|
Urfa
| |
| Tuesday, October 09, 2007 - 3:27 pm: |
| 
|
माझ्या अतरंग नवर्याची घेतलेली फ़िरकी त्याला दुसर्या नावाने मेल करुन करुन पटवला आज संध्याकाळी भेटायला बोलावला तोपर्यंत ह्या हुश्शार माणसाला पत्ता नाही आपल्याला बोलवणारे कोण आहे ते हा झक्कपैकी तिथे हजर झाला. मला तिथे बघितल्यावर स्वारी गडबडली. आता तु इथे कसा वगैरे विचारुन तिथे आणखी भडकवला. मग हा मनुष्य सांगतो मला असे असे मेल आले वगैरे, मी तरी त्याच्याशी बोलाताना मेल मधली वाक्य वापरुन हिंट देतेय तरी हा आपला शोधतोय इकडे तिकडे कुणालातरी शेवटी मीच त्याला सरळ विचारले की अमक्या अमक्या नावाने कुणी मेल केले होते का? तेंव्हा कुठे उजेड पडला. आपण ज्या व्यक्तीला शोधतोय ती दुसरी तिसरी कुणी नाहीये तर आपलीच अर्धांगीनी आहे.
|
Itgirl
| |
| Tuesday, October 09, 2007 - 4:32 pm: |
| 
|
..झकासच्या पुढची आवृत्तीला काय बरं म्हणता येईल? (विचारमग्न चेहरा) झकुला
|
Monakshi
| |
| Wednesday, October 10, 2007 - 6:16 am: |
| 
|
शैलू अगदी हेच नाव माझ्याही डोक्यात होते.
|
Chyayla
| |
| Wednesday, October 10, 2007 - 11:27 am: |
| 
|
झकासपुत्राचे नामकरण सुरु आहे वाटत.. मला तरी वाटत की त्याच नाव आपण "लई" ठेवाव. म्हणजे कसे... "लई झकास पाटील" नावावरुन मला एक प्रश्न खुप दीवसापासुन सतावुन राहीला आहे तो प्रश्न झकासला विचारायचा आहे की हे "झक्की" तुमच्या खानदानीतले का? त्यांच्या घरी एखादी "झकीला"ही असावी असा दाट संशय मला का तर कोण जाणे नेहमी येतो.
|
Chyayla
| |
| Tuesday, October 16, 2007 - 2:14 pm: |
| 
|
उर्फ़ा,  भले शाब्बास तर तु नवर्याचा पोपट केलास होय. आम्ही तुला काय मैना म्हणायचे का? हे अतरंग नवरा म्हणजे काय?
|
Zakki
| |
| Tuesday, October 16, 2007 - 3:04 pm: |
| 
|
अहो च्यायला, विश्वास असेल माझ्यावर तर मी सांगतो. आमचे नि झकासरावांचे खानदान एक असण्याचा संभव फार कमी. मला माझ्या संबंधितांची बर्यापैकी माहिती आहे, त्यात कुणि झकासराव नाहीत. शिवाय कुणि झकिला, शकिला पण इथे नाहीत. बाकी तुम्ही त्यांच्या मुलाला दिलेले नाव चांगले आहे. नाहीतर कुणितरी उगीचच 'भकास' असले काहीतरी नाव सुचवायचा! उर्फ, तुमची गोष्ट आवडली. असे काय लिहीले होते तुम्ही त्याला की तो विचार न करता आपला अनोळखी मुलीला भेटायला गेला? त्याला सांगा, असे नीट चौकशी केल्याशिवाय उगाच कुणाला भेटायला जाऊ नका, धोका होउ शकतो.
|
झकास च्या पोराच्या नावासाठी वरती 'लई झकास आयडिया' होती बरं! खालील प्रकाराला वेंधळेपणात टाकावं की इब्लिसपणात? आत्ता अजमेरला झालेल्या स्फोटानंतर तिथे ईद अगदी साधेपणात साजरी झाली. आम्ही ह्याच्यावर एक बातमी बनवत होतो. बातमीला आवाज माझा एक सहकारी देत होता. बातमीचा मजकूर असा होता... "विस्फोट की वजह से इस साल ईद सादगी से मनाई गयी, ना लोगों ने दावतें की, ना ही वह कपडे पहने जो ख़ास तौर से ईद के लिए बनवाए गए थे" आता ह्या बहाद्दराने बातमीला आवाज देतांना 'वह' हा शब्द वाचलाच नाही!! 'ना ही दावतें की और ना ही कपडे पहने' वाचून ऐकणारा प्रत्येक जण दचकला!
|
Slarti
| |
| Tuesday, October 16, 2007 - 7:23 pm: |
| 
|
इब्लिसपणा मुद्दाम केलेला असतो... त्याने जर हे मुद्दाम केले असेल तर त्याला सांगा हे बाहेर कुठे कळू देऊ नकोस, नाहीतर त्याचा खून पडेल...
|
Zakasrao
| |
| Wednesday, October 17, 2007 - 4:29 am: |
| 
|
लोकहो माझ्या पोरासाठी इब्लिसपणाच्या BB वर नाव का शोढताय??????????? माझ मी शोधेन हो. उर्फ़ तुम्ही नवर्याला असा कसा काय सोडला? त्याला कोणीहि मुलगी मेल वर बोलावेल आणि तो जातो हे तुम्हाला खटकले नाही का??? च्या नाही रे झक्कि काकाना मी वयोमानानुसार काका म्हणतो फ़क्त. ते माझे काका नाहीत. अलिकडे चाफ़्या,च्या.... या लोकानी इब्लिसपणे करणे सोडुन दिलेय काय?? योगेश अरे हा तर वेंधळेपणा झाला त्याचा. मग तु इथे का लिहिल आहेस? कदाचित तो तु तर नव्हेस.
|
Ashwini_k
| |
| Wednesday, October 17, 2007 - 7:44 am: |
| 
|
झकास, तुमच्या बाळाचे नाव ठेवायचा मायबोलीवरच्या आत्या व काकांचा प्रेमळ अधिकार आहे हो. तुम्ही त्यात तुमच्या व बाळाच्या आईच्या आवडीला priority नक्कीच द्या पण आत्या काकांना पण enjoy करु द्या की.
|
Chaffa
| |
| Saturday, October 20, 2007 - 3:48 pm: |
| 
|
हा केलेला नाही पण घडलेला( चुकुन) किस्सा: आमच्या ईथे एक अचाट प्रथा पडली आहे. कुठल्याही मिटींगमध्ये कुणिही उशिरा आले तर सगळे उठून टाळ्या वाजवतात. आज एकतर दिवसभर एका कामात अडकलो होतो आणि ते कमी पडले म्हणुन की काय आमच्या दुसर्या शाखेचा GM आला. कुठल्यातरी नव्या कार्यक्रमाची कटकट घेउन मग नेहमीप्रमाणे अर्जंट मिटींग. मला उशीर होणारच होता कारण माझ्या समोरचा प्रश्नच महान होता. आज दिवसात लपटॉपचा वापर नाही म्हणुन त्याच्या स्क्रिनवर कुंकवाचे मोठ्ठे स्वस्तिक काढून ठेवले, आता ऐनवेळी ते पुसायचे की हा डब्बा तसाच न्यायचा या विवंचनेत अडकलेलो. जरा उशिर झालाच आता आत पाउल ठेवताच टाळ्यांचा कडकडाट करायला बरेचजण उत्सुक असणार. पण समोरुन हे पाहुणे येताना दिसले मोठ्या आदराने???? त्यांना 'आफ़्टर यु' म्हणुन आत पाठवले आणि टाळ्यांचा गजर, महाराज हे असले भारी आदरतिथ्य बघुन खुष!!!!! पण त्यांना दोन गोष्टी कळाल्या नाहीत एक म्हणजे टाळ्यांचा ताल असा विचीत्र का? म्हणजे ते एकदोनतिन एकदोनतिन एक्-दोन- तीन टायपातले. आणि सगळ्यांच्या चेहर्यावर अचानक आश्चर्य उमटून टाळ्या बंद का झाल्या? असो असते एकेका ठिकाणची रित
|
Chaffa
| |
| Sunday, October 21, 2007 - 2:49 pm: |
| 
|
सर्वांनाच दसर्याच्या भरगच्च शुभेच्छा आज चाफ़्फ़ीला गिफ़्ट दिले त्यातला छानसा इरसालपणा: सकाळी उठल्या उठल्या तिच्या हातात भला मोठा खोका दिला, तिने तो तपासुन पाहिला ( हा BB वाचल्यामुळे असेल हो की नाही उर्फ़ा?) त्याच्यात एका जडश्या ठोकळ्यावर 'सरप्राइझ गिफ़्ट? कपाटाच्या डाव्या खणात.' असे लिहीलेले, कपाटाच्या डाव्या खणात दुसरा खोका त्यात 'ड्रेसिंग टेबलाच्या खालच्या बाजुला' असे आणखी तिथे दुसरा पत्ता म्हणजे एकुण त्या 'होम मिनिस्टर' टायपात आख्खे घर पालथे घालायला लावले शेवटी एका खोक्यात एक चावी मिळाली तिच्या सोबतच्या चिठ्ठीवर 'बाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या डिकीत' असे लिहीलेले. पाऽऽर वैतागलेली चाफ़्फ़ी गाडीची डिकी रिकामी बघितल्यावर चिडायच्या ( की रडायच्या?) बेतात होती तेंव्हा कुठे लक्षात आलं की आख्खी गाडीच नविन आहे. तात्पर्य: माणसाला एकाच कामात गुंतवुन ठेवले तर तो आजुबाजुच्या बदलाकडे दुर्लक्ष करतो. करुन पहाण्यास हरकत नाही.
|
Chyayla
| |
| Sunday, October 21, 2007 - 8:55 pm: |
| 
|
जय श्रिराम.. "हॅप्पि रावण मरा दिन" (हे माझ्या अपार्टमेंटच्या ईरसाल मित्राकडुन) माझ्याकडुनही दसर्याचा सर्व मायबोलिकराना मन:पुर्वक शुभेच्छा. चाफ़ा तुला विशेष शुभेच्छा. कुठल्याही मिटींगमध्ये कुणिही उशिरा आले तर सगळे उठून टाळ्या वाजवतात. थाम्बा मी पण आधी गडबडा लोळुन घेतोय.. चाफ़्या तु ईरसाल, तुझी कंपनीपण ईरसाल आणी चाफ़्फ़ी पण ईरसाल... पण काय रे तुला ईरसाल मित्र पण असतिल ना? असो.. ही माझी विवंचना.. खरच मी असे करायला हवे होते का? जो मित्र म्हणुन आपल्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर असा प्रयोग करणे बरोबर आहे का? झकासराव, नंदिनी तुम्ही तरी सांगा. अरेच्या तुम्ही म्हणाल हे काय सुरु आहे यात कसला आलाय इब्लिसपणा.. तर खरी गम्मत पुढे आहे चाफ़्याने मला google Talk वरुन व्हॉईस मेसेज पाठवला कारण मी रात्री बेरात्री उगवतो म्हणुन.. "तु ना भूत आहेस.. भूSSSत" बर त्याने मेसेज तर पाठवला पण दुसर्या दिवशी घाबरत त्यानी मेल टाकला कि अरे त्या Google Talk वरुन मेसेज पाठवला तर त्याच बिल येइल का? मी त्याला नाही म्हणुन साळसुदपणे उत्तर देणार तितक्यात ईब्लिस भूत माझ्यात संचारले. म्हटल चाफ़्यासारख्या महाईब्लिस माणसासोबत ईब्लिसपणा करण्याची चालुन आलेली आयती संधी का सोडावी. मग काय दिले ठोकुन कि तुला काय वाटल ते Google वाले दान-धर्म करायला बसलेत, अरे ह्यातच तर ते कमवतात. आणी चाफ़्याला खरच google talk चे २०.७५ रु. चे बिल आले हो. वरुन धमकी कि बिल नाही भरले तर त्याच gmail id बंद. चाफ़्याने ते बिल मला पाठवले आणी म्हटले हेच का ते बिल? मी म्हणालो हो हेच ते.. वरुन झकासरावनेही ऑर्कुटवर दिले ठोकुन कि अरे तुला पण बिल आले का, मला सुद्धा येउन गेले. मग काय चाफ़्याची खात्रीच पटली मग रोज माझ्याशी चॅटवर त्या बिलाबद्दल चर्चा, ते कसे भरायचे वैगेरे.. वरुन अजुन मला खुप काही शिकायचे आहे ही त्याची कबुली. मी त्याला म्हटले अरे त्या बिलात गडबड दिसतेय तु रिप्लाय करुन चौकशी कर.. मित्राची सुचना मानुन चाफ़्याने चौकशी केली.. तर त्याला उत्तर काय आले हे पुढच्या पोस्टमधे. तुर्तास हे बिल तुमच्यासाठी जोडतोय. मित्रा मला माफ कर पण तुझा ईब्लिसपणा आणी खेळकर स्वभाव यामुळे तु पण याला खेळीमेळीने घेशिल.. असो याला "मायबोली बकरा" म्हणावे का?
|
Zakasrao
| |
| Monday, October 22, 2007 - 4:44 am: |
| 
|
चाफ़्या तुझ्या कंपणीत सगळ्याना तुझा संसर्ग झालेला दिसतोय चाफ़ीच्या वेंधळेपणाचा अस फ़ायदा घेतोस काय रे?? असो तुला गाडीच्या शुभेच्चा रे. आणि त्या सम्या ने पाठवलेल्या GTALK च्या बिलाच्या पण सम्या तु महाइब्लिस आहेस. अजुन पुढचा किस्सा टाक बघु. हा निम्माच आहे.
|
Zakasrao
| |
| Monday, October 22, 2007 - 4:45 am: |
| 
|
सम्या त्याला "बकरा ऑफ़ दसरा" म्हणु या
|
Itgirl
| |
| Monday, October 22, 2007 - 4:58 am: |
| 
|
समीर, झकास इब्लिस लोक्स!!
|
Manuswini
| |
| Monday, October 22, 2007 - 5:22 am: |
| 
|
उर्फ़ा, एक (कु)शंका, तुझ्या नवर्याला तु मुलगी म्हणून मेल पाठवला होतास? आणि इतक्या झटक्यात तो पटला? ह्म्म..... तो 'मित्र' मूवी पहा बरे दिवे घे बरे का.....
|
Chaffa
| |
| Monday, October 22, 2007 - 6:56 am: |
| 
|
च्यायला धन्य आहात आपण गैर फ़ायदा घेतोस काय मित्राच्या अज्ञानाचा पण मी काही कच्च्या गुरुचा चेला नाही. तुझ्याशी चट करतानाच माझ्या हळुहळु लक्षात आले होते. अरे तु इरसालपणात माझाही गुरु आहेस रे! पण बोलताना फ़सलास, कसा? पठ्ठ्या माझे २०.७५ रु. ते तुझे ५ डॉलर होतात होय वर ते दुसरे मेल त्यात सरळ इब्लिस असा उल्लेख आहे. "तो बकरा कटा, लेकिन दोस्ती मे". असो भुताचा भाउच ना तु काहीही असो पण मी चकलो होतोच अज्ञान हो दुसरे काय! एक बकरा ( बकर्याच्या मुन्डिचे चित्र)
|
Swa_26
| |
| Monday, October 22, 2007 - 7:33 am: |
| 
|
समीर, चाफा तुम्ही दोघेही धन्य आहात!! ४ दिवसांपुर्वी मला ट्रेन लेट झाल्याने ऑफिसात यायला उशिर होणार होता, मग म्हटले कोणी आपल्यासोबत आहे का बघावे. म्हणुन ऑफिसातल्या एकाला missed call दिला. तर तो ऑफिसात पोचलेला होता, मग त्याने ऑफिसातुन landline वरुन फोन केला. आता हा लवकर आलेला, म्हणुन आणखी एका मैत्रिणीला conference . लावुन द्यायला सांगितले त्याला. तिला फोन लावला नि हा काहीच बोलला नाही, मग मी तिच्याशी बोलले तर कळले कि ती पण उशिरा येणार आहे, तर दोघी एकत्र जाउ असे ठरले. नंतर तिच्या लक्षात आले तेव्हा म्हणते,"अगं तु मोबाइलवरुन बोलतेयस ना? मला इथे दुसराच नंबर दिसला.. ०२२२२६***** असा!!" मी: "अगं नाही, असे कसे होईल? मी माझ्याच सेलवरुन बोलतेय?" मैत्रिण: "अगं त्या दिवशी माझा मोबाईल खालि पडलेला, त्यामुळे असा प्रॉब्लेम येत असेल..." इथे मी आणि तो दुसरा कलीग हे सगळे ऐकुन हसुन हसुन वेडे व्हायच्या बेतात!! ऑफिसात आल्यावर तिला अस पिडलंय कि ज्याचं नाव ते!!
|
चाफ़्फ़्या.. मी आधीच खूप हसले होते. आता अजून हसत आहे. बरं एक सांग तो कस्टमर सर्व्हे वाचल्यावर कसे वाटले ते सांग...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|