|
Kshanik
| |
| Wednesday, November 14, 2007 - 4:54 pm: |
|
|
येथे चित्रपटांवर बरेच BB आहेत, या विषयांवर आधिच चर्चा झाली असेल तर माफ़ करा. tamil, italian, japanese अशा भाषेमध्ये पुष्कळ चांगले चित्रपट आहेत, त्यांविषयी येथे चर्चा करुयात....
|
Kshanik
| |
| Wednesday, November 14, 2007 - 5:08 pm: |
|
|
मला आवडलेला Vita è bella, La (aka Life is beautiful)हा चित्रपट. नाझि डेथ कॅम्प वर आधारित आहे. Roberto Benigni मस्तच काम केले आहे. त्याचा हसत खेळत जगन्याचा दृष्टिकोन छानच. लहान मुलाचे कामही उत्तम झाले आहे. जरुर पहाच.
|
Ramani
| |
| Wednesday, January 16, 2008 - 9:48 am: |
|
|
ही लिन्क आज सहज युट्युबवर फिरता फिरता मिळाली. हिन्दीच आहे, पण पकिस्तानी चित्रपटतील. बहुदा आपल्या रेखाचा 'उमराव जान' या चित्रपटवरुन प्रेरणा घेउन केल गेला असावा. http://www.youtube.com/watch?v=7ei3nlAqFFg&feature=related http://www.youtube.com/watch?v=tn37SdqsHUA&NR=1
|
Mbhure
| |
| Thursday, February 07, 2008 - 8:06 pm: |
|
|
बर्याच BB add झाल्या आहेत. Cure: हा जपानी सिनेमा भयंकर आणि विचित्र आहे. Kiyoshi Kurosawa ह्या दिग्दर्शकाचा हा सिनेमा आहे. Akira Kurosawa शी ह्याचा काही संबंध नाही. DVD मिळाल्यास दिग्दर्शकाची मुलाखत बघावी आणि वाटल्यास चित्रपट परत पहावा. Nobody Knows: हा ही जपानी चित्रपट आहे. भरपुर अवॉर्डस आहेत पण मला आवडला तरी एव्हढा "Great" वाटला नाही. एक मुलगा हिरो आहे. त्याचे काम फार छान आहे. एकदा मात्र अवश्य बघावा. सागरसंगमः कमल हसन आणि जयाप्रदाचा हा एक अत्युकृष्ट सिनेमा आहे. ह्या चित्रपटासाठी कमल हसन नृत्य शिकला. दारु पिऊन विहीरीच्या कठड्यावर केलेला नाच तर सहीच.
|
Ajjuka
| |
| Friday, February 08, 2008 - 4:25 am: |
|
|
All time fav.. Irani films Majid Majidichya sagalya Children of Heaven, Baran, Colours of Paradise Majidi chya nasalelya Irani films Poet of the west Turtles can fly Aavadaleli Israeli film Aviva My life Emir Kusturica chya Underground, Black Cat White Cat ya films Will write in detail abt some of these later. Emir Kusturica probably!
|
Mbhure
| |
| Friday, February 08, 2008 - 5:26 pm: |
|
|
अज्जुका, एक Correction Turtles Can Fly by Bahman Ghobadi Poet of West by Mohamad Ahmadi
|
Sas
| |
| Saturday, February 09, 2008 - 1:36 am: |
|
|
मला आवडलेले 'बंगाली' चित्रपट : दहन, शुभ मुहुरत, तितली, आंतर महल, चकोर बाली... gr8 direction and acting, must see... atleast once. हे सारे चित्रपट वेगवेगळ्या कथानकावर आहेत NOT like 'Hindi' movies (Love-Relation Drama's or Fights and Songs... most of the time same theme... )
|
Ajjuka
| |
| Monday, February 18, 2008 - 10:34 am: |
|
|
एमभुरे, धन्स! मला पटकन नावं आठवली नव्हती पण माजिदीच्या नाहीत हे लक्षात होतं. म्हणून तर माजिदीच्या नसलेल्या असं लिहिलं होतं.
|
Sas
| |
| Thursday, February 28, 2008 - 3:10 am: |
|
|
Few more good Bangla movies: Tak Jhal Mishti, Unishe April, Bibar, Nagordola
|
Mbhure
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:17 pm: |
|
|
वीकएण्डला अखेर पाहिला "Turtle Can Fly" . केवळ अप्रतिम. एकदा नव्हे अनेकादा बघावा असा हा चित्रपट आहे. ह्यातील काम करणारे इराक / तुर्कस्थान सीमेवरील निर्वासीत आहेत. कोणी खास ऍक्टर नाहीत. बहुतेक सर्व १३ - १४ वर्षाची मुलेच आहेत. Don't Miss. दुसरा चित्रपट बघितला तो ऑस्कर विजेता चिनी चित्रपट "Farewell My Concubine" . तसा टिपीकल चायनीज चित्रपट आहे म्हणजे चित्रपटाची कथा मोठ्या Span मध्ये पसरलेली; यात साधारण १९२६ पासुन अगदी Cultural Revolution पर्यंतचा काळ दाखवला आहे. फक्त त्यामानाने त्यातील Main Characters तरुण वाटतात. कथा तशी विचित्र आहे पण हा सिनेमा एकदा पाहावा असा नक्कीच आहे. Barbarian Invasion: अजुन एक ऑस्कर विजेता चित्रपट. एकेकाळी " धमाल " करणारा पण आता कॅन्सरमुळे आणि वयोमानानुसार हट्टी आणि दुराग्रही झालेल्या बापाची गोष्ट आहे. वडीलांचे शेवटचे दिवस मजेत जावेत म्हणुन त्याच्या मुलाने केलेले प्रयत्न आणि त्यातुनच एकमेकांपासुन दूर गेलेले बाप आणि मुलाचे जवळ येणे अशी कथा आहे. चित्रपट प्रेंच भाषेत आहे.
|
Ajjuka
| |
| Wednesday, March 05, 2008 - 4:20 am: |
|
|
Underground by Emir Kusturica सिनेमा सुरू होतो तेव्हा २ खुशालचेंडू ऐय्याश मित्र कम्युनिस्ट पार्टी जॉइन केली म्हणून सेलिब्रेट करताना दिसतात. दारू ढोसून संपूर्ण खलास झालेले हे दोघे म्हणजे eat drink be merry! हा मंत्र personified आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं कम्युनिस्ट पार्टी मधे जाण्याचं कारणही असंच पपलू. दारू किंवा मुली किंवा प्रतिष्ठा. हा काळ आहे दुसर्या महायुद्धाच्या वेळचा. देश आहे पूर्व युरोपातला. ज्यांचा महायुद्धाशी प्रत्यक्ष संबंध कधीच नव्हता पण मुळात छोटा आणि परावलंबी देश असल्याने कधी जर्मनी तर कधी फ्रेंचांना मदत करणे हे भागधेय. दोघा मित्रांची एक नटी मैत्रिण असते. एकजण तिच्याशी लग्नही करायचं ठरवतो. लग्न चालू असतानाच पोलिस येतात आणि यांची पळता भुई थोडी होते. कसेतरी ते आपापल्या घरात पोचतात. लग्न करणार्या मित्राला त्याची बायको(नटी नव्हे आधीची) सांगते की तिची वेळ जवळ आलीये आता कधीही ती प्रसूत होऊ शकते. यातच दुसर्याच दिवशी बॉम्बिंग सुरू होते. घरे बेचिराख होतात. आणि या सगळ्यांना एका शस्त्रे बनवण्याच्या कारखान्यात तळघरात लपून रहावे लागते. त्यात रस्त्यावरचा पांगळा मुलगा, नटी, गरोदर बायको असे अनेक जण असतात. एकिकडे त्याचय बायकोला प्रसूतिवेदना सुरू होऊन ती तळघरातच मुलाला जन्म देते. तो कारखाना दोघांपैकी दुसर्या मित्राच्या वडिलांचा असतो. हा मित्र अधून मधून बाहेर जाउन जगाची खबरबात आणत असतो. अशी खूप वर्षे जातात... यापुढचा सस्पेन्स मी सांगत नाही. कारण ते बघण्यातच खरी गंमत आहे. पण हा सगळा वरचा भागही आपण शांतपणे बघू शकत नाही किंवा गंभीरपणे बघू शकत नाही. सगळ्याला काळ्या विनोदाची (black comedy) चा पाया आहे. आपण खिदळत असतो आणि त्याच वेळेला म्हणत असतो की कशावर हसतोय आपण. काय हे? हे 'काय हे?' feeling गडद गडद होत जातं. आपण थकतो. पण सिनेमा संपेपर्यंत सोडत नाही आपल्याला. शेवटी उरते एक भयाण शांतता. खूप काही चांगलं आणी वाइट दोन्ही मोडून संपून गेल्यानंतरची. नक्की बघा!
|
Ajjuka
| |
| Thursday, March 06, 2008 - 3:00 am: |
|
|
सध्या काही तुरळक ठिकाणी मुंबईत गेल्या वर्षी Foreign Film Catagory मधे ऑस्कर जिंकणारा The Life of Others हा जर्मन सिनेमा लागला आहे. कालच मी पाहून आले. सगळ्यांनी जरूर पहा. MUST SEE! अतिशय साधी treatment कुठेही उगाचच music, sound effects देऊन भडक करणे नाही. अत्यंत रूक्ष Statsi च्या आयुष्यातलं किंचितसं मार्दव हळूच डोकावत रहातं. अप्रतिम! शेवटाला उगाचच Cyrano De Bergerac, Poet of the West इत्यादी films ची आठवण येते. अरे हो BTW Cyrano De Bergerac ही एक अत्युत्कृष्ट फिल्म आहे. जुनी आहे. बरेच जणांनी पाह्यलीही असेल. नसेल तर बघायलाच हवी. त्यावरून आपल्याकडे एक भिकार चित्रपट झाला होता. साजन नावाचा. Cyrano पाह्यल्यावर साजन भिकार का ते लक्षात येईल. बॉलिवूड वाले चांगल्या गोष्टीचं कसं छान वांगं करू शकतात तेही..
|
मामी फ़िल्म फ़ेस्टीवलला कोणी जाणार आहे कां? वडाळा आणि वर्सोवा ह्या दोन्ही खूप आडनिड्या जागा आहेत. ह्यावेळी असे व्हेन्यू का सीलेक्ट केलेत कळत नाही.
|
Mbhure
| |
| Wednesday, March 19, 2008 - 5:18 pm: |
|
|
Togather: A chinese movie from the director of "Farewell My Concibine". चीनमधल्या गावात राहाणारा १३ - १४ वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडिल ह्यांची गोष्ट आहे. मुलगा व्हायोलीन वाजवण्यात जन्मजात निपुण असतो. त्याला ह्याच कलेत मोठे करावे हा एकाच ध्यास घेऊन वडिल बेजिंगमध्ये येतात. पहिल्याच स्पर्धेत उत्तम व्हयोलीन वाजवूनही पाचवा येतो. तेंव्हा वडिलांना कळते की चांगली "Connection" असल्याशिवाय मुलगा पुढे जाऊ शकणार नाही. त्याच स्पर्धेच्या वेळी हजर असणारा आणि प्रेमात फसलेला Maestro त्या मुलाचे गुण ओळखतो. बर्याच मिनतवर्या केल्यावर तो त्याला शिष्य म्हणुन स्वीकारतो. तो मुलाला पहिला धडा देतो तो हाच की Only play when your heart desires . मुलाला पुढे आणण्या करीता वडिल कष्ट करुन पैसे साठवत असतात. एकदा एका Auditorium चे रिपेरिंग काम करताना ते, एका मुलाच्याच वयाच्या वादकाचा ओर्केस्टॉ बघतात. त्यांच्या लक्षात येते की आपल्या मुलाला नुसताच शिकवाण्याएवजी पुढे नेणारा गुरु पाहिजे. मग मुलाला नव्या गुरुकडे पाठवण्यात येते............ ह्या गोष्टीत अजुन एका तरुण मुलीची कथाही आहे; जी समोरच्या बिल्डींगीत रहात असते. व्हायोलिनचे काही जबरदस्त Pieces आहे. Don't Miss this movie.
|
Preetib
| |
| Wednesday, March 19, 2008 - 6:01 pm: |
|
|
Robin Proof fence based on natives of Australia..एक सुन्दर मुव्ही आहे. . Its based on Half child concept..Native tribals had kids with white people and they termed as Half child. Such kids were removed from their origin and kept aside for many years in 1930s ..in turn they loose their identity. Few months back, australian prime ministor openly apologized about this.. movie is about 2 girls who escaped from the barrier and walked across the fence for more than 800 miles to come back to their tribal area.. apratim anubhav aahe
|
Farend
| |
| Wednesday, March 19, 2008 - 6:22 pm: |
|
|
प्रीती, Rabbit proof fence म्हणायचे आहे का? मी अर्धवट पाहिलाय, चांगला वाटला.
|
Runi
| |
| Wednesday, March 19, 2008 - 8:41 pm: |
|
|
प्रिती, मी बहुदा हा सिनेमा बघितलाय ३-४ वर्षांपुर्वी म्हणजे नाव आठवत नाही पण कथा वाचुन आठवले. त्या दोन मुली कश्या सगळ्या पहारेकर्यांना चुकवत शेकडो मैल चालत घरी येतात. मला चांगलाच लक्षात राहिला कारण तो सत्य घटनेवर आधारलेला होता असे मी तेव्हा वाचले होते. खुपच सुंदर आहे तो सिनेमा, मला खुप आवडला होता, पण मला somehow वाटत होते की त्या सिनेमाचे नाव Long walk home आहे म्हणुन.
|
Mbhure
| |
| Wednesday, April 09, 2008 - 3:12 pm: |
|
|
Spring, Summer, Fall, Winter... Spring: थोडा spiritual level वर असलेला हा कोरियन सिनेमा छानच आहे. एका छोट्या बेटावर एक बौध्द भिक्षू आणि लहान मुलगा असे दोघेच असतात. बाहेरच्या जगाशी त्यांचा गरजे पुरता (खाणे, कपडे..) संबंध असतो. तो लहान मुलगा त्या भिक्षूकडे शिक्षण घेताना त्याची इतर कामे करतो. हा चित्रपट त्या मुलाचा लहानपणापासुन Maturity पर्यंतचा प्रवास आहे. चित्रपटाचे नाव आणि त्या मुलाची life Cycle ह्याचे रुपक आहे. फोटोग्राफी तर खासाच आहे. संपुर्ण सिनेमात जेमतेम १० - १२ संवाद आहेत. पण त्यामुळेच सिनेमा जास्त आवडला. ते निर्जन बेट आणि कमीत कमी संवाद ह्याचे combination मस्त जुळले आहे. एका शॉटसाठी हा चित्रपट R rated आहे. US मध्ये बर्याच लायब्ररीत हे चित्रपट मिळतात्; त्याचा अवश्य लाभ घ्यावा. Father & I: फ्रेंच सिनेमा बाप आणिमुलामधील संबंधावर(तणावपुर्ण) आहे. सर्वांचा अभिनय छानच आहे. Good Bye Lenin: पुर्व जर्मनीत कम्युनिस्ट पक्षाची कट्टर कार्यकर्ती कोमातुन जागी होते तेंव्हा बर्लिनची भिंत पडलेली असते. दोन्ही जर्मनी एक होत असतात आणि " पाश्चिमात्य " जगातल्या सर्व भल्याभुर्या गोष्टी आता पुर्वेला सुरु झालेल्या असतात. अश्यावेळी आपल्या आईला (जिची कम्युनिझमवर पुर्ण श्रद्धा आहे)हा धक्का बसु नये म्हणुन तिच्या मुलांनी केलेली धडपड आणि त्यत त्याची होणारी ओढाताण ह्याची कथा आहे. थोडी Black comedy , थोडी गंभीर अशी ही गोष्ट आहे. ह्या चित्रपटाला भरपुर बक्षिस मिळाली आहेत आणि ते योग्यही आहे.
|
Kshanik
| |
| Saturday, April 12, 2008 - 7:15 am: |
|
|
A moment to remember (Nae meorisokui jiwoogae) नावाचा साउथ कोरिअन चित्रपट , छन प्रेम कथा आहे. कोरिअन हीरोइन फ़ारच क्युट आहे. दोघे घर कस असाव ह्यावरचा प्रसंग तर फ़ारच मस्त चित्रित केलाय. जमल्यास जरुर पहा
|
Maanus
| |
| Thursday, May 01, 2008 - 2:19 pm: |
|
|
Bread & Tulips नावाचा ईटालीयन चित्रपट काल पाहीला. चांगला आहे. चित्रपटाची हीरोईन ४०-४२ वर्षाची बाई आहे, ट्रीप मधे बस चुकल्याने ती घरातल्यांपासुन दुर जाते व पहील्यांदा मिळालेल्या freedom चा ती कसा उपयोग करुन घेते त्याची story http://www.imdb.com/title/tt0237539/
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|