|
३०० बघायचा धीर होत नव्ह्ता >> का रे? अँपोकलिप्टो बघेन आता. मागेही ऐकले होते.
|
सिन सिटी पण भारी होता. थोडा हटके होता खरा. सिन सिटीसाठी टॅरेंटिनोला गेस्ट डायरेक्टर असे क्रेडिट दिले आहेत. टॅरेंटिनो हा मी मगाच्या पोस्ट मध्ये उल्लेख केलेल्या रिझर्वॉयर डॉग्ज ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक. त्याचा आणखी एक जबरी पिक्चर पल्प फिक्शन.
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 27, 2007 - 3:48 am: |
| 
|
कालची CNN वरची माधुरीची मुलाखत बघितली का ? एक दो तीन, मेरा पिया घर आया, जोराजोरी चनेके खेत मे, अखियाँ मिलाये, के सेरा सेरा, मार डाला, सारख्या अनेक गाण्यांची झलक होती. यातल्या प्रत्येक गाण्याच्या चित्रिकरणाच्या आठवणी तिने सांगितल्या. तिच्याबद्दल हेमा, करण, यश, शाहरुख, आमिर, वैभवी, कुणाल असे अनेकजण बोलले. पण सगळ्यात सुंदर काय असेल तर तिने उस्फुर्तपणे दाखवलेली नृत्य झलक. तिच्या पायात हाय हिल्स होत्या. ड्रेसही तसा सोयीचा नव्हता. पण ते नृत्य सुरु करण्यापुर्वी चेहर्यावरचे भाव, चेहर्यावर थोडीशी भिती, स्टेजला केलेला नमस्कार, डोळ्यावरचा आडवा हात आणि ते नृत्य. सगळेच देखणे होते.
|
ए ब्यूटिफुल माइंड संपूर्ण चित्रपटामध्ये एकही कॅरॅक्टर रडारड, आक्रस्ताळेपणा, मेलोड्रामा करत नाही. कुठेही भावूक संवाद नाहीत. परंतु दरवेळी हा पिक्चर बघताना घशात आवंढा येतो. रसेल क्रो चा अत्यंत सहज अभिनय. अतिशय नैसर्गिक. ह्याचसारखा मिलियन डॉलर बेबी देखील कितीही वेळा बघितला तरी खिन्नता येते. ह्या चित्रपटामध्ये देखील कुठेही मेलोड्रमॅटीक संवाद, अभिनय नाही. आणि खरेतर असे करण्याला अतिशय वाव असुन देखील. केवळ तीन प्रमुख कॅरॅक्टर. विशेषत भाव खाउन जातो तो मॉर्गन फ्रिमन. दुसर्या हाफ मध्ये तर केवळ वेंटीलेटरचा आवाज आहे पार्श्वभूमीला.
|
Asami
| |
| Tuesday, November 27, 2007 - 6:51 pm: |
| 
|
३०० बघायचा धीर होत नव्ह्ता >> का रे? >> sin city मूळे. मला graphic contents चा problem नाही पण ते context मधे नसेल तर नुसताच texas chaain massacre होतो रे. Frank Miller is recognised for his graphic works. पण जिथे तो फ़ार philosophical बनतो (e.g. Daredevil, Electra etc) तिकडे माझ्या डोक्यात जातो. sin city मधे Benicio Del Tor, Rosario Dawson, Alexis Bledel अशि फ़ौज असूनही त्यात काही जान नाही असे वाटले मला. 300 तर मूळातच philosophical असणार हे उघड होते म्हणून बघायचा धीर होत नव्हता. ३०० चा director मला वाटते Zack Snyder होता. CBDG
|
Chinya1985
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:16 pm: |
| 
|
अरे इथे कोणी 'नो स्मोकिंग ' पाहिलाय का???पाहिला असल्यास मला जरा सांगा की चित्रपटात नक्की काय होते. मी पाहिला पण मला काहिच कळल नाही काय होत आहे ते.
|
नो स्मोकिंग हया चित्रपटामध्ये अनेक रुपके (मेटॅफर्स) वापरलेली आहेत. तसेच काफ्काच्या जोसेफ के चे काही सूक्ष्म (सटल) सुचके (रेफरन्सेस) आहेत. हा चित्रपट हे अनुराग बसुला आलेल्या अनेक अनुभवांचे सेल्फ इंडल्जंट (मराठी प्रतिशब्द सुचला नाही) चित्रण आहे. कळला तर कळला नाही तर सोडला ह्या प्रकारातला हा सिनेमा आहे. उदा: एखादी कविता जशी अनुभवावी लागते तसा हा चित्रपट देखील अनुभवावा लागतो.
|
Itgirl
| |
| Thursday, November 29, 2007 - 8:22 am: |
| 
|
शंतनू, ब्युटीफ़ुल माईंड खरेच सुरेख सिनेमा आहे, मलाही खूप आवडला. रसेल क्रो ने कमाल केली आहे. पहावा असा सिनेमा.
|
नो स्मोकिंग हया चित्रपटामध्ये अनेक रुपके (मेटॅफर्स) वापरलेली आहेत. अरे टन्या तु तरी काही समजेल असे लिही की!!!तो अनुराग बसु नाही अनुराग कश्यप आहे. त्या चित्रपटात दाखवलेले कसे काय होउ शकते??
|
Sonalisl
| |
| Thursday, November 29, 2007 - 11:14 pm: |
| 
|
No Smoking बघताना मलाही आघी उत्सुकता होती कि आता पुढे काय होईल...पण अर्धा movie झाल्यावर आपण काय बघतोय अन् का बघतोय तेच कळेना.
|
सॉरी, अनुराग कश्यप, बसु नाही. रुपकांचे एक उदाहरण म्हणजे: जेव्हा तो बाबा बंगालीला भेटायला जातो, तेव्हा तो अनेक पायर्या, मजले उतरत जमिनीच्या आत शिरताना दाखवला आहे. हे पाताळाचे एक रुपक असु शकते. बाबा बंगाली हा यमाचे रुपक असु शकतो. तसेच जेव्हा बाबा बंगाली म्हणतो की तु जगाच्या पाठीवर कुठेही सिगरेट पी, मला कळेल किंवा जेव्हा के सायबेरीयामध्ये अनेक विमाने बदलून जावून सिगरेट पीतो आणि तरीही बाबा बंगालीला कळते की त्याने सिगरेट प्यायली, हे एक प्रकारे माणुस जगाला एकवेळ फसवू शकतो पण स्वतला फसवू शकत नाही ह्याचे रुपक असु शकते. जॉन अब्राहमचे नाव के असण्याचे एक कारण जोसेफ के ला (काफ्काच्या ट्रायल ह्या कादंबरीतील मुख्य पात्र) दिग्दर्षकाचे अभिवादन (ट्रिब्युट) असु शकते. जगात कोएट्झी सारख्या साहित्यिकांनी देखील के ला ट्रिब्युट म्हणुन Life and Times of Michael K सारख्या अजरामर साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. के चा भाउ "जे", जो फक्त जर्मन भाषा बोलतो हे त्याचेच एक अजुन ठळक रुपक. मी सर्व ठिकाणी आहे ह्याऐवजी असु शकतो हा शब्दप्रयोग केला आहे कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे एखाद्या कवितेप्रमाणे हा चित्रपट प्रत्येकाला वेग-वेगळा उमजतो.
|
Slarti
| |
| Friday, November 30, 2007 - 5:43 am: |
| 
|
मला बाबा बंगाली हे त्याचे स्वतःचेच, त्याच्या अंतरात्म्याचे रूपक वाटले, म्हणजे पायर्या उतरत खोल जाणे हे स्वतःच्या आत जाऊन स्वतःचाच शोध घेणे असे वाटले. मग 'त्या' बाबा बंगालीला कोणीही फसवू शकत नाही आणि त्याच्यापासून काहीही लपू शकत नाही. अर्थात, तान्या म्हणतो तसे तो चित्रपट उमजण्यात व्यक्तिसापेक्ष फरक पडू शकतो.
|
Ajjuka
| |
| Friday, November 30, 2007 - 5:51 am: |
| 
|
बुद्धीला खुराक आहे तर आळेकर सरांच्या नाटकांसारखा.. बघायलाच हवा मग.
|
नो स्मोकिंग, महानिर्वाण आणि महापर्वच्या तोडीचा नसावा. मी दोनही नाटके बघितलेली नाहीत पण आईने ऐकवली आहेत.
|
टन्या,स्लार्ती आलं लक्षात. पण असा चित्रपट कधी बघितला नव्हता त्यामुळे कळला नाही मात्र अशावेळी बॅकग्राउंडमधुन काही कॉमेंटरी केली असती तर बर झाल असत. बराका नावाचा एक असाच चित्रपट पाहिला होता ज्यात एकही डायलॉग नाही मात्र अतिशय सुंदर चित्रपट आहे. त्याचा अर्थ नाही कळला तरी सुंदर निसर्ग पाहिल्याचा आनंद तरी मिळतो. अर्थात तो बुध्दिच्या पलिकडे जाउन stillness आणि presence मधे बघायचा चित्रपट आहे. दुसरी गोष्ट अशी की थोडीफ़ार रुपके जुळुन उपयोग नाही,चित्रपटातील होणार्या सर्व घटनांचा ताळमेळ लागतोय का हे महत्वाचे. आता तुमच्या स्टोरीप्रमाणे दोन बोटे जाण्याच्या मागच काय रुपक असाव??रणबीरची दोन तुटलेली बोट वापस कशी येतात??एक रुपयाच काय प्रकरण आहे??त्याचा अंतरात्मा कसा काय गायब होतो??आणि तरीही जॉन जिवंत कसा रहातो??एका विशिष्ट वेळी सिगरेट प्यायला का परवानगी असते??जर बाबा यम अथवा स्वत्:चे रुपक असेल तर तो इतके पैसे कशाला घेतो?? कृपया एक्-दोन ओळी न लिहिता पुर्ण स्टोरी सविस्तर समजवावी.
|
Jadhavad
| |
| Friday, November 30, 2007 - 5:17 pm: |
| 
|
आजा नच ले माधुरी चा ३र्ड come back म्हणून प्रसिद्धी केलेला हा मुव्ही म्हणजे माधुरी एके माधुरी आहे. नावाजलेले सिनेमाऑटोग्राफ़र आणि नवीन Director अशोक मेहता नी प्रत्येक फ़्रेम मध्ये माधुरी असेल ह्याची काळजी घेतली आहे. माधुरी ची तीच दिल खेच अदा, तेच सौंदर्य (आता क्लोज अप मध्ये wrincles दिसतात म्हणा), acting मधले बारकावे बघण्यासाठी हा मुव्ही नक्की बघावा. स्टोरी वगैरे आहे थोडीफ़ार, पण मी तर थिएटर ला १० डॉलर मध्ये फ़क्त माधुरी ला बघत होतो. अशोक मेहता नी तिची age line लपविण्याचा प्रयत्न केलाय, आणि लॉंग शॉट्स मध्ये तो सफ़ल ही झालाय, पण काही ठिकाणी ते जाणवतय. डायलॉग, कॉमेडी, स्टोरी साठी ऑनलाइन बघता येयील पण माधुरी चे कलर कॉम्बीनेशन आणि माधुरी चे भव्य सेट बघायला सबकुछ माधुरी असलेला हा प्रयत्न थिएटर मध्येच बघायला हवा. अमित १स्ट स्टार्ट दयावान मध्ये विनोद खन्ना बरोबर आणि ३र्ड स्टार्ट आजा नच ले मध्ये अक्षय खन्ना बरोबर, हा माधुरी चा विचित्र (?) संयोग असला पाहीजे.
|
Sonalisl
| |
| Friday, November 30, 2007 - 6:10 pm: |
| 
|
कृपया एक्-दोन ओळी न लिहिता पुर्ण स्टोरी सविस्तर समजवावी. .... खरंच कारण ती कळली तर पिक्चर पुन्हा बघावासा वाटेल
|
मी आधीच लिहिल्याप्रमाणे हा चित्रपट प्रत्येकाने स्वत उमजून घ्यावयाचा आहे. दोन लोकांना एकाच प्रकारे हा चित्रपट भावणार नाही. त्यामुळे संपुर्ण कथा समजावण्यात अर्थ नाही. जी २ बोटे कापली आहेत त्या बोटात सहसा सिगरेट पकडली जाते. गायब झालेला अंतरात्मा हा तडजोड केलेल्या माणसाची उपमा असावी. मायाजालावर बरेच चर्चागट ह्या चित्रपटाची चर्चा करताना दिसतील. तसेच पॅशन फॉर सिनेमा ह्या साइटवर अनुराग कष्यपचा ब्लॉग आहे बहुतेक. वाचाल तर वाचाल!!
|
Slarti
| |
| Saturday, December 01, 2007 - 2:35 am: |
| 
|
>> थोडीफ़ार रुपके जुळुन उपयोग नाही,चित्रपटातील होणार्या सर्व घटनांचा ताळमेळ लागतोय का हे महत्वाचे. एकदम बरोबर. त्यामुळे काही मूलभूत अशा प्रतिमा मनात धरून त्या अनुषंगाने चित्रपटातील घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करून बघ असे सुचवेन, माझ्या मते चित्रपटाचा आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेचा तो भाग आहे..... थोडा कल्पनाविस्तार लागतो (अज्जुका म्हणते तसा खुराक होतो) बरेच बारकावे कळतात, मजा येते..... असाच एक अपूर्व चित्रपट म्हणजे mulholland drive .
|
अरे टन्या तिथे तर त्याने नुसतीच क्रीटीक लोकांवर तोफ़ डागली आहे. बरच काही काही लिहिल आहे. कृपया त्याने जिथे स्टोरी समजावली आहे ती लिंक दे. पण क्रीटीक लोकांची मस्त काढली आहे. पण तो बाबा फ़ार ऍरोगंट आहे अस वाटत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|