|
Maanus
| |
| Saturday, December 01, 2007 - 2:00 am: |
| 
|
Zee TV should be sued. आज मी ते लहान मुलांचे सारेगम पाहीले. child labour ला परवानगी नसताना, त्या लोकांनी एका लहान मुलीला तिथे हातात कसलीतरी थाळी घेवुन उभे केले होते. they had so many clowns there, any adult in clown dress could have easily done that job. anyway that competition doesnt make sense, at least throwing someone out part. whoever is not good to go in next round, you just ask them to be child judge or involve them in some back stage actives like recording studio and all. make sure they are part of that group till the end competition. throwing them out doesnt make sense.
|
Yog
| |
| Sunday, December 02, 2007 - 1:07 am: |
| 
|
hhmm . फ़ारच बारकाईने बघता वाटत? मग त्यातल्या बर्याचश्या चान्गल्या गोष्टि तुमच्या नजरेतून कशा सुटल्या..? to me the best aspect of the litlle champs is the guidance/suggestions/comments by Suresh Ji and Sonu. These two judges are far beyod and above the std of all other judges in other "masalaa" singing competitions... ह्या little champns नी त्यान्चे मार्गदर्शन घेतले तर खर्या अर्थाने सन्गीताची जाण होवू शकेल.. agreed that its tough for kids to be eliminated. but then its competition and this is one thing that parents should consider seriously. कधी कधी या वयात अशा गोष्टिन्चा मनावर खोलवर परिणाम होतो, तर काही मुले त्यातूनही पुढे जातात.. पण its sensitive issue. भारतात विशेषता गुरुकुल प्रथेत शिकणार्या मुलाना ठराविक वयापर्यन्त कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायला गुरून्ची परवानगी नसते.. त्यात मुख्यत्वे हाच दूरगामी विचार असतो. unfortunately times have changed.. everything is becoming fast paced and short lived. मग यश, अपयश एव्हडेच शिल्लक रहाते अन साधना व शिक्षण थोडे मागे पडते. असो. मराठी सारेगम मात्र सर्वच बाबतीत फ़ारच फ़िके वाटते.. आणि presentation च्या बाबतीत हा show अगदीच गुळमुळीत आहे.. असो.
|
दोन वर्षांपूर्वी त्याचा पुण्यात एक कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये त्याने लगानमधले "काले मेघा.." गायले होते. गाणे संपल्यावर त्याने सांगितले की मूव्हीमध्ये गाण्याच्या शेवटी ढग निघून जातात असं दाखवलंय पण समजा ते ढग त्या गावावर बरसले असते तर ते गाणं कसं झालं असतं?? आणि त्यानंतर तो जे गायला ना ते केवळ अशक्य होतं अक्षरशः पुढील पाच मिनिटे अंगावरचे रोमांच जात नव्हते.!! <<<<अगदी अगदी .. मागे एकदा इथे पण रेहमान च्या show मधे तो आला होता तेंव्हा ही तो हे ढगांचे effect गायला होता .. केवळ उच्च !
|
Giriraj
| |
| Monday, December 03, 2007 - 4:34 am: |
| 
|
9X या channel वर महा उस्ताद नावाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. कुणी पाहिला का? आठ established गायक गायिका यात भाग घेत आहेत.. पहिल्या भागात डूबा डूबा वाल्या मोहित चा performance आवडला. रुपकुमार चा तर खूपच अप्रतिम होता. त्याने 'सा रे गा मा' ची जी व्याख्या केली ती तर अगदी उच्च! कैलाश खेर ने 'तेरे नाम से जिलू,तेरे नाम पे मर जाऊ' गायलं. पण त्याला जी आक्टींग करायला लावली होती ती मला मूळीच आवडली नाही. खरी टक्कर रुपकुमार आणी त्याच्यात आहे असेच वाटते. जावेद अखतर आणि A.R. रेहमान परिक्षक म्हणून आहेत.
|
मी फ़क्त ट्रेलर पाहिलं त्या program चं , एकुणच professional singers चा मुकाबल्याची idea interesting वाटली आणि रेहमान judge आहे म्हणून अजुन च ! पण त्यातले नरेश अय्यर - महालक्ष्मी हे रेहमान च्या खास आवडीचे लोक आहेत 
|
Giriraj
| |
| Monday, December 03, 2007 - 10:17 am: |
| 
|
रंग दे मध्ये रेहमानने मोहितकडून 'खून चला' गावून घेतलं होतं. तो चवथा नरेश अय्यर आहे तर! आणि त्याच्याबरोबर कोण आहे ते कळले नाही!
|
श्रध्दा पंडित आहे एक , जतिन ललित पैकी कोणाची तरी पुतणी .
|
Arch
| |
| Monday, December 03, 2007 - 4:41 pm: |
| 
|
Deeps कुठे पहातेस ग हा कार्यक्रम? आपल्याकडे येतो हा channel? लहान मुलांच्या सा रे गा मावर सोहा फ़ारच गोड वागली. मुख्य म्हणजे पूर्ण हिंदीत बोलत होती. दिसलीपण गोड.
|
आर्च , भारत - दुबई मधे पाहिलं याचं ट्रेलर .
|
Me_sakhi
| |
| Monday, December 03, 2007 - 7:40 pm: |
| 
|
आजच्या सा रे ग म च्या भागात चैतन्य कुलकर्णी स्पर्धे बाहेर गेला. थोडेसे खटकलेच.देवकीच्या मते चैतन्यचा आवाज कमावलेला नाही पण तो अप्रतिम गातो. त्याने गायलेले "शब्दावाचुन कळले सारे" हे गाणे आज पर्यंत गायलेल्या सगळ्या गाण्यांमधे सर्वश्रेष्ठ होते म्हणायला हरकत नाहि. आज त्याने जाता जाता गायलेले "काटा रुते कुणाला" हे पण फ़ार छान झाले. आज चक्क सायली पानसे ३ क्रमांकावर फ़ेकली गेली जरा विचित्र वाटले. सायली ओक आज देखिल "हे श्यामसुंदर" गाताना गीताचे बोल विसरली.वैशाली मात्र dark horse प्रमाणे आज चक्क प्रथम क्रमांकावर आली. तिने "भरल आभाळ " ही बैठकीची लावणी गायल्या पासुन तिची घौडदौड चालू झाली म्हणायला हरकत नाही.सायली पानसेचे गाणे पहिल्या सारखे खुलत नाही, का कोण जाणे? अनिरुद्ध ने गायलेले "अवधुतचे मधुबाला श्रवणीय वाटले नाही. अनिरुद्ध जरा loud गातो. इतर सगळ्या channel वरिल स्पर्धांपेक्षा "सा रे ग म प" ने आपले साधेपण व मराठीपण जपले आहे आणि उगिचच judgements च्या नावाखाली melodrama नाही ही सगळ्यात चांगली बाब आहे. अतीरंजित काही नसल्यामुळे कार्यक्रम बघावासा वाटतो. "सखी"
|
Nakul
| |
| Monday, December 03, 2007 - 11:44 pm: |
| 
|
गिरी महा उस्ताद नाही रे मिशन उस्ताद. त्याचे विदेओ इथे पहा http://www.youtube.com/watch?v=VMVmWhTFwSI&feature=PlayList&p=4DBDC4671B5C79AF&index=0&playnext=1 mI naahii baghitalele ajUna.
|
Nkashi
| |
| Tuesday, December 04, 2007 - 9:59 am: |
| 
|
चैतन्य गेला ते वाईट झाल... त्यापेक्षा अनिरुध्द गेला असता तर बरे झाले असते ती सायली पानसे मला तरी नाही आवडत, वैशाली मस्तच अरे, कोणीतरी त्या पल्लवीला सांगा "तुला कसे वाटते?" विचारणे सोड. अख्ख्या एपिसोड मद्ये जवळ्-जवळ 15-20 वेळा विचारुन हैराण करुन सोडते....
|
Manuswini
| |
| Tuesday, December 04, 2007 - 5:41 pm: |
| 
|
nkashi, तुच का नाही जावून सांगत ( just kidding ). हो तेच, दर गाण्याला 'आता कसे वाटते'? आधी कसे वाटत होते? पण इथे ती बरी दिसते. कपडे पण बरी घालते. पण हिंदी अंताशरी काय कपडे घालायची,त्यात जाडी होती. बहुधा हिंदी अंताशरीची dress designer horrible असावी, आता हिमानी काय horrible कपडे घालते. (हे अंताशरी कसे लिहितात मराठीत, काय्तरी चुकतेय कळते पण नक्की समजत नाही.)?
|
Tiu
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:54 pm: |
| 
|
a.ntAkSharI | अंताक्षरी .. ..
|
Mandarnk
| |
| Tuesday, December 04, 2007 - 7:36 pm: |
| 
|
अजून सोप्पं : a.ntAxarI | अंताक्षरी .. .. 
|
Manuswini
| |
| Tuesday, December 04, 2007 - 8:29 pm: |
| 
|
thanks tiu, mandark (चार शब्द कसे लिहायचे...)
|
Dineshvs
| |
| Wednesday, December 05, 2007 - 6:07 am: |
| 
|
तुम्ही सगळे चर्चा कराताहात म्हणुन मी कधी नव्हे तो हा कार्यक्रम काल बघितला. एका मुलाने सुहास्य तुझे हे कृष्णार्जुन युद्ध या सिनेमातले दिनानाथांचे गाणे गायले. ते नंतर पंडित जितेंद्र अभिषेकी नी आणि सुरेश वाडकरनेही गायले. तिघांची रित वेगवेगळी. कालच्या मुलाची गायकी बरिचशी सुरेश वाडकरसारखी होती. नंतर एका मुलीने, मी मज हरपुन बसले गं, हे आशाचे गाणे गायले. या गाण्याच्या चालीवर सुहास्य तुझेच्या चालीची दाट छाया आहे. आशाचा प्रत्येक गं चा उच्चार सुंदर आहे आणि तिच्या शेवटच्या दोन ताना तर वीजेसारख्या चमकुन जातात. कालच्या मुलीला त्या अजिबातच जमल्या नाहीत, पण तिची सगळ्यानीच तारिफ़ केली !!! या स्पर्धेत अंतिम फ़ेरीत आलेल्या कलाकाराची तयारी एवढीही नसावी ! मला मान्य आहे कि आशाची तान हि अगदी दाणेदार असते, त्या तानेची कॉपी करणे सोपे नाही. पण कालची तान अगदीच कळाहीन होती. मग हि स्पर्धा कसली आहे, गायनाची, अभिनयाची, चांगले दिसण्याची, पल्लवीच्या लाडेलाडे बोलण्याची, कि देवकी च्या विश्लेषणाची ? कमलाकर नाडकर्णीनी अलिकडे लिहिले होते कि समर्थ कलाकराना परिक्षक बनवुन त्यांचे गायनच बंद केलेय. वसुधा कोमकलि, आरती अंकलीकरानी दाखवलेली झलकही कुठल्याची स्पर्धकाला त्यांचे स्थान दाखवणारी होती. मग त्या कलाकारानच मनसोक्त का नाही गाऊ दिले ?
|
Manjud
| |
| Wednesday, December 05, 2007 - 9:46 am: |
| 
|
दिनेशदा, तुम्ही ज्या मुलाबद्दल म्हणताय त्याचं नाव अनिरुद्ध जोशी. आणि ज्या मुलीबद्दल बोलताय ती सायली ओक. ही सायली ओक अश्विनी भिडे देशपांडेची शिष्या आहे. केवळ मराठी गाणी ऐकायला मिळतात म्हणून मी हा कार्यक्रम बघते. ह्याच्या रीझल्ट्सची किंवा महागायक कोण होणार ह्याची किंचीतही उत्सुकता मला नसते. मुळात प्रेक्षकांचा कौल घेऊन विजेता ठरवणं इतकं पारदर्शक आहे का? हा प्रश्न मला अनेकदा पडतो. स्पर्धकाना येणारे sms , त्याची गणना, मोबाईल कंपन्याना व चॅनलला त्याचा होणारा फायदा ह्या सगळ्याच बाबी अगम्य आहेत. कशावरून ते चॅनलच अर्ध्याहून अधिक sms त्याना ज्या स्पर्धकाला जिंकवायचय त्याला पाठवत असेल? इथे बोलावण्यात येणारे परीक्षक ही अजूनच हास्यास्पद गोष्ट आहे. आता फायनलला गौतम राजाध्यक्ष, अशोक सराफ, केदार शिंदे ह्याना बोलावण्याचं प्रयोजन मला कळलंच नाही. त्याना गाण्याची उत्तम जाण वगैरे असेल हो मग त्याना प्रिलिम्सना बोलवा ना. प्रिलिम्सना पद्मजा फेणाणी, सुरेश तळवलकरांसारखे परीक्षक आणि फायनल्सना हे. मग तुम्ही विजेता आधीच ठरला आहे या लोकांच्या मताला पुष्टी देता ना..........
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 05, 2007 - 8:34 pm: |
| 
|
नाही मंजु. प्रिलीम्स ला चांगले जज यासाठी की भाग घेतलेल्या लोकांमधुन त्यांना त्यातल्या त्यात चांगले लोक निवडता यावेत. शेवटी कोणालाही बोलावले तरी चालते कारण SMS च विजेता ठरवतात. ही पध्दत चांगली आहे का? नाही. पण दुसरी कुठलीच पध्दत नाही. सायली पानसे व वैशाली त्यातल्या त्यात चांगल्या गायीका आहेत.
|
Jadoo
| |
| Thursday, December 06, 2007 - 12:41 am: |
| 
|
झलक मधुन सोनाली गेली... वाईट वाटले ज़य गेला असता तर बरे झाले असते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|