Zakasrao
| |
| Wednesday, November 28, 2007 - 10:21 am: |
| 
|
काल मोनाने सांगितले म्हणुन मी तो प्रॉग्राम पाहिला. आणि नेमके कालच सगळे छान गायले शंकर साहेबानी बरेच टोमणे हाणले बाकीच्या प्रोग्राम्स ना! मला आता कोणाचीच नाव पाठ नाहित पण सगळेच छान गायले. शेवटचे मितवा जास्तच आवडले
|
Mansmi18
| |
| Wednesday, November 28, 2007 - 1:40 pm: |
| 
|
planetvu.com सुरु झाले का?? हा episode online मिळेल का?
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, November 28, 2007 - 3:10 pm: |
| 
|
महेश, 'आओ ना' गाण्यात खूप मेलडी आहे आणि वैशालीचा आवाज थोडा शार्प आहे. कदाचित म्हणून 'ध' दिला असेल.>>तसं असेलही.. मला त्यातलं फारसं काही कळत नाही.. पण शंकर म्हणाला ना की रेकॉर्डिंगच्यावेळी तू नव्हतीस.. नाहीतर तुझ्याच कडून रेकॉर्ड करून घेतलं असतं.. निदान अशा कॉमेंट नंतर तरी तिला "नी" मिळेल असं वाटलं होतं.. अरे प्रेक्षकांना सुद्धा सामील करून घेतलंन् त्याने.. "मितवा"ने तर हंगामा करून कळस चढवला. माझ्या मते ही वैशालीच होईल महागायिका.. सुरुवातीला सायली पानसे वाटली होती महागायिका होईल म्हणून आणि तिला टक्कर देणारं कुणीच नाही असं ही वाटलं होतं पण आता सगळं चित्र बदललंय.. येस चैतन्य वीक आहे सगळ्यांच्यात.. त्या करंबेळकरणी ऐवजी हा बाहेर गेला असता तरी चाललं असतं.. मला शंकरचं कौतुक या साठी वाटतं की एवढा टॉप ला पोचून सुद्धा त्याने अजूनही मराठीची नाळ तोडलेली नाही.. मराठीत गातो काय.. अशा कार्यक्रमांना येतो काय.. खळेकाकांचा गौरव.. सगळंच भावलं मनाला त्याचं..
|
Tiu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:22 pm: |
| 
|
मला बघायचाय हा एपिसोड!!! कुठे ऑनलाइन मिळेल का?
|
Chinya1985
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:13 pm: |
| 
|
शंकर महादेवन मराठी सारेगमत????त्याला मराठी येत??मराठीत बोलला का???
|
Sayuri
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:52 pm: |
| 
|
यूट्युबवर आहेत ही सर्व गाणी. प्लेनेट्व्हीयू कधी चालू होणारे कुणास ठाऊक!
|
Nakul
| |
| Thursday, November 29, 2007 - 2:01 am: |
| 
|
तुमच्या कॉमेंटस वाचून मी बघितले यूत्यूबवरती सुरेखच गाणी म्हणली महदेवनकाकांचे बगळ्यांची माळ फ़ुले इतके बसले आहे कानात. बघायला ही घ्या लिंक http://www.youtube.com/profile_videos?user=ahonkan&p=r
|
Psg
| |
| Thursday, November 29, 2007 - 4:48 am: |
| 
|
शंकर महादेवन मराठी सारेगमत????त्याला मराठी येत??मराठीत बोलला का??? चिन्या, शंकर मुंबईकर आहे. तो ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे त्याच्या वयाच्या १२व्या वर्षापासून गाणं शिकला. ते त्याचे गुरु आहेत. त्याने तर परवा मान्य केलं की खळेकाकांच्या संगीताचा खूप प्रभाव आहे त्याच्यावर. तो मराठी व्यवस्थित बोलू शकतो, आणि गातो तर अगदी मराठी गायकासारखा! नकुलनी दिलेली लिंक पहा, नाहीतर श्रीनिवास खळेंवर 'नक्षत्रांचे देणे' हा कार्यक्रम झाला होता त्याची vcd मिळव. आपण एका 'महादेवन'चा आवाज ऐकतोय आहे असं वाटतही नाही!
|
Bsk
| |
| Thursday, November 29, 2007 - 4:54 am: |
| 
|
thanks alot nakul! .. ..
|
Manuswini
| |
| Thursday, November 29, 2007 - 5:50 am: |
| 
|
शंकर महादेवन वाशीत रहातो(रहायचा). ९ १० वर्शापुर्वी तो वाशीत आला तेव्हा नुकताचा त्याचा कुठलातरी एक मूवीला दीलेले संगीत गाजले. तेव्हा कुठल्याश्या channel मुलाखत घेतली tv वर, एकदम simple नी छान माणुस वाटला मराठी एकदम उत्कृष्ट बोलत होता.
