Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 12, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » खुशी » Archive through December 12, 2007 « Previous Next »

Shraddhak
Wednesday, December 12, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रदीन खान आणि करीना कपूरचा ' खुशी ' .

सिनेमाचे प्रोमोज येत होते तेव्हा नेहमीचे ड्वायलाक फ़रदीन करीना वगैरे म्हणत होती... ' ये बहुत ही अलग फ़िल्म है. कहानी बिल्कुल अलग है.... ' तेव्हापासूनच ही ' वेगळी फ़िल्म ' पहायची उत्सुकता मनात निर्माण झाली होती. :-P

तेव्हा बंगलोरला होते आणि तेव्हा हा एकच हिंदी सिनेमा चालू होता शहरात... अगदीच कंटाळा आला म्हणून मी नि मैत्रीण गेलो होतो. ( त्यापेक्षा, कन्नड सुपरस्टार उपेंद्राचा एखादा सिनेमा पाह्यला असता तर बरं झालं असतं, असं नंतर वाटलं. त्यात सांगायचे एक [ वेगळा सिनेमा, वगैरे] आणि दाखवायचे भलतेच, असे काही नसते. सरळसाधा action packed सिनेमा, angry hero [young की ओल्ड वगैरे नको लिहायला] असा मसाला असतो.)

तर सिनेमाच्या सुरुवातीलाच दोन लहान बाळं आपापल्या आईवडिलांसोबत कलानिकेतनमध्ये साडीखरेदीला गेलेली दिसली. ( साडीखरेदी आईची, वडील पैसे चुकते करायला नि मुलं लहान असल्याने त्यांना घरी सोडू शकत नाही म्हणून तीही बरोबर....) तर दुकानात गर्दी असल्याने त्या बाळांच्या आया एकमेकींच्या जवळजवळ बसलेल्या असतात तेवढ्यात एक बाळ दुसर्‍याचा हात पकडते. ( तो लहानपणचा फ़रदीन असतो म्हणे!)
मग अमिताभने सिनेमाच्या सुरुवातीलाच ' कहानी इतनीही है की इन दोनोंको मिलना है.... ' ( त्याआधी काहीतरी नियती वगैरेवर बडबड होती वाटतं.) असे सांगून सिनेमाची ष्टोरी फ़ोडली. तरी आम्ही नेटाने बघत होतो.
हिरो मोठा होऊन अमेरिकेला उच्चशिक्षणासाठी जाणारंसं कळलं. आणि हिरॉईनचा जन्म खेडेगावातल्या आईबापाच्या पोटी झाल्याने ती फ़क्त ' शेहेर के अच्छे कॉलेज ' पर्यंत मजल मारू शकणार, हेही कळलं. मग वाटलं, की हिरॉईनला शिष्यवृत्ती वगैरे मिळून ती पण अमेरिकेला जाते की काय? पण येथेच कथालेखकाचे चातुर्य दिसून आले. त्याने हिरॉईनला अमेरिकेला न पाठवता हिरोला अपघात घडवून भारतातच ठेवले. त्याचा तिकडचा प्रवेश हुकतो, पण त्याला अभ्यास बुडवायचा नसतो म्हणून तो स्थानिक कॉलेजात प्रवेश घेतो. ( ज्ञानप्राप्तीची तळमळ; दुसरं काय?)

कॉलेजमध्ये ते दोघेही देवळात जाणे, तिथे एका अभागी मुलीने लावलेला दिवा विझू न देण्याची शर्थ करणे, आचरट प्रोफ़ेसर जॉनी लिव्हरसोबत गॅदरिंगची प्रॅक्टिस करणे अशा प्रकारे वर्ष सत्कारणी लावतात. त्यातच हिरॉईन हिरोची सिगरेट सोडवण्याचे पुण्यकर्मदेखील करते.
आता मध्यंतरापर्यंत एवढे दाखवून संपले. बजेटमध्ये व्हिलन बसला नसावा, कारण तो नव्हता. मग त्या दोघांमध्ये काहीतरी कारण काढून भांडण लावणे आले.
हां तर... अनायासे परीक्षा जवळ आलेली असते. PLs सुरू झालेल्या असतात. हिरॉईन काळी पारदर्शक साडी नेसून अपार्टमेंट कॉम्प्लेक्स च्या बागेत अभ्यास करत असते. ( घ्या, नाहीतर मला चष्म्याऐवजी लेन्स घालायलादेखील वेळ नसायचा PLs च्या काळात. टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय ते या हिरॉईनकडून शिकावं.) हिरो तिला बहुधा डिफ़िकल्टी विचारायला येतो आणिऽऽऽऽऽ......
त्याचे तिच्या कमरेकडे लक्ष जाते. हिरॉईन चतुर असते, तिला बरोब्बर लक्षात येते. त्याने आपली कंबर बघितली म्हणून. ती त्याला लगेच जाब विचारते. हिरो गुळमुळीत उत्तर देतो. भांडणऽऽऽ.... ( तोवर इकडे भांडणाचं हे असलं कारण पाहून मी नि मैत्रीण गार....)
मग यथावकाश त्यांचं भांडण मिटवून तो सिनेमा संपला तोपर्यंत आम्ही ' फ़रदीन अगदी provogue च्या जाहिरातीतल्या सारखाच दिसतो नै या पूर्ण सिनेमात.... करीनाचा हा ड्रेस बराय. पॅटर्न लक्षात ठेव. आपण पण एखादा असा ड्रेस शिवून घेऊ. ' वगैरे महत्त्वाच्या चर्चा करत वेळ घालवला.

