|
Yog
| |
| Thursday, December 06, 2007 - 2:34 am: |
| 
|
पण दुसरी कुठलीच पध्दत नाही >>ते कसे काय बुवा..? आजपर्यन्त काय स्पर्धा झाल्याच नाहीत का कधी? सन्गीत परिक्षक संस्था नाहीत का..? आणी शेवटी सगळाच sms चा खेळ आहे तर कुणीही का परिक्षक असेना.. काय फ़रक पडतो? उद्या धोणीलाही बोलावतील परिक्षक म्हणून. रामदेव बाबानाही बोलवायला हरकत नाही. 
|
Manuswini
| |
| Thursday, December 06, 2007 - 3:07 am: |
| 
|
कपीलदेव नाही का आला मग धोणीने काय घोडे मारलेय (असे मी नाही जनता म्हणेल especially dhoNee supporters .. ) आणि रामदेव supporters म्हणतील,त्याने काय पाप केलेय म्हणून तो का नाही शेवटी काय झी सांगेल तीच acting करायची आहे ना ह्यांना.
|
Dineshvs
| |
| Thursday, December 06, 2007 - 3:25 am: |
| 
|
हि SMS पद्धत परिक्षकांचा छान पाण ऊतारा करते नाही ? झलक मधे ते खुपदा बघायला मिळते. अर्थात नेगी सारखे स्पर्धक अजुन का टिकुन आहेत ते कळत नाही. संध्याची एक्स्प्रेशन्स वाईट असतात पण ती नाच छानच करते. तिच्यापेक्षा तिचा जोडीदार उत्तम नर्तक आहे. एखाद्याच्या हरण्याचा असा सोहळा बघुन मला किव येते. आपण ग्लॅडिएटरच्या जमान्यात परत जात आहोत का ? हरणार्या स्पर्धकावर स्पॉटलाईट ठेवून, नेमका कुठला असुरी आनंद मिळतोय, प्रेक्षकाना. अगदी पुर्वी दक्षिण अमेरिकेत आणि आपल्याकडेही नरबळी, सती जाणे वगैरे प्रकार होते, त्याची आठवण येते. ( म्हणजे त्या प्रसंगाच्या वर्णनांची. ) मनोरंजनाचा दर्जा इतका खाली जावा ? का अमेरिकेत होते म्हणुन आपणही असले शो करायचे आणि पहायचे ? स्पर्धेला ना नाही, उत्तम कलाकार पुढे यावेत हेहि खरे. त्यासाठी जाणकार परिक्षक हवेतच, पण SMS चा खेळ नको. उद्या क्रिकेटमधलेही निर्णय, SMS ने मागतील. कर्णधार कोण, आधी कुणी खेळायचे, आणि कुणी हरायचे ते देखील SMS ने ठरवु !!!
|
उलट सोनाली आधीच जायला हवी होती ! तिच्या पेक्षा किती तरी पटींनी चांगल्या सुधा - प्राची eliminate झाल्या . आणि रोनित रॉय पण गेला का ?? सोनाली उगीचच त्या टॉबी मुळे टिकून होती .
|
Meggi
| |
| Thursday, December 06, 2007 - 4:56 am: |
| 
|
सोनाली गेली हे छान झालं. आता फ़क्त नेगी गेला पाहिजे. प्रेक्षक आणि त्यांची partner पण सुटेल. मिका, नेगी आणि सोनाली यांच्या partners ची मला दया यायची.. त्यादिवशी ' आपने इतना easy dance क्यूं किया ' असं शामक ने विचारल्यावर, नेगी म्हणाला, ' एक हफ्तेमे दो dance करने थे, ये आपको भी समझना चाहिये ' .. जसं काही या एकट्यालाचं २ dance करायचे होते. प्राची ने एकदम ' खल्लास ' dance केला. ती जिंकावी अस वाटतयं मला.. संध्याचा dance चांगला असतो, पण ती चिडल्यासारखी दिसते नेहमी. जय - बिंदी ची जोडी पण छान आहे.
|
Giriraj
| |
| Thursday, December 06, 2007 - 5:35 am: |
| 
|
रामदेव बाबांना बोलावल्यास ते श्वासाचा आवाज न करता श्वास कसा घ्यायचा हे तरि शिकवतिल या गायकांना!
|
Manjud
| |
| Thursday, December 06, 2007 - 5:53 am: |
| 
|
केदार, योग, दिनेशदा..... गिरी, तुला २१ मोदक..........
