गुपीते फोडली आहेत त्या समिक्षणात. छ्या!!!! कुणी वाचू नका जर सिनेमा बघायचा असेल तर!
|
Amruta
| |
| Friday, December 07, 2007 - 4:16 pm: |
| 
|
अरे बापरे!!! अस आहे होय... अजुन तरी मला काहि मेल आलेली नाहिये. जोवर मेसेज आहे तोवर असुदे.. नाहितर US मधे आपण मराठी सिनेमे कुठे पहाणार?? 
|
Santoshd
| |
| Friday, December 07, 2007 - 4:46 pm: |
| 
|
होग Amruta खरच आहे, इथे तेलगु, तमीळ चित्रपटांच्या इतक्या कचरयासारख्या साईट्स आहेत, त्यांचे चित्रपटसुधा ईथल्या थियटरमद्धये रीलीज होतात. आणि आपण फक्त मराठी मंडळ Join करत बसतो . आपल्यासारखया परदेशात राहणारयांसाठी कोणी मराठी चित्रपट, नाटका साठी वेबसाईट बनवली तर त्यालाच तत्वद्नान सांगत बसतो आणि उहापोहा करत बसतो आपण मराठी लोक मागे पडतोय वैगेरे वैगेरे पण ती लींक छान आहे. मलासुधा जमेल तशी मदत करतो तीथे.
|
अमृता, संतोष अनुमोदन. परदेशात रहाणार्यांनी मराठी चित्रपट पाहुच नयेत का मग??
|
Asami
| |
| Friday, December 07, 2007 - 8:31 pm: |
| 
|
परदेशात रहाणार्यांनी मराठी चित्रपट पाहुच नयेत का मग?? >> illegally पाहू नका अशा द्रुष्टीने तो message पाठवला जातो. नि त्यात काहीच चूक नाही
|
Farend
| |
| Monday, December 10, 2007 - 11:32 pm: |
| 
|
'मालामाल वीकली' चा मूळ चित्रपट (घराण्यांचे मूळ पुरूष असतात तसे आपल्या चित्रपटांचे 'मूळ चित्रपट' असतील ) ' Waking Ned Devine ' बघितला. प्रियदर्शन ने म्हणे ठोकून दिले होते की MW त्याचा ओरिजिनल कन्सेप्ट आहे! दोन्ही चित्रपटांच्या विनोदाच्या स्टाईल मधे फरक आहे. हा चित्रपट एका आयरिश खेड्यातील ही कथा दाखवतो. मला तर पहिल्यांदा MW एकदम फालतू वाटला होता, पण दुसर्यांदा बघितल्यावर खूप बरा वाटला होता, परेश रावळ आणि ओम पुरी चे पार्ट्स तरी. एकूण मला आता कॉपी च जास्त बरी वाटते या दोन्हीत. काही प्रसंगही MW मधे जास्त हसवतात. तो एक एक करत सगळ्यांना त्यांना सामील करावे लागते तो किंवा क्लायमक्स, जरी प्रचंड आतिशयोक्ती असली तरी.
|
सध्या पुस्तके वाचायची नाहीत असे ठरवले असल्याने सिनेमांचा रतीब घालतो आहे. आत्ताच अमेरिकन गॅंगस्टर बघितला. रसेल क्रो आणि डेंझेल वॉशिंग्टन.. दोघांनीही ताकदीचा परफॉर्मन्स दिला आहे.. विशेशत डेंझेल.. त्याची नजर, मॅनरिझम, सगळं परफेक्ट.. रसेल क्रो च्या अ ब्युटिफूल माइंड च्या बेअरिंगची थोडीशी झलक दिसते इथे.. जेव्हा तो कोर्टामध्ये बोलायला सुरुवात करतो तेव्हा बरोब्बर नॅशचा अभिनय केल्यासारखा दिसतो..
|
Mukund
| |
| Wednesday, December 12, 2007 - 6:37 am: |
| 
|
शंतनु... आता रतिब घालतच आहेस तर... आणी तुला जर डॅंझेल चा अभिनय आवडत असेल तर त्याचा ट्रेनींग डे हा मुव्ही बघ.... उगाच नाही त्याला ऑस्कर मिळाले त्या चित्रपटातल्या अभिनयाबद्दल... आणी जरुर सांग कसा वाटला त्याचा अभिनय ते... माझ्या मते तो एक परिपक्व व तगडा अभिनेता आहे. त्याही चित्रपटात त्याची नजर,मॅनरीझम्स अगदी सगळे इतके सही वठवले आहेत ना त्याने.. अस वाटतच नाही की हा एक अभिनेता आहे.. तो जे कॅरेक्टर वठवत असतो तो हाच आहे असे आपल्याला सतत वाटत राहते चित्रपट बघत असताना. आणी हलका फुलका विनोद पाहीजे असेल तर माय कझीन विनी हा चित्रपट बघ.... जो पेशीच्या अभिनयामुळे हसुन हसुन पोट दुखते... अमोल.. नुसते मुव्हीच नाही ते कॉपी करत... म्युझिकची तर किती उदाहरणे देता येतील... कॉपी करा पण मुळ संगीत किंवा चित्रपटाचे ऍकनॉलेजमेंट सुद्धा करत नाहीत त्याचा मला राग येतो..
|
Asami
| |
| Wednesday, December 12, 2007 - 4:56 pm: |
| 
|
denzel चा AB होतोय असे नाही का वाटत कोणाला ? character पेक्षा actor मोठा होतोय
|
Denzel cha aanakhi ek movie "Man on Fire". Tyamadhe Denzel cha performance changala aahe. (Hindi madhe "Aetbaar" (Aamitabh Bachchan) aala.)
|
Maitreyee
| |
| Wednesday, December 12, 2007 - 6:20 pm: |
| 
|
असाम्या डेन्झेल बद्दल तसं का बर वाटलं तुला, I mean इतक्या frequently दिसतोच कुठे तो. मी पंखा आहे हे सांगायला नकोच
|
जो पेसी म्हणजे स्कोर्ससीचा लाडका ना? कॅसिनो आणि गूडफेलाज मधला.. तो पण एक जबर्या आहे.. कसला एकदम त्वेशाने काम करतो.. एस्पे. मी उल्लेख केलेल्या २ सिनेमात..
|
Manuswini
| |
| Wednesday, December 12, 2007 - 7:41 pm: |
| 
|
गेल्या long weekend मध्ये बरेच मराठी मूवी कधी न्हवे ते एकामागून एक पाहीले. इतक्या वर्षात माहीत न्हवते की इतके चांगले मूवी येतात. लहानपणी अशोक सराफ़ नी लक्ष्मिकांत बेर्डे नी एकच impression दीले की मराठी मूवी म्हणजे नको तितका आचरटपणा(अर्थात हे माझे मत झाले त्यांची चित्रपट पाहून, बहुतेक कोणाचे फ़ेव असतील ते;माझे नाही). असो, हे मूवी पाहीले(कृपा मायबोलीची कारण तिथल्याच friend नी सांगीतले की मनु हे पहा) आता हे माझे मत आहे खालील चित्रपटाविषयी, मातीच्या चुली : जुनाच विषय सासु-सून.सुरवात विनोदी आहे, काही प्रसंग छान आहेत. शेवट आवडला. शेवटी जर एपत असेल नी संबध पार बिघडण्याच्या एवजी वेगळे राहून maintain केलेले बरे. कायद्याचे बोला : चांगला वाटला, पुन्हा जुनाच विषय, कायद्यातील लाचलुचपतखोरी, मकरंद अनासपुरी जरा किंचीत आचरटपणा करतोच. पण टाईमपास. आंनदाचे झाड : छान वाटला, प्रत्येकाच्या जीवनविषयी जगण्याच्या कल्पना वेगळ्याच असतात. काही स्वपनात रंगतात काही फक्त practical बाजू बघून. दोन्हीचे plus minus आहेत. सावरखेड एक गाव : ठीक वाटला. अंदाज होताच पहील्यापासून की असा गावात गोंधळ कोण घालत असेल. काही गोष्टी अचाट वाटल्या. मुक्ता : अर्धा पाहीला नी सोडून दीला. बोर वाटला मलाच. बकुळा नामदेओ घोटाळे : आचरटपणाचा कळस,अर्धा पाहीला नी सोडून दीला.
|
Asami
| |
| Wednesday, December 12, 2007 - 7:58 pm: |
| 
|
I mean इतक्या frequently दिसतोच कुठे तो>>नाही मला frequency बद्दल नाही म्हणयचे ग. म्हणजे त्याच्या व्यक्तिरेखा ह्या त्याला समोर ठेवून लिहिल्या जतात किमान पक्षी त्या character साठी Denzel असेल तर त्याला suit होतील अशा केल्यासारखे वाटते. Especially Training Day नंतर हे जास्त जाणवते. एक स्रुदय मनुश्य जो कुठल्यातरी अधिकारी post वर असतो अशा types . ACting चा प्रश्नच येत नाही ग. फ़क्त AB नंतर ताक सुद्धा फ़ुंकून घेतलेले बरे एव्हढेच
|
Santoshd
| |
| Thursday, December 13, 2007 - 1:36 am: |
| 
|
मनु तु कुठे बघीतलेस? भारतात असताना मी कधी मराठी मुव्ही बघीतले नसते तीतक्या आपुलकीने युएस मध्ये बघीतले. मला अस वाटत. मातीच्या चुली - शेवट छान आहे, फक्त सुसंस्क्रुत घरातला मुलगा दारु पीतो आणि मराठी कुटुंबात आई अजीबात ओरडत नाही, पटत नाही. कायद्याचे बोला- पोलीस आणि वकीलांना एकदम बावळट समजलय. ओढुन ताणुन वीनोद, वैताग आला. आनंदाचे झाड - सुनेचा, तुळसकरचा स्वभाव एकदम प्रॅक्टीकल वाटला, पण नवरा एकदम साधा आणि बायकोसुधा साधी गणित चुकीच वाटल, अश्या परीस्थीतीत बायको नेहमीच खंबीर असते आणि संसार नीट सांभाळते, पण शेवट छान आहे. मुक्ता - बोध घेण्यासारखा आहे, विशेषत: शेवट छान आहे. बकुळा नामदेओ घोटाळे - मल हीरोईन छान वाटली आणी तीच्या नवरयाच कामसुद्धा छान झाल आहे, भरत जाधाव नेहमीच डोक्यात जातो, त्यावर एक निबंध होईल. तीथे सचिनचा नवरी मीळॆ नवरयाला आहे, जरुर बघ, मग तुला कदाचीत अशोक सराफचा खरा वीनोदीपणा कळॆल.
|
परवा सोनी वर विशाल भारद्वाज ने direct केलेली एक short film पाहिली का ? नाव होतं ' Blood Brothers'. पवन मल्होत्रा , सिध्दार्थ , आयेशा टाकिया असलेली ही गंभीर विषया वर ची film जेम तेम दहा ते पंधरा मिनिटांची होती पण छान घेतलीये एकदम . आधी मला वाटलं कि कुठल्या movie चे ट्रेलर किंवा एखादी advertisement आहे म्हणून पण चक्क एक छोटीशी फ़िल्म आहे . पुन्हा सोनी वर किंवा इतर चॅनल वर लागली तर जरुर पहा .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|