|
Amruta
| |
| Monday, October 15, 2007 - 4:35 pm: |
| 
|
झक्की, अहो आपल्या सकाळ मधे पण आहे रिव्हु. हा वाचा. http://esakal.com/esakal/10152007/Nava_ChitrapatF9AA5C15FB.htm काश मी NJ मधे रहात असते.. मग किरण,जुई व तुम्हाला एकत्र ठेउन मी व सौ. झक्की गेलो असतो दर मंगळवारी पिक्चरला. एका दगडात सगळे पक्षी. 
|
Zakki
| |
| Tuesday, October 16, 2007 - 1:26 pm: |
| 
|
मग या की बागराज्यात! 'आमचे येथे कुठल्याहि प्रकारची नोकरी मिळेल' असा बोर्डच लावायला हवा का?
|
Amruta
| |
| Tuesday, October 16, 2007 - 3:18 pm: |
| 
|
नोकरी मिळेल हो. पण आम्ही dedicated L&T वाले आहोत त्याच काय??
|
रविवारी भुलभुल्लया पाहीला. बरा आहे. (चांगला म्हणवत नाही). पण काही चांगले सिन आहेत.
|
भुलभुलैयामधे काही आक्षेपार्ह सीन आहेत असे ऐकले. खरय का??
|
Sashal
| |
| Tuesday, October 16, 2007 - 5:29 pm: |
| 
|
Kedarjoshi Tuesday, October 16, 2007 - 12:10 pm: रविवारी भुलभुल्लया पाहीला. बरा आहे. (चांगला म्हणवत नाही). पण काही चांगले सिन आहेत. Chinya1985 Tuesday, October 16, 2007 - 1:14 pm: भुलभुलैयामधे काही आक्षेपार्ह सीन आहेत असे ऐकले. खरय का?? >>>
केदार 'ह्याच' scenes ना चांगले म्हणतोय का?
|
Slarti
| |
| Tuesday, October 16, 2007 - 7:28 pm: |
| 
|
सशल केदार, तुझ्या दृष्टीने 'चांगले' चित्रपट कोणते रे ?
|
Zakki
| |
| Tuesday, October 16, 2007 - 8:54 pm: |
| 
|
ना रहेगा बास ना बजेगी बासुरि! एव्हढे सगळे रामायण करून आज कळले की तो सिनेमा नाहीच आहे पारसिप्पनिला. एकच दिवस होता म्हणे! आज आता बहुधा गुड लक चक पहाण्यात येईल.
|
केदार 'ह्याच' scenes नाचांगले म्हणतोय का?>>>> नाही ग सशल. काही कॉमेडी सिन बरे आहेत असे लिहायला हवे होते. त्यातला एक सिन आक्षेपार्य आहे पण त्यात ' विषय ' हा विषय नाही. तो सिन मी सांगन्यापेक्षा बघीतलेला बरा. कॉशन लहान मुलाला घेऊन तो सिन बघु नये.
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 17, 2007 - 12:49 pm: |
| 
|
भुलभुलैया मधे गौतम बुद्धाबद्दल काहि दृष्ये होती, ती आता काढुन टाकली आहेत. त्यातल्या टायटल सॉंगमधल्या रामनाम लिहिलेला कुडता घालुन हिडीस हालचाली करणार्या मुलींबद्दल मी आधीच इथे लिहिले होते. त्या सीनला कात्री लागली नसेल ना अजुन, केदार ?
|
Mansmi18
| |
| Wednesday, October 17, 2007 - 2:54 pm: |
| 
|
झक्की, तुम्हाला ४ तिकिटे कसे देतात हो? आमच्याकडेही randolph ला optimum आहे पण आम्हाला फ़क्त २ तिकिटे चकटफ़ु मिळतात दर मंगळवारी clearview मधे. तुम्ही काय special गिर्हाईक आहात का?
|
नाही कात्री नाही. पण ते गाण सर्वात शेवटी टायटल्स सोबत आहे.
|
काही मराठी चित्रपट आणि मालिका (दुरदरषन) सुचवाल का? VCD/DVD मागवायच्या आहेत. आभारी आहे.