|
Dakshina
| |
| Thursday, December 06, 2007 - 5:55 am: |
| 
|
तुम्ही लोक, हास्यसम्राट पहाता का? त्यात हे एक दोन कलाकार खरंच अगदी फ़ार चांगलं perform करतात. एक संतोष शिंदे (कोल्हापूर) आणि सदानंद कोष्टी (सांगली) त्यांची अस्सल कोल्हापूर - सांगलीची भाषा खूप भावते. माझ्यामते सदानंद कोष्टी आणि संतोष या दोघातच खरी चुरस आहे.
|
ते कसे काय बुवा..? आजपर्यन्त काय स्पर्धा झाल्याच नाहीत का कधी? सन्गीत परिक्षक संस्था नाहीत का..? >> आहेत ना. पण एक तरी तशी स्पर्धा TV वर झाली आहे का? (आजच्या युगातील टिव्ही वर). मग त्या स्पर्धेत असे किती स्पर्धक फेमस झाले? मागे अंताक्षरी असायची. नंतर सोनी ने गुरुकुल आनले पण ते स्पर्धकांपेक्षा त्यांचा गुरु मधील वादामुळे प्रसिध्द झाले. मूळात ही वा अशा इतर स्पर्धा गायक घडवत नाहीत तर असलेल्या कलागुणांना लोकांसमोर मांडन्याची संधी व क्वचीत त्यांना प्रसिध्दीही देते. अन तो महागायक होतो. याचा अर्थ तो खरा महागायक आहे असा कधीच होनार नाही निदान शास्त्रीय साठी तर नाहीच नाही. सोनु, कुनाल जेव्हा स्पर्धक होते तो काळ अन आजचा काळ यात भरपुर फरक असल्या (झाल्या, निर्मान केल्या) मुळे आता गुरुकुल वा संगीत परिक्षक संस्थाना आणले तर कोणी पाहानार नाही फक्त आपल्या सारखे काही हजार लोकच पाहातील अन ते टिव्ही च्यानल चालवनार्यांना परवडनारे नाही. नाहीतर त्या दर मिनीटाला प्रत्येक च्यानल वर येनार्या सांस बहु मालीका केव्हाच थांबल्या असत्या. पण पब्लीक डिमांड है भाई. 
|
Monakshi
| |
| Thursday, December 06, 2007 - 6:18 am: |
| 
|
दक्षिणा एक दुरुस्ती. तो सदानंद नसून अजितकुमार कोष्टी असं त्याचं नाव आहे. अप्रतिम performance आहे त्याचा. आणि विशेष म्हणजे हा प्रोफेसर आहे economics चा. मला मिर्झा बेग आणि दिपक देशपांडेंचे विनोद जास्त आवडतात.
|
Zakasrao
| |
| Thursday, December 06, 2007 - 11:45 am: |
| 
|
मी पाहतो अध्ये मध्ये हास्य सम्राट त्यातले खास कोल्हापुरि शब्द ऐकुन मजा वाटते पिंडकराम हा एक नमुना. मी विसरलोच होतो हा शब्द मोना दिपक देशपांडे हे एक प्रोफ़ेशनल अर्टिस्ट आहेत अस म्हणल तरी चालेल. त्यांची हास्यकल्लोळ नावाची एक कॅसेट आणि सीडी आहे बाजारात. ते प्रयोग पण करत असत ह्या कार्यक्रमाचा. आता माहित नाही पण आधी तर होत होता. त्यांनी इकडे बरेचसे विनोद तेच सिडिमधुन रिपिट केले आहेत. अर्थात क्वालिटि आहे त्यांच्याकडे. मला त्यानी सादर केलेल कुमार गंधरव यांच्या ष्टायलीतल "तुम पास आये" खुप आवडल. दक्षिणा अजुन एक जण होता कोल्हापुरचा कुलकर्णी म्हणुन होत. तो पण चांगला होता. कोष्टी यांची बोलण्याची ष्टाइल वेगळीच आहे.
|
Jadoo
| |
| Thursday, December 06, 2007 - 2:40 pm: |
| 
|
I agree Negi जायला हवे होते. पण जय आणि सोनाली मधे जय जायला हवा होता. तो नुसता हवेत उड्या मारल्या सारखा नाचतो. त्यामधे ताल काहि फ़ार दिसत नाही. सोनाली ची प्रगति चांगलि होति.ती जरा slow वाटते कुठल्याहि dance मधे. प्राची आणि संध्या खरोखर चांगल्या नाचतात.त्यांच्या नाचामधे दम आहे असे वाटते.
