Farend
| |
| Tuesday, October 30, 2007 - 6:58 pm: |
| 
|
मी असे वाचले आहे की किस केल्याने भरपूर कॅलरीज बर्न होतात.. पूनम, तसे नसावे, नाहीतर तो इम्रान हाश्मी आत्तापर्यंत फक्त हाडाचा सापळा शिल्लक राहिला असता
|
Gsumit
| |
| Tuesday, October 30, 2007 - 7:26 pm: |
| 
|
आणी मल्लिका पण सापळी झाली असती... ;-)
|
Zakasrao
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:50 am: |
| 
|
अमोल,पुनम,बदामराजा,छोटु सुमित अरे कॉलेजात गाण्याची विटंबन होत होती विडंबन नव्हे रे. माझ्या मते पहिल चुंबन घेतल की माणसाला चटक लागते जशी नरभक्षक वाघाला लागलेली असते माणसाच्या रक्ताची ही उपमा म्हणजे त्या एका "लक्ष्या"च्या फ़िल्म मधे बघुन मला सुचली आहे. त्यात नाही का तो एक नोकर असतो आणि तो म्हणतो ती त्याला घट्ट चिकटुन बसली होती जशी पाल भिंतीला चिकटुन बसते बहुतेक चिकट नवरा असेल. असो विषयंतर नको
|
Hkumar
| |
| Wednesday, October 31, 2007 - 7:55 am: |
| 
|
पहिल्या चुंबनात आपण एकमेकांच्या अगदी निकट येतो. त्यावरून एका भूमितीच्या प्राध्यापकांनी केलेली चुंबनाची व्याख्या आठवली: kiss is the shortest distance between two curves! 
|
Swa_26
| |
| Wednesday, October 31, 2007 - 9:52 am: |
| 
|
पहिल्या चुंबनात आपण एकमेकांच्या अगदी निकट येतो.>>> फक्त पहिल्याच चुंबनात का???
|
Badamraja
| |
| Wednesday, October 31, 2007 - 10:05 am: |
| 
|
झकासराव पहील चुंबन म्हणजे किती नाजुक आणि रोमांटीक भावना असते. तुम्ही कुठे नरभक्षक वाघ, रक्ताची चटक पर्यंत पोहोचलात... तुम्ही ड्रॅकुला च्या पहील्या चुंबना बद्दल बोलताय का?
|
Itgirl
| |
| Wednesday, October 31, 2007 - 10:20 am: |
| 
|
..इम्रान हाश्मी आत्तापर्यंत फक्त हाडाचा सापळा शिल्लक राहिला असता ... अमोल,
|
Panna
| |
| Wednesday, October 31, 2007 - 12:58 pm: |
| 
|
अमोल, सुमित  अशा चुंबनाने जर का कॅलरीस बर्न झाल्या असत्या तर सगळ्या gyms मधे फक्त चुंबन घ्यायला शिकवले असते!! 
|
Gsumit
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:37 pm: |
| 
|
ड्रॅकुला च्या पहील्या चुंबना >>> एक नवीन टायटल हिंदी पिक्चरला... बघा आपण किती क्रिएटीव्ह झालोयेत...
|
Nilima_v
| |
| Friday, November 02, 2007 - 7:50 pm: |
| 
|
Tatya Vinchu, Tumhi aani Tumchi "Honari Baayko" ne kiss karaycha tharawila.(Mug kahani adhuri kashi rahili) Tumhi 3-4 warsh lagnaagodar chatushrungila jaat. He tar lok lagnanantar kartaat. Tumchi gosht aani kiss karnyache prayatn aikun ekdam Amol Palekar chya movie chi aathwan zali.
|
अहो मी ठरवली की ती होनार पण सासर्याचे मत काही वेगळेच होते त्याला माझा सासरा व्ह्यायचे न्ह्ववते. त्यामुळे तिच्याशी नाही झाले लग्न. पण यथावकाश झालेच दुसरीशी. पण काय सांगु लग्न झाल्यावर मात्र पटले की हेच आपले खरे प्रेम. आधीचेही खरेच होते पण आता बिघडत नाही. अमोल पालेकरची आठवन (कुठला बरे होत पिक्चर).
|
Nilima_v
| |
| Friday, November 09, 2007 - 7:21 pm: |
| 
|
छोटिसि बात त्यात चुम्बनाचा प्रकर नव्हता मात्र.
|
Anaghavn
| |
| Thursday, November 15, 2007 - 12:24 pm: |
| 
|
माझं लग्न ठरल्यावर ची गोष्टं------(ही kiss ची गोष्ट नाहीये तरीही सांगते) मी औरंगाबाद ला आणि तो पुण्याला..... एकदा नेहमी प्रमाणे मला भेटायला औ.बाद ला आला. जाण्याची वेळ आली. मी त्याच्या बरोबर बसस्टंवर त्याला सोडवायला म्हणून गेले होते. परत जाताना खुप imotional झाला होता.समोर पुण्याची बस्---आजुबाजूला माणसं. खुप वेळ आम्ही काहीच बोलत नव्हतो.जाताना,"काळजी घे" म्हणाला,कपाळावर ओठ टेकवले आणि झटकन वळून बस कडे गेला. मी मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे बघत होते. अंगात वीज सळसळावी तसं झालं. त्याची ती क्रुती खुप काही सांगून गेली. depression च्या वेळी आधार देऊन गेली.(अजूनही ती आठवण म्हणजे माझ्या special आठवणींपैकी एक आहे.) अनघा
|
Hkumar
| |
| Wednesday, November 21, 2007 - 7:59 am: |
| 
|
चुंबून चुंबून दमले सगळे! आता पहिल्या आलिंगनाचे अनुभव चालू करूयात काय?
|
Sheshhnag
| |
| Wednesday, November 21, 2007 - 11:07 am: |
| 
|
करा सुरू. मग आहेतच सगळे...
|
Badbadi
| |
| Thursday, November 22, 2007 - 6:00 am: |
| 
|
मग आहेतच सगळे... >> ऑ... हे भलतंच!!!
|
Sheshhnag
| |
| Thursday, November 22, 2007 - 9:15 am: |
| 
|
मग आहेतच सगळे... वाचायला हो! तुम्ही काय समजलेत? लोकांची कल्पनासृष्टी खूपच विशाल हो!
|
Hkumar
| |
| Saturday, November 24, 2007 - 8:05 am: |
| 
|
पहिल्या आलिंगनाबद्दल जे काही कथा-कादंबर्यांतून वाचले होते ते सगळे त्यावेळेस मस्त अनुभवले आणि तृप्त झालो!
|
Rajya
| |
| Saturday, November 24, 2007 - 8:38 am: |
| 
|
काय वाचले होते कथा कादंबर्यात? आम्हालाही कळु द्या आणि जरा सविस्तर लिहा हो, म्हणजे पहिले अलिंगन कुणाला दिले, घेतले, परीस्थिती काय होती, अलिंगन दिल्या घेतल्या नंतर काय वाटले, अलिंगन कुणाला दिले की कुणाचे घेतले वगैरे माहीती सविस्तर येऊ द्या की
|
राज्या लेका, मी आज पहिल्यान्दा तुज़ा अनुभव वाचला अन थक्क ज़ालो............. मी माज़ा पान अनुभव लिहिन कधितरी..............
|