|
Dineshvs
| |
| Tuesday, October 09, 2007 - 4:12 pm: |
| 
|
आजचा कोस्टा रिका मधल्या जंगलातला एपिसोड तर थरारकच होता. चुकला असेल तर अवश्य बघा.
|
Dhumketu
| |
| Wednesday, October 10, 2007 - 4:40 am: |
| 
|
८ ते ९ आहे का? मी ९ ते १० समजून ९ वाजता लावला तर तो माणूस एका नदीच्या का समुद्राच्या काठावरून काहीतरी सांगत होता. तेव्हढ्यात केबलवाल्याचे लाईट गेले.. आले तर DC वरती काहीतरी लॉफ़्टर चे सांगत होते.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 11, 2007 - 3:32 am: |
| 
|
आज तो ३ वाजता दाखवणार आहेत. तो माणुस अगदी किर्र जंगलात उतरतो, तिथुन एक ओहोळ, नदी, खाडी असे करत समुद्रकिनारा गाठतो. पाणी कसे मिळवायचे. पोट बिघडले तर कुठल्या झाडापासुन औषध मिळु शकते, तराफ़ा करण्यासाठी कुठले झाड योग्य, निवारा कसा उभारायचा, डास कसे पळवायचे, वैगरे अनेक गोष्टी दाखवल्या आहेत. इथे हिंदी सिनेमातल्या हिरोप्रमाणे तो नेहमीच यशस्वी होत नाही. अनेकदा चुकतो, धडपडतो, पण शेवटी किनारा गाठतोच. कदाचित शुक्रवारी वा शनिवारी रात्री तो परत दाखवतील.
|
Hkumar
| |
| Thursday, October 11, 2007 - 4:36 am: |
| 
|
'चक दे' चांगला आहे. सत्य घटनेवर आधारित आहे असे लेखांतून कळले. पण, तो आंतरराष्ट्रीय स्पर्धांना पाठवू नये असे मला वाटते. कारण त्याची theme आपल्या देशाशी संबंधित आहे. परदेशी प्रेक्षक आणि परिक्षकांना तो विशेष वाटणार नाही.
|
Dhumketu
| |
| Thursday, October 11, 2007 - 5:08 am: |
| 
|
झाडे आणी त्याचे वर्णन सगळे तिकडचे आहे. त्यामुळे दिलेल्या माहीती पेक्षा कमीच साठवली जाते मेंदूत .. youtube वर सगळे भाग आहेत का ते पाहीले पाहीजे. मध्ये गुगल करताना असे कळाले की आधिही हे भाग झाले आहेत.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 11, 2007 - 5:43 am: |
| 
|
http://en.wikipedia.org/wiki/Man_vs._Wild इथे वर्णन आहे. मला वाटतं त्याच क्रमाने दाखवताहेत. झाडे ओळखता येतील, इतपत व्यवस्थित दाखवत नाहीत, पण आपल्याकडेही अशी झाडे असणारच. एकंदर फ़ार छान वाटते बघायला, पण आपण कधी अश्या परिस्थितीत सापडु, याची कल्पनाही करवत नाही. इथेही माहिती आहे. http://www.imdb.com/title/tt0883772/ युट्युब वर मात्र पुर्ण नाहीत भाग. http://www.youtube.com/watch?v=4Tdlh4zlhjY
|
Apurv
| |
| Thursday, October 11, 2007 - 4:02 pm: |
| 
|
इथे आहेत काही भाग http://www.youtube.com/profile_videos?p=r&user=proagg&page=1
|
Farend
| |
| Friday, October 12, 2007 - 10:38 pm: |
| 
|
मागच्या आठवड्यात Knocked Up पाहिला. चांगला आहे. अगदी पोट धरधरून वगैरे नाही पण हसवेल. काही संवाद खूप चांगले आहेत. स्वत:ची वेब साईट ( startup company ) चालू करू पाहणारे पण त्याची चर्चा करत असताना Superman starts in 8 minutes म्हणून पटकन टीव्ही कडे जाणारे टिपीकल स्लॅकर्स मस्त दाखवले आहेत.
|
Jhuluuk
| |
| Friday, October 12, 2007 - 11:04 pm: |
| 
|
आत्ताच The Kingdom पाहुन येत आहे खुप चांगला वाटला.. मसाला मुव्ही नाही आहे, सगळे real life based आहे..
|
Sas
| |
| Saturday, October 13, 2007 - 6:00 am: |
| 
|
I m not able to play movie on Windows Media Player. When I try to play it by opening the Media Player I receive the black screen After buffering movie runs but there is no video. (Sound is very clear) I just don't know where to start troubleshooting this problem. I hv Windows XP, Win Media Player 10 Could someone help us figure out where to start troubleshooting problem. Sorry for posting this question here but I need help Thank you.
|
Ajai
| |
| Saturday, October 13, 2007 - 6:34 am: |
| 
|
Sas- what is graphics card/software you are using .try changing video settings for the same. e.g if you are using ATI- catalyst control center (CCC) will alow you to do so. ATI software if loaded will be shown in tray of your menubar.
|
मलाही windows media player त्रास देतो आहे पण माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. आधी प्लेयर व्यवस्थित चालायचा पण आता कुठलही गाण,व्हिडीओ लावल की तो debug कराव लागेल म्हणतो आणि बंद होतो. काय करावे??
|
Amruta
| |
| Saturday, October 13, 2007 - 10:17 pm: |
| 
|
कालच भेजा फ्राय पाहिला. काय धमाल मस्त मुव्ही आहे. कुणि पाहिला नसेल तर http://www.rajshri.com/ वर आहे. वेगळ्या पठडीतला धमाल मुव्ही
|
Manuswini
| |
| Saturday, October 13, 2007 - 10:39 pm: |
| 
|
लागा चुनरी पे दाग : चांगला आहे. राणीने चांगले काम केलेय. कोकणा is cute . story is about two sisters different level of strugle to establish coming from small village तसे रोजचे call girl,call center चे थोडासा background आहेच. पण overall watchable आहे. हम तो ऐसे है भैया गाणे मला लयऽ आवडले )
|
Dineshvs
| |
| Sunday, October 14, 2007 - 8:53 am: |
| 
|
आधी विद्या बालन, राणीच्या बहिणीचा रोल करणार होती. त्या दोघी बहिणी म्हणून शोभुन दिसल्या असत्या.
|
Zakki
| |
| Sunday, October 14, 2007 - 8:52 pm: |
| 
|
लोकहो, भूल भुलैय्या हा चित्रपट कसा आहे? फुकटात (फक्त जाण्या येण्याचा त्रास आहे, नि पेट्रोल) बघायला मिळाला तर करमणूक होऊ शकेल का? परवा हार्टब्रेक किड बघितला. तद्दन फालतू. घाण भाषा, मूर्खांचा कारभार! पण गेम प्लान मात्र मस्त! फारच आवडला!
|
Manuswini
| |
| Sunday, October 14, 2007 - 9:35 pm: |
| 
|
झक्की, तुम्हाला टिकीट फुकट मिळतेय का? कुठे ओळख आहे मग आणखी एका टिकीटाची arrangement होत असेल तर भूलभुलैयाचा रीव्हू देते मी फुकटात
|
Farend
| |
| Sunday, October 14, 2007 - 9:49 pm: |
| 
|
झक्की मी IndiaFM आणि रीडिफ यांचे रिव्यू वाचतो, सहसा दोन्ही विरुद्ध मते असतात. बघा यातून तुम्हाला ठरवता येते का ते की तेव्हढा वेळ घालवण्यासारखा आहे का.
|
Farend
| |
| Sunday, October 14, 2007 - 9:53 pm: |
| 
|
लायब्ररीतून 'मंझिल' मिळाला होता आणि योगायोगाने (पण अगदी ठरवून पाहिल्यासारखा) तो ११ ऑक्टोबरला पाहिला. पुलंची अजून न वाचलेली पुस्तके, Friends चे अजून न पाहिलेले एपिसोड्स याप्रमाणे अमिताभ चा जुना न पाहिलेला चित्रपट म्हणजे दुर्मिळ. IMDB प्रमाणे हा १९७९ सालचा असला तरी याचे बरेच शूटिंग खूप आधी झालेले असावे. कारण पूर्ण चित्रपट भर अमिताभ चे जंजीर च्या आधीचे व नंतर डॉन वगैरे च्या वेळचे लुक्स असलेले शॉट्स अधून मधून मिक्स होतात. म्हणजे पहिल्या अर्ध्या तासात त्या दोन गाण्यांना दिसणारा आणि गाण्या आधी किंवा लगेच नंतर दिसणारा अमिताभ वेगळे दिसतात. त्यामुळे आपण डबल रोल पाहात आहोत असे वाटते. एकदा तर (तो ज्याच्या लग्नात गायलेला असतो तो मित्र त्याच्या ऑफिस मधे येतो तेव्हा) एकाच शॉट मधे क्लोजप असताना ७९ चा अमिताभ व थोड्या लॉंग शॉट ला ७१ चा अमिताभ दिसतो. अमिताभ चे एकूण काम खूपच सौम्य आहे. आणि ७९ च्या मानाने खूप वेगळे काम आहे कारण तोपर्यंत त्याची स्वत:ची स्टाईल तयार झाली होती आणि लोकप्रियही होती. त्याची चालण्याची स्टाईल पाहिली की लक्षात येते. फक्त एकदा व्होल्टमीटर का काहीतरी बघताना, तो पिस्तुलात किती गोळ्या राहिल्या ते बघतोय असे वाटते मौसमी काही शॉट्स मधे चांगली दिसते, पण पुढे पुढे आधीच्या शॉट्स मधे दाखवलेली मिठाई तिने स्वत:च खाल्यासरखी दिसते इतर कलाकारांना स्वत:चे वेगळे व्यक्तिमत्त्व देण्याची स्टाईल हृषिकेश मुखर्जींप्रमाणे बासू चटर्जींची असावी (बाकी चित्रपटात एवढे आठवत नाही). अमिताभ गाताना वगैरे फक्त सुरुवातीलाच दिसतो. ते 'रिमझिम गिरे सावन' मुंबईत खर्या पावसात चित्रीत झाले आहे असे वाचले होते, ते पाहताना आणखी एक लक्षात येते की तेव्हा या भागात किती कमी गर्दी होती. आणखी एक गंमत म्हणजे सत्येन कप्पू च्या एका शॉट मधे (तो त्याच्या बागेत अमिताभ च्या मित्राबरोबर चालत असताना), क्लोजप मधे त्याच्या चष्म्यात बहुधा समोरून शूटिंग करणारे लोक, कॅमेरा ई. दिसतात.
|
Zakki
| |
| Monday, October 15, 2007 - 1:38 pm: |
| 
|
मन:स्विनी, आमच्याकडे केबल टीव्ही, केबल फोन नि केबल इंटरनेट आहे. ते घेतल्यावर क्लिअरव्ह्यू थेटरांत दर मंगळवारी चार तिकीटे फुकट मिळतात. त्यामुळे तुम्ही आलात तर चालेल, इतकेच नव्हे तर बरे होईल. फक्त एक धोका आहे. मला हिंदी सिनेमातले काऽहीहि कळत नाही, नटनट्या ओळखू येत नाहीत. मग सारखे 'हा कोण, ही कोण' असे चालते. शिवाय 'असे का? किंवा असे कसे?' हे प्रश्न मला सतत पडत असतात. त्यामुळे सौ. जाम चिडते! तर तुमचे तुम्हीच ठरवा. पारसिप्पनीला आहे सिनेमा. नि लगेच कळवा, म्हणजे कुठे भेटायचे, किती वाजता, ते कळेल. तुमचे कुणि significant other किंवा नवरा असेल तर त्यांनाहि घेऊन या. बिचारे नवरे! बायका त्यांच्या तोंडावर सांगतात, 'अहो हे सद्गृहस्थ नाहीत, माझा नवरा आहे' किंवा significant other नाही, नवराच आहे!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|