|
माझी एक वर्गमैत्रीण आणि मी ह्या आॅफ़िसात एकत्रच लागलो. परत एकदा एका परीक्षेसाठी पुण्याला जावं लागणार होतं, म्हणून एकत्रच तिकिटं काढली. एअरपोर्टवरच थेट भेटलो. मी जरा निसर्गाच्या हाकेला ओ देऊन परत चेक्-इनच्या रांगेत लागलो. समोर पाहिलं तर अगदी तिच्यासारखीच एक मुलगी माझ्याकडे विचित्र चेहरा करून पाहत होती. मी थोडा embarrass होऊन विचार करत होतो, "आयला!! कित्ती सारखे चेहरे आहेत दोघींचे!!" पण त्या मुलीचं पाहणं काही कमी होईना म्हणून मीच नजर वळवून समोर पाहू लागलो, आणि गाढवपणा लक्षात आला... ती माझीच मैत्रीण होती, मीच मठ्ठासारखा Spicejet- Pune ची रांग सोडून Air Deccan-Bangalore च्या रांगेत जाऊन उभा राहिलो होतो! जूनिअर काॅलेजात एकदा असंच आपल्या ट्रेनमधून फलाटावर पेपर आणायला गेलो आणि समोरच्या ट्रेनमध्ये जाऊन बसलो होतो!!
|
Chyayla
| |
| Saturday, October 06, 2007 - 11:21 am: |
| 
|
माणुस आणी योग्या धन्य आहे तुमची.. आता माझाही ताजा वेंधळेपणा.. नवीनच ओळख झालेलेया मनिषच्या घराकडे जात होतो तर तोच मला बाहेरुन येताना दीसला त्याच्याशी मस्त गप्पा मारल्या त्याला विचारतोय की रुबी (त्याची बायको ) कशी आहे? तो थोडा विचित्र नजरेनी पहायला लागला. आणी तितक्यात समोरचा दरवाजा उघडला आणी खरा मनिष दारात येउन म्हणतोय "आईये" तिथेच ताडकन उडालो मग लक्षात आले ज्याचाशी बोललो तो दुसराच त्याच्यासारखा दीसणारा अमीत नावाचा त्याची पण नुकतीच ओळख झाली होती. घरात गेल्यावर मनिष आणी रुबी ला हा किस्सा सांगितला तर माझा पोपट झालेला पाहुन त्यान्ना हसु आवरेना. काही दीवसापुर्वी ह्याच रुबीला म्हटले होते की आप अमीत के साथ खाना खाने आईये. तेन्व्हापासुन हा असला वेन्धळेपणा करतो हे तीच्या लक्षात आले होते.
|
Mandarp
| |
| Monday, October 08, 2007 - 6:33 am: |
| 
|
नमस्कार मित्रहो, वेन्धळेपणाचे किती किस्से लिहायचे, म्हणून आत्तापर्यन्त काही लिहीले नाही, पण आता सुरुवात करतो. वाशी स्टेशन वर आज सकाळी १०० रु देवून ५० रु किमतीचे कूपन बूक घेतले. मी वाशी ते ठाणे लोकल नि गेल्या महीन्यापासून प्रवासाला सुरुवात केली. पहील्या दिवशी, तिकीट किती आहे हे न विचारता, ठाणे तिकीट घेतले. पण नंतर मित्राशी बोलतांना लक्शात आले की मी दूप्पट पैसे देउन रिटर्न तिकीट काढले होते. आता बाकीचे किस्से हळुहळु लिहिन.
|
Cutepraju
| |
| Monday, October 08, 2007 - 7:17 am: |
| 
|
मला एकदा मुलुन्डहुन डोम्बिवलिला जायच होत. मी घराजवळ रिक्शात बसले मुलुन्ड स्टेशन्ला जायला. रिक्शावाल्याला सान्गितल " डोम्बिवली return "...... तो खो खो हसला!!
|
Aashu29
| |
| Monday, October 08, 2007 - 12:26 pm: |
| 
|
cute praju मी पण खो खो हसले हे वाचुन!!
|
Ajjuka
| |
| Tuesday, October 09, 2007 - 6:34 am: |
| 
|
नवर्याचा ताजा ताजा वेंधळेपणा... पर्वा विजय सेल्स मधून फूड प्रोसेसर घेतला. काल त्याची delivery मिळणार होती. ती somehow झाली नाही. आज सकाळी डेमो वाल्याचा फोन की तो येतोय म्हणून. खरंतर माझाच नंबर दिला होता पण नेमकी मी अंघोळीला गेले होते त्यामुळे नवर्याने घेतला. आणि त्याला ये सांगितलं. मी आल्यावर मला सांगतो की डेमो वाला येणारे. "आणि मशिन?" "ते काय माहित नाही." "अरे पण त्याला विचारायचं नाही का?" "त्याने दुकानात बघितलं पाहिजे ना..!" (मस्त सारवासारव..) यानंतर घडलेली शाब्दिक चकमक इथे देत नाही... १० मिनिटांपूर्वी तो डेमो वाला येऊन गेला. त्याला सांगितलं delivery मिळाली नाहीये आणि वर मीच मुद्दामून त्याला म्हणलं की आपने चेक करना चाहीये ना... "हम कंपनीसे आते है मॅडम, मैने फोने किया तो सरने बताया की आजावो इसलिये मै आया..!" असा सुंदर पचका...
|
Hkumar
| |
| Tuesday, October 09, 2007 - 7:32 am: |
| 
|
किराणा दुकानातून रवा घेत होतो. तेथील मुलाने पिशवीत भरल्यावर खूप पांढरा वाटला. मनात म्हटले,''असेल, नवीन brand चा. घरी आल्यावर बायकोने पाहिल्यावर लक्षात आले की तो मैदा होता!
|
Cutepraju
| |
| Tuesday, October 09, 2007 - 9:47 am: |
| 
|
मी शाळेत असताना एकदा दुसर्याच एखाद्या मुलीला माझी मैत्रिण समजुन पाठीत जोरात धपाटा घातला होता...........ंअन्तर काही दिवस तिला तोन्ड दाखवायची पण लाज वाटत होती मला!!!!!!
|
Zakki
| |
| Tuesday, October 09, 2007 - 11:33 am: |
| 
|
यावर माझे अत्यंत आवडते गाणे आहे. कुठल्याश्या सिनेमात आशा पारेख समजून शम्मी कपूर कुणा भलत्याच्याच पाठीवर थाप मारतो. त्यामुळे लोक त्याला मारायला उठतात. तेंव्हा 'देखिये साहिबो' हे गाणे आहे ते नुसते ऐकण्यापेक्षा बघायला जास्त मजा. त्याच वेळी त्या दुसर्या मुलीला म्हणायचे 'अय्या, किती बदललीस .... ! नि नावहि बदललसं?'
|
हलकंसं विषयांतर.... ह्या पाठ थोपटण्यावरून एक SMS आठवला... एखाद्या मुलीला पटवायचं असेल, तर मागे जाऊन "भाॅऽऽऽ" करायचं. दचकणं झाल्यावर तिने मागे वळून पाहिलं आणि हसली तर समजा पोरगी पटली. मात्र रागाने पाहिलं, तर टाळ्या पिटत reverse gear मध्ये चालत म्हणायचं.. "हाहाहा!! दीदी डर गयी!!"
विषयाकडे परत... आमचे कंप्यूटर्स ओळीने मांडले असतात, आणि एका कंप्यूटर ला दोन माॅनिटर्स असतात. मी माझ्या माॅनिटरवर शेअरबाजाराच्या बातमीची फ़ाइल उघडली आणि शेजार्याच्या माॅनिटरमधली सोनिया-लेफ़्टची चित्रं बघून गोंधळलो होतो!! बाय द वे... आज रेखाचा वाढदिवस. आमच्या लोकांना शोधून्-शोधून "(दिल चीज़ क्या है) आप मेरी जान लीजिए" ह्या ओळी वाजवायला सापडल्या!! चांगलं 'इन आंखों की मस्ती के' चं फ़ुटेज घेतलं असतं!!
|
Dakshina
| |
| Wednesday, October 10, 2007 - 5:10 am: |
| 
|
सोमवारी, माझा Boss इकडच्या Office ला आला होता, आमच्या Department मध्ये २ PC आहेत, Boss ला Laptop connect करायचा होता, त्याने मला माझ्या PC ची, Network Wire काढून द्यायला सांगितली, कारण त्याला मेल्स download करायचे होते. मी खुर्चीतून उठले, तोपर्यन्त याने माझी खुर्ची मागे ओढली, कारण जागा कमी होती आणि त्याला, Laptop on करायचा होता, मी वायर काढली, आणि त्याच्या लँपटॉपला जोडली, आणि मागे बसायला गेले, ती धप्पकन जमिनीवरंच..
|
Farend
| |
| Wednesday, October 10, 2007 - 3:45 pm: |
| 
|
दक्षिणा, वायरलेस नेटवर्क कंपन्यांना हा किस्सा पाठवून दे जाहिरात म्हणून आणि 'इकडच्या' म्हणजे तुझ्या नवर्याच्या का?
|
Anaghavn
| |
| Thursday, October 11, 2007 - 6:51 am: |
| 
|
माझाही झालेला सुंदर पचका! एकदा मी आणि नवरा एका प्रदर्शनात गेलो होतो. नवर्याला पटकन कुठेतरी गायब व्हायची सवय! असच पहात पहात पुढे जात असताना, मला एक छान स्टॉल दिसला म्हणून "चल तिकडे" असं म्हणंत त्याचा हात धरला आणि वळाले., आणि काय सांगू महाराजा, मी हात तर धरला होता, पण वळल्यावर समोर नवरा! मग मागे हात कोणाचा?मी घाबरून मागे पाहिलं, तर दुसराच माणूस!!!!! इतकी लाऽऽऽऽऽऽज वाटली म्हणून सांगू! पण नवरा हासत होता, आणि त्याने त्या माणसाकडे "माझी बायको आहे" अशा अर्थाने पाहिलं. तो माणूसही हसला आणि "चलता हे" अशा अर्थाने पाहीलं. त्या नंतर कितीही घाई असेल तरिही "हाच ना माझावाला?" असं कंफ़र्म झाल्याशिवाय नाही रे बाबा!!
|
Monakshi
| |
| Thursday, October 11, 2007 - 7:19 am: |
| 
|
अनघा, तुझ्या किस्स्यावरुन मला एक प्रसंग आठवला. हा माझ्या नवर्याचा वेंधळेपणा. कॉलेजमध्ये असताना एकदा मैत्रिणीचा वाढदिवस होता म्हणून आमचा सगळा ग्रुप cake shop मध्ये गेलो होतो. नवराही आलेला. (अर्थात, तेव्हा तो नवरा नव्हता, पण नवरा होण्याच्या मार्गावर.... जास्त डिटेल देत नाही, जाणकारांनी समजून घ्यावे. . मी आणि माझ्या एका मैत्रिणीने सारख्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि आम्ही सगळे कुठची पेस्ट्री खायची ते बघत होतो. अचानक माझ्या नवर्याने माझ्या मैत्रिणीचा हात धरला आणि तिला दुसर्या ठिकाणी केक दाखवाय घेऊन जायला लागला. ती बिचारी,"अरे सोड, मी कविता आहे, मोनिका नाही" असं ओरडायला लागली. सगळ्यांची ह. ह. पु. वा. तो बिचारा गांगरुन इकडे तिकडे बघायला लागला. आणि मी एका कोपर्यात लांब उभी राहून छान छान पेस्ट्र्या बघण्यात दंग होते. हे सगळं माझ्या गावीही नव्हतं. हसण्याचा आवाज आला तेव्हा मी पाहिलं आणि मग मला कळ्ळं. आता बिचारा चार चार दा चेक करतो हात धरायच्या आधी.
|
Princess
| |
| Thursday, October 11, 2007 - 9:51 am: |
| 
|
माझा नाही पण जावेचा किस्सा आठवला वरचे किस्से वाचुन. माझी जाऊ एकदा भाजी मंडईतुन बाहेर पडली आणि दुसर्याच कुठल्या माणसाच्या स्कुटवर बसली घाई घाईत. तो माणुस आणि थोड्या अंतरावर थांबलेला माझा दीर दोघेही चकित शिवाय भाजी घेत असलेली त्या माणसाची बायको धावतच आली आपला नवरा कुठल्या बाईबरोबर जातोय ते बघायला.
|
Sheshhnag
| |
| Thursday, October 11, 2007 - 11:27 am: |
| 
|
योगेश, च्यायला, मंदार, क्युट, अज्जुका, दक्षिणा, अनघा, मोनाक्षी, प्रिन्सेस, वेंधळ्यांची शाळा भरली वाटते. सर्वच किस्से धमाल! ह. ह. पु. वा. या शाळेत माझीही भरती! जुनी गोष्ट आहे. गोव्यात नुकतंच नव्या घरात राहायला गेलो होतो. गस सिलिंडर आणायचा होता. घर हायवेपासून आत होतं आणि हायवेवर गस सिलिंडरचा ट्रक यायचा. एक दिवस सिंलिंडर आणायची माझ्यावर पाळी आली. लहानपणी बेळगावला मी सिलिंडर आणायचा पण त्यावेळी आमच्याकडे फक्त HP चे कनेक्शन होते. आता भारतचेही होते. मला HP चा सिलिंडरवर निळा मार्क असतो आणि भारतवर पिवळा मार्क असतो इतकेच माहीत होते, कुठे असतो ते माहित नव्हते. मी HP चा सिलिंडर बदलायला तिठ्यावर गेलो. गाडी आली, त्यांनी सिलिंडर बदलून दिला, मी पाहिलं, सिलिंडरचे सिल पिवळ्या रंगाचे आहे. मी त्या माणसाला मला भारतचा नकोय, HP चा सिलिंडर हवाय म्हणून वाद घालू लागलो, त्याला काहीच कळेना आणि मी तो सिलिंडर घेईना. शेवटी त्याने हा सिलिंडर चालला नाही तर पुढच्या वेळी बदलून देईन, आता वेळ नाही म्हणत गाडी पुढे ताणली. मी चडफडत सिलिंडर घेऊन घरी आलो आणि आईला कैफियत सांगितली. तिनं कपाळावर हात मारला, आणि सिलिंडरच्या वॉल्व्हखाली असलेला निळा रंग दाखवला, तसेच भारतच्या सिलिंडरवरचाही मार्क दाखवला. आपल्या अगाध ज्ञानाची माहिती सगळ्यांना झाल्याबद्दल पुन्हा सहा महिने सिलिंडर बदलण्याच्या भानगडीत पडलो नाही! ता. क. - आणि आता हे अगाध ज्ञान जगभर झाले. (दु:खी चेहरा)
|
प्रिन्सेस, .... .... ....
|
Itgirl
| |
| Thursday, October 11, 2007 - 2:08 pm: |
| 
|
अनघा, मोनाक्षी, प्रिन्सेस!! ... ...
|
Amruta
| |
| Thursday, October 11, 2007 - 4:25 pm: |
| 
|
वरच्या किस्स्यांवरुन मला पण एक किस्सा आठवला. niagra falls ला मागे गेलेलो तेव्हा cave of the winds मधे मस्तपैकी धबधब्या खाली धुंद झालेलो असताना एक माणुस माझ्या मैत्रीणीला चक्क त्याची बायको समजुन खेचु लागला. lets go .. lets go.. आम्हाला काही कळेना... तेवढ्यात त्यालाच कळ्ळ. सही हसलो मग...
|
Zakki
| |
| Thursday, October 11, 2007 - 8:28 pm: |
| 
|
अन्घावन यांचा आणखी एक गोंधळ. वर झकासराव यांना मुलगी झाली याबद्दल त्यांनी माझेच अभिनंदन केले आहे! अहो, आता माझ्या मुलीला मूल होण्याइतके तिचे वय आहे. मी म्हणजे काय निक नोल्टे आहे का टोनी रंडॉल? निकला सहासष्टाव्या वर्षी तर टोनी ला ऐंशीनंतर मूल झाले! (म्हणजे तसे होऊ शकते, पण माझा तसा बेत नाही.) आणि पूर्वी पुण्यात हॉटेलात डोश्याला घावन म्हणत, त्याची आठवण झाली! आजकाल कदाचित् त्याला क्रीप्स म्हणत असतील!

|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|