|
Abhi_
| |
| Thursday, November 29, 2007 - 7:43 am: |
| 
|
मराठी सा रे ग म बद्दल वरील सर्वांच्या मताशी सहमत. कदाचीत महाअंतीम फेरीसुद्धा एवढी चांगली होणार नाही एवढा हा भाग चांगला झाला. मंगळवारचा भाग हा खरच अविस्मरणीय होता. सर्वजण छान गायले. हिंदी गाण्याच्या फेरीत सायली ओक आणि चैतन्य थोडे घसरले होते मधे पण तरीही एकूणात छान गायले. शंकर महादेवन बद्दल काय बोलणार? तो कर्नाटकी शास्त्रीय संगीत शिकलेला आहे. तसेच तो रुद्र वीणा पण वाजवतो. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने खळे काकांनी संगीत दिलेल्या "राम श्याम गुणगान" या भजनांच्या रेकॉर्डमध्ये वीणा वाजवली आहे. यातील भजने पंडित भीमसेनजी आणि लता मंगेशकर यांनी गायली आहेत. लहानपणापासून मुंबईत राहिल्यामुळे तो मराठी चांगले बोलू शकतो. आणि (माझ्या माहितीप्रमाणे) त्याची बायको महाराष्ट्रीयन आहे. गाण्यातील सरगम गाताना तर तो कमाल करतो. दोन वर्षांपूर्वी त्याचा पुण्यात एक कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये त्याने लगानमधले "काले मेघा.." गायले होते. गाणे संपल्यावर त्याने सांगितले की मूव्हीमध्ये गाण्याच्या शेवटी ढग निघून जातात असं दाखवलंय पण समजा ते ढग त्या गावावर बरसले असते तर ते गाणं कसं झालं असतं?? आणि त्यानंतर तो जे गायला ना ते केवळ अशक्य होतं अक्षरशः पुढील पाच मिनिटे अंगावरचे रोमांच जात नव्हते.!! त्याचे परवाचे मितवा ऐकताना पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या झाल्या.
|
Giriraj
| |
| Thursday, November 29, 2007 - 7:51 am: |
| 
|
अरेरे,मी चुकवला तो एपिसोड! पुन्हा केव्हा होतो रिपीट?
|
Manjud
| |
| Thursday, November 29, 2007 - 8:49 am: |
| 
|
गिरीराज, शुक्रवारी सन्ध्याकळी ५.३० ला back to back लागतो. पण यात बहुतेक फक्त स्पर्धकांची गाणी असतात, परीक्षकांच्या कॉमेंट्स नसतात. आणि रविवारी संध्याकाळी ५ ते ७ दोन्ही एपिसोड्स सलग दाखवतात. अजिबात चुकवू नका. अभि म्हणतोय तसं महाअंतिम फेरी पण एवढी चांगली होणार नाही.
|
Nkashi
| |
| Thursday, November 29, 2007 - 8:56 am: |
| 
|
त्याला मराठी चांगल येत? पण तो तर हिंदीत बोलत होता अख्ख्या एपिसोड्मध्ये repeat शुक्रवारी back-to-back असते... 5.00pm बहुतेक
|
Mrdmahesh
| |
| Thursday, November 29, 2007 - 2:54 pm: |
| 
|
काशी, त्याने शो च्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की तो मराठीत बोलणार नाही म्हणून.. (चांगला बोलत असला तरी).. मी नर्व्हस होतो असं कारण दिलं त्याने... म्हणून अख्ख्या शो मध्ये तो हिंदी / इंग्लिश मध्येच बोलत होता...
|
तो मराठी व्यवस्थित बोलू शकतो, आणि गातो तर अगदी मराठी गायकासारखा! अरे वा!!!!सहिच!!!त्याला मराठी पिक्चरला गाणी द्यायला लावावित(म्हणजे पिक्चरवाल्यांनी तितके पैसे जमवावेत) म्हणजे नविन पिक्चर्सला तरी चांगली गाणी येतिल
|
Amruta
| |
| Thursday, November 29, 2007 - 5:19 pm: |
| 
|
नकुल thanks for the link, काय भन्नाट गायलाय शंकर महदेवन. मितवा मी ४,५ वेळा ऐकल. त्याच ऐकल्यावर पुढे अजुन काही ऐकलच नाहिये.. simply superb
|
Monakshi
| |
| Friday, November 30, 2007 - 5:19 am: |
| 
|
चिन्या, अगंबाई अरेच्च्या मधलं मन उधाण वार्याचे शंकरनीच गायलं आहे.
|
चिन्या, अगंबाई अरेच्च्या मधलं मन उधाण वार्याचे शंकरनीच गायलं आहे छान गाण आहे ते. पण माझ्यामते त्याने मराठि चित्रपटांना संगीत देण जास्त गरजेच आहे कारण आपले चित्रपट अजुनही जुन्या स्टाईलचीच गाणी बनवतात असे वाटते तरीही नविन चित्रपटात नविन स्टाइलची गाणी येत आहेत मात्र तेव्हढी भारी नाहीत. गोलमाल या चित्रपटात आजच्या युगातील गाणी आहेत. शंकर महादेवनने अनेक छान गाण्यांना संगित दिले आहे. तसेच मराठीतही जमवले तर बरे.
|
नकुलराव अनेक धन्यवाद. ते प्ल्यानेट व्हू गंडल्यामुळे यावेळेस मराठी सारेगमप पाहताच आल नाही.
|