|
Manuswini
| |
| Sunday, November 04, 2007 - 4:21 pm: |
| 
|
हो आता मी आठवत होते, काही सीन खरोखर मजा आणतात. जब वे मेट मधले. एक तो रात्रीचा हॉटेल मधील सीन, शाहीदला थांबवून ती स्वत रेट decide करते तो, मग मन्जीतला नकार द्यायची कारणे तो(वोह impotent है? त्याच्यावर तीचे उत्तर, पता चल जाता है... ) नगाडा नगाडा गाणे छान आहे. you feel like dancing, typical punjabi steps really .. तुमको पाना... गाणे छान आहे.
|
Manuswini
| |
| Sunday, November 04, 2007 - 7:15 pm: |
| 
|
blue umbrella: SUPERB! movie, really must watch मी कधी कधी सकाळीच सकाळी movie बघते, हातात चहा पीत, फालतु असेल तर fast forward करून अर्ध्या तासात संपवायचा. तो पर्यन्त नाश्ता सुद्धा होतो. हा मूवी खरेच छान आहे. करमचंदने उर्फ़ शाहीदच्या बाबाने चांगला अभिनय केलाय.
|
Psg
| |
| Monday, November 05, 2007 - 6:01 am: |
| 
|
'जब वी मेट' बद्दल स्लार्तीला पूर्ण अनुमोदक. छान, हलकाफुलका सिनेमा. करीना मला प्रथमच आवडली.. छान दिसते, आणि लाऊड असली तरी overacting करत नाही. शाहिदला ही संयत भूमिका खूपच सूट झाली आहे. दोघांची केमिस्ट्री मस्त आणि प्रसंगानुरूप विनोदही सही आहेत.. गाणी सुरेख आहेत. २ गाणी तर खूपच शांत आहेत. for a change एखादा फंडू सिनेमा न बघता एक गोड प्रेमकहाणी पहायची असेल, तर अवश्य पहा
|
Milya
| |
| Monday, November 05, 2007 - 6:33 am: |
| 
|
ए पण ती करीना डॊक्यात नाही का जात तुमच्या? किती बोलते ती?
|
Badbadi
| |
| Monday, November 05, 2007 - 6:51 am: |
| 
|
किती बोलते ती? >> मिल्या खूप बोलण्याचा त्रास तुला व्हावा?? हे म्हणजे 'अति'च झालं 
|
'acting म्हणजे कारण नसताना ओठाच्या वेड्यावाकड्या हालचाली करणे' असं बहुतेक तिला वाटत असावं.. बहुतेक चित्रपटात ती (करीना) तेच करत असते... तरी गेली 5/6 वर्षं पडेल नटी असून सुध्दा तिला काम मिळतं हेही आश्चर्य आहेच...
|
Itgirl
| |
| Monday, November 05, 2007 - 3:41 pm: |
| 
|
काल नन्हें जैसलमेर पाहिला. छोट्या मुलाच काम खूपच छान जमलय. सिनेमा आवडला. फ़क्त मधून मधून बॉबी देओल सहन करावा लागतो, ते ही ठीक एक वेळ. त्रास म्हणजे हिमेश रेशमिया २ - ३ गाण्यात रेकतो. तेवढे fast forward केले की काही त्रास नाही एकूण सिनेमा आवडला.
|
जब वी मेट मला जाम आवडला. शाहिदचे काम जबरदस्त झाले आहे. त्याहुनही मस्त काम इम्तियाज अलिने केले आहे. हा या चित्रपटाचा दिग्दर्शक. या आधी त्याने बर्याच विनोदी मालिका दिल्या आहेत. त्याचा पहिला चित्रप्ट सोचा न था पण असाच हलका फ़ुलका होता. मुळात एका व्यक्तीच्या प्रेमात पडलेली व्यक्ती दुसर्या व्यक्तिच्या प्रेमात पडू ह्स्कते तेही कसलंही गिल्ट फ़ील न ठेवता हे हिंदि पिक्चरवाल्याना आधी मान्यच नव्हते. प्यार त्याग दिल की बात नसीबो का खेल असल्या फ़ालतु गोष्टीच भरपूर असायच्या. प्रेमाचा त्रिकोण म्हटल्यावर त्यातला एक मरायला पाहिजे किंवा हिरवीणचे एकाबरोबर सात फ़ेरे व्हायला हवेत असा नियम होता. त्यातच करन जोहर आदि चोप्रा सारखे प्रेम विकायला बसल्यासारखे पिक्चर काढतात. हम एक बार जिते है एक बार मरते है शादी भी एक बार होती है अशा टाळीनाज डायलॉगनंतर हीरॉएनचा हात दुसर्या कुणीतरी आणून देईपर्यंत थांबायचं नाहीत्यर एखाद्या कुत्र्याने याचे लफ़डं जाअहीर करेपर्यंत रडायचं. हल्ली मात्र हा ट्रेंड बदलला आहे. जब वी मेट मधे गीतला काय हवं आहे याची कल्पना आहे. आणि तो डिलेमा ती स्वत्: सोडवते. कुणाचीही मदत न घेता. आदित्य तिच्या प्रेमात पडलाय हे कबूल करतो पण त्यातून विनाकारण देवाला जिंदगीला दोष देत बसत नाही. पण सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे दिगदर्शक कधीच विसरत नाही की हा हलका चित्रपट आहे. एकही सीन त्याने जड कंटाळवाणा रडका ठेवला नाही. अगदी शिमल्याच्या हॉस्टेलपुढचा गीत आणि आदित्यचा सीन.... हॉटेल दीसेंटमधल्या सीनमधे शाहिदचे री ऍक्शन शॉट्स जबरदस्त आहेत. करीनाला दिलेला मुघलेआझम चा टीशर्ट आणि पटियाला फ़्रेम अजूनच विनोदी बनवतात. आदित्यचा गंभारपणा आणि मधे मधे उफ़ाळून येणारा मिश्किलपणा "तुम हमेशा ऐसी बकबक करती हो या आज कोई स्पेशल ऑकेजन है..." सही घेतले आहेत. दारा सिंग छोट्याशा भूमिकेत मस्त काम करतो. अंशुमनचं काम करणारा कोण आहे? दगडी चेहरा ठेवुन पण त्याने हसे वसूल केले आहेत. गाणी सर्व मस्त आहेत, पण मला उस्ताद रशिद खानचे गाणे जास्त आवडले. त्याचे टेकिंग पण उत्तम आहे. मनाली पंजाब चे चित्र्रेकरण पण चांगले झाले आहे. सोचा न था चा शेवट पण गाण्याने होतो. पण तिथे सोनु आणि मधुश्रीचे (बहुतेक) मस्त duet वापरलं होतं. मौज्जाही ला ती सर येत नाही. एकदा बघायला मस्त पिक्चर आहे. करीना शाहिद कपल असताना त्याचे पिक्चर हिट गेले नाही आणि वेगळं झाल्यावर हा पिक्चर हिट गेला. (सेम ह्रितिक करीनाचं झालं होतं.. नंतर त्याने एकत्र पिक्चर करणंच सोडून दिलं.)
|
Sunidhee
| |
| Tuesday, November 06, 2007 - 6:17 pm: |
| 
|
जब वी मेट मला पण आवडला. शाहीद तर मला भयंकर आवडतो. खूप संयत काम केले आहे त्याने, तरी कुठे बावळट वाटत नाही. करीना आधी बोर करायची पण हा रोलच चांगला आहे त्या मुळे थोडी कर्कश्य असली तरी डोक्यात जात नाही. कधी कधी मजा येते तिचे ओरडणे ऐकताना. तरी पण वाटुन गेले की जुनी माधुरी, जुनी रेखा ने अजून जान आणली असती (हे फक्त माझे मत हॉ). हो, पण मग आमचा शाहीद नसता ना त्यात. नंदीनी म्हणते तसे सिनेमा वेगवान आहे. कुठेही रडारड नाही, जोहर-चोप्रा सारखे भावनांचे खोटे प्रदर्शन नाही. (आठवा, 'कभी खूशी...' मधे शाहरुख्-काजोल चा मुलगा अत्यन्त बेसुरपणे जन-गण-मन म्हणतो... ते देशभक्तीचे प्रदर्शन अगदी खोटे वाटते आणि नंतर उगाचच टाळ्या आणि काजोल ई. चे रडे )) आणि अंशुमन नावाच्या मुलाने करीना त्याला फोनवर जे सांगते त्या नंतर आणि शेवटी १-२ एक्सप्रेशन्स इतकी मस्त दिलीत की खो-खो हसु येते. बाकी गोष्टी अनेकानी वर लिहिल्या आहेतच.
|
ओम शांती ओम, सावरिया पाहिले का कुणी????कसे आहेत??
|
Preetib
| |
| Sunday, November 11, 2007 - 12:36 am: |
| 
|
Sawaria ha ekdam bhikar picture aahe..krupaya konihi wel ani paisa waya ghalavu naka. It was torture yesterday night.
|
Suhasya
| |
| Sunday, November 11, 2007 - 7:23 am: |
| 
|
'ओम शांती ओम' च्या काय प्रतिक्रिया?
|
ओम शांती ओम ओमफस आहे. पहीला अर्धा भाग कथा काहीच नसल्यामुळे थोडा सुसह्य झाला आहे. (कारण अर्धावेळ बॉलीवुड वर जोक्स आहेत) पण नंतर मात्र डोक दुखु लागल अन तेच ते फालतु डायलॉग ऐकावे लागले. नॉट वर्थ ईन थेटर. एकच चांगली गोष्ट म्हणजे दिपीका. तेवढेच १० डॉलर वसुल. BTW - आम्ही ग्रुप ने गेलो होतो सर्व पुरुषांना पिक्चर बोअर झाला तर सर्व स्त्रिया मात्र काय छान काय छान करत होत्या. त्यामुळे पाहायचा की नाही ते तुम्हीच ठरवा. American Gangstar चांगला आहे. डैन्झल वॉशींग्टंन बिलकुल निराशा करत नाही. रसेल क्रो पण मस्तच पण त्याला बघवत न्हवत कारण ढेरी सुटलीये.
|
Manuswini
| |
| Sunday, November 11, 2007 - 9:01 pm: |
| 
|
ओम शांती ओम म्हणजे दुसरा टुकार मूवी, आधी bollywood वर जोक्स करून पुन्हा स्वत तोच मुर्खपणा करायचा. नंतर तर आम्ही सर्व हसत होतो. भूत येते काय,शाहरूखला दिसते मग villain ला मारते काय, मग इतके वर्षे काय शांतीप्रिया(भूत) झोपले होते काय? फ़राह एवढा मोठेपणा सांगत होती एका interview मध्ये.. कसचे काय. त्यापेक्षा सावरीया बघायला होता. सावरीया कोणी पाहीला तर टाका इथे review . उगाच $8 कशाला waste करा .
|
Ami79
| |
| Monday, November 12, 2007 - 4:53 am: |
| 
|
देवाच्या कृपेने आम्हाला सावरिया आणि 'ओम' दोन्हीची तिकिटे मिळाली नाहीत. त्यामुळे आम्ही जब वी मेट पाहिला. धमाल, पैसा वसूल आहे. करिना मला अजिबात आवडत नाही. पण तीने रेफ्युजी आणि ओमकारा मध्ये खूप चांगली अभिनय केला असे मला वाटत होते. त्यात आता जब वी मेट सुद्धा ऍड झाला. नक्की पहावा असा चित्रपट आहे
|
ओम शांती ओम अती बकवास सिनेमा आहे. ३ तास ड्राइव्ह करुन अटलांटाला गेलो आणि काय बकवास च्यायला. पिक्चर संपल्यावर बाहेर एक बाई आत जाण्यार्या एका बाईला सांगत होती, "बहोत अछ्छी मूव्ही है. हस हस के पेट दर्द करने लगा है." आणि माझं डोकं दर्द करत होतं. सावरीया संजय भन्साळींचा असल्याने कितीजण धाडस करणार आहेत कोण जाणे? by the way, one of the best lines in a Om Shanti Om review: 'OSO is as much about plot and story as Anna Kournikova is about tennis'
|
Psg
| |
| Monday, November 12, 2007 - 5:30 am: |
| 
|
'ओम..' पूर्ण टीपी मूव्ही आहे.. बोले तो पैसा वसूल.. मुळात तुम्ही 'सिनेमा एन्जॉय करायला जायचा' असंच मनात धरून जा, म्हणजे फ़ार त्रास होत नाही आणि बर्यापैकी करमणूक होते. पहिला भाग खूप लांबवलाय.. तो थोडा कमी चालला असता, पुढचा भाग is fairly engaging . सिनेमा शाहरूखचाच आहे, तरीही श्रेयस तळपदेला चिकार स्कोप दिलाय हे विशेष. आणि दिपिका ही गोड दिसते. तिचे costumes अनुरूप आहेत त्या त्या काळाला. शेवटी सिनेमा predicatable होत जातो. 'दर्द-ए-डिस्को' हे गाणं तर निव्वळ शाहरूखचे ' 6 pack abs ' दाखवण्यासाठी घुसडवले आहे. 'ओम शांती ओम' मधे स्टार्सची परेड आहे, आणि ती छान वाटते बघायला. या गाण्याला प्रचंड शिट्ट्या पडतात, त्यामुळे theatre ही lively होतं एकदम overall, om shanti om is an ok movie
|
Radha_t
| |
| Monday, November 12, 2007 - 8:22 am: |
| 
|
मी पाहिला सावरिया. मला तरी खूप आवडला. return of Raj Kapur . अनिल कपूर ची मुलगी छान दिसते. आणि ऋषी कपूरचा मुलगा acting बरी करतो नाचताही येत. direction & music उत्तम. सगळा सिनेमा अंधारात शूट केल्यासारखा वाटला. पण OK . हिरोचा नंगा नाच सोडला तर मला या सिनेमात कुठलिही गोष्ट खटकली नाही
|
Mansmi18
| |
| Monday, November 12, 2007 - 3:07 pm: |
| 
|
मला वाटते संजय लीला भन्साली प्रेक्षकाना taken for granted करायला लागलाय. black च्या यशाने त्याच्या डोक्यात हवा गेलेली दिसते. त्याला वाटले असेल मी काहीही दिले तरी प्रेक्षक स्वीकारतील. पण प्रेक्षकानी बड्या बड्या दिग्गजाना धूळ चारली आहे..संजयला अजुन खुप मजल मारायची आहे. मला वाटते सर्वात weak point होता "गाणी". Title song वगळता एकही लक्षात राहिले नाही. हा चित्रपट पैसा वसूल करेलही कदाचित पण हे म्हणजे एखाद्या gold medal अपेक्षित करणार्या विद्यार्थ्याला first class मिळण्यासारखे झाले.
|
Amruta
| |
| Monday, November 12, 2007 - 4:47 pm: |
| 
|
jab we met आवडला. पहिल्यांदा करीना ह्यात आवडली. शाहिद पण गोड वाटतो. आता इथले मिक्स्ड रिव्हु वाचुन ओम शांती ओम थेटरात पहावा कि नाही कळत नाहीये.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|