|
Maitreyee
| |
| Thursday, December 06, 2007 - 2:55 pm: |
| 
|
प्राची, संध्या अन रोनित हवे होते फ़ायनल मधे. रोनित ग्रेसफ़ुल नाचायचा खर तर. सोनाली, मिका, नेगी जेवढे आले तेच फ़ार पुढेपर्यन्त आलेत! लिटल चॅंप्स पैकी मुले जास्त चांगली वाटत आहेत सगळ्या मुलींहून.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, December 06, 2007 - 3:00 pm: |
| 
|
ह्या हास्यसम्राट मध्येच कोष्टीने सांगितलेला जोक्: एक काडीपैलवान एका चांगल्या तगड्या पैलवानाला कुस्तीत हरवतो.. त्या तगड्या पैलवानाला विचारलं की "का रे तू एवढा तगडा, तू कसा काय हरलास या काडीपैलवाना पुढे?". "काय करू हो.. मला SMS च कमी आले" - तगडा उत्तरला..
|
Yog
| |
| Thursday, December 06, 2007 - 8:51 pm: |
| 
|
केदारशेठ, आजकाल काहीही चालते, खपते. marketing/presentation चे तन्त्र जमले की काहिही खपू शकते. त्याच न्यायाने चान्गल्या सन्गीत संस्थान्च्या स्पर्धाही होतील लोकप्रीय. demand supply मान्य आहे पण म्हणून आधुनिकतेच्या नावाखाली काहिही गोन्धळ? उद्या सर्व गाढवान्ची लाथा मारायची स्पर्धा tv वर घेवून मग त्यातून काय महागाढव निवडणार का..?निदान गाढव खरच लाथा मारते ही त्यातली reality तरी आहे. दीपिका पदुकोण (नक्की आडणाव काय आहे हा विषय इथल्या gossip bb वर चर्चेला घ्या )परिक्षक म्हणून आली तर असा महागाढव कार्यक्रम ही लोकप्रीय होईलच. तसच झुम इन्डीया हा कार्यक्रम म्हणजे काय आधुनिक कालात ज्ञानेश्वरानी (गायक mentors )रेड्याकडून (स्पर्धक) वेद म्हणवून घेतले असे म्हणायचे का? झुरळाने खाल्लेल्या पेटीच्या भात्यातून येतो तसा आवाज असणारे स्पर्धक गायन स्पर्धेत कशाला? मग भले ते tv वरील चान्गले कलाकार का असेनात.. talent पुढे येवू द्या ना चान्गलेच आहे पण त्याच वेळी कलेचा आदर ठेवायला हवा इतकीच अपेक्षा आहे. TV हे खूप प्रभावी माध्यम आहे, जे दाखवाल ते आम जनता घेईल. बाकी सावळा गोन्धळ सर्वत्रच आहे.. 
|
Dakshina
| |
| Friday, December 07, 2007 - 6:29 am: |
| 
|
मोना.. दुरुस्ती बद्दल धन्यवाद... कोष्टींचा अजुन एक अफ़लातून विनोद काल ऐकलेला.... ते स्वप्नात वर गेले, म्हणजे इंद्रलोकी... तिथे रावण बसलेला असतो.... तर ह्यांनी त्याला विचरलं 'रावण्या... बेन्या.... कसला इचार करायलायस?.... मी असली लोळले हसून..... बाप रे..! त्यांची उभं रहायची पद्धत, हातवारे अगदी अस्सल. अप्रतिम. त्यात कोल्हापूरची भाषा ऐकून... कान अजूनच तृप्त (?)
होतात...
|
Manjud
| |
| Friday, December 07, 2007 - 9:23 am: |
| 
|
झ, मोना दिपक देश्पांडे????
|
Monakshi
| |
| Friday, December 07, 2007 - 9:45 am: |
| 
|
का गं मंजू, काय झालं??? दिपक देशपांडेच आहेत. मी काही चुकीचं नाव सांगितलं का????
|
Dakshina
| |
| Friday, December 07, 2007 - 10:21 am: |
| 
|
मंजू, दीपक देशपांडेंबद्दल माझं पण काहीसं हेच मत आहे. अगं मोनाक्षी, त्यांचे विनोद Typical असतात गं. आणि तो मिर्झा बेग पण तसाच आहे. तेच तेच. कोष्तींकडे वेगळं असं काय आहे, ते नेमकं नाही सांगता येणार, पण दि.दे. चे विनोद हे अवास्तव वाटतात. उदा. कालच्या एपिसोड मध्ये त्यांनी तो २ कामगारंच्या मुलाखतीचा विनोद सांगितलेला. तर तुम्ही कुठे काम करता अस प्रश्नं विचारल्यावर मुलाखतदार कधी उध्धट्पणे उत्तर देईल का?
|
Manjud
| |
| Friday, December 07, 2007 - 12:24 pm: |
| 
|
ए मोने, झ मोना आणि दिपक देशपांडे मध्ये स्वल्पविराम नही टाकलाय.... मग मी कसं वाचायचं ते नाव? मी तो प्रोग्राम बघत नही......
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|