|
Aashu29
| |
| Friday, August 03, 2007 - 11:02 am: |
| 
|
मला बघायला आलेल्या सर्वात पहिल्या स्थळाच्या वेळेस मुलाच्या दिडशहाण्या बापाने मला विचारले, कि तू जन्मापासुन मुंबईत आहेस आता जर माझा मुलगा कायमचा इथे (म्हणजे त्यांच्या खेड्यात) आला तर तु काय करशिल? माझी तशी काहि इछा नव्हती तर मी तो प्रश्न टाळायचा बराच प्रयत्न केल ( करण पप्पांची ताकिद होति की वाइट वाटेल असे स्पश्ट बोलु नकोस) पण तो सोडेचना!! त वरुन ताकभात हे काहि लोकाना खरच कळत नसेल का?
|
vaah majja ahe... mast ahet kande pohe. apalya samor alelya kande pohyatali limbachi (kadu) bee kadhun, limbu marake pohe sadar karavet. Vadhanaryas ani chakhaaryas doghannahi anad hoil... ~D gya. Pohe dya
|
Maanus
| |
| Monday, October 29, 2007 - 5:15 am: |
| 
|
कधी नाही ते चार पाच महीन्यापुर्वी पहील्यांदा मी कोणाशीतरी फोनवर बोलायचे धाडस केले. १०-१५ मिनीट इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मुलीचा पहीलाच प्रश्न तुला जेवन बनवता येते का. (स्वगत, i was not expecting this as first question from a brilliant girl like her ) नंतर affiars एकतर पहील्यांदाच कुठल्यातरी मुलीशी हे असे काहीतरी बोलत असल्याने काही विनोद पण सुचत नव्हते. त्यामुळे घाबरत घाबरत english मधुन ती विचारेल त्या सगळ्याला उत्तर देत होतो पुढे तासभर प्रश्न मंजुशा सुरु होती. तिला मधे विचारले पण मराठी येते का, तर हो म्हणाली, पण english मधेच बोलु. anyway मुलगी हुशार होती, आपल्याकडुन +ve . काही दिवसांपुर्वी मला ही एक link सापडली arranged marriage 101 भारी लिहीतो हा बाबा. from his artical Me asked: "So what are your greatest strenghts?". She replied: "I am black belt in karate, if that helps". Slap! Served me good. अजुन तरी फक्त दोनदाच ह्या दिव्यातुन गेलोय, देवाने अजुन पुढे काय मांडुन ठेवलेय काय माहीत
|
>>तुला जेवन बनवता येते का. सही गुगली ! 'उपास' पण म्हणूनच पोळ्या वगैरे शिकायला लागला की काय जोमाने?
|
उपासची 'पोळ्या' शिकवणी झाली असावी.. त्याने पुढची पायरी गाठली आहे.. 
|
हो ना, आता एकदम चकल्या करंज्यांची शिकवणी चालू असेल
|
Manuswini
| |
| Tuesday, October 30, 2007 - 8:42 pm: |
| 
|
सव्या, काहीतरी शिक ह्यातून. माणसा, कारे बाबा, तुला असा प्रश्ण अपेक्षीत न्हवता? आज काल सगळ्याच मुली हा प्रश्ण विचारतात. वाईट काय त्यात?
असे मी नाही म्हणत हां वाढून नाही, काय वाढायचे शिजवायचे रोज तो विचार कर
|
Manuswini
| |
| Tuesday, October 30, 2007 - 9:32 pm: |
| 
|
माणसा, काय फ़न्नी आहे तुझा link ही ही ही
|
Zakki
| |
| Tuesday, October 30, 2007 - 9:33 pm: |
| 
|
माणसा, अरे स्पष्टपणे सांगायचे की मला स्वैपाक येत नाही, पण माझे काही अडत नाही, तुला स्वैपाकाशिवाय अडत असेल तर तू शिकून घे! डरते काय क्यूं बे. नागपूरके पोट्टे हो ना!
|
Tiu
| |
| Wednesday, October 31, 2007 - 2:42 pm: |
| 
|
हा माझ्या मित्राचा कांदेपोहे अनुभव... मुलीचे बाबा: US ला होता ना तुम्ही? मुलगा: हो... :-) मु.बा.: किती दिवस होता? मु: वर्षभर होतो. मु.बा.: मग भरपुर कमवले असतील? मु: हो म्हणजे थोडेफार. मु.बा.: तरी किती कमवले? मु: ___ लाख मु.बा.: मग परत जायचा काही प्लॅन? मु: बघु...कंपनीने पाठवलं तर जाईन. मु.बा.: या वेळेस एकटे जाणार की फॅमिली सोबत? मु: long term असेल तर दोघं जाउ. मु.बा.: वा वा. आता कमीत कमी दोन वर्ष तरी जा. मु: बरं! मु.बा.: Insurance घेतला आहे का? मु: ??? मु.बा.: LIC ची नवीन पॉलिसी आहे. ५० लाखांचा insurance कव्हर. आणि पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर मनी बॅक guarantee . मु: हो का? अरे वा! मु.बा.: Premium जरा जास्त आहे पण तुमच्यासाठी काही विशेष नाही... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!!! मु: (उगीच) ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!!! मु.बा.: असं कशाला? तुम्ही जरा बसा. मी फाईल घेउन येतो. डिटेल्स देतो. मु: मुलीला बोलावताय ना? तेव्हापासुन बिचारा एखादी मुलगी सांगुन आली की मुलगी काय करते विचारण्याआधी मुलीचे बाबा काय करतात हे विचारतो...
|
हा हा हा म्हणजे ऍम्वेचा बाप निघाला की
|
Slarti
| |
| Thursday, November 01, 2007 - 5:17 am: |
| 
|
तिउ, ... ... ... ...
|
Sush
| |
| Thursday, November 01, 2007 - 6:32 am: |
| 
|
माझ्या एका मैत्रिणिला नुकताच आलेला एक अनुभव. मुलगा पुण्यात एका नामांकीत कं.त कामाला. हि रहायला कराडला. मुलगा पहायला आला आणि प्रश्नोत्तरे सुरु झाली. मुलाने डायरेक्ट इंग्रजीत प्रश्नोत्तरे सुरु केली. आता मैत्रिणहि बरेच वर्ष पुण्यात नोकरीला असल्याने तिने उत्तरे दिली. पण हि पद्धत झाली का? आपण मराठि ना मग मराठित प्रश्न विचारायला काय झाले. असही नव्हतं कि तो अमेरिकेत वगैरे रहात होता मग english चे जुजबि ज्ञान आहे कि नाहि हे चेक करणं वगैरे ठिक पण हा प्रकार जरा जास्तच होतो. तिने नकार दिला हे वेगळं सांगायला नको. ही लोकं स्वताला काय समजतात देव जाणे. पुर्विचे दिवस गेले. मुलीने म्हणेल तसं वागायला, बोलायला. अरे स्वताला सुशिक्षित म्हणवुन घेणार्यानि जरातरि विचार करावा ना. कुठलिच मुलगी हे खपवुन नाहि घेणार.
|
अशा मुलांशि मुद्दाम मराठित बोलायचं. शुद्ध मराठि बोलता आल तर फ़ार च उत्तम. त्यामधे पुणेरि ठसका दाखवता आला तर फ़ार च फ़ोडणि च
|
>>शुद्ध मराठि बोलता आल खरय. आणि शुद्ध लिहीता येत असेल तर काय म्हणा, सगळ 'जर तर' आहे.
|
Sunidhee
| |
| Thursday, November 01, 2007 - 5:50 pm: |
| 
|
अरे, इंग्लिश चे काय सांगता. मला आई-बाबा पूर्वी एकाकडे घेऊन गेले होते 'दाखवायला' . तर तो सुपुत्र भारतात नव्हता. त्याचे वडील पुर्ण वेळ मला इंग्लिश मधे प्रश्न विचारत राहीले. आई-बाबांशी मात्र मराठीत बोलत होते. पण मी मराठीतुनच उत्तरे दिली. तर त्यांचे 'नकार' कळवणारे पत्र आले आणि कारण लिहिले होते 'मी इंग्लिश मधुन प्रश्न विचारले तरी मुलीने मराठीतुन उत्तरे दिली' !!! आम्ही पण शिकलेल्या असतो ह्या मुलांसारख्याच. नोकरी करत असतो त्यांच्याचबरोबरीने पण मुलांच्या आई-वडीलांचा नाक मात्र नेहमीच वर. दुसरा एक प्रसंग. मी USA मधे पोचले होते. मुलाशी बोलले, तो इथेच होता. फोटो वगैरे दिला-घेतला. छान जाडजूड खात्यापित्या घरचा मुलगा वाटत होता. पण बोलायला छान होता. तेव्हा माझी भारत वारी ठरली होती. तो म्हणाला, 'माझ्या आई-बाबाना भेटुन येशील का?' मी म्हटले 'ठीक आहे'. तर आम्ही भेटुन आलो. त्याना मी आवडले नाही. मग मी परत आले. तर २ महिन्यानी त्यांचे पत्र, 'आम्हाला तुमची मुलगी पसंत नाहिये पण आमच्या मूलाला ती खूप आवडली आहे म्हणुन तुम्ही हवे तर तिला त्याच्याशी बोलायला सांगा'. आई अशी भडकली होती. ती पण खरमरीत पत्र लिहायला निघाली होती पण संयम केला तिने. मी अर्थात त्याला फोन केला नाही. नंतर मी प्रेमविवाह केला. अश्या चित्रविचित्र लोकाना भेटुन दमले होते.
|
Rimzim
| |
| Thursday, November 01, 2007 - 6:21 pm: |
| 
|
सव्या..... LOL लई भारी मझ्या नवर्याच्या मित्राच्या बायको चा किस्सा.... ( बापरे त्यापेक्षा माझ्या एका मैत्रिणीचा म्हणायला कित्ती सोपे) तर हा मित्र स्वत्:ला अतिशहाणा समजणारा एक बेंगलोर वासी. ( याने २०० कुंडल्या पाहिल्या, स्वत्: पहायचा. ) तर हा सुनित गेले सहा सात वर्ष अमेरिके मधे राहतो. पण मुलगी अशी हवी म्हणे की तिच्या कुंडली मुळे याला फायदा होईल. सुनित ने शेवटि अतिशय लठ्ठ आणि बुटक्या मुलीशी तिला न बघताच पसंद केले. पत्रिका चांगली असे सांगुन.( ति सुंदरा MBBS झाली आहे. आणि आता बाकी formalities like ithalya exams etc करत आहे. आणि सुनित वाट पहात आहे कि कधी तिला job लागेल आणी मग तो घर घेईल. या सुंदरेला त्याने लग्ना आगोदर फोन केला. आणी स्वत्:चे ईंग्रजी झाडायला सुरु केले. ( सुंदरेचे ईंग्रजी too much good आहे. तिथे बसुन तिला सगळ्या ईथल्या TV Serials पहायची सवय.) आणी तिने शांतपणे उत्तरे दिली. आणि मग तिने विचारयला सुरु केले, त्यावर सुनित ने आपण कानडी बोलले तर चालेल का असे विचारले घाबरुन. हा किस्सा सुनित च्या समोर तिने आम्हाला ऐकवला आमची ह ह पु वा
|
Mandarnk
| |
| Thursday, November 01, 2007 - 6:49 pm: |
| 
|
त्यावर तिने "मग इतका वेळ काय मी कानडीत उत्तर देत नव्हते का?" असं विचारलं नाही का?
|
Manuswini
| |
| Thursday, November 01, 2007 - 7:05 pm: |
| 
|
सुनिधी, मोदक तुला, इतके चित्र विचित्र असतात ना, म्हणजे अगदी शिकलेले, सुक्षिशीत, social वाटणारे मुलगे इतके विचीत्र असतात, त्यांना भेटून, बोलुन, त्यांचे विचित्र प्रश्ण एकून कंटाळा येतो(आलाय). दाखवतील आम्ही विचाराने खुप modern आहोत वगैरे वगैरे पण शेवटी काय डाळ भातच खातात ना(ही एक उपमा आहे, नाहीतर कोणीतरी वात्रट प्रश्ण विचारेल डाळ खाणे वाईट काय?). म्हणजे इतके wavering mind , आणि एकदम तुझ्या आई वडीलांनी असे केले पाहीजे,तसे केले पाहीजे.... sickening . तडजोड करावी'च'लागते मान्य आहे पण immatured,in-sensible behavior प्रत्येक वेळेला सहन करणे असह्य आहे. बरे आपल्या अपेक्षा पण ह्यांना clear नसतात. स्वतला काय योग्य आहे हेच माहीती नसते. आपण 'कुठे' वाढलो, कसे वाढलो व काय विचार आहेत आपले हे त्यांनाच माहीती नसते, मित्राला मिळाली ना तशीच हवी मला पण असे काहीसे. जसे काय खेळणेच आहे. एखादी मुलगी अशी बघायची की modern in living , thinking पाहीजे पण कशी तर वेळेनुसार नी सोयीनुसार बदलणारी. बहिणाबाई नी जे. लो. उदाहरण दीले होते ना मागल्यावेळी तसेच. बरे मुलगे ठीक वाटत असताना आपला जरा बर्यापैकी जवळपास निर्णय घ्यायची वेळ आली मग त्यात त्यांच्या आई वडीलांचा आधी कमी दाखवलेला तिरसटपणा एकदम उसळुन येतो मग हे मुलगे एकदम कुक्कुल बाळ...... (आता ह्यावर strict शेरा येईलच कोणा कोणाचा, आणि biased म्हणून ओरडाओरड होइलच पण वाचण्यार्याने लक्षात घ्या की हा ज्याचा त्याचा अनुभव आहे.) मुलगी US ला आहे असे सांगीतले की एकटी रहाते का? बरे सहज म्हणून विचारले असेही प्रश्ण नसतात ते कळते.इतके sick प्रश्ण विचारणारे महाभाग आहेत. बरे इतकी शिकून चांगली नोकरी करतेय हे आधी माहीती असून सुद्धा नोकरी सोडावी लागेल असे पहील्याच फोनवर विचरतात नी मोठेपणा काय आमच्याकडे मुलींना नोकरी करायची गरज नाही. घ्या आता. मग आम्ही काय गरीब म्हणून नोकरी करतोय. मग नोकरी नसलेल्या मुलीलाच का नाही आधीच contact करत. तर उत्तर काय आधी नोकरी केलेल्या, वावरलेल्या मुली बावळट नसतात असे त्यांचे म्हणणे. (आता लगेच, नोकरी करत नसलेल्या मुली मुर्ख हा प्रश्ण मला नका विचारू, त्या अश्या मुलाच्या वडीलांना विचारा(कोणाला खोड आली असेल तर)). . बरे जावु दे चोथा झालाय ह्याच्यावर लिहून, आता तेल गळायचे बाकी आहे
|
Rimzim
| |
| Thursday, November 01, 2007 - 7:45 pm: |
| 
|
mandar... khi khi pan tya muliche ingraji kharach khup mahan ahe. janu kahi ithech janmali ahe usa madhe.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|