Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 14, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through November 14, 2007 « Previous Next »

Manuswini
Monday, November 12, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजकाल ती style आलीय वाटते, नायकांना expose करायचे. ... भिजवायचे वगैरे अगैरे.

ओम शांती ओम मध्ये शाहरुख, सावरीया मध्ये रणबीर.
रणबीरला कुठल्यातरी एका गाण्यात( trailer on Zee ) मध्ये बिचार्‍याला कायच्य काय शरीर प्रदर्शन करायला लावलेय :-(


Nayana
Monday, November 12, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कलच खूप दिवसाने चांगला picture बघितला not without my daughter खुपच छान आहे जरुर बघा.

Chinya1985
Monday, November 12, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनि अगदीबरोबर. त्या ट्रेलरने तर डोकच फ़िरवल आहे. हिरोचा टॉवेल वगैरे काय???शी.....!!!!!हीरोईन टॉवेलमधे दाखवली असती तर ठीक आहे.

the blair witch project पाहिला. खरिच डॉक्युमेंटरी आहे का??का पिक्चर बनवला आहे डॉक्युमेंटरी स्टाईलनी??ते कलाकार खरच मेले का तिथे??का अजुन जिवंत आहेत??


Farend
Monday, November 12, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओम शांती ओम च्या रिव्यू मधे एक ऑस्कर किंवा फिल्मफेअर पारितोषिकांच्या कार्यक्रमाचे आणि त्यातील चित्रपटांचे विडंबन असलेला शॉट आहे असे वाचले.

तो त्या नेकेड गन ३३ १३ मधल्या ऑस्कर सिक़्वेन्स वरून घेतल्या सारखा वाटतो. कोणाला तसे वाटले का? त्याची लिंक देतो Youtube वरून, मिळाली की.


Manuswini
Monday, November 12, 2007 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

farend ,
मी आधी होते bay area मध्ये.


ओम शांती ओम बघितल्यानंतर घरी आल्यावर डोर पाहीला, मैत्रीणेने आणला होता. (फुकट) म्हणून पाहीला :-)

it brings tears in your eyes, atleast माझ्या डोळ्यात तरी पाणी आले. काय जीवन आहे राजस्थानामध्ये विधवा बायकांचे. हे अजूनही असेच आहे का आजच्या काळात??

one moment वाटते की तीने (आयेशा)ने सही करु नये. तीचा मुद्दा बरोबर आहे जरी ती Selfish , निर्दयी वाटली तरी कारण तीची अशी अवस्था आमीर मुळेच झाली असते.

पण मग चांगले वाईट च्या नादात माणुस फसतो...

anyways, good movie touching...


Vijaykulkarni
Tuesday, November 13, 2007 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हा चित्रपट कोणी पाहिला का


http://pudhari.com/KolhapurStanikDetailNews.aspx?news_id=10896


Meggi
Tuesday, November 13, 2007 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, अनुमोदन. खूपच सुंदर movie आहे 'डोर'. नागेश कुकुनूर अतिशय हुशार दिग्दर्शक आहे. त्याच्या movies कधीच typical आणि predictable नसतात.

Preetib
Tuesday, November 13, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Just saw Om Shanti Om..its simple comedy one time see movie..far gr8 nahiye pan ekda baghayala harakat nahi..halaki fulaki comedy aahe..
Dipika Padukon sahi aahe

Akhi
Tuesday, November 13, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dipika mind blowing............
बाकी मसाला movie typical bollywood

Nandini2911
Tuesday, November 13, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संजय लीला भन्सालीला दोन गोष्टी पक्क्या माहित आहेत. त्याच्याकडे चांगली कथा आहे आणि रणबीर कपूर आहे. या दोघाच्या बळावर तो सावरिया उभा करतो.

एका रशियन लेखकाची स्वत्:ची प्रेम कहाणी आहे. त्या शॉर्ट स्टोरीला पिक्चर बनवताना भन्साली कलाकृतीशी प्रामाणिक राहतो. देवदासची जशी त्याने मोडतोड केली तशी इथे करत नाही. चार रात्रीत घडणारी ही कथा तो चार रात्रीतच संपवतो. शेवट बदलेल की काय अस्धी मला धास्ती होती.

खरंतर कथा चार वाक्यात सांगता येईल. पण तरीही सावरिया तीन तास चालतो. कारण नऊ गाणी. दहावेळा सोनम कपूरचं सेटभर धावणं. :-)


गुलाब ही या कथेची narrator आहे. रानी मुखर्जीने कमाल काम केलेले आहे. ती दिसतेपण छान आणि एकदम स्लिम. सलमान खान थोडाच वेळ आहे. आणि जितका वेळ आहे तितका वेळ सुसह्य आहे. भन्साली सलमानला चांगला हॅंडल करू शकतो. हे भन्सालीचे यश. खामोशी हम दिल दे चुके सनम मधे त्याने सलमानकडून व्यवस्थित काम करवून घेतलं होतं. सलमानच्या व्यक्तिमत्वाला दिलेला गूढपणा त्याला शोभून दिसतो.

सोनम कपूर सुरेख नाचते. धावते रडते आणि हसते. (या व्यतिरिक्त ती पिक्चरमधे काहीही करत नाही. :-)) पूर्ण सलवार कमीझमधे पण तिने स्वत्:ला बर्‍यापैकी "दाखवलं" आहे. अर्थात हे क्रेडिट भन्सालीचं.

बेगम पारा आणि जोहरा सैगल या दोघीची दाद द्यायलाच हवी. जोहरा सैगल तर काय काम करते!!! जबरदस्त. बेगम पारा तर पृथ्विराज कपूरची नायिका होती. तिच्या तोंडी मुघलेआझमचे संवाद दिलेले आहेत. :-)

But the hero of this film is Ranbir कथेच्या दृष्टीने आणी अभिनयाच्या दृष्टीने पण. प्रत्यक्षात अत्यंत गंभीर असलेला रणबीर कॅमेरासमोर मात्र सहज होउन जातो. त्यासाठी त्याला विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. एंट्रीचा त्याचा स्टुपिड चेहरा सोडल्यास बाकी काम जबरदस्त.... त्याच्या अंगात कपूर घराण्याचं रक्त धावतय हे सांगायलाच नको. त्याने अधून मधून केलेली राज कपूरची आणि शम्मी कपूरची नक्कल तर लक्षात सुद्धा येत नाही इतक्या सहज तो करतो. नीतु कपूरसारखा चेहरा ऋषी कपूरचा आवाज राज कपूरची शरीर यष्टी आणि शम्मी कपूरचा नाच. (तसंही पोरगं शम्मीच्या वाटेने जास्त जाईल त्याची प्रेमप्रकरणं पाहिली तर.... :-))

जबसे तेरे नैना गाण्यामधे त्याने एक्स्प्रेशन्स आणी स्टेप्स नीट केल्या आहेत. टॉवेलचं म्हणाल तर.. पडायला हवा होता. :-) कमॉन, आरकेचा हीरो पांढर्‍या कपड्यात (तेही कमीत कमी) दिसायला नको का??? सर्व मक्तेदारी काय हीरॉईन वर आता त्याची ट्रेनिंग सलमान घेतोय म्हटल्यावर बॉडी दाखवायची लाज कसली???

यु शबनमी मधे पण तो छान नाचला आहे. त्या गाण्याची कोरीओग्राफी पण छान आहे. त्याच्या अंगात रिदम आहे. गोविंदासारखा टीपिकल फ़िल्मी डान्स तो मस्त करेल. आणि तसंही

भन्सालीला मानायला हवं ज्या पद्धतीने रणबीरला हाताळलय. हुकुमाचा एक्का असल्यागत भन्साली त्याच्याकडून काम करवून घेतो. रणबीरमधला निरागसपणा दाखवण्यात तो पूर्ण यशस्वी ठरला आहे. राज कपूरने जो या भोळसट नायकाचा प्रकार आणला त्यात रणबीर स्वत्:ला फ़िट बसवतो, हो बसवतो कारण तो स्वत्: प्रत्यक्षात तसा नाही. :-) बारमधे जाऊन दूध वगैरे मागणे जरा अतिच होते. तो भाग वेगळा.

मला स्वत्:ला रणबीर गुलाबच्या दारात जातो तो सीन आणि फोनवरून लिलनशी बोलतानाचा (सकीना निघून गेल्यावर) सीन खूप आवडले.

ते सुरुवातीचे "परी" गाणं ब्लॅकमधे असल्यासारखी साईन language वापरली आहे. :-) ते गाणं कापलं तरी चालेल.

भन्सालीने केलेला hues वापर नंतर त्रासदायक ठरतो. वातावरण निर्मितीसाठी आवश्यक असलेला अंधार शेवटी शेवटी वैताग देतो. कालाअ हिरवा आणि निळा हेच तीन रंग दिसत राहतात. त्याला contrast म्हणून फ़क्त रणबीर पांढर्‍या costume मधे दिसतो. बाकी सर्व कॅरेक्टर्स background ला मर्ज होताना दिसतात. रंगाचा हा वापर बघण्यालायक आहे.


पिक्चर पडला अशी हाकाटी न्युज चॅनलवाल्यानी तिसर्‍या शोपासुन सुरू केली. प्रत्यक्षात ओम शांती ओम आणि सावरियाची जातकुळी वेगळी आहे. आणी सलमान म्हणतो तसं there is enough audience for both films :-)

सावरिया पैसे जरूर रीकव्हर करेल. प्रॉफ़िट किती बनवेल ते आताच सांगता येणार नाही. सॅड शेवट असल्यामुळे सध्या ऑडियन्स त्या मूडमधे नाही. रीपीट ऑडियन्स मिळण्याची शक्यता कमी आहे. पण तरी रणबीर आणि सोनम प्रेक्षकाच्या पसंतीला उतरत आहेत. आणि तेच तर बॉलीवूडला हवं आहे.




Prady
Tuesday, November 13, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपली मराठी वर काल बकुळा नामदेव घोटाळे पाहिला. टोटल टीपी आहे. सिद्धार्थ जाधवचं काम छान आहे. नवी हिरॉईन सोनाली कुलकर्णी पण भाव खाऊन जाते. विनोद देखील नेहेमीचे पाचकळ नाहीत. त्यामुळे मजा आली.

Sas
Tuesday, November 13, 2007 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी
I hv not seen movie yet but तू खुपच छान review/ समीक्षा लिहिली आहेस. :-)

Chinya1985
Tuesday, November 13, 2007 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टॉवेलचं म्हणाल तर.. पडायला हवा होता.

नन्दिनी, और कितना गिराएगी??????
.....
टॉवेलको


Manuswini
Tuesday, November 13, 2007 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, हे हीरोईन टॉवेलमध्ये असती तर 'ठीक' आहे म्हणजे काय रे?? आँ .. (राज कपूरचा फ़ॅन आहेस का?)
ते हीरोईन ला तरी का टॉवेल मध्ये?


Deepanjali
Wednesday, November 14, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टॉवेलचं म्हणाल तर.. पडायला हवा होता. कमॉन, आरकेचा हीरो पांढर्‍या कपड्यात (तेही कमीत कमी) दिसायला नको का??? सर्व मक्तेदारी काय हीरॉईन वर आता त्याची ट्रेनिंग सलमान घेतोय म्हटल्यावर बॉडी दाखवायची लाज कसली???
<<<< JA आणि सलमान नी expose करायला काही objection नाही
पण रणबीर फ़ारच girly वाटतो मला .


Ami79
Wednesday, November 14, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहावा की न पहावा, कळत नाही. :-)

Nandini2911
Wednesday, November 14, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मान गये दोस्त, ज्या पद्धतीने शाहरुखने मीडीया गेम खेळलाय... मान गये.
शुक्रवारपासुनच ओम शांति ओम लोकाना आवडल्याची "ब्रेकिंग न्युज" यायला लागली. आणि त्याचबरोबर "सावरिया" सुपर फ़्लॉप असल्याची.
फिर भी दिल है हिंदुस्तानीच्या वेळेला शाहरुखने रोशन पिता पुत्राकडे साफ़ दुर्लक्ष केलं होतं आणि ती चूक त्याला बरीच महागात पडली होती. इथे तर कांटे की टक्कर होती.
तरीही त्याने बर्‍याच गोष्टीचा फ़ायदा उचललाय.. एक म्हणजे भन्साली भडकू आहे. दुसरं म्हणजे रणबीरची गर्लफ़्रेंड त्याच्या पिक्चरची हीरॉईन आहे. दिपिकाला ज्या पद्धतीने पुश केलं गेलत त्याला तोड नाही.

त्यातच रणबीर gay असल्याची पद्धतशीर अफ़वा पसरवली गेली आहे. क्रिटीक्स तर सगळे केव्हाच खिशात घातले आहेत. मजा बघा... हेच क्रिटीक्स जे oso ला चांगलं म्हणत आहेत, एरवी बॉलीवूड तीपिकल मसाला फ़िल्म बनवत असतो नवीन वाट चोखाळतच नाही म्हणत असतात.
प्रदर्शनापूर्वी सावरिया चांगला होता. आता अचानक बॅड फ़िल्म झालाय.. :-)
मीडीया opinion maker होतोय त्याचेच हे लक्षण आहे.
भन्सालीने भडकून काही बोललं तर त्याचंच हसं होईल त्यापेक्षा त्याने आता सरळ नेक्स्ट फ़िल्म डीक्लेअर करावी. (बाजीराव मस्तानीचे घोडं पेंड खातच आहे.) त्यामधे रणव्बीर असेल हेही सांगावं.
पहिलेछूट रणबीरला inaccessible करून टाकावा. interviews, TV appearance, page 3 appearances सर्व बंद. रणबीर बघायचाय?? थेटरात सापडेल.

टीव्हीवरून सर्व प्रोमोज काढून टाकावेत आणी त्या ऐवजी ऑदियन्स री ऍक्शन आणि मेकिंग ऑफ़ सावरियाचे प्रोमोज टाकावेत.

रण्बीर दिपिकचा रोमान्स परत उगाळाला पाहिजे. कशा पद्धातीने तिने त्याला शिडी म्हणून वापरलं आणि जेव्हा त्याला तिची गरज होती तेव्हा ती कशी सोडून गेली वगैरे वगैरे ईमोशनल स्टफ़... खास पोरीसाठी.

सोनमचे बिकीनीशूट ऑलरेडी झालेले आहे. त्यात ती हॉट दिसते. ते फोटो पब्लिश करावेत. हे सर्व सावरिया चालण्यासाठी.


आणे रणबीरसाठी बेस्ट म्हणजे तो चित्रपट द्ग्दर्शित करतोय हे पिल्लू सोडून द्यावं... त्याला नुसता न्युअकमर ऐवजी फ़िल्म मेकर म्हणून पुश करावा.

(बहुतेक जण मी नक्की काय काम करते हे विचारतात. तर यालाच पी आर म्हणतात. :-)


Dakshina
Wednesday, November 14, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळीच्या सुट्टीत ३ / ४ चित्रपट पाहीले.

आवारापन : हा चित्रपट मी का पाहीला? तुम्ही अजून नसेल पाहील तर बरंय. कधी पाहून नका, अगदी फ़ुकट दाखवला तरीही.
इम्रान हाश्मी हा एक (जणू) आयूष्याला कंटाळलेला माणूस, जो आपल्या मालकाची इमाने इतबारे सेवा करत असतो. एके दिवशी त्याचा मालक त्याला सांगतो की 'मी पाकिस्तानातून एक मुलगी आणली आहे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे तू तिच्यावर लक्ष ठेव, अनि शोधून काढ कि तिचं दुसर्‍या कोणावर प्रेम आहे क? कारण मला तसा संशय आहे.' झालं य गोष्टीवर चित्रपट निघू शकतो का? पण तो काढलाय. इम्रान चे स्त्री शिवायचे चित्रपटातले वावरणे म्हणजे मासा हवेत चालल्यासारखे वाटते. मग तिला पाहून त्याला त्याच्या प्रेयसीची आठवण काय येते, मध्येच ते कबूतर आणि पिंजरा याचा संबंध विनाकारणच जोडल्या सारखा वाटतो. इतके दिवस पकिस्तानी नटीवर लक्ष ठेवणारा तो, अचानक त्यांना पळून जायला मदत करतो. आणि हे नेक काम करता करता आपले प्राण गमावतो...



Dakshina
Wednesday, November 14, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचं लिहीते हळू हळू आत्ता खूप काम आहे.

Jiten
Wednesday, November 14, 2007 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tumchya Paiki kuni kuni ashwini bhave cha navin chitrapat pahila aahe ???

KADACHIT...

tichi acting chaan zhali aahe..

http://www.kadachitthefilm.com/



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators