|
Supermom
| |
| Thursday, October 25, 2007 - 2:46 pm: |
| 
|
मी पण नवीनच सायकल चालवायला शिकले होते. बाबांनी जाऊन खास कोरी करकरीत सायकल आणली कौतुकाने. तशी अगदीच घाबरत घाबरत चालवायचे. म्हणून मैत्रिण तिच्याबरोबर तिच्या घरी घेऊन गेली. ती सराईत चालवणारी. घर बरेच दूर होते.सुखरूप तिच्या घरी जाऊन पोचलो. परत येताना ती तिच्या सायकलवर नि मी माझ्या. माझे घर जवळ आले होते. मधे एका ठिकाणी खूपच उतार होता. तिनं वेगात सायकल पुढे दामटली. मी पण तिचेच अनुकरण केले. एकदम वेग वाढला तशी शेजारून जाणार्या एका माणसाच्या सायकलचे चाक थोडे माझ्या बाजूला वळल्यासारखे वाटले. सुसाट वेग नि उतार यामुळे मी इतकी घाबरले की दोन्ही हात नि पाय सोडून दिले. पुढे काय झालं ते सांगायची गरज नसावी.
|
Zakki
| |
| Thursday, October 25, 2007 - 3:22 pm: |
| 
|
प्रथम सायकल चालवतानाचा नाही, पण नंतरचा एक अनुभव: आता नक्की आठवत नाही की भारतातल्या सायकलींचे मागच्या चाकाचे ब्रेक उजवीकडे असतात की डावीकडे, पण माझ्या इथल्या सायकलचे ब्रेक मात्र त्याच्या विरुद्ध बाजूला असत. हे मला माहित होते. आमच्या घराजवळच एक मोठ्ठ्या उताराचा रस्ता आहे. माझ्या मुलाला नवीन सायकल घेऊन दिल्यावर तो प्रथम तिकडे जायला निघाला. सौ. ने म्हंटले 'अहो, जरा तुम्ही त्याच्याबरोबर जा, लहान आहे, जरा सांभाळून न्या.' म्हणून मी पण निघालो. मुलगा पुढे मी माझ्या सायकलवर मागे. नि काय सांगावे राव? अर्ध्या वाटेत जरा वेग वाढल्यावर तो काबूत आणायला मी घाईघाईत ब्रेक दाबले - नेमके पुढल्या चाकाचे! अक्षरश: कार्टून मधे दाखवतात तसा मी तीन चार कोलांट्या उड्या खात पार दोन तीनशे फूट खाली कोसळलो! मुलगा निर्लज्जपणे खो खो हसत उभा होता. कसाबसा धडपडत उठून मोडलेली सायकल घेऊन घरापर्यंत गेलो. तोपर्यंत मुलाने घरी जाऊन सौ. ला सांगितले होते, नि निरोप आणला होता की डॅडी, आई म्हणाली ती शेजारच्याला गाडी घेऊन तुम्हाला आणायला पाठवते आहे. मी कसाबसा घरी पोचलो. बरेच खरचटले होते अंगभर, पण काही मोडले नव्हते. (अहाहा, पंचेचाळीशीतले तारुण्यातले दिवस ते! आता नुसते खाली बसायचे तरी कंबर मोडेल की काय अशी भीती वाटते, नि उठताना घुडगे जाग्यावर रहातील की नाही!) पुढे अनेक दिवस सौ., मुलगा नि तीन वर्षांची मुलगी, डॅडी कसे पडले याची नक्कल करत हसत होते.
|
Gsumit
| |
| Thursday, October 25, 2007 - 3:28 pm: |
| 
|
तीन चार कोलांट्या उड्या खात पार दोन तीनशे फूट खाली कोसळलो! >>> झक्किंना मायबोलिचे रजनीकांत असा पुरस्कार द्यायला पाहीजे... ३-४ उड्यांत दोन्-तीनशे फ़ुट खोल कसकाय गेले हो तुम्ही
|
Zakki
| |
| Thursday, October 25, 2007 - 6:58 pm: |
| 
|
अहो असे दोन तीनशे फूट कोसळत खाली जाताना तुम्ही मोजून दाखवा किती कोलांट्या उड्या झाल्या ते. चारच्या वर मोजू शकलात तर नशीब तुमचे समजा!
|
Sahayadri
| |
| Friday, October 26, 2007 - 4:41 am: |
| 
|
Hello, me ithe navinach aahe first time madhech first time lihite aahe barech post vachlet chaan aahet, pan ithe kay mostly sagle USA wale aahet ka, anyways Hiiiiiiiii to everybody here.
|
Sheshhnag
| |
| Friday, October 26, 2007 - 12:10 pm: |
| 
|
सहयाद्रि, सुस्वागतम! सगळे आहेत. तुम्हाला कंच्या गावचं मानूस हवं?
|
Gsumit
| |
| Friday, October 26, 2007 - 8:19 pm: |
| 
|
नको नको, असे अनुभव ऐकायलाच बरे बुआ तरीपण २-३शे फुट म्हणजे जरा जास्तच खोल वाटलं मला... असेल कदाचीत... अन मी "अहो" बोलण्याएवढा नाही हो मोठा... अरे-तुरेच बराय
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|