|
Deshi
| |
| Thursday, July 19, 2007 - 2:06 pm: |
| 
|
काय वडिन्ग्याहून आलाईस का>>> म्हणजे हा अलिबागचा भाऊ. सही. कोल्हापुरी मित्राला वापरायला बरा.
|
वरती शिळीमकर, भडकमकर, सूतकताई असले प्रकार आठवून हसू आलं, आणि लक्षात आलं, आमच्या एका निकट स्नेह्यांचं आडनाव पळशीकर आहे!! _______________________ दिल्लीत वाढलेल्या एक मराठी परिचिताने टाकलेला बाॅम्बगोळा... "हां!! तो माझा खूपच चांगला दोस्त आहे! रोज माझ्या कमरेवर यायचा!" (रोज़ मेरे कमरे पर आता था!) : O
|
Dakshina
| |
| Monday, July 23, 2007 - 10:45 am: |
| 
|
रोज माझ्या कमरेवर यायचा.. 
|
Manjud
| |
| Monday, July 23, 2007 - 11:37 am: |
| 
|
मग श्रीपाद पणशीकरचे काय होईल बरे? \clipart (एक अतिविचारमग्न चेहरा)
|
Mansmi18
| |
| Monday, July 23, 2007 - 11:50 am: |
| 
|
मी : नही, पक्कड नही है पण चिमटा है, उससे काम चलायेगा क्या? वो नल रातभर गल रहा है, दिमाग की वाट लग गई है... ------------------------------------------------------ नल रातभर गल रहा है!! fantastic!!!
|
Chyayla
| |
| Monday, July 23, 2007 - 2:14 pm: |
| 
|
पळशीकर.. योग्या, हे आडनाव ईंदोरला जास्त प्रचलित आहे मला वाटत एका रोडचे की भागाचे नावही आहे.. आम्ही लहानपणी मुद्दाम या आडनावाला फ़ोडुन बोलायचो.. "पळ शी कर" खर म्हणजे आडनावावरही वेगळा BB चा विशय व्हावा. कमरेवर.. खुपच सही
|
आडनावांवरून अजून एक हलकंसं विषयांतर.... "रिसाव" चा हिंदी अर्थ गळती असा होतो. ह्याने आमच्या एका मित्राचा अशक्य पोपट केलाय... त्याचं आडनाव रिसबूड आहे... : D पळतो आता, नाहीतर जोड्याने हाणाल!
|
Tiu
| |
| Monday, July 23, 2007 - 5:58 pm: |
| 
|
वो आजारी था ना, तो उसको बहोत वीकनेसपणा आया था...
|
Disha013
| |
| Monday, July 23, 2007 - 8:08 pm: |
| 
|
कमरेवर....... सहीच....... क न क ह्ह क क्न्क्म
|
Dakshina
| |
| Tuesday, July 24, 2007 - 11:42 am: |
| 
|
आज आमच्या canteen मधल्या माणसाने कप फ़ोडला... माझा कलिग त्याच्यावर ओरडत होता.... 'और कितने कप की शादी लगाएगा तू?
|
Alpana
| |
| Thursday, August 02, 2007 - 12:26 pm: |
| 
|
एक प्रेझेंटेशन हिंदी मध्ये ट्रान्सलेट करतेय... आत्ता लिहिलेले वाक्य... २००१ के भुकंपके कारण पानी आपुर्ती infrastructure को धक्का original sentence : extensive damage to water supply infrastructure in 2001
|
Runi
| |
| Thursday, August 02, 2007 - 9:36 pm: |
| 
|
माझी एक मुंबैत वाढलेली अमराठी मैत्रीण मला फोन करुन म्हणाली. तु आज आम्च्या इकडे Meryland ला येतेस का. इकडे एक इंडियन मेलाय. आपल्याला तिकडे जायचय. तिकडे खाणे-पिणे सगळे आहे, पण मला जास्त hopes नाहीयेत. तु सलवार कमीझ घालुन ये. एवढे म्हणुन फोन ठेवला सुद्धा. आता मला कळेना की ही कुणाच्या तरी अंत्यसंस्काराला जातेय आणि मला काय बोलावतेय, एकवेळ ते पण ठीक आहे, कोणा कोणाला भिति वाटते म्हणुन असु शकेल पण तिकडे जायचे तर खाण्याचा विचार कशाला आणि माणुस मेल्यावर कसल्या आल्यात hopes . मी थोड्यावेळाने परत फोन करुन तिच्या नवर्याला विचारले तेव्हा कळले की तिकडे एका ठिकाणी हिंदीतला 'मेला' होता मराठीतला नाही.
|
Disha013
| |
| Friday, August 03, 2007 - 6:01 pm: |
| 
|
रुनी,एका शब्दाने अर्थाचा अनर्थ!!
|
Aashu29
| |
| Friday, August 03, 2007 - 6:11 pm: |
| 
|
या BB वर नेहमीच माझी ह. ह. पु. वा होते
|
Manjud
| |
| Saturday, September 08, 2007 - 12:07 pm: |
| 
|
काल इथे मुंबईत मोटरमन्सनी अचानक संप केला. त्यामूळे संध्याकाळी लोकल्स ३० - ४० मिनीटं लेट आणि प्रचंड गर्दी घेऊन धावत होत्या. फ़र्स्ट क्लासला सेकंड क्लासवाले बिनधास्त चढत होते. हे पाहून माझी एक मैत्रीण खवळली आणि एक बाई, जी सेकंड क्लासवाली होती तिला जोरजोरात बोलू लागली, " हम लोग इतना दुप्पट पैसा देते है यहां फ़र्स्ट क्लास के लिये और आप जैसे फुकट लोगों के लिये हमको कितना suffer करना पडता है? मालूम है आपको? " त्यावर त्या बाइचं उत्तर, " हां दिदि, हम भी बहुत लंबा सफ़र करते है. वडाला से पनवेल तक...... " आम्ही हसून लोटपोट आणि मैत्रीण बिचारी आपल्याच शब्दाचा अर्थ लावत बसलेली....... suffer की सफ़र.....
|
Monakshi
| |
| Monday, September 10, 2007 - 7:07 am: |
| 
|
मंजू सहीच ह. ह. पु.वा. खरंच ही ट्रेन मधली भांडणं ऐकणेबल असतात अगदी. जाम धमाल येते.
|
Sweetgirl
| |
| Friday, September 14, 2007 - 12:25 pm: |
| 
|
खरेच खुपच सही आहेत सर्व posts या BB वरच्या. हे वाचताना मी एकटीच खूप खूप हसत असते.
|
Chyayla
| |
| Saturday, September 15, 2007 - 3:11 am: |
| 
|
इकडे एक इंडियन मेलाय. आपल्याला तिकडे जायचय. तिकडे खाणे-पिणे सगळे आहे, पण मला जास्त hopes नाहीयेत रुनी... खो खो खो... माझा गाढवपणा मी ही पोस्ट मिटींगच्या रीकाम्या वेळात वाचत होतो
|
Rashmee
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:54 pm: |
| 
|
मी US ला येत होते तेव्हा माझा मावस भाऊ (तो अगदी डाय हार्ड मुम्बई वाला आहे.) मला सोडायला विमानतळावर आला होता. तो माझ सामान गाडितून काढून कार्ट वर ठेवत होता आणी त्याचा मागे अगदी कमी अन्तरावर वर एक बाई(मुलगीच) ने येऊन आपली गाडी उभी केली . माझ्या भावाने आधितर रागाने मागे पहिल आणी त्याच्या पहाण्याने तिने घाबरून बहुतेक ब्रेक वरून पाय काढला आणी गाडी आणखीन पूढे आली. हे पाहून माझा भाऊ अगदी सन्तापून ओरडला " आज़ा मेरे आन्ग पे, ले ले मेरा जीव" . मी हातातल सामान सोडून कीती वेळ नुस्ती हसत उभि होते. ती मुलगी पण किती तरी वेळ हसत होती. आजही तो प्रसन्ग आठवला की ह.पु. होते.
|
Itgirl
| |
| Thursday, October 18, 2007 - 2:28 am: |
| 
|
रश्मी, ह. ह. पु. वा. ग!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|