|
Slarti
| |
| Thursday, October 25, 2007 - 4:55 am: |
| 
|
दिनेश, मला असे वाटते की चित्रपट काशीमध्ये घडतो... निदान गंगेच्याच काठी घडतो. पेहराव, भाषा, घरे - वाडे, वातावरण सर्व काही स्पष्टपणे काशीकडे / गंगेकडे बोट दाखवत असताना तो राजस्थानात घडतो हे केवळ त्या number plate मुळे वाटले की अजून काही कारण आहे ? गाण्यात बंगाली शब्द आहेत कारण त्या भूत झालेल्या राजाच्या पदरी असलेली नर्तिका बंगाली असते. साठेक वर्षांपूर्वी बंगाली नर्तिका नव्हत्याच असे तर नाही ना ? आता त्या काळातील बंगाली नर्तिकेने भरतनाट्यम् करणे हे कदाचित थोडे वेगळे असेल पण अशक्य नाही. btw , गोहत्तीच्या IIT मध्ये समाजशास्त्राचा विभाग आहे जिथे अर्थशास्त्र, इंग्रजी, तत्वज्ञान, मानसशास्त्र, इतिहास, पुरातत्वशास्त्र इ.मध्ये पदवी मिळवण्याची सोय आहे. भारतातील कुठल्याही भागातील मुलाने तिथे जाणे हे खटकणारे नव्हे.
|
Slarti
| |
| Thursday, October 25, 2007 - 5:23 am: |
| 
|
बाकी ते मलकापूर मलाही आंध्रातले वाटले. शिवाय अथर्वशीर्षाऐवजी शंकराचे स्तोत्र जास्त शोभले असते असे मलाही वाटले, विशेषतः त्या 'कुलुपाला' भैरवकवच असे म्हटले आहे त्यावरुन तरी...
|
कधी नव्हे ते हा पिक्चर पाहताना माझा अंदाज बरोबर आला. पण मधेच मला अक्षय कुमार जर शशिधर असेल तर असे वाटत होते. विद्या बालनने कमाल केली आहे. स्पेशली क्लायमॅक्सला उत्तम. तिने हे बेबी सलाम ए इश्क सारखे फ़ालतू पिक्चर न करता असलेच पिक्चर करावेत ही अपेक्षा. अमिषा वाया गेली आहे. तिला अजून "संशयास्पद" दाखवायला हवं होतं. प्रियदशनच्या नायिका कायम साडीत किंवा सलवार कमीझ मधे असतात (विरासत तेरे नाम क्युंकी. ) पाचकट विनोदी पिक्चरपेक्षा असले पिक्चर प्रियन चांगले बनवतो.
|
Aaftaab
| |
| Thursday, October 25, 2007 - 6:40 am: |
| 
|
काल पुन्हा एकदा ' The Sixth Sense' पाहिला. त्यातली मला खटकलेली एकच गोष्ट.. Bruce Willis सुद्धा जर भूत असतो तर tape recorder वरती जेव्हा त्याच्या आधीच्या पेशंटचं बोलणं ऐकत असतो, तेव्हा तो forward , rewind वगैरे कसं करु शकतो?
|
Dineshvs
| |
| Thursday, October 25, 2007 - 7:06 am: |
| 
|
slarti त्या हवेलीचा लुक आणि आतली सजावट राजस्थानी आहे. नंबर प्लेट झाकताही आल्या असत्या. थोर बंगाली नर्तिका आठवत नाहीत मला. बंगाली गायिकांचा आवाज खुप गोड असतो. कंकणा बॅनर्जी, चंद्रलेखा बॅनर्जी वैगरे कलाकार आहेत. पण तिथे तशी शास्त्रीय नृत्याची प्रथा नाही. उदय शंकर वैगरे वेगळ्या प्रकारचे नृत्यनाट्य करत असत. सिनेमातही बंगाली नट्या नृत्यात पारंगत नव्हत्याच, राखी, शर्मिला, जया भादुरी, बिपाशा बासु कितीतरी उदाहरणे आहेत. भरतनाट्यम पेक्षा कथ्थक शोभुन दिसले असते तिथे. गुवाहाटी या शब्दावर सिनेमामधे श्लेष आहे. म्हणुन ते खटकले. नंदिनी, असा रहस्यभेद का केला ? आता बाकिचे लोक चिडतील ना !!!