|
kahi marathi nave: 1) 10 vi F 2) Pak pak pakak 3) Aag bai arechaa 4) Dombivali fast 5) Marathi Natak Hasavafasavi (Dilip Prabhavalkar) Shantech kart chalu aahe ( Lamikant Berde, etc) Batatyavhi chawl (Pu.la.Deshpande) 6) Nivadak Pu.la.(Kathakathan) 7) Va.pu.kale (Kathakathan)
|
Varil dvds ya collection sathi aahet.Jar time pass sathi havya asatil tar alikade khup cineme aahet.
|
Aditih
| |
| Monday, October 22, 2007 - 11:52 am: |
| 
|
काल मोठ्या पडद्यावर "लागा चुनरी में दाग" पाहिला. आवडला बुवा मला. मराठी मधे काही वर्षांपुर्वी "दोघी" नावाचा सिनेमा आला होता. सुमित्रा भावेंचं दिग्दर्शन होतं.त्यांनी तो खुपच छान केला होता. तीच स्टोरी आहे या पण सिनेमाची. यशराज प्रस्तुती आहे त्यामुळे सगळं भव्य दिव्य आहे. एकतरी परदेशवारी असायलाच हवी त्यामुळे ती पण आहे मग भले चित्रपटाच्या कथानकाला ती आवश्यक असो वा नसो. कोंकणा सेन पुन्हा एकदा भाव खाऊन जाते.खर सांगायचं तर ती आहे या सिनेमात म्हणुन तर मी धाडस केलं थिएटर मधे जाऊन हा सिनेमा पाहायचं.आणि ती आहेच या पण सिनेमात नेहमी सारखी. एकदम सहज वावर आहे तिचा. राणीने पण चांगलं काम केलंय.सुंदर तर ती दिसतेच. गाण्यात म्हणाल तर "हम तो ऎसे हॆ भैय्या ..." मस्त आहे, आवडलं. बनारस मधे असताना त्या दोघींना सलवार कुर्ते आहेत वेशभुषेत.कसले सही आहेत ते!! सुती , साधे पण मस्त.
|
Dineshvs
| |
| Monday, October 22, 2007 - 12:58 pm: |
| 
|
येत्या बुधवारी रात्री ८ वाजता, डिस्कव्हरी चॅनल वर, गंगेवर एक खास कार्यक्रम आहे. उद्या रात्री ८ वाजता, MAN VS. WILD आहेच.
|
Mala avadlele english movies 1) Persuit of happiness 2) Million dollar baby 3) Beautiful life 4) Gladiator 5) A perfect world 6) 51st days 7) Blood Diamond 8) Contract 7) Crash 8) Escape to victory 9) Goal 10) Perfect Strom
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 24, 2007 - 11:16 am: |
| 
|
गेल्या मंगळवारचा MAN VS. WILD चा भाग ब्ल्यु लगुन, सिक्स डेज सेव्हन नाईट्स, कास्टवे पेक्षाही उत्कंठावर्धक होता. थिएटरला सिनेमा बघण्यापुर्वी, मायबोलिवरचे अभिप्राय वाचणे मला आवश्यक वाटते. आणि असे अभिप्राय वाचुनच आज भुल भुलैया बघितला. वेगळा विषय, वेगळी मांडणी म्हणुन छान आहे. गंभीर विषयाला दिलेली विनोदाची डुबही छान आहे. अक्षयच्या कॉमेडी सेन्सचा जबाबच नाही. शायनी राजपुत्राच्या भुमिकेत अगदी शोभुन दिसला असला तरी, त्याला इथे फारसा वाव नाही. जितेंद्र जोशी, रसिका, परेश, असरानी, विक्रम गोखले आदि मंडळींचा अभिनय उत्तम आहे. अमिषा पटेल आणि विद्या बालन या दोघींपैकी फक्त एकीच्याच वाटेला, कुणाही अभिनेत्रीने हेवा करावा इतपत उत्तम भुमिका आली आहे, आणि तिने तिचे चीज केले आहे, दुसरीला मात्र गुणवत्ता असुनही पडखाऊ भुमिका मिळाली आहे. या अभिनयासाठी अवश्य पहावा असा हा सिनेमा आहे. आधीच गाजत असलेले गाणे, केदारला शेवटी दाखवण्यात आले होते पण आम्हाला ते मध्यंतराच्या आधीच आणि तेही अर्धवट दाखवले. मला प्रोमोज मधे खटकलेले दृष्य, सिनेमात नाही. बाकिच्या गाण्यात, लबोको लबोंसे श्रवणीय असले तरी चित्रीकरण ठिक नाही. प्रियदर्शनच्या ख्यातीचे तर अजिबात नाही. प्रियदर्शनच्या सिनेमात प्रत्येक फ़्रेम सजवण्याच्या, अट्टहास असतो पण इथे कथाविषय असलेली हवीलीच जुनाट असल्याने, मर्यादा पडल्या आहेत. अल्ला हाफ़िझ, गाण्यात त्या शब्दांचे काहिच प्रयोजन नाही. साखरपुड्याच्या गाण्याच्या वेळी राजस्थानी लोकसंगीतातले, केसरीया बालमा सारखे मांड रागातले गाणे हवे होते. आहे ते अगदीच फ़िल्मी आहे. राज्याभिषेकाच्या वेळी ध्रुपद धमार आहे. अत्यंत श्रवणीय तरीही आता दुर्मिळ झालेला हा प्रकार आहे. ख्याल गायकीच्या आधीचा हा गायनप्रकार गाणारे कलाकारच आता नाहीत फारसे. पण ते गाणे जरा मोठे हवे होते. प्रियदर्शनच्या लौकिकाला साजेसे असे नर्तकीच्या गाण्याचे चित्रीकरण आहे. पण गाण्याचे शब्द बंगाली का, ते कळत नाहीत. कथा राजस्थान भागात घडते ( गाड्यांचे रजिस्ट्रेशन नंबर्स तिथले आहेत ) नर्तिका बंगाली का ? बंगाली नर्तिका फ़ारश्या नव्हत्याच. ती ओरिसामधली असती तर ओडीसी नृत्यही चालले असते, पण पडद्यावर भरतनाट्यम दिसते. याचे गाणे मराठीही चालले असते. ( आपल्या शिवाजी महाराजांचे बंधु, सर्फ़ोजी राजे यानी भरतनाट्यमसाठी काहि मराठी रचना केल्या होत्या. ) पण बंगालीचा मेळ काहि लागत नाही. विक्रम गोखलेच्या तोंडी अथर्वशीर्ष का आहे ? वातावरणनिर्मितीसाठी जरी ती योजना असली तरी यावेळी शंकर, कालभैरव, महाकाली किंवा दत्ताचे श्लोक हवे होते. तसा भूगोलाचा घोळ घातला आहेच. कथा राजस्थान भागातली असली तरी नदी गंगा आहे. मधेच मलकापुर या गावाचा उल्लेख येतो, आणि ते भारताच्या मध्यभागी असल्याचे सांगितले जाते. ( माझ्या बघण्यात महाराष्ट्रातच तीन मलकापुर आहेत, एक बुलढाणा जिल्ह्यात, एक कोल्हापुर जिल्ह्यात आणि एक कर्हाड जिल्ह्यात ) पण सिनेमातले आंध्र प्रदेशमधले असावे. राजस्थानमधला मुलगा, ईकॉनॉमिक्स शिकण्यासाठी गुवाहाटीला जाईल, हे पण पटत नाही. तरी याला सिनेमॅटिक लिबर्टी मानले तर सिनेमा छान आहे. सिनेमाचे ध्वनिमुद्रणही उत्तम आहे. त्याने उत्तम वातावरणनिर्मिती झालीय. कथेत तसे फारसे घोळ नाहीत. बहुतेक दृष्यांचे स्पष्टिकरण शेवटी मिळते. एकदा अवश्य बघा.
|
Prajaktad
| |
| Wednesday, October 24, 2007 - 11:45 am: |
| 
|
भुलभुलैया चा रहस्यभेद जरा निट लक्ष देवुन संवाद ऐकले तर बराच आधी कळतो( अक्षय च्या एन्ट्री आधिच) अक्षय आणी विद्याची काम सुंदर आहेत... शायनी हा एकटाच अभिनयात मार खातो...बाकी सगळे उत्तम अमिशा च्या संवाद्फ़ेकित लक्षणिय सुधारणा आहे..पण,विद्याच पुर्ण भाव खावुन गेलिय. राजस्थान लोकेशन असल्यावर कपडेपट अजुन कलरफ़ुल करता आला असता. संगितकार बंगाली (प्रितम) असल्याने बंगाली असावे गाण्यात .. just joking संगित आणी उत्तम lyrics याने चांगली addition झालि असती.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|