|
Itsme
| |
| Saturday, November 17, 2007 - 1:17 pm: |
| 
|
GS, मजेदार ... खुपच हसले. (मला लिंकच साहेबांनी पाठवली असल्याने डोकावुन बघण्याचा प्रश्णच नव्हता ... )
|
Samit
| |
| Saturday, November 17, 2007 - 3:57 pm: |
| 
|
जीएस, पर्फ़ेक्ट लिहिलं आहे. सोनम कपूर अगदीच सामान्य पंजाबी मुलीसारखी दिसते. रणबीर कपूरने अजून ५-६ वर्षांनंतर सिनेमात आल्यास चांगले. जरा तरी मॅचुअर्ड माणूस वाटेल. त्याचा चेहरा फ़ार विचित्र आहे. कसा आवडतो कोणा कोणाला देव जाणे. राणी मुखर्जीने आता चित्रपट संन्यास घ्यावा. बास झाले आता.
|
आशु, करण जोहरच्या पिक्चरमधे अमिताभ,अभिषेक,प्रिती,राणी,हृतिक,काजोल इत्यादी लोकांनीही कामे केली आहेत मात्र त्यांनी ओव्हर ऍक्टींग केलेली नाही. शिवाय शाहरुखने इतर डिरेक्टर्सच्या पिक्चरमधे पण ओव्हर ऍक्टिंग केली आहेच की. आता या भन्साळ्याच्या पिक्चरमधे पण कीती केली होती!!केदार म्हटल्याप्रमाणे त्याने फ़क्त स्वदेस व चक देत ऍक्टिंग केलिय नाहितर नेहमीच ओव्हर ऍक्टींग करतो. त्या चक देत पण खनकन कानामागे ओढावा असा रडका चेहरा केलाच आहे की!!त्या अशोकात तर ४-५ दिवस जुलाब होत आहेत असा चेहरा केला होता अहो GS1 , पिक्चर रद्दी असु देहो पण शाहरुखला भिडतोय ना??मग चालतय की!!
|
बरं नन्दिनि,मी हा प्रश्न तिसर्यांदा विचारतोय्-भन्साळी भडकला म्हणजे काय केल??काही बोलला,ओरडला,आदळ आपट केली का रुसुन बसला का रडला??नाही रडला नसेल. रडण्याचा ठेका शाहरुखने घेतलाय कधीच!! दुसरा प्रश्न repeat -शाहरुख चोप्राच फ़िसकटल आहे या न्युजला काही अर्थ आहे का??
|
Suyog
| |
| Saturday, November 17, 2007 - 8:38 pm: |
| 
|
Saw two good movies recently: Jab we met and Manorama six feet under
|
Manuswini
| |
| Saturday, November 17, 2007 - 10:11 pm: |
| 
|
बघितला शेवटी सावरीया, ठीक ठाक मूवी. सावरीय review : रणबीर : बायकी दिसतो बर्याच ठीकाणी. Jr नीतु सिंग. आवाज ऋषी कपूर.बर्याच ठीकाणी येडा वाटतो तो मला.टॉवेलचे जरा ज्यास्तच आहे. आता पडतो का नंतर असे होते. बरे तो असे देहप्रदरशन का करतो कळले नाही तो टॉवेल बराच पातळ आहे हां उंची वगैरे छान, अभीनय as required by movie . नीलम कपूर : पडद्यावर चांगली वाटली बाकीच्या शो मध्ये दिसली त्यापेक्षा. उंची एकदम मस्त. काही ठीकाणी गोड दिसते. अभीनय : ठीक ठाक. actually तीला अभीनय करायला नाहीच आहे. राणी मुखर्जी : चांगली acting केलीय. दिसते सुद्धा चांगली जाडी कमी केल्याने. सलमान : आला काय गेला काय काळोखात कळलेच नाही. गाणी: जबसे मिले नैना हे एकच मला छान वाटले(टॉवेलमुळे नाही हां). सावरीया, बाकी गाणी होती काय? overall movie: पुर्ण मूवी रात्रीच चालला आहे असे वाटते. इतक्या काळोखात आहे की मलाच झोप यायला आली भर दुपारी थेटरात बघत असताना. नक्की कुठल्या काळातील आहे हे एक कोडेच आहे मला. मध्येच रणबीर english बोलतो काय पत्ताच लागला नाही. पोटापाण्याची सोय नसताना प्रेम कसे काय सुचते हा मला कायम पडलेला प्रश्ण असे मूवी बघून, खाताना पण काही दिसत नाही. छ्या! . बरे कुठले ठीकाण दाखवायचे होते director ला ते पण कळत नाही पुर्ण काळोखामुळे. जर director देशाबाहेर घडलेली कथा म्हणून दाखवतोय किंवा एखादी मुस्लीम,रशीयन आहे का काही थांगपत्ता लागु देत नाही director पक्का हां शेवटी उगाच 'बिचारा नायक' feeling वाटले नायकाकडे पाहून. इथे सलमान मिळवतो बाबा हीरोईनला नाहीतर दुसरा हम दील दे चुके झाला असता त्याचा. in compare to OSM: च्यायला काही मजा नाही काळोखी पणामुळे. OSM अर्धा भाग तरी टाईम्पास होता मग रोजचा रटाळ. पहावा का नाही तुमची जिम्मेवारी
|
Manuswini
| |
| Saturday, November 17, 2007 - 10:21 pm: |
| 
|
पुन्हा एकदा डोर पाहीला. ..मला प्रत्येक वेळेला खुप वाईट वाटते चित्रपटातील 'मीराचे'. काय जीवन आहे ना........... ये हौसला माझे एकदम फ़ेव गाणे झालेय. कोणी मला मराठी मूवीची link द्या जरा बकुळा नामदेव घोटाळे वगैरेची. मेहेरबानी होईल.
|
Manuswini
| |
| Saturday, November 17, 2007 - 11:29 pm: |
| 
|
प्राडी, थॅंक्स. अग ह्यावेळेला लॉँग वीकएन्ड्ला घरीच बसणार आहे तेव्हा मराठी चित्रपट पाहायचा विचार करतेय. तो श्रेयस तळपदेचा कुठला मराठी चित्रपट चांगला आहे?
|
Divya
| |
| Sunday, November 18, 2007 - 12:22 am: |
| 
|
मनुस्विनी आईशप्पथ बघ, श्रेयस फ़ार छान दिसतो त्यात. 
|
Manuswini
| |
| Sunday, November 18, 2007 - 12:30 am: |
| 
|
तुझ्याकडे लिंक आहे का त्याची free मध्ये ?
|
Divya
| |
| Sunday, November 18, 2007 - 2:00 am: |
| 
|
अग वरती prady ने दिलेली link आहे ना आपली मराठीची त्यावर आहे ना. free च आहे. त्या link वरचा आनंदाचे झाड पण बघ. श्रेयस तळपदे नाहीये त्यात पण तो ही छान movie आहे. दोन्ही तुला आवडतील.
|
Dineshvs
| |
| Sunday, November 18, 2007 - 5:20 pm: |
| 
|
GS तु सावरिया बघितलास, या धक्क्यातून मी अजुन बाहेर पडुच शकत नाही रे. शूटिंग करताना, टॉवेल पुर्णच पाडला होता. सेन्सॉरने तो सीन ठेवला तर UA सर्टिफ़िकेट देऊ, असा पवित्रा घेतला, म्हणुन तो सीन उडवला. बॉबी मधे पण असा सीन होता म्हणे. ( मी बॉबी बघितला नाही, अजुन. )
|
Sunidhee
| |
| Sunday, November 18, 2007 - 6:25 pm: |
| 
|
सर्व मंडळींना टॉवेल फारच पसंत पडलाय वाटते.. नाही म्हणजे हीरीरीने चर्चा चालू आहे त्यावर.. पण रणबीर ला ट्रेलर मधे पाहून तरी पुर्ण सावरीया बघायची अजिबात इछ्छा होत नाहिये. बावळट्ट दिसतो त्यात तरी. GS , वर्णन मस्त! चिन्या किती ते शाहरुख ला शिव्या..
|
Manuswini
| |
| Sunday, November 18, 2007 - 9:34 pm: |
| 
|
जीस, मी तुमची प्रतीक्रीया आत्ताच वाचली. best !
|
तशी काही मला हे चित्रपट पहायची फारशी ईच्छा नव्हती. पण आता सगळ्या प्रतिक्रिया वाचुन बघावेसे वाटू लागले अहेत. GS एकदम मस्त लिहीले आहे....
|
Maitreyee
| |
| Monday, November 19, 2007 - 12:27 am: |
| 
|
तुम्हाला फ़्रेश चेहरे, क्यूट हीरो, चिकणी हिरॉइन, मस्त गाणी, करमणूक असं काही आवडतं का? मग सावरियाच्या वाटेला अज्जिबात जाऊ नका प्लीज!! तर मी पाहिला एकदाचा सावरिया! मला ते डोस्टोवस्की वगैरे झेपत नाही. मी सामान्य.. करमणुकीची अपेक्षा करणारा आड्यन्स आहे काही नाहीतर डोळ्याना सुखावणारी दृष्ये, श्रवणीय गाणी अस असलं तरी चालतं मला. पण सावरिया.. फ़ार अवघड गेला हो बघायला. पहिल्या पाच मिनिटात पेशन्स संपत आला तरी नेटाने बघितला. पुलंचे सदु अन दादू, गोदू ची वाट, ननाट्य न अनुवाद असे काही काही आठवले बघताना. एकूण कथा(?) एखादे असंबद्ध स्वप्न पडावे तशी! मधेच इन्ग्रजी ड्वायलॉक, दिव्याचा झगमगाट, बार वगैरे अन मधेच कंदील, दोरीने ओढून हलवायचे पंखे!! भंजाळायलाच होतं बघून. ते कृत्रिम सेट्स, निळा अंधार, त्या रनबीर चे वस्त्रहरण यात कुठेही कलात्मकता, सौन्दर्य दिसत नाही. सगळा नुस्ता विक्षिप्त पणा वाटतो. रनबीर पूर्ण वेळ राज कपूर ची कॉपी करत असल्यासारखा वातला. शाय, बावळट्ट वगैरे! अन ते लाल ओठ, तिरके कटाक्ष, नाक उडवणे वगैरे.. काहीच्या काहीतरीच दिसते! सोनम सामान्य दिसते. तिला अगदी भोली भाली सहमी हुई दाखवलीय ओढनी गळ्याभोवती, डोक्यावर गुंडाळलेली वगैरे. पण त्यामुळे ती ओढणीची लांबी कमी पडली की काय कुणास ठाऊक! कारण पूर्ण पोट, पाठ, बेंबी हे सग्गळे एक्स्पोज झालेय बर असो. एकन्दर काय तर महा बोर. बघू नका प्लीज
|
Divya
| |
| Monday, November 19, 2007 - 1:21 am: |
| 
|
मैत्रेयी इतके भन्नाट एकेकाचे reviews वाचल्यावर बघायचा मोह आवरण कठीणच आहे. ते टॉवेल प्रकरण तर फ़ारच गाजलय इथे. 
|
Panna
| |
| Monday, November 19, 2007 - 2:38 am: |
| 
|
मी पण अगदी हाच विचार करत होते... एक से एक reviews वाचल्यावर तर 'कॉमेडी' म्हणून तरी बघावा सावरिया!! आणि बघताना तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंटस आठवून तर अजूनच लज्जत वाढेल अस वाटतय!! 
|
Santoshd
| |
| Monday, November 19, 2007 - 3:44 am: |
| 
|
सावरीया तसा ठीक आहे, पण अवाढव्य आणी नीळ्याच नीळ्या सेटच्या कलरने हीरो हीरोईन हरवुन गेल्यासार्खे वाटतात. पण फुल मार्कस रणबीरच्या डान्ससाठी..... रीशी कपुरसारखा रोमांटीक नाही पण नक्कीच त्याच्यासारखी नॅचरल ऍक्टींग आहे त्याला.
|
अगर सोनम को टोवेल मे दिखाते तो लोग डर नही जाते. सावरिया बना रहे थे. भूत का रीमेक नही.. टॉवेल गिरा हुआ सीन डीव्हीडी एडिशन मे जरूर ऍद होगा. तब देख लेना.. इति आरके.. अर्थात ऑफ़ द रेकॉर्ड.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|