|
Dineshvs
| |
| Tuesday, October 30, 2007 - 11:02 am: |
| 
|
मनुस्विनी, आपल्याकडे कुणीतरी मानसोपचार तज्ञ असायला हवा होता. नीना कुलकर्णीच्या, ध्यानीमनी नाटकातपण असाच शेवट आहे. म्हणजे कल्पनेतल्या पात्राचा खून वैगरे. शिवाय ते नाटक हु ईज अफ़्रेड ऑफ़ व्हर्जिनिया वुल्फ़, वर आधारित आहे. खरेच असे करतात का, ते कळायला हवे. आणि तो हळुहळु जागे करण्याचा प्रसंगही मी प्रत्यक्ष पाहिला आहे.
|
>>मेंदू बंद करून बघायचे असतात हे कोणी सांगितले नाहीय्ये का? बरोबर.... जर निर्माते, दिग्दर्शक लॉजिकल विचार करायला लागले तर ते आपल्यासारखे खर्डेघाशी करताना दिसतील.
|
Manuswini
| |
| Tuesday, October 30, 2007 - 6:09 pm: |
| 
|
सव्या, your point is noted, specially खर्डेघाशीचा
|
Slarti
| |
| Tuesday, October 30, 2007 - 6:37 pm: |
| 
|
gone baby gone कोणी बघितला का ? परीक्षणे तर जोरात आहेत. Lions for lambs कसा आहे ?
|
Gone Baby gone is based on true story in UK which is current event. It is based in four year old girl of a british Dr. couple , abducted from a Portugal holiday home. Since it is an unsolved mystry, the film is not released in the UK as yet.
|
बर ते जाउ द्या शुक्रवारी कोणी अमेरिकन गन्गस्टर बघनार आहे का? न बघीतलेल्या पिक्चर कसा असेन अस वाटतय? माझे दोन्ही आवडीचे लोक त्यात आहे डन्झल वॉशींग्टन अन रसेल क्रो शिवाय डायरेक्टर चे पहीले दोन्ही पिक्चर जबरी आहेत.
|
Apurv
| |
| Wednesday, October 31, 2007 - 7:15 pm: |
| 
|
भू भू मध्ये...म्हणूनच अक्षय म्हणतोना की कोणताच मानसोपचार तज्ञ ठीक करू शकत नाही... आणि तो मार्ग अवलंबतो जो बाकी कोणत्याही मानसोपचार तज्ञानी अवलंबला नसता. ह्याचा अर्थ मानसोपचार तज्ञात असे करत नाही हे स्पष्ट केले आहे. मला आवडला हा चित्रपट
|
Sunidhee
| |
| Wednesday, October 31, 2007 - 9:19 pm: |
| 
|
भु. भु. ने निराशा केली बहुधा अक्षय, परेश रावळ विद्या हे आवडते लोक आहेत आणि ट्रेलर्स मस्त असल्याने अपेक्षा वाढल्या होत्या. वाईट नाहीये पण म्हणावा तसा मनात उतरला नाही. जी काही कॉमेडी होती ती तर forced वाटते. हसु येत नाही. पण अक्षय चे टायमिंग नहमीप्रमाणेच जबरदस्त. तो तरी किती प्रयत्न करणार आडात नसेल तर.. राजपाल यादव, रावळ वाया. ती विद्या फार सुंदर आहे.. मला तिचा आवाज तर अतिशय आवडतो. डोके न वापरता पण प्रश्न येतात मनात.. उदा. बंगाली कसे बोलु शकते 'ती' व्यक्ती? बाकी सारे करता येइल हो पण भाषा अशीच कशी येते? तसा रहस्यभेद झाला आहेच तरी मी थांबते. बाकी हल्लि आवडलेले सिनेमे म्हणजे, जॉनी गद्दार आणि एक्-चालीस की लास्ट लोकल. ह्या दोन्ही मधे कलाकार कसबी नाहीत पण एकदा सिनेमाने पकड घेतली की कथा फास्ट पळते आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
|
Divya
| |
| Thursday, November 01, 2007 - 4:20 am: |
| 
|
भुलभुलय्या कौतुक करण्या एवढ फ़ार काही खास नाही. मला राहुन राहुन प्रश्न हाच पडला होता कि जर तो अक्षय कुमार मोठ मानसोपचार तज्ञ वैगरे तर तो तिथे काय करतोय, इथुन त्या खेड्यात कोण कशाला जाईल( हे स्वदेस बघीतल्यावर पण वाटल होत) आणि त्याच ते शेवट मंत्र तंत्र मदत घेण पण अतिच दाखवलय. अमिषा पटेल रोगट्ट दिसते, तिच्यावर संशय यावा म्हणुनही तसा मेकप असेल. आजकाल मराठी पिक्चरच जास्त बघणेबल असतात. आइ शप्पथ खुप मस्त चित्रपट. गाणी सगळीच छान. श्रेयस तळपदे तर crush व्हावा एवढा handsome दिसतो. मला या चित्रपटातली गाणी जबरदस्त आवडली. खुप दिवसांनी classical छान एइकायला मिळाल. कुणाकडे असली तर मला पण पाठवा. मागच्या महिन्यात Babel बघीतल. Nice one. एकदातरी बघावा असा आहे. चार वेगळ्यावेगळ्या culture चे आणि country चे लोक एक घटनेने कशे बांधले जातात. छान दाखवले आहे. Brad Pitt as usual great . काही गोष्टी खटकतात पण वास्तवतेच्या जवळ नेण्याचा प्रयत्न director चा नक्किच यशस्वी झाला आहे. शेवटपर्यन्त उत्सुकता नक्किच ताणुन धरतो.
|
Slarti
| |
| Thursday, November 01, 2007 - 5:13 am: |
| 
|
स्वाती_राजेश, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. Gone baby gone ही Dennis Lehane च्या Kenzie-Gennaro मालिकेतील १९९८ साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे ज्यावर हा चित्रपट आहे. योगायोगाने हा चित्रपट व 'ते' अपहरण यांच्यात साम्य असल्यामुळे व सध्या तो संवेदनशील विषय असल्यामुळे ब्रिटनमध्ये तो प्रकाशित झालेला नाही.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 01, 2007 - 8:56 am: |
| 
|
काल डिस्कव्हरी वर गॅंजेस या मालिकेचा दुसरा भाग दाखवला. मैदानी प्रदेशातली गंगा होती. इतके सखोल दर्षन होते ना, कि बस. गंगेच्या उपनद्या, ज्यात चंबळही आली, यांचेही यथार्थ चित्रण होते. बर्फ़ वितळल्याने गंगेला येणारे पूर, त्यामुळे होणारा चिखल, तिथे येणारे भाताचे अमाप उत्पादन. आजुबाजुच्या गावात असलेले प्राणीजीवन आणि त्या गावातल्या खास रुढी, ( एका गावात नागाना अभय आहे, तिथे गावात सगळीकडे नागांचा मुक्त संचार आहे. तिथे कुणाला तो चावला तरी उपचार घेत नाहीत. एका गावात भरणारा गुरांचा बाजार, त्यात हत्तीही आले. भातशेतीचे हत्तींमुळे होणारे नुकसान ) सगळे छान दाखवले होते. शालेय जीवनात अशी फ़िल्म बघायला मिळति, तर भूगोलाची आणखी गोडी लागती. आपल्या देशातल्या अनेक नद्यांचे असे चित्रीकरण करता येईल. मी खुप वर्षांपुर्वी बियास नदीवरची अशी फ़िल्म बघितली होती, त्यानंतर अशी फ़िल्म कुठेच बघायला मिळाली नाही. या मालिकेचा तिसरा भाग, पुढच्या बुधवारी रात्री आठ वाजता दाखवतील. MAN VS, WILD मधे हवाई बेटावरच्या जागृत ज्वालामुखीच्या प्रदेशातुन करुन घेतलेली सुटका दाखवली. तोही भाग शनिवारी रात्री दाखवतील.
|
Slarti, Sorry, he mala mahit navate. Mahitimadhe bhar ghatali. Thanks. kedarjoishi, American Gangster yacha report khup changala aahe ase mhanatat. In 1970s America, a detective works to bring down the drug empire of Frank Lucas, a heroin kingpin from Manhattan, who is smuggling the drug into the country in the coffins of soldiers returning from the Vietnam War. (This is copy & paste) Chuk maph asavi. Denzel Washington jar avadat asel tar Remember the Titans ha khupach sundar aahe.
|
khup divasani kal marathi "Ek dav Bhutacha" pahila khup maja aali. Ashok Saraf che kam khup sundar zale aahe.Dilip prabhavalkar kiti tarun aahe tyamadhe. Tyancha pahila cinema aahe ka?
|
Apurv
| |
| Thursday, November 01, 2007 - 2:33 pm: |
| 
|
स्वाती Remember The Titans हा माझा आवडता चित्रपट... बरेच वेळा पाहिला. Russell Crowe चे movies पण छान असतात. 3:10 To Yuma, Gladiator खुप छान होते... American Gangster पण चांगला असावा.
|
Oscar wining na? "Gladiator". Mi pahila aahe pan "3:10 to yuma" pahila Nahi.
|
Manuswini
| |
| Saturday, November 03, 2007 - 9:22 pm: |
| 
|
मी काल जब वी मेट पाहीला, ठीक आहे तीच story रोजचीच रोन धोनी, बिचडल्यावर एकदम वाटायला लागणारे प्रेम.. वगैरे वगैरे. करीना जराशी overacting .
|
Farend
| |
| Saturday, November 03, 2007 - 11:26 pm: |
| 
|
अच्छा रोनाधोना! मला वाटलं धोनी कोठे आला येथे मनुस्विनी, शाहीद आणि करीना वगैरे फार जबरदस्त काम केले आहे वगैरे कौतुके ऐकली तसे काही दिसत नाही.
|
Slarti
| |
| Sunday, November 04, 2007 - 12:13 pm: |
| 
|
जब वी मेट पाहिला. मला आवडला. दोघांची कामे छान झाली आहेत, करीनाने एक अल्लड, मोकळी, थोडी निरागस अशी मुलगी खरच छान उभी केली आहे. *SPOILER प्रवेशालाच तिचा हात धरून तिला धावत्या आगगाडीत घेतल्यावर जेव्हा तो मदत करणारा तिचा हात लगेच सोडत नाही तेव्हाची तिची प्रतिक्रिया... लाजवाब !! * छान म्हणजे डोक्यात गेली नाहीच, तर उलट त्यापुढे जाऊन तिची व्यक्तिरेखा पटली, भावली. वरकरणी उच्छृंखल वाटणार्या या मुलीची तिची स्वतःची अशी एक philosophy आहे, त्याप्रमाणे ती मनापासून जगते. शाहीदनेसुद्धा काम छान केले आहे. त्याचा वैताग कमीत कमी शब्दांत सुरेख व्यक्त केला आहे. कथेद्वारे त्याचा गंभीरपणा हा परिस्थितीजन्य आहे हे कळते. हे वरचे पापुद्रे जसे बाजूला होत जातात तसा त्याचाही नैसर्गिक तारुण्यसुलभ खळखळाट दिसू लागतो. तो प्रेमात पडत जातो, पण ते संयत आहे. एकंदरीतच कुठेही जोहरी भडकपणा / बटबटीतपणा न दाखवता त्या दोघांचे नाते उलगडले आहे. *SPOILER सिमल्याला आगगाडीत बसतात तेव्हा ती सरळ त्याला विचारते," तुम्हे मैं बहुत अच्छी लगती हूँ ना ? " यावर तोही,"हाँ, बहुत बहुत अच्छी..." असं उत्तर देतो. वर तिला सांगतो की,"तुम tension मत लो, ये मेरा problem है|" बास एवढेच. त्यात 'जिंदगी भी क्या खेल खेलती है...' असले तिडीक देणारे फालतू उदात्तीकरण नाही, तत्वज्ञान झाडणे नाही. हा एवढाच संवाद होतो, ते दोघेही परिस्थिती स्विकारतात (परत करीनाचा सुंदर अभिनय) आणि प्रवास पुढे सुरू. सुरेख !!! * अशा जागा आणखीही आहेत. असो. ते हळूहळू उलगडले जाते हे महत्वाचे, म्हणजे 'हे अचानक प्रेमात कसे पडले' असा प्रश्न नाही पडला मला. punches सही आहेत, जागा उत्तम उचलल्या आहेत. एकतर विनोदी प्रसंग खरोखर हसवतात. एक मला आवडले ते हे की या पात्राचे काम विनोदी, याचे गंभीर, याचे भावूक असा बटवारा केला नाहीये. विनोद 'घडला' असे वाटते, तो 'घडवला' जात नाही. मुळात प्रेक्षक हसायला येणार आहेत त्यामुळे आता हसवायला पाहिजे असले प्रयत्न नाहीत. विनोदी प्रसंग चपखल बसले आहेत, अगदी अनपेक्षितपणे येणारेसुद्धा. उदा. *SPOILER शेवटचा अंशुमानचा 'गन्ना'वाला शीन... * एकंदरीत चित्रपट हिंदी चित्रपटाच्या चौकटीतलाच आहे, त्या अनुषंगाने येणारा थोडाफार अतर्क्य बावळटपणा आहेच, पण तो खूप खटकणारा नाही, कारण एकतर तो खूप ठिकाणी नाही आणि बहुतांशी त्याचा मुख्य कथाभागाशी जवळून संबंध नाही. तरी त्या चौकटीत राहूनही बर्यापैकी अकृत्रिम वाटला. हलकीफुलकी मस्त प्रेमकथा. मला आवडलेली गाणी : 'तुमसे ही' सुंदर !!! 'ना है ये पाना, ना खोना ही है, तेरा ना होना, जाने क्यूँ होना ही है...' अचूक !! 'नगाडा नगाडा' जोरदार आणि 'ये इश्क है' अतर्क्य चित्रण सोडले तर उत्तम.
|
Prajaktad
| |
| Sunday, November 04, 2007 - 1:39 pm: |
| 
|
स्लार्टी!तु spoiler म्हणुन जे लिहलय ते दिसत नाही आहे.. बाकी 'जब वुई मेट' मला बरा वाटला...दोंघांची काम छान आहेत..इतर बर्याच ठिकाणी परिक्षनात लिहलाय तसा 'दिल है की मानता नही' चा भरपुर प्रभाव जाणवतो..
|
प्राजक्ता ते पांढरा रंग टाकुन लिहीले आहे. त्याला सिलेक्ट कर मग दिसेल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|