Prajaktad
| |
| Tuesday, November 20, 2007 - 6:59 pm: |
| 
|
मिकाचा attitude पाहिला का आज पण .. गेला एकदाचा !! >>>मिका फ़ुका अकडुपणा करत होता..पण, त्याने चनेल वाल्यांना चांगलिच चपराक दिली आहे...सगळ vote bank वर ठेवायाच आणी मग चांगले कलाकार उडाले की गळे काढायचे.. public किती ढ!!.. between प्राची आणी सुधा ची wildcard entry ही परत एक शक्कल..जि सगळेच वापरत सुटलेत..
|
Deepanjali
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:27 am: |
| 
|
आणि wild card entries जिंकतात पण बरेचदा . सारेगमप मधे अनिक , झी सिनेस्टार कि खोज मधले पियुष - सबिना !
|
Aashu29
| |
| Wednesday, November 21, 2007 - 2:45 pm: |
| 
|
मी लेटेस्ट झलक पाहिले नाहि, wild card entry मधे तर एकच जण येतो ना? सुधा आणी प्राची दोघी कशा काय आल्यात?
|
Zakasrao
| |
| Wednesday, November 21, 2007 - 3:19 pm: |
| 
|
यत्या वीकेंडला माधुरि येतेय म्हणे नच ला सही दिसते आता. बरीच स्लिम झाली. आणि त्या आजा नचले मधल्या dance with me वरचा डान्स तर कसला सही आहे
|
Prajaktad
| |
| Wednesday, November 21, 2007 - 6:49 pm: |
| 
|
सुधा आणी प्राची दोघी कशा काय आल्यात? >>>> दोघींपैकी एकच परत येईल... पब्लिक voting दोघींसाठी ठेवलय..जिला जास्त वोट ती ईन..
|
Prajaktad
| |
| Friday, November 23, 2007 - 10:23 pm: |
| 
|
या शुक्रवारी नच बलिये मधे माधुरी विथ आजा नचले टिम होती... माधुरी काय सही दिसत होती?एकदम जबरी... must watch for madhuri fans
|
Dineshvs
| |
| Saturday, November 24, 2007 - 3:27 am: |
| 
|
CNN वर सोमवारी रात्री साडेदहा वाजता माधुरीची मुलाखत आहे. ती सुद्धा न चुकवण्यासारखी.
|
Psg
| |
| Saturday, November 24, 2007 - 4:53 am: |
| 
|
प्राजक्ता, 'नच'चा रीपीट कधी असतो माहित आहे? रविवारी दिडला असायचा पण आता वेळ बदलली आहे वाट्टं मी काल बघायची मिसले..
|
Zakasrao
| |
| Saturday, November 24, 2007 - 11:25 am: |
| 
|
मी काल बघायची मिसले.. >>>....... तु काय काल झलक बघत होती का?? तरि मी आधीच लिहुन ठेवले होते की ती येतेय म्हणुन बर रिपिट टेलेकास्ट सांगाच कधी आहे ते. मलही पहायचय
|
माझ्याकडे जास्तीच्या चेनेल्स नसल्याने, मी कम्प्युटरवर माधुरीची मुलाखत पाहिली. Please log on to www.apnicommunity.com . This is a website that carries quite a few popular shows from Indian T.V. channels. Once you become a member, access is totally free. Nach Baliye and quite a few popular shows and their most recent episodes are available to watch online. I hope this information is helpful .
|
Prajaktad
| |
| Saturday, November 24, 2007 - 5:33 pm: |
| 
|
पुनम इथे चेक कर.. www.indya.com or www.india-forums.com
|
Psg
| |
| Monday, November 26, 2007 - 7:15 am: |
| 
|
धन्स प्राजक्ता, लीली मी टीव्हीवरच पाहिला शेवटी.. रविवार दुपारी १२ पासून लावून ठेवला होता.. तेव्हा 'झलक' पाहिले आणि दीडला 'नच..' दोन्ही सही झाले.. रोनित आणि सन्ध्या मस्त. आणि माधुरी!!!!!! पुन्हा येणार आहे पुढच्या एपिसोडला
|
लिल चॅम्प्स चे सर्व एपिसोड्स बघण्यालायक होतात. मुख्य म्हणजे जज मंडळी काहीही नाटकीपणा करत नाहीत आणि मुलाना मार्गदर्शन पण छान करतात. पब्लिक व्होटिंग अजून तरी नाहिये आणि नसावं ही अपेक्षा.
|
Maitreyee
| |
| Monday, November 26, 2007 - 3:53 pm: |
| 
|
त्यात परवा त्या छोट्या पंजाबी मुलाने हिमेस ची नक्कल कसली सही केली! माझ्या माहितीप्रमाने त्यात पण काही सुरुवातीच्या फ़ेर्या सोडून नन्तर पब्लिक वोटिन्ग असणारच आहे. बिचार्या छोट्या मुलांना एलिमिनेट वगैरे झालेले पाहून फ़ार वाईट वाततं पण.. झलक.. मधे परवा सन्ध्या, प्राची, जय चे पर्फ़ॉर्मन्सेस छान झाले.
|
Bsk
| |
| Monday, November 26, 2007 - 7:16 pm: |
| 
|
रोहनप्रीत नी फारच सुंदर नक्कल केली हिमेशची! अगदि हातवार्यांसकट!! हेहे.. बाकी मला सगळीच मुलं अवडतात,मस्त गातात! पण तो आमिर हाफीज(असच नाव अहे न त्याचे?) फ़ार विसरतो गाताना,आणि सगळ्यात वाईट म्हणजे, फार वाईट चेहरे करून गातो! ती चिमणी वैशाली तर (उगीच) डोक्यात जाते, बाकीचे सगळे अप्रतीम!
|
Tiu
| |
| Tuesday, November 27, 2007 - 4:56 pm: |
| 
|
ती चिमणी वैशाली जायला हरकत नाही आता...उगीच ठेवलंय तिला! बाकी सगळे खरंच छान गातात. पण शुक्रवारच्या एपिसोड मधे बिचार्या मुलांना आशा भोसलेची गाणी दिली...फार वाट लागली गाता गाता सगळ्यांची! तो तन्मय चतुर्वेदी पण भारी character आहे एक...
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:49 am: |
| 
|
कालचा सारेगमप छान झाला.. वैशाली भैसने-माडेचं "आओ ना.." खूपच छान झालं तिला अवधूत ने "नी" ऐवजी "ध" का दिला ते कळलं नाही.. असो.. शंकर महादेवन सुप्पर्ब..
|
Psg
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:59 am: |
| 
|
खरंच.. आत्तापर्यंतचा सर्वोत्तम एपिसोड होता कालचा मराठी सारेगमप! सगळेच अप्रतिम गायले. वैशाली जिंकेल ही स्पर्धा. खरंतर आता सगळेच चांगले गायक आहेत. चैतन्य त्यातल्यात्यात वीक वाटतो, पण काल तोही जबरदस्त गायला. सगळ्यांना मार्क साधारण सारखेच पडलेत. आता sms वरच भवितव्य ठरणार.. हे सगळेच विनर होऊ शकतील असे आहेत! महेश, 'आओ ना' गाण्यात खूप मेलडी आहे आणि वैशालीचा आवाज थोडा शार्प आहे. कदाचित म्हणून 'ध' दिला असेल. आणि शंकर महादेवन तर सहीच आहे. त्याने तर मान्यच केलं की हिंदी टॅलंट शो पेक्षा मराठी टॅलंट जास्त चांगलं आहे, आणि मुख्य म्हणजे परिक्षक भांडत नाहीत! सायली ओक मस्त गाईल हिंदी गाणी असं वाटलं. आणि त्याने सादर केलेलं 'मितवा' तर अफलातूनच!!!! 'बगळ्यांची माळ' अजून थोडं गायला हवं होतं नाही?
|
Bsk
| |
| Wednesday, November 28, 2007 - 7:51 am: |
| 
|
मितवा काय होतं???? अशक्क्य सुंदर..!(कोणाला कुठे लिंक मिळाली तर द्या ना..) काल सगळेच छान गायले..मजा आली! ५ही जणं जाऊ नयेत असं वाटतं! बघू काय होतय!
|
Manjud
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:54 am: |
| 
|
कालचा सा रे ग म प सगळ्यात हीट एपिसोड होता. सुरूवात अप्रतिम आणि शेवट तर अहाहा!!! तो गुरू ठाकूर एवढा तरूण असेल असं वाटलं नव्हतं. अवधूतला काल कळलं असेल where does he stand . म्हणूनच एकदम गप्प झाला होता. चैतन्य आता over perform करायला लागलाय. सायली ओक सुनिधी चौहान स्टाईलने गायली तर मस्त जम बसेल तिचा. तिचा काल best performer चा चान्स घालवला शंकरने. वैशाली तर केवळ अप्रतीम.... खर्या गायकिचे सगळे sms तिला मिळायला हवेत. सायली पानसेला उगाच चढवून ठेवलय असं वाटतय. ती सुद्धा एकदम आढ्यतेखोरपणे गाते. 'बगळ्यांची माळ फुले' कानात अजून रुंजी घालतय. शंकर महादेवनवर जान कूर्बान!!!! त्याने श्रीनिवास खळ्यांच्या 'नक्षत्रांचे देणे' मध्ये 'लाजून हासणे' काय म्हटलं होतं. 'उगवला चंद्र पुनवेचा' पण सही म्हटलं होतं. कालचं शेवटचं 'मितवा' तर खासच होतं.
|