|
Dineshvs
| |
| Thursday, October 25, 2007 - 7:48 am: |
| 
|
कालचा डिस्कव्हरी वरची गॅंजेस हि गंगेवरची फ़िल्म अप्रतिम होती. गंगेचे अगदी मूळ उगम, देवप्रयाग, बद्रिनाथ, केदारनाथ, जमनोत्री, व्हॅली ऑफ़ फ़्लॉव्हर्स सगळ्याचे अप्रतिम चित्रण होते. प्रत्येक फ़्रेम पिक्चर पोस्टकार्डसारखी देखणी होती. निवेदनही सुंदर होते. या सगळ्या चित्रीकरणात रंगसंगतीचे सुंदर भान राखले होते. अगदी गंगेची आरतीदेखील वेगळ्याच कोनातुन चित्रीत केली होती. काल याचा पहिला भाग झाला, अजुन दोन भाग आहेत. दुःख एवढेच कि अशी फ़िल्म करावी असे BBC ला वाटले. फ़िल्ड को ऑर्डिनेटर सोडले तर प्रॉडक्शन टिम मधे एकही भारतीय नाव दिसले नाही. कालचा भाग कदाचित परत दाखवतील, जमल्यास तो आणि पुढचे भाग चुकवु नका.
|
दिनेशदा रहस्यभेद कुठे झालाय???? भरतनाट्यमच्या जर स्टेप्स पाहिल्या तर कळेल ते का वापरले आहे ते. कथ्थक जरा नाजुक वाटलं असतं बंगाली पण मुद्दाम वापरलं आहे. जनरली अशा भयप्रद चित्रपट बनवताना प्रेक्षकाची एक मानसिकता लक्षात घेतली जाते. या कथेत जत तमिळ किंवा तलुगु वापरलं असतं तर कदाचित ते विनोदी वाटलं असतं. बंगाली उच्चार आणि तो विषिष्ट आवाज यामुळे एक नाद निर्माण होतो. (आणि सर्वसामान्याला ते समजायला देखील सोपे आहे) इथे मराठी वापरलं असतं तरी चाललं असतं. पण मग नृत्याला मर्यादा आल्या असत्या, दिग्दर्शकाला इथे "बीभत्स" रस अपेक्षित आहे. आणि तो त्यामधे पूर्ण यशस्वी होतोय. गंमत म्हणजे अमिषा भरतनाट्यम मधे विशारद आहे... विक्रामाच्या नादी लागली नसती तर कुठल्या कुठे पोचली असती.
|
Badamraja
| |
| Thursday, October 25, 2007 - 8:51 am: |
| 
|
सस्पेन्सं आणि हाॅरर वातावरण निर्मिती करण्यामधे चित्रपट यशस्वी झाला आहे. विद्या बालन ला लुक ही चांगला घाबरवन्या सारखा दिला आहे.
|
Monakshi
| |
| Thursday, October 25, 2007 - 10:56 am: |
| 
|
हो मलाही "त्या" विद्या बालनला पाहून रात्री झोप आली नव्हती. मलापण खूप आवडला तो पिक्चर.
|
Slarti
| |
| Thursday, October 25, 2007 - 1:13 pm: |
| 
|
नंदिनीचा बंगाली आणि भरतनाट्यमचा मुद्दा पटतो. ती नर्तिका थोर नसूही शकते, दिसायला छान पाहिजे एवढेच... (अन् साठेक वर्षांपूर्वीची एखादी नर्तिका माहिती नसू शकते की !!!) शिवाय हवेलीच्या बांधणीवर राजस्थानी प्रभाव असू शकतो. मला असे वाटते की त्या २ 'डुलक्यां'पेक्षा उपरोल्लेखित गोष्टींद्वारे झालेली वातावरणनिर्मिती फार जास्त परिणामकारक आहे... म्हणजे ती गोष्ट राजस्थानात घडते की उ.प्र. मध्ये असा गोंधळ उडावा अशी परिस्थिती मला तरी नक्कीच वाटत नाही. असो. उत्तरार्ध कोणाला थोडा लांबलेला वाटला का ? विशेषतः रहस्यभेदानंतरचा भाग... बदाम, मोनाक्षी, सूचक विधाने जरी करायची असली तरी इथे चाणाक्ष वाचक आहेत हे ध्यानी घेऊन warning द्यावी हो कृपया...
|
Antara
| |
| Thursday, October 25, 2007 - 1:22 pm: |
| 
|
hey! badaamraja, nandini, monakshi.. तुम्हि लोक सस्पेन्स बद्दल indirect का होइना चर्चा करून इतरांची मजा का खुशाल घालवता!! how rude is that!!
|
Apurv
| |
| Thursday, October 25, 2007 - 2:21 pm: |
| 
|
चकवा मराठी चित्रपट पाहिला... चित्रपटाची हाताळणी पाहता का कुणास ठाउक एखादा English चित्रपट पाहत आहे असे वाटले. भितिदायक असे काही वाटले नाही.... पुढे काय होइल ह्याची थोडीफार उत्सुकता राहते. नायिका म्हणजे एक पुतळा बोलत आहे असे वाटले. इतर कलाकार चांगले होते. मराठी चित्रपट पण फालतुगिरी नाही (तस हल्ली दर्जा फारच वाढला आहे) म्हणून आवडला.
|
Farend
| |
| Thursday, October 25, 2007 - 3:44 pm: |
| 
|
हे भूलभुलैय्या बद्दलच चालले आहे का? आता बघायला पाहिजे. मी रीडिफ वरचा रिव्यू वाचून समज करून घेतला होता की अगदी टाकाऊ असेल
|
Monakshi
| |
| Thursday, October 25, 2007 - 4:50 pm: |
| 
|
>>बदाम, मोनाक्षी, सूचक विधाने जरी करायची असली तरी इथे चाणाक्ष वाचक आहेत हे ध्यानी घेऊन warning द्यावी हो कृपया >>hey! badaamraja, nandini, monakshi.. तुम्हि लोक सस्पेन्स बद्दल indirect का होइना चर्चा करून इतरांची मजा का खुशाल घालवता!! how rude is that!! >>हे भूलभुलैय्या बद्दलच चालले आहे का? आता बघायला पाहिजे घ्या प्रश्न आणि उत्तर दोन्ही तुमच्या समोर आहे
|
Slarti
| |
| Thursday, October 25, 2007 - 6:35 pm: |
| 
|
अमोल, मी यांसारखे बरेच मायबोलीकर इथे प्रतिक्रिया वाचून चित्रपट बघायचा की नाही हे ठरवतात. अशा वेळी चित्रपट बघताना त्या प्रतिक्रिया आठवून रसभंग होऊ शकतो हे लक्षात घेतले तर बरे.
|
Aashu29
| |
| Thursday, October 25, 2007 - 7:48 pm: |
| 
|
ह्म्म अपुर्व मी पण चकवा पाहिला, पण मला तो भयावह वाटला खरंच, म्हणजे बीभित्स चेहरे न दाखवता पण हवा तो परिणाम साधला गेलाय,अतुल क. नेहमिप्रमाणेच परिणामकारक, दीपा परब फ़ार वाईट अभिनय करते!! पण "तो" जो कोणि आहे त्याला नुसता उभा बघुन पण अंगावर काटा येतो क्षणभर!! त्यावेळचे संगित पण जबर्दस्त आहे! थोडक्यात मला आवडला!
|
Aashu29
| |
| Thursday, October 25, 2007 - 7:53 pm: |
| 
|
भुलभुलैया मला आवडला पण अक्षय फ़ारच वैताग अभिनय करतो सुरुवातिला आणि मग उत्तरार्धात सुधारलाय!! हेराफेरीत एकदा तसा अक्षय बघायला मजा आलि, परत तसेच चालु छाप इमेजवाले त्याचे डझनभर सिनेमे आले, वारंवार काय तसेच अखंड बडबड आणि दुसर्याचि फ़िरकि घेणे!!
|
Apurv
| |
| Thursday, October 25, 2007 - 9:18 pm: |
| 
|
हो आशु, मलाही ते संगीत खुप परिणामकारक वाटले, अंगावर काटा येतो खरं!
|
Ami79
| |
| Friday, October 26, 2007 - 5:50 am: |
| 
|
मी जॉनी गद्दार पाहिला. वेगळा चित्रपट आहे. पण हीरोला अजिबात अभिनय येत नाही.
|
Badamraja
| |
| Friday, October 26, 2007 - 10:21 am: |
| 
|
अंतरा सस्पेंन्स चित्रपटांची चर्चा त्यातल सस्पेंन्स ओपन न करता कशी करता येईल? कालचक्र बघीतला का कुणी? कसा आहे? माझा बघायचा राहुन गेला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|