|
Farend
| |
| Friday, November 16, 2007 - 7:49 am: |
| 
|
मनोजकुमार शाहरूखवर अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे... आणि जुन्या त्याच्या स्वत:च्या चित्रपटांसाठी स्वत:वरही लावणार का? ते काय कमी विनोदी होते का
|
आणि बाय द वे, तुझी अत्यंत आवडती ईशा देओल पण अजून एकाकीच आहे रे. >>> अरे पण ती धर्मेंद्रची मुलगी आहे. शाळेत असताना एका मुलाचे डोके फ़ोडले होते. नंतर कुणाला तरी थोबडवले होते. म्हणून तिच्या वाटेला कुणी जातच नाही. बरेच पिक्चर आपटल्यावर ती सध्या सांगतेय.. "मी पिक्चर्स करणं सोडणार आहे. कारण माझे आईवडील माझ्यासाठी स्थळ शोधतायत.. मनोज कुमारला तसंही काही काम नाही. तर जरा स्टंटबाजी करून बघेल. दुसरं काय? अरे बाबा, त्यानिमित्ताने तरी लोकाना तुझी आठवण आली हे काय कमी आहे?? गूड न्युज.. सावरियाचे कलेक्शन स्टेडी आहे. मल्टिप्लेक्समधे फ़िल्म जोरात चालू आहे. शाहरूखने आधी स्टेटमेंट केलं की "माझा पिक्चर रीलीज झाल्यावर सर्व स्पर्धक गायब होतील." त्यावरून भन्साली भडकला. पण खरं त्याने भडकायचं काहीच काम नाही. शाहरूख आणि रणबीर अशी स्पर्धा होऊच शकत नाही. धूम ३ रणबीर आणि शाहरूखला ऑफ़र केला होता. शाहरूखने नाकारला. बच्चनबरोबर त्याची दुष्मनी आहेच. कपूर्सबरोबर पण झाली. चोप्राबरोबर पण फ़िस्कटलं तर कठीण आहे. रणबीर मात्र खुश आहे. त्याचं काम सर्वाना आवडलय आणि त्याच्या गर्लफ़्रेंडचा (एक्स का असेना) पिक्चर चाललाय... त्याच्याकडे करन जोहर चोप्रा घई अशा सर्व बॅनरच्या ऑफ़र्स ऑलरेडी आहेत. आता बघू पुढे काय करतो.. बाय चान्स ऍक्टिंगचं दुकान चाललं नाही तर डिरेक्शनचे टाकून बसता येईल.
|
Itgirl
| |
| Friday, November 16, 2007 - 2:19 pm: |
| 
|
नंदू, तुझ्या सर्व बातम्या मस्त गंम्मत आली वाचायला
|
Nilima_v
| |
| Friday, November 16, 2007 - 3:31 pm: |
| 
|
comeon नंदिनी , मल्लिका शेरावत तर direct movies मध्ये affairs करते. मी असे ऐकले की ती वयाने पण मोठी आहे आणि तिचा airhostess च फोटो पब्लिश झाला तेव्हा सर्वांना तिचे खरे वय कळले. कोणतेही affairs नसलेली मुलगी, रितेश देशमुख चालेल?
|
Amruta
| |
| Friday, November 16, 2007 - 4:07 pm: |
| 
|
वा किती दिवसांनी असे फिल्मी गॉसिपस वाचायला मिळाले. नंदिनी सगळ्या बातम्या पहिल्यांदा आम्हाला कळल्या पाहिजेत.
|
Amruta
| |
| Friday, November 16, 2007 - 4:09 pm: |
| 
|
फक्त तुझ्यासाठी मी सावरीया बघेन आता ;) (टॉवेल पडतोय का पाहु)
|
Asami
| |
| Friday, November 16, 2007 - 5:10 pm: |
| 
|
फक्त तुझ्यासाठी मी सावरीया बघेन आता >> कालपर्यंत सोनम कपूर होती ना त्यात, आता नंदिनी पण का
|
मनोजकुमार तसा सिरियस माणुस आहे. अशा लोकांवर विनोद करावे का नाही हा प्रश्न आहे. त्याने म्हटलय 'मी देशभक्तीपर चित्रपट काढलेत म्हणुन मला देश ओळखतो. OSO मधे विनोद न करता माझा अपमान केला आहे. ज्या लोकांना देशावर प्रेम नाहि असेच लोक अस काम करु शकतात.' यावर शाहरुखने फ़ोन करुन त्याची माफ़ी मागितली आहे. म्हणजे थोडक्यात आरोप मान्य आहेत त्याला. नन्दिनि, शाहरुख म्हणाला होता की मी काही इंडस्ट्रीत झक मारत नाही आहे. पण त्यावर भन्साळी काय म्हणाला??भडकला म्हणजे नक्की काय केल त्याने?? शाहरूख आणि रणबीर अशी स्पर्धा होऊच शकत नाही. बरोबर, रडारडी इल्लॉजिकल गोष्टी आणि ओव्हर ऍक्टींग मधे रणबीर काय कोणीच शाहरुखचा हात धरु शकणार नाही. शाहरुखच चोप्रा बरोबर फ़िसकटल आहे अशी बातमी आली होती त्यात काही तथ्य आहे का??फ़ना मधे आमिरपुर्वी शाहरुख होता आणि शाहरुखनी जास्त पैसे मागितले तर चोप्रा म्हणाला तुला इतके पैसे देण्यापेक्षा मी आमिरला देईल. हे खरे आहे का?? तु रणबीरला भेटली आहेस का??भेटल्यास त्याला माझा एक सल्ला दे- परत टॉवेल पाडू नको आणि घालुही नकोस. तु गे आहेस अशा बातम्या अशा सीन्समुळेच उठतात. मॅनली दिसण्यासाठी माफ़क दाढी ठेवत जा म्हणाव.
|
Aashu29
| |
| Friday, November 16, 2007 - 9:55 pm: |
| 
|
ओव्हर ऍक्टींग मधे रणबीर काय कोणीच शाहरुखचा हात धरु शकणार नाही. चिन्या बास हां, उगाच शाहरुखला नावे नको ठेउस!! करण जोहर चाच हा दोश आहे की शाहरुखला ओवर acting करवि लागते.
|
शाहरुख ने चोप्रा, जोहर व स्वतच्या प्रॉडक्शन खाली काम करु नये. अभिनय त्याने फक्त दोनच चित्रपटात केला. स्वदेश व चक दे मध्ये. बाकीच्या सर्व चित्रपटात अभिनय कशाशी खातात हे त्याला कळले नाहीये. तो रड्या आहे. तेच ते प्रेमपट काढुन कंटाळा का नाही आला त्याला. जरा थोडी विवधता आनायला पाहीजे त्याने. अन आता म्हाताराही दिसत आहे. उगीच आतापर्यंत कमावलेले पैसे OSO सारखे चित्रपट काढुन घालन्यापेक्षा रिटायर झालेल बर. जरा साईड चे रोल म्हण्जे हिरो चा बाप, भाउ वैगरे कर म्हणाव आता. 
|
हाहाहा केदार, नक्की सांग कोणावर चिडला आहेस आज?
|
आयला कसली गहन चर्चा चालु आहे. बर असो. अरे कुणी नो स्मोकिंग बघितला का? हिंदी मध्ये असा अतिशय वेगळा प्रयोग प्रथमच केला गेला आहे.
|
Zakasrao
| |
| Saturday, November 17, 2007 - 4:22 am: |
| 
|
त्याच्याकडे करन जोहर चोप्रा घई अशा सर्व बॅनरच्या ऑफ़र्स ऑलरेडी आहेत>>>>>>>>>>>>>>> हे लोक्स त्याची वाट लावणार बच्चानला तर यानी काहिहि रोल्स देवुन काहिहि करायला लावल आहे. फ़ालतु फ़िल्म्स असतात सर्व त्यांच्या
|
चिन्या, रणबीरला मी भेटली आहे. तो गे नाही पण गे लोकाचा आवडता आहे. ही इज कूल अबाऊट इट. त्याची ऑलरेडी इतकी अफ़एर्स झाली आहेत की त्याला गे म्हणणं जीवावर येईल. रणबीरने "नाही" म्हटलेल्या मोव्हीज.. फ़िझा, कभी खुशी कभी गम, हम तुम, कभी अलविदा न कहन, बंटी और बबली. फ़िल्मी लोकाना त्याचं पोटेन्शियल फ़ार आधीपासून दिसलं आहे. त्याचा India 1964 हा शिकत असताना बनलेला पिक्चर बघा. चक्क ऍक्शन रोल आहे त्याचा. ते माफ़क दाढी पण आहे त्या पिक्चरमधे आणि अभिनय सावरियापेक्षा चांगला आहे. (मी त्याला पहिल्यादा भेटले तेव्हा तर फ़्रेंच कट दाढी होती. फ़ार मजेदार दिसायचा तेव्हा तो. ) रणबीर कपूर पिक्चर मधे येण्याच्या आधीपासून त्याचे फ़ॅन क्लब चालू झाले होते, ऑर्कुटवर त्याची कम्युनिटी आहेच आहे. त्यामुळे त्याला फ़ॅन फ़ॉलोइंग जबरदस्त आहे.
|
Gs1
| |
| Saturday, November 17, 2007 - 8:19 am: |
| 
|
चित्रपट प्रदर्शित झाला तेंव्हा कार्यालयाला दिवाळीची सुट्टी होती, लगेच शनिवारी रात्री सहज म्हणून चित्रपट बघायला गेलो. बहुपडदा चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री नऊच्या खेळाची तिकिटे, ती सुद्धा शेवटून दुसऱ्या रांगेची तिकिट खिडकीवरच आयत्या वेळीसुद्धा तुम्हाला मिळतात तेंव्हाच खरे म्हणजे सावध व्हायला पाहिजे. पण नाही झालो. तसेही चांगले चित्रपट कळतील आणि चालतील एवढा मोठा प्रेक्षकवर्ग नाही आपल्याकडे अजून. दुसरीकडे ओम शांती ओम सारखे शाहरुखपट चालत आहेत म्हणजे ते चांगले असतीलच असे सांगता येत नाही. आत गेलो तेंव्हा चित्रपट सुरू झाला होता, प्रेक्षागृहापेक्षाही पडद्यावर जास्त अंधुक वातावरण होते आणि चित्रपट संपून प्रेक्षागृहात दिवे लागले तोपर्यंत ते तसेच अंधारलेले राहिले. सगळा चित्रपट एका अनामिक काळातल्या अनामिक नगरीतल्या अनामिक मोहल्ल्याच्या तद्दन खोट्या वाटेल अशा सेटवर चित्रित केलेला. मुठा उजव्या कालव्याइतपत रूंदीची एक नदी, त्यातून पाणी वाहत असावे अशी शंका घेता घेता यावी इतपत संथपणे पण चित्रपटापेक्षा वेगाने वहाते. त्यावर एक लाकडी पूल ज्यावर चित्रपटाची नायिका सुनसान रात्री कशाची तरी ( बहुदा चित्रपट संपण्याची) वाट पाहत राहते. नंतर म्हणजे मध्येच कधीतरी कळते की ती ईदच्या दिवशी येईन असे सांगून गेलेल्या सल्लूची वाट पाहत असते. आता चार दिवस आधीपासूनच का बघत असते ते काही कळत नाही, संपूर्ण वेळ हिरवा निळा अंधार पसरलेला असताना प्रेक्षकांना हे रात्र वगैरे कसे कळावे असा प्रश्न सुज्ञ वाचकांना पडला असेल पण त्यासाठी दोन चार सुचवणी (मराठीमध्ये क्लू) दिग्दर्शकाने दिल्या आहेत. उदा. वेळोवेळी स्थानिक घड्याळघरात रात्रीचे टोले पडतात, आणि नायिका साधारण सिंड्रेलाएवढीच घरी जाण्यासाठी कावरीबावरी होते, किंवा मग राणी मुखर्जी व इतर तत्सम काकू व्यवसायानिमित्त आसपास घोटाळू लागतात, मद्यपींचा वावर सुरू होतो असे काही काही. या खोट्या मोहल्ल्यातील माणसांचा अभाव, वास्तूरचना, बोलण्याची पद्धत यामुळे चित्रपट मध्ययुगातील असावा अशी शंका येते, पण मध्येच उपहारगृह व इतर गोष्टींचे कलात्मक इंग्रजी नामफलक बघता तसे नसावे असे वाटू लागते, त्यात नायिका मुसलमान म्हणजे स्थल काल परिस्थितीचा कुठलाच अंदाज प्रेक्षकांना येऊ द्यायचा नाही असा चंग बांधलेला दिसतो. अशा उच्च लीलांना स्थळ काळाचे बंधन कसले असाही विचार असावा. बरं, अंधार तर इतका की एकदा चुकून त्या सोनमऐवजी रणबीरलाच टॉवेलमध्ये गुंडाळून उड्या मारत पेश केले आहे तरी ते संकलन करतांनाही कोणाच्याच लक्षात आले नाही. त्याने टॉवेल जवळ जवळ सोडलाच होता तेंव्हाही नाही. जोहरा सेहेगलला तरूणाईपेक्षाही रोम्यांटिक अशी फाजील उत्साही जख्ख म्हातारी दाखवायची एक फ्याशन रुढ होउ पाहते आहे, त्यात ती इतके समरसून काम करते की अजून एक जरी लाडिक/सेंटी/फिलॉसॉफिकल वाक्य पुढे बोलली तर उठून हिचा गळा दाबावा यासाठी माझ्यासह अनेक प्रेक्षक आतुर झालेले दिसले. रणबीर कधी कोई मिल गया मधल्या मतिमंद हृतिक सारखा, कधी अतीव भाबड्या राजकपूरसारखा तर कधी अजूनच अतर्क्य असा हास्यास्पद वावरतो. अनिल कपूरची मुलगी साधारण सव्वातीन अँगलमधूनच बरी दिसत असावी त्यामुळे तिला फक्त त्याच त्याच अँगलमधून दाखवले आहे. राणी मुखर्जी चांगले काम करते, पण तिचे पात्रच मुळात ओढून ताणून घुसडलेले. त्याला ती तरी काय करणार ? सल्लूमियाला दोनच प्रसंग त्यामुळे सुसह्य. बाकी इंग्रजी कथा काही काळापूर्वी वाचली होती. त्यावर एखादी एकांकिका होऊ शकली असती. पण (बहुधा त्या नदीचेच हिरवे निळे काळे) पाणी घालून पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचा हा प्रयोग काही सावरता आला नाही असे वाटले.
|
Psg
| |
| Saturday, November 17, 2007 - 9:31 am: |
| 
|
अशक्य लिहिलं आहेस GS ! राणी मुखर्जी व इतर तत्सम काकू व्यवसायानिमित्त आसपास घोटाळू लागतात  एकदा चुकून त्या सोनमऐवजी रणबीरलाच टॉवेलमध्ये गुंडाळून उड्या मारत पेश केले आहे तरी ते संकलन करतांनाही कोणाच्याच लक्षात आले नाही बापरे! जाम हसले!
|
Zakasrao
| |
| Saturday, November 17, 2007 - 9:32 am: |
| 
|
GS जबरा समिक्षण. ह्यापेक्षा सह्याद्रीची भेट झाली असती तर छान वाटल असत नै
|
बरं, अंधार तर इतका की एकदा चुकून त्या सोनमऐवजी रणबीरलाच टॉवेलमध्ये गुंडाळून उड्या मारत पेश केले आहे तरी ते संकलन करतांनाही कोणाच्याच लक्षात आले नाही. त्याने टॉवेल जवळ जवळ सोडलाच होता तेंव्हाही नाही. >>>> जी एस.. जबरी.. कळवून पण टाकलं मी टॉवेलवाल्याला.
|
Maitreyee
| |
| Saturday, November 17, 2007 - 11:59 am: |
| 
|
>> रणबीर कधी कोई मिल गया मधल्या मतिमंद हृतिक सारखा, कधी अतीव भाबड्या राजकपूरसारखा तर कधी अजूनच अतर्क्य असा हास्यास्पद वावरतो. हे बाकी एकदम पर्फ़ेक्ट 
|
Manjud
| |
| Saturday, November 17, 2007 - 12:06 pm: |
| 
|
जी एस... खल्लास....  ह्यापुढे प्रत्येक चित्रपटाचं समिक्षण, अर्थात आपण पाहिलेल्या, इथे देण्यात यावं ही खास विनंती. अजून एक जरी लाडिक/सेंटी/फिलॉसॉफिकल वाक्य पुढे बोलली तर उठून हिचा गळा दाबावा यासाठी माझ्यासह अनेक प्रेक्षक आतुर झालेले दिसले. सॉलिड जोरात हसले मी.... इतकी जोरात की बॉसने केबीनमधून डोकावून बघितलं बाहेर.......
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|