सध्या तो सिनेमा कधीमधी ' सहारा वन ' ला लागतो. पहायला विसरू नका. विशेषतः ' आई रे आई रे खुशी... ' आणि ' दो अजनबी चले जा रहे है... ' ही गाणी.



Meggi
Wednesday, December 12, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बजेटमध्ये व्हिलन बसला नसावा, कारण तो नव्हता >>
हा हा हा... :-) :-) :-)

Itgirl
Wednesday, December 12, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र :-)
सिनेमातल्या काही सिच्युएशन्स बघून अवाक व्हायला झालेल खर!!


Nandini2911
Wednesday, December 12, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, यात एक अचाट डायलॉग आहे.
फ़रदीनचा बाप त्याला म्हणतो "मुंबई युनिव्हर्सिटीका चॅन्सलर मेरा बहोत अच्छा दोस्त है. वो तुम्हे ऍडमिशन दे देगा.. :-) :-) :-)


Sadda
Wednesday, December 12, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

( ज्ञानप्राप्तीची तळमळ; दुसरं काय?):-)

एकुणच करिनाची acting च अचाट आहे मै प्रेम कि दिवानी हु मधे नाहि का काय आचट काम केलय तिने आणि ह्रितिक नी..


Shraddhak
Wednesday, December 12, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्दा, लिही बघू अचाट नि अतर्क्य एंट्री ' मै प्रेम की दीवानी हूं ' वर...
हाही सिनेमा आम्ही बंगलोरमध्ये थिएटरमध्ये जाऊन, पहिल्या दिवशी धडपडून तिकिटे मिळवून ( तिकिटे मिळाली यावरून तरी सिनेमाचा दर्जा कळायला पाह्यजे होता... पण हाय रे कर्मा!) पाहिला होता.
राजश्री प्रॉडक्शनचा छाप असलेल्या काही गोष्टी,
उदा. बहिणीला जीजी म्हणणे, बाळबोध मुलगी असल्याचे दाखवणे, करीनाला अजिबात सूट करत नव्हते. एकंदरीत सिनेमा अचाट नि अतर्क्यच...


Aashu29
Wednesday, December 12, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम कि दिवानी हुं काय अन मुझसे दोस्ती करोगे काय! एकच पठडि, overacting भरलेलि ठासुन नुसति, बाकि, श्र मी तर या साडिच्या सिनला खुप हसलेले, एरवि कधिहि साडि नेसत नाहि बया आणि तेव्हाच बरी येते साडि नेसुन, आणी चांगलि घट्ट वर नेसुन यायला काय होते साडि, अभ्यास करताना केस कशाला मोकळे म्हणते मी!!


Sadda
Wednesday, December 12, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग श्र तुच लिही.. तु मस्त लिहितेस..
बाळबोध मुलगी असल्याचे दाखवणे आणि अचानक नंतर इतकी शहाणी होते की काही विचारु नका.. आणि ह्रितिक म्हणजे कोई मिल गया तुन बाहेरच नाही आलेला त्यात.. :-)


Meenu
Wednesday, December 12, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र तु जोगवा मागितलास गडावर म्हणुन लिहीतेय
सहीच तुझा रीव्ह्यू.


Manuswini
Wednesday, December 12, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, हे आणखी ज्यास्त तू फुलवू शकली असतीस. पक्का टाईमपास झाला वाचून :-)
तो विवाह असाच अचाट अतर्क्य मूवी होता बडजात्याचा, उगाच लाजणे काय ने काय त्या अमृता रावचे.............


Lopamudraa
Wednesday, December 12, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकडे भांडणाचं हे असलं कारण पाहून मी नि मैत्रीण गार....) >.mi pan baghavaa laagel अजुन काही सिनेमांची नावे देते श्र.. एक म्हणजे हे सिनेमे पाहिले नाहियेत आणि नावे ऐकुन यात नक्कि काय दाखवले असेल असा विचार येतो:-) "कसम पैदा करने वालेकी, अर्जुन पंडीत" नावे ऐकुनच गार होतो आपण ०

Farend
Wednesday, December 12, 2007 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, घाईघाईत लिहिल्यासारखे वाटले. अजून जरा डीटेल्स असतील तर टाक. व्हिलन नाही, प्रेमाचा त्रिकोण नाही मग भांडण काढणे आणि ते मिटवणे यात काहीतरी अचाट प्रकार असेल पण तो कळला नाही. काळी साडी... संक्रांत असेल त्या दिवशी आपल्याला काय माहीत :-)

फ़रदीन तर मला कोणत्याच चित्रपटात विशेष वाटला नाही. ते एकदा बापासारखे काउबॉय हॅट घालून घोड्यावरून प्रत्येक चित्रपटात फिरून बघ जमतेय का म्हणावं.

आणि ते कॉलेजातील आचरट प्रोफेसर्स वर कोणीतरी अभ्यास वगैरे करून लिहायला पाहिजे, पण 'नसीब' मधील कबड्डीचे रेकॉर्ड कोणीही मोडणार नाही बहुतेक :-)


Prajaktad
Wednesday, December 12, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अक्षय खन्ना आणी नगमाची बहिण हिरविन असलेला एक असाच पकावु चित्रपट होता...'डोलि सजा के रखना'

Lopamudraa
Wednesday, December 12, 2007 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते कॉलेजातील आचरट प्रोफेसर्स वर कोणीतरी अभ्यास वगैरे करून लिहायला पाहिजे,>> farendहो ना हिंदी सिनेमात प्रोफ़ेसर म्हणजे कठिणच मै हु नाचा प्र्न्सिपल, आणि अजुन कोणता तो ज्यात राणी मुखर्जीचे वडील प्रिन्सिपल असतात. त्यात ती ओम जय जगदीश हरे गाणे म्हणते?? ब-याच सिनेमात प्रोफ़ेसोर फ़ार भयानक दाखवलेत.

Divya
Wednesday, December 12, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, तो कुछ कुछ होता है.

Lopamudraa
Wednesday, December 12, 2007 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बरोबर दिव्या, तोच तो.. अग माझ्यकडन तो सिनेमा पुर्ण बघितलाच गेला नाही. आठ वर्षाची मुलगी आइचे पत्र वाचुन काय काय करते??? हे अस शक्य आहे का कधी??

Divya
Wednesday, December 12, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, त्यातला राणीचा गेस बघ ना नुकतीच बाळंतीण झालेली आणि तिने केवढ्या confidance नी पत्र लिहीली तिच्या त्या वेळी बाळ असलेल्या मुलीला कि बापाला affair मधे मदत कर म्हणुन. वर बाप मैत्रीणीचे नाव विसरुन जाउ नये म्हणुन स्वताच्या मुलीचे नावही तेच ठेवते काहीही.

Lopamudraa
Wednesday, December 12, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या .. .. .. ...

Divya
Wednesday, December 12, 2007 - 8:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा खुशी बघीतलाच नाहीये पण बघते आता. श्रद्धा छान लिहीतेस तु.

त्याने आपली कंबर बघितली म्हणून......
.... visualization करुनही कळेना नक्की भांडायच काय कारण असु शकेल.


Sunidhee
Wednesday, December 12, 2007 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रध्धा, तुझा हा रिव्ह्यु सिनेमापेक्षा चांगला आहे गं. बाप रे त्या सिनेमात ती करीना सतत ओरडत बोलली आहे. जसा काही आवाज बसण्याच्या ऐवजी उठला होता आणि म्हणुन ओरडावे लागले होते. इतके ओरडणे ऐकून आपल्याला शेवटी रागच यायला लागतो पण डोके इतके फिरून जाते की राग पण कोणाचा येतोय ते कळेनासे होते आणि काहीच लक्षात राहिनासे होते.. ह्या सर्वातून जाऊन श्रध्धा ला इतके आठवते आहे?? कोऊतुक आहे. क वर २ मात्रा कशा द्याव्यात?
दिव्या.. KKHH .. कस बोललीस अगदी.. :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators