|
तरी बर्र वर तुच साधा सरळ रणबीर तीच्यात involve होता लिहिले आहेस .>>> पण रणबीर पोरीच्या बाबतीत "साधा भोळा" आहे असं कुठं म्हटलय. मी तर आधीच त्याला शम्मी च्या वाटेने जाणार हे सांगितलय. त्याचा बाबा पण काही धड नव्हता. नीतु सिंगने त्याला ताळवार आणला. तरी एकदा घटस्फ़ोटापर्यंत मजल गेलीच होती. चिन्या, ते sec c शूट झालं की फोटो टाकेनच. हो, त्याला माफ़क दाढी ठेवायचा सल्ला (मेकपमनने) दिलेलाच आहे. आणि ते केस न विंचरायचा पण.. आयला पण त्याचे केस काय सही सिल्की आहेत. एकदम मऊ आहेत. केसाना फ़ॉल पण मस्त आहे. चिना तुझे दोन प्रश्न कोणते?? दिव्या, हे क्लायंट लवकरच माझ्या हातून जावं हीच माझी इच्छा आहे. ते सेलेब्रीटी ग्लॅमर वगैरे ठीक आहे पण करीअरच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. आजचा नाही अजून पंधरा वीस वर्षानंतरचा विचार करायला हवा ना!!! युवी तसापण छपराच आहे. त्याचा आणि मॅच हरण्याचा काहीही संबंध नाही. मुलीना पटवण्यासाठी युवराजची ईमोशनल स्टोरी माहितेय?? (मॉड्स, नवीन बीबी उघडा ना तिथे हे फ़ालतु चर्चा करता येईल.)
|
Chinya1985
| |
| Thursday, November 22, 2007 - 10:41 am: |
| 
|
चिन्या, ते sec c शूट झालं की फोटो टाकेनच. नको कशाला आमच्यावर अत्याचार!!!ती टॉवेल ऍड आधीच त्रास कमी देतेय का?? मुलीना पटवण्यासाठी युवराजची ईमोशनल स्टोरी माहितेय?? नाही माहित. काय आहे ती???आता उत्सुकता निर्माण केलीच आहेस तर सांगुन टाकच. २प्रश्न्- १)भन्साळी भडकला म्हणजे त्याने नक्कि काय केल??काय बोलला शाहरुखला?? २)शाहरुख आणि यश चोप्राच बिनसलय या न्युजला काही अर्थ आहे का??फ़नामधे आधी शाहरुख होता पण पैसे जास्त मागितल्यावर चोप्रा म्हणाला तुला इतके पैसे देण्यापेक्षा मी आमीरला देईल. ही न्युज खरी आहे का??
|
Psg
| |
| Thursday, November 22, 2007 - 11:04 am: |
| 
|
nandini /hitguj/messages/644/108021.html?1195727348 तूच सुरु कर ना इथे नवीन थ्रेड.. 'गॉसिप' नावानी.. युवीपासून होऊदे सुरुवात..
|
Amruta
| |
| Thursday, November 22, 2007 - 8:14 pm: |
| 
|
एकदाच काल OSO पाहिला. अगदी फिल्मी इस्टोरी वाटली. पण SRK ची बॉडी एकदम सॉलीड दिसत्ये. तो एकदम संजय द्त्त, सल्लु, ह्रितीक च्या रांगेत जाउन बसला. पण तरीही मला ते दर्दे डिस्को नाही आवड्ल. भारी बाबा ती जीन्स खाली घातलीये. टॉवेल गुंडाळण काय नी जीन्स एवढी खाली घालण काय, माझ्यासाठी दोन्ही सारखच 
|
Suyog
| |
| Thursday, November 22, 2007 - 8:23 pm: |
| 
|
Another good new hindi movie is Johny Gaddar. already informed about jab we met and manorama.
|
Chinya1985
| |
| Thursday, November 22, 2007 - 11:23 pm: |
| 
|
आज २ चित्रपट पाहिले एक 'टॉवेलरिया' आणि दुसरा 'बोंब अशांती बोंब'. प्रथम 'बोंब अशांती बोंब'. ठिक ठाक आहे पण एव्हढाही भारी वगैरे नाही. मधे मधे तर फ़ारच कंटाळा आला होता. ते सगळ्या स्टार्सना आणन्याचा प्रकार काही पटला नाही. त्या फ़राह खानच्या भावाने पण हे बेबी मधे १२ आयटम्स आणल्या होत्या हा त्याचाच पुढचा भाग आहे. गाणी पण ठीक नाही. एकच गाण बर वाटल. किसकी भुक शाहरुखने नेहमीप्रमाणे रडारड केलीच आहे पण जरा प्रमाणात केली आहे. 'यन्ना रास्कला' आवडले पण मनोज कुमारची फ़ारच काढली आहे. तशी पिक्चरमधे शांती एक मिनिटही नाही. सतत आग लागणे,गाणी गजबजाट आहे. टॉवेलरिया बरा वाटला त्याच्यापेक्षा. अनेक फ़ाल्तु सीन्स,इल्लॉजिकल गोष्टी आहेत मात्र शाहरुखच्या रोनाधोना लव्ह स्टोरिजपेक्षा बरा आहे. सोनम कपुर काही दिसायला खास नाही,दुरुनच बरी दिसते. सलमान तर 'अब्दुल कसाईच' दिसतो टोपिमधे. अस वाटतच नाही की हा प्रेम वगैरे करेल. मला वाटत होत की end ला हा तिला फ़ार मोठा धोका देईल. एक दोन गाणी श्रवणीय आहेत्-माशा अल्ला,सावरिया. आता रणबीर. बाकी सगळ ठिक आहे पण पुरुषी दिसण्यासाठी तेव्हढे कष्ट घ्यावे लागतिल. टॉवेलचे गाणे मात्र डोक्यात गेले. सलमान उघडाच असतो नेहमी,शाहरुखने पण ऍब्स दाखवल्या आहेत पण या लोकांच्या कपडे काढण्यात बॉडी बिल्डर्सचा थाट असतो त्यांचे बॉडी दाखवणे पुरुषांना त्रासदायक ठरत नाही उलट सल्लुला बघुन अनेक जण जीमला जातात पण या रणबीरने अक्षरश्: हीरॉईनप्रमाणे expose केल आहे. त्यात अजिबात पुरुषीपणा नाही. अगदीच विचित्र दिसत ते. अस केल्यावर कोणीही तो गे आहे का अशी शंका घेणारच की!!ते GS1 ने लिहिल्याप्रमाणे सोनम कपुरच्या ऐवजी चुकुन रणबीरला टॉवेलमधे आणलेले असावे.
|
Yog
| |
| Monday, November 26, 2007 - 5:09 am: |
| 
|
ढोल : धमाल कमरणुक आहे.. राजपाल यादव लक्षात रहातो. Life In Metro: चान्गला आहे, विषय नेहेमिचाच पण हाताळणी चान्गली आणि सर्वच जण सहज सुन्दर अभिनय करतात.. that works for the film
|
Speed (Urmila Matondkar) koni pahila aahe ka? Nehmipramane Bhat bandhuni English Movie chi copy keli aahe. "Cellular"
|
Rajankul
| |
| Monday, November 26, 2007 - 12:00 pm: |
| 
|
आपण ओव्हर ऍक्टींग करुन अनेकांच डोक फ़िरवतो हे SRK ला पक्क माहित असाव म्हणुन तो रिस्क घेत नसावा. बाकी आमीर त्याच्यापेक्षा कितितरी भारी आहे.>>. चिन्या आसे बोलुनही तु त्याचा पिक्चर बघितलाच. वर विचारतो भन्सालीचे शाहरुख खानशी का बिनसले? चोप्राशी काय झाले? च्यायला तुझ्या जर तो डोक्यात जातो तर लेका तुला कशाला हव्यात रे नसत्या चौकशा?
|
Maitreyee
| |
| Monday, November 26, 2007 - 2:32 pm: |
| 
|
ओम शान्ति ओम!! दीपिका सही दिसते, एक दोन गाणी अन बॉलिवुड वरचे इनोद यामुळे सुरुवातीला ठीक टाईमपास झाला, डोकं बाजूला काढून ठेवलं होतं पण तरी हा फ़रहा - शाहरुखपट नन्तर डोक्यात गेला. ज्या फ़िल्मी गोष्टींची( बूढी मॉं, फ़िल्मी मेलोड्रामा, घीसेपीटे डायलोग्ज वगैरे)टिन्गल आधी केली आहे तेच नन्तर याच सिनेमाच्या उत्तरार्धात सिरियसली घ्यावे अशी अपेक्षा फ़रहा खान आणि कंपनीने केली आहे!! शाहरुख च्या सर्वात टुकार सिनेमांपैकी एक हा शिरोमणी ठरावा!! वय २५ ची बतावणी करताना त्याला बघवत नाही. ते पोस्टर शी बोलणे, घायाळ वगैरे नजरेने हिरॉइन कडे बघणे इ.इ. स्वप्नाळू गोष्टी अन 40+ वय स्पष्ट दाखवणारा चेहेरा यात काही ताळ मेळ च वाटत नाही! शेवटी शेवटी तर लोक शाहरुख आहे म्हणून काहीही आचरटपणा डोक्यावर घेतील या फ़रहा खान, करण जोहरी वृत्तीची चीड येते अगदी! असो.
|
Chinnu
| |
| Monday, November 26, 2007 - 3:42 pm: |
| 
|
ढोल एकदा पहायला हरकत नाही. राजपाल यादवने रंगत आणली आहे. ओमपुरीचे काहे खुसखुशीत डायलॉग्स हसवून जातात. काही सीन आणि एक दोन तोडक्या मोडक्या म्हणी व टायमींग जोक्स बरे जमलेत.
|
च्यायला तुझ्या जर तो डोक्यात जातो तर लेका तुला कशाला हव्यात रे नसत्या चौकशा? अहो, तो वृत्तपत्र,टी.व्ही,इंटरनेटवर असतोच ना ते neglect करता येत नाही. शिवाय चौकशी just curiosity म्हणुन (गॉसिपमधुन कुणालाही कुठलाही फ़ायदा होत नाही,पेपरवाले सोडुन)!!!
|
Itgirl
| |
| Monday, November 26, 2007 - 3:54 pm: |
| 
|
सावरिया भयाण सिनेमा आहे अगदी!! संजय लीला भन्साळीचा सिनेमा आहे हे खरच वाटत नाही एखाद्या ड्रगच्या अमलाखाली असल्यासारखा सिनेमा बनवला आहे
|
अग माहिति तन्त्रज्ञान मुली, देवदास या सिनेम्यानंतर भन्साळी किति भकास पिक्चर काढु शकतो हे कळले नव्हते काय??
|
Asami
| |
| Monday, November 26, 2007 - 4:38 pm: |
| 
|
आहे तेच नन्तर याच सिनेमाच्या उत्तरार्धात सिरियसली घ्यावे अशी अपेक्षा फ़रहा खान आणि कंपनीने केली आहे!>> MT मला वाटते that's was also part of spoof
|
Maitreyee
| |
| Monday, November 26, 2007 - 4:52 pm: |
| 
|
अरे ते तसे असते तर बरे दिसले असते, पण शेवटी ते बदला, सजा वगैरे प्रकरण बरेच सिरियसली घेतले आहे असे मला वाटले ते त्याचे डोळे भरून दीपिकाच्या भुताला त्या 'टिपिकल लूक' ने बघत रहाणे वगैरे.. अरारा
|
अग मैत्रेयी शाहरुखकडुन चांगल्या चित्रपटांची अपेक्षा कशाला केलीस??मी तर फ़क्त आपल्यावर हा चित्रपट किती अत्याचार करेल या भितीने २ दिवस चित्रपट बघत नव्हतो.
|
३०० पाहीला. आवडला. बर्याच दिवसांपासुन पाहायचा होता. राहुन राहुन मला शिवाजी महाराजांचे पन्हाळ्यावरुन पलायन तसेच दुसरा प्रसंग म्हणजे अफझलखान वध आठवला. नंदीनी जरा हिंदी चित्रपट निर्मात्यांना या विषयावर पिक्चर काढायला सांगनार का? ( फक्त तेच प्रंसग आख्खे शिवचरीत्र नको). (अन विषय कोणाला सुचवनार असशिल तर केदार शिंदे अन भरत जाधव ला नको का ते सांगतो.) बकुळा नामदेव घोटाळे हा एक टाकावु चित्रपट आहे. खरतर केदार शिंदे सारखा चांगला दिग्दर्शक अन भरत सारखा चांगला (कधीकाळी) अभिनेता या दोघांनीही आपली पार लावुन घेतली आहे. तेच ते रद्दी अन बिन टायमींगचे जोकस मारने त्यांनी बंद केले नाही तर त्यांचा लक्षा होनार. मराठी चित्रपटाने कात टाकली कात टाकली असा हाकारा एकीकडे केला जातोय अन दुसरी कडे तेच तेच जत्रा, आई नं १ नाना मामा, बकुळा सारखे तद्दान पांचट विनोदी चित्रपट निर्मान होतात. अरे विनोद करायचा तर काहीतरी टाइमिंग असायला हवे. विनोद विनोदी वाटायला हवा पण इथे तसे काही नाही. जी नवी हिरोईन आहे ति मराठी नगिना काढला तर खपेल. पण तिने बरे काम केले आहे. सिद्दार्थ जाधव ला मेन रोल मिळाला. भरत ने मात्र अभिनयात निराशा केली. नुसते दात लावुन अभिनय जमत नाही. केदार शिंदेनेच कथा लिहीली आहे. का लिहीली हा प्रश्न पडलाय. अरे मायबोलीवर पण चांगल्या कथा येतात त्यापेक्षा. भरत अरे भाउ तुझा लक्षा झालाय तेच ते बोअर पिक्चर काढुन जरा काही तरी चांगले कर रे.
|
केदार, ३०० हा एक दृश्य-सोहळा आहे. हिंसा अतिशय ठळकपणे दाखवून सुद्धा अंगावर येत नाही किंवा किळसवाणी होत नाही. तसेच संपूर्ण चित्रपट जी प्रकाशयोजना वापरली आहे त्यामुळे ही कथा खूप जुन्या काळात घडत आहे असे वाटते. तसेच कपडे व पार्श्वभूमीचा रंग ह्यांच्यातील कॉंट्रास्ट मुळे भावना अधिक ठळत दिसतात. ह्याच पठडीतला आणखी एक सिनेमा म्हणजे अँपोकलिप्टो. हा मेल गिब्सन स्कूल ऑफ सिनेमा. त्याला व्हिज्युअल व्हॉयलन्सचे वेड लागले आहे. बर्याच लोकांना हा खूप भडक वाटेल पण ज्याना ३०० आवडला त्यांनी बघायला हरकत नाही. ह्या चित्रपट मायन भाषेमध्ये आहे आणि तिथल्याच स्थानिक कलाकारांनी ह्यात काम केले आहे. त्यामुळे सगळेच एकदम ओरिजिनल वाटते. परत एकदा रिझर्वॉयर डॉग्ज बघितला. कांटे हा चित्रपट ह्या रिझर्वॉयर डॉग्ज वरून उचलला होता. ७-८ लोकांचा एक ग्रुप हिर्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न करतो आणि पोलिसांना आधीच पत्ता लागतो कारण ह्या ग्रुप मधला एक जण अंडरकव्हर कॉप असतो. संपूर्ण चित्रपट हा केवळ चोरीचा प्रयत्न फसल्यावर एक एक जण संकेतस्थळी परततो, तिथल्या त्यांच्या इंटरॅक्शनवर आहे. अधेमधे प्रत्येक कॅरॅक्टरची ब्रीफ ओळख करुन देण्यात येते. अतिशय खिळवून ठेवणारा पिक्चर.
|
Asami
| |
| Monday, November 26, 2007 - 9:10 pm: |
| 
|
sin city बघितल्यावर ( jessica albaa साठी काय काय बघावे लागते ) ३०० बघायचा धीर होत नव्ह्ता. But it's worth the watch. Thxgvg ला dvd पण उचलली चक्क
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|