|
Swa_26
| |
| Monday, October 22, 2007 - 6:29 am: |
| 
|
आह.... काय मस्त BB उघडलाय हा!! दिवाळीच्या १-२ आठवडे आधिच आईची तयारी सुरु व्हायची. आधि ते सामान खरेदि वगैरे!! त्यातही माझी विशेष खरेदी म्हणजे मोती साबण!! हे हे हे... तो असल्याशिवाय मला दिवाळि आल्यासारखे वाटायचेच नाही. मलापण आईच्याच हातचा फराळ आवडतो!! चकल्या नि शंकरपाळ्या खासच!! अनारसे आई करायची पण त्याची चव अधिक महिन्यात जावयाला देताना आजी करायची तशी येत नसे. करंज्या करताना मग सोसायटितल्या सख्या असायच्या मदतीला, कारण ते एकच काम जरा वेळखाउ असे!! त्याबरोबर मग आम्हीहि शेजारी जाउन करंज्या करुन देणे आलेच. खुप मजा यायची पण!! चढाओढ लाउन लाट्या लाटायच्या, त्या भरायच्या... हे सगळे प्रकार झाले कि मग लाडु, शेव, चिवडा वगैरे छोटे प्रकार!! लाडु मला फक्त मुगाचा आवडतो.. आणि मग खुद्द दिवाळीच्या दिवशी तर पहाटे ४ वाजता उठवायची आजी. त्या थंडितुन एवढ्या पहाटे उठणे अगदि जीवावर आलेले असायचे, पण काय करणार!! आई तर कधीचीच उठलेली असे नि नारळ किसत असलेली दिसायची, त्यात उटणे मिक्स करुन लावायचे असे ना!! नि मग ते उटणे लाउन अभ्यंग स्नान!! नंतर आईकडुन ओवाळुन घ्यायचे आणि फटाके फोडायला पळायचे. मला फक्त फुलबाजे, पाउस, चक्र असे आवाज न करणारे फटाके आवडतात. हल्ली तर खुप variety आलीय त्यात!!
|
Hkumar
| |
| Monday, October 22, 2007 - 8:00 am: |
| 
|
लहानपणी फ़टाक्यांची मजा अनुभवली खरी. पण गेल्या ५ वर्षांपासून आम्ही फ़टाके पूर्ण बंद केले आहेत. याचे कारण त्यामुळे होणारे प्रचंड प्रदूषण. आधीच सगळी शहरे विविध प्रदूषणांमुळे त्रस्त आहेत. समाजात श्वसनविकारांचे प्रमाण खूप वाढले आहे. तेव्हा त्यात फ़टाके उडवून आपण आगीत तेलच ओतणार आहोत. फ़टाक्यांवरचे पैसे आपण खाउ व इतर मौजमजा अथवा सुयोग्य दान यावर खर्च करणे अधिक चांगले नाही का?
|
Gsumit
| |
| Monday, October 22, 2007 - 3:42 pm: |
| 
|
तोंडाला पाणी सुटलं B.B. च नावच वाचुन... अहाहा, काय बनवायची आइ एक एक पदार्थ, लिहिण अवघड आहे मला... या वर्षी दिवाळी खायला नाही मिळणार...
|
Atul
| |
| Monday, October 22, 2007 - 7:38 pm: |
| 
|
अहाहा.. काय विषय आहे BB चा. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... गेले ते दिवस मला लहानपणी "चला दिवाळी सम्पत आली बर का" या वाक्याची भयानक चीड यायची.
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 23, 2007 - 2:21 pm: |
| 
|
आमच्या सोसायटीमधे अनेक राज्यातले लोक आहेत. सगळे एकाच कंपनीमधले असल्याने, ओळखी वैगरे करुन घेणे नव्हतेच. अगदी पहिल्या दिवाळीपासुन आमच्याकडे वेगवेगळ्या चवीचा फ़राळ येतो. त्यात केरळ, कारवारचा खोबरेल तेलातला फराळही असतोच. सिंधी बंगाली प्रकारही येतात. पण अगदी कौतुकाचे म्हणजे आमचे क्रिश्चन शेजारीही, ताट रिकामे पाठवायचे नाही, म्हणुन काहितरी गोड करतातच. मुंबईत साधारणपणे गुजराथी मारवाडी कंपनी असली तर, ऑफ़िसमधे लक्ष्मीपूजन जोरात साजरे होते. त्यावेळी सुक्यामेव्याची लयलुट असते. या दिवसात दादरचा रानडे रोड, नुसता झगमगत असतो. इतक्या प्रकारचे आकाशदिवे तिथे असतात ना कि बास. पण एक दुःख म्हणजे, पुर्वी दादरमधे भरणारी रांगोळी प्रदर्शने आता नसतात. संस्कार भारतीची रांगोळी छान असते, पण त्या प्रदर्शनात अतिशय सुंदर आणि अनोख्या रांगोळ्या असत. शंभर रुपयाची नोट, ग्रामोफोनची रेकॉर्ड, केळीच्या पानावरचा अबोलीचा गजरा हे सगळे रांगोळीतुन हुबेहुब साकार केले जात असे. फ़टाक्यात आता खुपच नवनवीन प्रकार दिसतात. मुंबईत वाशी, कुर्ला आणि मस्जिद ला फ़टाक्यांची घाऊक दुकाने आहेत. तिथे छापील किमतीपेक्षा पावपट किमतीत फटाके मिळतात. मला स्वतःला आवाजी फटाक्यांपेक्षा शोभेचे जास्त आवडतात. या दिवसात पहाटे वा रात्री टेरेसवर गेले तर सगळे आभाळ फटाक्यातल्या बाणानी भरुन गेलेले दिसते. काहि फटाके मात्र आता विस्मरणात गेलेत. एक चिडिया नावाचा प्रकार असायचा. त्यावर बंदी आलीय.
|
Priyab
| |
| Tuesday, October 23, 2007 - 2:24 pm: |
| 
|
बी खूप छान बीबी उघडलास त्याबद्दल Thank you .. दिवाळि च्या तर खूप आठवणी आहेत... अजुन हि सगळ्या गोष्टि परत कराव्या वाटतात... दिवाळि ची चाहुल तर दसरा संपल्या संपल्या लागायची. घरातले सगळे डबे धुतले जायचे घराला नविन color दिला जायचा घरासमोरचे आंगण झाडुन साफ़ व्हायचे. घराघरातुन भाजण्यांचा वास यायला सुरु व्हायचा. दिवाळि च्या आधी घरी पणत्या यायच्या. मी आणी माझि बहिण त्या पणत्या पाण्यात भिजवुन ठेवायचो..मग त्या वाळवुन त्याना color करायचो... माझी बहिण खूप छान रांगोळि काढते... दिवाळि च्या दिवशी ती सकाळ पासुन सुरु व्हायचि. आधि खडु ने faces draw करुन घ्यायचि मग त्यात color भरायचि. अशी ती रांगोळि दुपारपर्यन्त चलायचि.. गणपति, देव्या राधा कृष्ण हे ती एकदम मस्त काढते दिवाळि च्या दिवशी कोण फटाका पहिला फ़ोडणार हि पैज आम्हि सुद्धा लावायचो..मग मी पहाटे पहाटे alarm लावुन उठायचे.. आंघोळ न करताच फाटाका फ़ोडुन यायचे त्यामुळे नेहेमि ती पैज मी जिंकायचे मला सुद्धा माझ्या आईने बनवलेले पदार्थ आवडतात. चकल्या तर तीची speciality तळलेला चिवडा, चकल्या, खुसखुशित शेव, तळलेलि डाळ, बेसनाचा लाडु, आणि best म्हणजे करंज्या. करंज्यांचे आवरण तर तोंडात पडल्या पडल्या विरघळायचे तसे मला for a change म्हणुन लोकांच्या घरचे पदार्थ सुद्धा आवडायचे.. परतलेल्या पोह्यांचा चिवडा शेव घालुन यायचा एका काकुंच्या घरुन एका बंगाली घरुन आलेलि लवंगलतिका लसुण, कोथिंबिर घातलेल्या चकल्या एक MP वाल्या काकुंच्या हातचे चिरोटे हे सगळे माझे आवडते पदार्थ. फाटाके तर मला सगळेच आवडायचे, फुलबाज्या,भुईनळे,भुईचक्र, colorful pencils . माझी बहिण फार घाबरट असल्यामुळे सगळे फटाके मला मिळायचे. आता आम्हि दोघिहि इथे असल्यामुळे सगळ्या गोष्टि होत नाहित पण आई try करते थोड्या प्रमाणावर सगळे करायचे.
|
Prajaktad
| |
| Tuesday, October 23, 2007 - 7:17 pm: |
| 
|
वा!छानच बीबी उघडलाय बीने! दिवाळिचा माझा आवड्ता फ़राळ म्हणजे आईच्या हातची कुरकुरित चकली, शेव,बेसन लाडु.. लहानपणी आई उगाच बाकी पदार्थ करत राहाते असच वाटायच.. लक्ष्मीपुजनापर्यंत सगळाच फ़राळ उस्टावला जायचा म्हणुन आई अनारसे लक्ष्मीपुजन सुरु झाल्यावर करायची(नैवैद्याला) शेजारुन ताट यायचीच, सगळेच मराठी त्यामुळे पदार्थ सगळे सारखेच पण, चव मात्र वेगवेगळी असायची. आईच्या हातचा फ़राळ आवडायचाच, आता दोन्ही वहिनीही चवदार फ़राळ बनवतात. फ़टाके मला फ़ार आवडत नाही... specially आवाजी फ़टाके तर अजिबातच नाही..(इथल फ़ायरवर्क छान असत) अभ्यंगस्नान मला मनापासुन आवडायच / आवडत..दाराची तोरण,रांगोळी माझ्याकडे असायची... ठिपक्यांची रांगोळी मला जमत नाही mostly फ़ुल्-पान,गणपती,संस्कारभारतिची मोठी रांगोळी,भुश्याची अशि व्हरायटी असायची..
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, October 24, 2007 - 3:25 pm: |
| 
|
बी झकास बीबी "मोठे होत जाऊ तशी दिवाळीची मनातली रंगत कमी होत जाते आणि आठवणी मात्रं तशाच रहातात. - दक्षिणा". अनुमोदन.. मनातलं बोललीस. दसरा झाल्यावर काही दिवसांनी घरात फराळाचा खमंग सुवास पसरायला लागायचा अन् आम्ही स्वैपाकघरात डोकवायचो. आम्ही आलेलं पाहिलं की आई तयार केलेल्या चिवड्याचा एक घास आम्हाला द्यायची अन् विचारायची "कसा झाला रे?" उत्तर अर्थातच "मस्त" असं असायचं आणि आम्हाला जाणीव व्हायची... दिवाळी आली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान व्हायचं आई भल्या पहाटेच आम्हा भावंडांना उठवायची. चहा झाला की लगेच तेल उटणं लावायला बहिणी तयारच आसायच्या. त्यांना ऑर्डर द्यावचो "नीट तेल लावा. जरा जोर लावा.. पाठ नीट चोळा.. नाहीतर ओवाळणी मिळणार नाही" (जसं काही आम्हीच कमावते होतो) बहिणी सुद्धा आम्हा भावांना छान तेल उटणे लावायच्या (आता त्या सासरी असल्याने हे सगळं संपलं).... मग आम्ही आंघोळीला तयार... मी आंघोळ करत असतांना भाऊ, बाबा एकेक फुलबाजी बाथरूम समोर उडवायचे. त्यांच्या आंघोळीच्या वेळी पण अशाच फुलबाज्या उडवल्या जायच्या.. आंघोळी झाल्यावर मी काही दण्णे फटाके घेऊन (साधारण ५:३० च्या सुमाराला) बाहेर यायचो अन् उडवायचो.. दणक्याने सगळे उठावेत हा हेतू . थोड्यावेळातच इतर मित्रही बाहेर यायचे अन् मग दे धमाल... नुस्ते दण्णे फटाके उडायचे. काहींचे फुसके निघायचे मग त्याला सांगायचो "उन्हात ठेव आज". फटाके उडवण्याचा कार्यक्रम ८ पर्यंत चालायचा मग फराळाची आठवण व्हायची... चिवडा (हा "मस्ट"च), चकली, करंजी, लाडू, चिरोटे (यावर पिठीसाखर घालून खातात.. तोंडाला पाणी सुटतंय... ) इ. पदार्थांवर यथेच्छ ताव मारला जायचा.. भरपूर फराळ झाल्यावर मग निद्रादेवी आमचा ताबा घ्यायची.... अभ्यंगस्नान केल्यावर किती छान वाटायचं म्हणून सांगू... दुपारचं जेवण सुद्धा असंच गोड असायचं.. मग कुमार, किशोर वगैरे दिवाळी अंक वाचायला घ्यायचो (मोठं झाल्यावर चंदेरी, जत्रा, आवाज वगैरे "तत्सम" वाचू लागलो ) संध्याकाळ कधी होतेय याची वाटच पहायचो. एकदाची संध्याकाळ व्हायची अन् मग आम्ही आमचे फटाके घेऊन बाहेर उडवायला जायचो.. बाबा आम्हांला फटाके वाटून द्यायचे. फुलबाज्या, भुईनळे, भुईचक्रं वगैरे उडवणे हे पोरी सोरींचे काम... आपलं नव्हे... आपण कसं सुतळी बॉंब, तोट्या सारखे दणकेबाज फटाके उडवायचे.. असा त्यावेळचा समज (?) (आता माझा छोकरा हे उडवतो.. त्यालाही सांगणार आहे बंद करायला..) पहिल्या दिवशी मनसोक्त फटाके उडवायचो... दुसरे दिवशी लक्ष्मी पूजन.. पूजनाच्या वेळी सुद्धा दणका लावायचो... लडी उडवण्यावर जास्त भर असायचा... दणक्यात पूजन व्हायचं... तिसर्या अन् चौथ्या दिवशी बहिणींना दिलेले फटाके चोरून उडवायचो (कारण आदल्यादिवशी लडी लावल्यामुळे सगळे फटाके संपलेले असायचे..).. "अरेऽऽऽ माझं इथलं रॉकेट / झाड(भुईनळा)/भुईचक्र कुठे गेलं?" हा त्यांचा टिप्पीकल प्रश्न... मग त्यांना कळायचं... मग भांडणं.. (त्या बिचार्या माघार घ्यायच्या...). भाऊबीजेचं ओवाळणं किती हृद्य असायचं.... बहिणींना दरवर्षी ओवाळणी घालताना वाटायचं.. कधी आपण कमवायला लागू? कधी त्यांना त्यांच्या मनासारखी ओवाळणी घालू? (आता हेही करून झालंय... करतोय..). आता फटाक्यात रस उरला नाही... रात्री गच्चीवर जाऊन आतषबाजी पहाणंच जास्त चांगलं वाटायला लागलंय.... (म्हातारपणाची लक्षणं??)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|