Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नकार!

Hitguj » My Experience » नकार! « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 15, 200720 12-15-07  6:39 am
Archive through December 26, 200720 12-26-07  10:41 am

Gsumit
Wednesday, December 26, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm , माझ्या लिहिण्यातुन थोडासा चुकिचा अर्थ निघतोय... मित्रांना गांभिर्य असते पण म्हणुन आपण त्यांना किती वेळा त्रास देणार तेच तेच सांगुन, शेवटी ज्याचे-त्यालाच सहन करावे लागते...

मित्रांनाही त्यांचे प्रॉब्लेम्स असतातच ना...


Dineshvs
Thursday, December 27, 2007 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहि सुमित, ज्याना हक्काने त्रास देता येतो. आपला त्रास त्याना सांगावासा वाटतो, ते मित्र.
बाकिचे श्रोते.
मला त्या अर्थाने मित्र व्हायला आवडते. मैत्री करायलाहि आवडते.


Gsumit
Thursday, December 27, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm खरय दिनेशजी... :-) तुमचे सुद्धा

Sanskruti
Friday, December 28, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते सर्वजन.,
दिनेशजी मी सहमत.
भाऊसाहेब पाट्न्करान्चा एक शेर.
रडलो आम्ही इश्कात, जेव्हा आम्हा रडावे वाटले,
तेव्हा नव्हे इश्कास, जेव्ह आम्ही रडावे वाटले,
आसवावरी अधीकार हाही इश्काअत ज्याला साधला,
नुसताच नाही इश्क त्याला मोक्श आहे साधला.
वरील पोस्त वाचुन एक शेर आठ्वला.ज़िन्दादिल वाचावे सर्वानी असेच आहे.


Nilima_v
Friday, December 28, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकाराची खंत रहतेच पण त्यापेक्षा जास्त खंत रहाते कधीच न विचारण्याची. या BB वर बरेच जणांचे मत दिसले की नकाराचा आदर करावा. मला काही मते ही खुपच "कॉपीड" वाटतात (दिवे घ्या कारण मी बरेचदा स्वत:ला जज बनवतो), त्यातलेच हे एक मत. नकार देणार्या व्याक्तिचा आदर करणे ठीक आहे,
नकाराचा आदर कशाला करायचा?

ट्राय करत रहा जोपर्यंत त्या व्यक्तिला त्रास होत नाही.
योगेशचे उदाहरण पहा, जेव्हा पुन्हा पुन्हा ट्राय करायचा असतो तेव्हा विनोदाचा वापर करावा, म्हणजे दुसर्या व्यक्तिला त्रास होत नाही आणि आपला पण चान्स रहातो.
बरेचदा आपल्याला नकार मिळतो याचे खरे कारण दुसरी व्यक्ति आपल्याला सांगत नाही कारण तिला आपली मैत्री प्यारी असते पण आपल्यातले काही दोष खटकतात. अशा वेळी ग़्रुप थेरपी वापरावी.
आपला जो कॉमन ग़्रुप आहे(किंवा कॉमन फ़्रेंड्स आहेत) त्यांच्याकदून जाणण्याचा प्रयत्न करावा, की काय त्या व्यक्तिला पसंत नाही.
मग ती इनकॉम्पॅटिबिलिटी आपल्याला पटली तर तिचा नाद सोदुन द्यावा.
ज़र पटली नाही तर त्या व्यक्तिला आपला द्रुष्टिकोन पटवायचा हळुवार(हे महत्वाचे) प्रयत्न चालू ठेवावा.

ही सर्व वैयक्तिक मते आहेत. ग़्रुप थेरपी बॅक फ़ायर होउ शकते मित्र विश्वासु नसतील तर. यात काहे रिस्क्स आहेतच पण मला वाटते की अयशस्वी झालात तर खंत जास्त रहाणार नाही.


Gsumit
Friday, December 28, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आज एक छान मेल आला याव विषयाशीच संबंधित.....

adjustment...

Preetib
Friday, December 28, 2007 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nilima,

Tu khup sundar lihila aahes ani ekdam pramanik lihila aahes.
Ya group therapy cha fayda nakki hoto..but depends on your friend circle.

Ajun ek, Nakar aala ki fakta haar manun gappa basu naye. Tyacha sagla bajuni vichar karawa, tyachi karana tapasun ghyawit.

At a point, we found that the reasons r wronge and doesn't hold any value. Then don't blame yourself why we go through this.

Its important to understand other person mindset which helps us to understand the situation better.

Finally treat it as Learning experiance in Life.



Trish
Wednesday, January 09, 2008 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>मित्रांना गांभिर्य असते पण म्हणुन आपण त्यांना किती वेळा त्रास देणार तेच तेच सांगुन, शेवटी ज्याचे-त्यालाच सहन करावे लागते...

मैत्रीला जर का खरोखरच काही वाटत असेल तर तो मदत करतोच, नाही तर मग हा चेस्टेचा विषय ही होऊ शकतो, शेवटी आपल्याला जर आपल्या मित्रावर विशवास असेल तरच त्याची मदत घ्यावी. तसे मित्राला हक्काने काही सांगितले तर काही त्याला त्रास होत नाही उलटे आपलेच मन हलके होते. पण जर का स्वताच जर का आपण स्वताला सावरू शकलो तर ते उत्तमच, अणि दुसरयांन पेक्षा आपण नेहमी स्वतः स्वतःला जास्त चांगले inspired करू शकतो असे मला वाटते.

> ट्राय करत रहा जोपर्यंत त्या व्यक्तिला त्रास होत नाही
हे कधी कधी अति होऊ शकते!

> treat it as Learning experiance
खरे आहे, नकारातुन खुप काही शिकण्या सारखे असते. थोड़े चिंतन करावे की सर्व प्रश्नाची उत्तरे आपोआप मिळतात. हे दिवस पण आपल्याला एक नविन दिशा देऊ शकतात, फ़क्त सकरातान्मक विचार करावा...

कालच वपुंचे मायाबाजार वाचले, कथा नेहमी प्रमाने मनाला असंख्य विचार देऊन गेली...
खास करून ही वाक्य :

"सगळे वार परवता येतात; पण अहंकरावर झालेला वार परतवता येत नाही..."

"सुख कधी संपत नाहीत ती नित्य नवी उगवतात. सुकलेल्या फुलाना टाकाण्याचे धेर्य फ़क्त आपल्या जवळ हंव. नव्या सुखाना जागा करून दिली की ती न बोलावता येतात."

शेवटी आपला मार्ग आपणाच नीवडतो, जाणारा कधीच दूर निघून गेलेला असतो बरोबर असते ती फ़क्त त्याच्या सहवासची अठावण ती ही आपण काढतो!


Anaghavn
Thursday, January 10, 2008 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा खरय. सुमित, वेळच्या वेळी cheking करत रहा बहिणी चं काहीच problem येणार नाही. आणि मनातली भिती सगळेच जण काढुन टाका. pentient ला नेहमीच जास्त दिसत असत. तुमच्या डोळ्यातली भिती तिला दिसत नसेल का? त्याने ती जास्त व्याकुळ होईल. सांगण सोप्प आणि आमलात आणण कठिण पण तरीही सांगते, भितीच्या डोळ्यात डोळे घालुन बघा, तिलाच भिती वाटेल तुमची.
आल्या प्रसंगाला निधडेपणाने सरळ मान ताठ करुन सामोरे जा. त्याने तिला खुपच बळ येईल. आणि cancer मध्ये हेच खुप महत्वाचं आहे. petient जितका आनंदी आणि ओपन असेल (भितिच्या द्रुष्टिने म्हणतेय मी) तितका तो safe .
हे सगळं करण्याची अक्कल त्यावेळी मला नव्हती. किंवा कदाचित त्यावेळी ती माझी कुवत नव्हती. पण तुला हे सगळं जाणवतय तु हे सगळं करु शकशील. लोक कदाचीत म्हणतील की cancer बरा होऊ शकत नाही. अशा लोकांच्या "नानाची टांग"... असं बोलुन लोक फ़क्त petient आणि त्याच्या नातेवाईकांचं खच्चीकरण करतात. cancer बरा होइल की नाही हे Dr. ठरवतील लोक नाही. आणि कसं जगायचं ते आपण.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators