|
Manjud
| |
| Friday, October 12, 2007 - 6:21 am: |
| 
|
झकासला मुलगा झाला आहे हो sssssssssss . मुलगी नाही. झकास बाबा झाला म्हणून नाव बदलेल आणि ते पण झक्कि????? असं वाटलंच कसं तुला अनघा? अहो झक्की काका
|
Zakki
| |
| Friday, October 12, 2007 - 11:27 am: |
| 
|
मंजुद, चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद. बाबा झाला तर फार तर झकोबा म्हणा, झक्की नको. झक्की चा अर्थ माहित आहे ना? नागपूरकरांना विचारा.
|
Chyayla
| |
| Saturday, October 13, 2007 - 7:45 am: |
| 
|
मी नागपुरकरच आहे.. माझ्या माहिती नुसार झक्की त्याला म्हणतात जो जिथे तिथे झक मारतो.. ऐ हाणा त्याला.. कोण रे तो मायबोलीवर जिथे तिथे पिंक टाकतात (झक मारतात) म्हणणारा...
|
Gsumit
| |
| Monday, October 15, 2007 - 7:23 pm: |
| 
|
लै जाम हसु आले सगळे किस्से वाचुन, आता तुमची पाळि हसायची... एकदा मी ऑफिस मधे २-३ मित्रांना विचारत होतो, या वेळेस २६ जानेवारी किति तारखेला आहे म्हणुन... विषेश म्हणजे, या सारखाच एक पोस्ट मी archives मधे पाहिला, अन बराच वेळ replyचि लिन्क तिथेच खाली शोधत होतो...
|
Gsumit
| |
| Monday, October 15, 2007 - 8:08 pm: |
| 
|
अजुन एक आठवला, फ़र्स्ट इयरला असतानी computer fundamental practicals घ्यायल एक नवीन सर यायचे, बुट्टे होते त्यामुळे पोरं आणी सर सगळे सारखेच वाटायचे. ते नेहेमी खुर्चीत बसुन शिकवायचे आणी आम्ही मागे घोळका करुन ऐकायचो. एकदा मी लेट झालो, पळत पळत practical ला गेलो, खुर्चिवर पाहिले तर एक मित्र बसलेला, मग शेजारच्या पोराच्या खान्द्यावर हात टाकुन विचारलं छोटु (सराला छोटु म्हणायचो आम्ही) नाही आला का अजुन? सगळी पोरं गुपचुप, मी सहज हात टाकलेल्या मुलाकडे बघितले तर तेच सर होते...
|
Sunidhee
| |
| Tuesday, October 16, 2007 - 10:42 pm: |
| 
|
काही वर्षापूर्वी माझी विनोदबुध्धी जेव्हा काम करत होती तेव्हाचा प्रसंग.. मला आधी तत्काळ प्रसंगानुरुप विनोद करणे किंवा कोट्या करणे किंवा काहीतरी चेष्टा करणे ह्याची खूप सवय होती. ही सवय अशी मुरली होती की कधी कधी विचार मनात आला आणि 'हे बोलुन दाखवू की नको?' असा विचार करण्याआधीच तो शब्दरुपाने बाहेर पडायचा.. तर अशीच एकदा ऑफीसात कुठूनतरी कुठेतरी चालले होते. एक मुलगा नुकताच भारतातुन इथे आला होता. तो माझ्या एका मित्राबरोबर बोलत उभा होता. मी त्या नविन मुलाला ओळखत नव्हते. तर माझे मित्राकडे लक्ष गेले. मी त्याला काहीही कारण नसताना उगीच घाबरवायला म्हणाले 'अरे SSS !!! पडशी SSS ल". तो नविन मुलगा जणु भिंत ही एक गादी आहे असे समजून अगदी आरामा SS त भिंतीला टेकुन उभा होता. इतका तिरका उभा होता की बास. माझे त्याच्याकडे आधी लक्ष गेले नव्हते. पण माझे हे वाक्य ऐकून तो दचकला आणि अक्षरश: धडपडत सरळ उभा राहीला. तेव्हा मला आपली चूक झाल्याचे कळले. मग ती चूक सुधारण्यासाठी मला फक्त त्याला सांगायचे होते की 'तुला नाही, त्याला म्हटले'. पण असा विचार मनात आला कि त्याला जर वाटले, 'हा तर नीट उभा होता तरी ही त्याला असे का बोलेल?? म्हणजे ही मलाच बोलली, काय आगावु आहे?' ईत्यादी ईत्यादी.. , माझ्यापाशी तर १-२ सेकंद होते उत्तर द्यायला. आणि विचार करायच्या आत माझ्या जबड्यातून शब्द बाहेर आले 'तुला नाही, भिंतीला म्हटले' !!!!! आणि दुसरी भयानक चूक केल्याचे मला कळले कारण तो जाडजूड होता.. आणि अजुनच ओशाळत कसनुसा हसला. मी मात्र धरणी दुभंगायची वाट न पहाता पुन्हा माझे तोंड काय उचकटेल ह्या भितीने तडक तिथुन निघुनच गेले. पण फार ओशाळायला झाले बुवा..
|
Chyayla
| |
| Wednesday, October 17, 2007 - 5:28 am: |
| 
|
बिचारी सुनिधी, म्हणजे तुच पडली तिथे.. खरच फ़ार ओशाळायला होत अशा वेळेस. पडण्यावर माझा ईब्लिसपणा वेगळा असतो अगदी सावकाश सांगायच... हळु पडायच हं. या वेळेस २६ जानेवारी किति तारखेला आहे म्हणुन अरे सुमीत असच विचारुन त्यांची फिरकी घेतली म्हणायच आणी ईब्लिसपणाच्या BB वर खपवायचस ना. मी तर मुद्दाम विचारतो गुड फ़्रायडे कोणत्या वारी आहे.? यावरुनच बरे आठवले, ३१ नोव्हेंबरला माझ्या कडे धमाल पार्टी आहे नक्की यायच हं सगळ्यानाच आमंत्रण आहे बर.
|
Gsumit
| |
| Wednesday, October 17, 2007 - 2:34 pm: |
| 
|
आत्ताच घडलेला एकदम फ़्रेश वेंधळेपणा.... मायबोलीमुळे... मित्रा बरोबर "गुगल टॉक" वर मराठित चाटिंग करत होतो... तिथ लिहीलं... ithe tha.nDii chaa.ngaliich vaaDhatiiye aataa... मला काय म्हणायचे होते ते तुम्ही ओळखतालच...
|
Anaghavn
| |
| Saturday, October 27, 2007 - 9:00 am: |
| 
|
हो झक्की, माझा हा सुध्धा मस्तपैकी पचका झाला!झकास रावांनाच झक्की म्हणतात, असा माझा गैरसमज!!. पण मंडळी मी काही इतकी ही (वेंधळी) नाही. पण आपला वेंधळेपणा किंवा चुक मोकळ्या मनाने मान्य केला की त्याची लज्जत आपल्यालाही अनुभवता येते. हो ना?
|
Anaghavn
| |
| Tuesday, October 30, 2007 - 12:12 pm: |
| 
|
याला वेंधळेपणा म्हणायचा की आणखी काही हे माहीत नाही. आगदी आत्त्ताच घडलेला प्रसंग--- आमच्या कंपनी च्या मेन दरवज्याचं लॉक खूप दिवसांत मला दिसलं नव्हतं. (ते लॅच आहे). माझा मेन बॉस परवाच यू.एस. वरून परत आला. आज तो विचारत होता, या दरवजाचं लॉक तुटलं का?दिसत नाहिये. मी भोचक पणा करून म्हणाले,"हो तुटलं आहे." तेहढ्यात माझा इमिडिएट बॉस म्हणाला,"नाही, ते मी काढून ठेवलं आहे.सारखं दार आपटतं म्हणून."
|
Badamraja
| |
| Tuesday, October 30, 2007 - 1:28 pm: |
| 
|
हा कीस्सा काॅलेज प्रॅक्टीकलच्या वेळेस घडला. झाल काय प्रॅक्टीकल होत जावा च आणि आमच्या लॅब मधील काॅमप्युटर ठेवण्याची पद्दत थोडी उलटी होती. म्हणजे सी पी यू (इंग्रजीमधे सी पी यू कसा लीहीतात ?) जो नेहमी उजव्या बाजुला असतो तो डाव्या बाजुला ठेवलेला होता. अस प्रत्येक काॅमप्युटरच. म्हणजे माझ्या माॅनीटर च्या उजव्या बाजुला शेजारच्याचा सी पी यू माझा १०-१५ लाइन्संचा प्रोग्राम लिहुन झाल्यावर मी तो रन केला आणि माझा काॅमप्युटर हॅंग झाला (लटकला). मी लगेच सी पी यू च रीसेट बटन दाबल... एकदा दाबल दोनदा दाबल पण काॅमप्युटर काही रीस्टार्ट झाला नाही. शेजारी बसलेला माझा मित्र माझ्याकडे हतबल होउन बघत होता आणि मग माझ्या लक्षात आल की मी चुकून त्याचाच काॅमप्युटर रीस्टार्ट केला आणि त्याने टाइप केलेला ४५०-५०० लाइन्संचा प्रोग्राम घालवला. त्यानंतर हसत हसत मी पुर्ण काॅलेज पळालो आणि तो माझ्या मागे मला मारायला. अजुनही मी जेव्हा कुठे माॅनीटरच्या डाव्या बाजुला सी पी यू बघतो मला तो प्रसंग आठवतो...
|
Tiu
| |
| Tuesday, October 30, 2007 - 5:49 pm: |
| 
|
(इंग्रजीमधे सी पी यू कसा लीहीतात ?) >>> CPU ;-)
|
Prajaktad
| |
| Tuesday, October 30, 2007 - 6:01 pm: |
| 
|
इंग्रजीमधे सी पी यू कसा लीहीतात ?) >>> मधेच इग्रजी लिहायचे असेल तर.. <> हि ब्रकेट वापरा..उदा: <c.p.u>
|
Badamraja
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:54 am: |
| 
|
thanks प्राजक्ता आणि Ti उ
|
Anaghavn
| |
| Friday, November 02, 2007 - 9:48 am: |
| 
|
बर्याच दिवसांत कोणी दिसलच नाही. आणि ती "अल्पना--दिल्लीवाली" कुठे आहे सध्या? योगेश,च्यायला,सखी,शेष,दक्षिणा,अज्जुका-----सगळे कुठे आहेत सध्या?य BB वर भेटा न एकदा. अनघा
|
Alpana
| |
| Friday, November 02, 2007 - 11:20 am: |
| 
|
अग अनघा मी दिल्लीतच आहे... पण सद्ध्या घरी आराम करतेय....कशी काय सुधारणा झाली माहित नाही...पण हल्ली मी खुप शहाण्यासारखी वागतिये.... कित्येक दिवसात वेंधळेपणाच नाही केला... अर्थात माझ्या नवर्याला नाही पटत हे....
|
आपुन बी जित्तं हाय!! सध्या सकाळी-सकाळी ब्लूलाईन बसेस च्या १०३व्या बळीबद्द्ल लिहित आहे. आॅफ़िसात आलो की वेंधळेपणाला सहसा scope नसतो (तरी कधीकधी करून घेतोच!! ) अल्पनाक्का, दिल्लीमध्ये कुठे? आम्ही सध्या लाजपतनगर मध्ये आहोत, आणि घरमालकाच्या कृपेने 'एक अकेला इस शहर में' गात आहोत! (आम्ही तिघं खरंतर्- तीन तिघाडा- पण nothing बिघाडा!!) इतक्यातला ताजा वेंधळेपणा असा की दूध ओट्यावरच्या भांड्यात ओतायच्या ऐवजी त्याच्या शेजारच्या चाळणीत ओतलं!!
|
Sakhi_d
| |
| Saturday, November 03, 2007 - 4:10 am: |
| 
|
मी पण आहे इथेच. कालचाच वेंधळेपणा...... संध्याकाळी बाहेर जायचे होते म्हणून नव-याला म्हणाले मी आवरायला घेते. कपड्यान्साठी कपाट उघडले आणि काय झाल माहित नाहि मी हाॅलमधे गेले तिथुन किचन मग बेडरुम नंतर पुन्हा हाॅल अशा ३ - ४ चकरा मारल्या नवरा बघतोय मी काय करतेय...शेवटि त्याने विचारलेच "काय शोधतेस?" तेव्हा माझ्या चकरा थांबल्या. कशासाठि चकरा मारत होते ते अजुनहि कळलेले नाहि...... 
|
Zakasrao
| |
| Saturday, November 03, 2007 - 4:30 am: |
| 
|
कशासाठि चकरा मारत होते ते अजुनहि कळलेले नाहि...... >>>>>>. ये किस चक्कर मे पडी हो सखी अल्पना हे चालणार नाही. वेंधळेपणाच बक्षिस घेतलेल्या व्यक्तीने तो केलाच पाहिजे.
|
Hkumar
| |
| Saturday, November 03, 2007 - 10:45 am: |
| 
|
एखाद्या कामासाठी खोलीत जाणे आणि मग कशासाठी आलो ते पूर्ण विसरून जाणे असे बर्याचदा होते खरे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|