Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 13, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » सारेगमप आणि इतर shows मधले performances . » Archive through October 13, 2007 « Previous Next »

Prajaktad
Tuesday, October 09, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिले डिजे ला धन्स... हा बीबी ओपन केल्याबद्द्ल...
सारेगामाविषयी.. गजेंद्रशिवाय सारेगामा हा पहिलाच प्रयोग.. सुरवातिपासुन trp मधे सगळ्यात पुढे.. घडवुन आणलेले अनेक वाद,सेलिब्रिटी गेस्ट्शी सुद्धा(आठवा हिमेश आणी आशा भोसले).. irritating हिमेश यामुळे सुरवातीपासुनच मला व्हिओआयच जास्त आवडला होता... अजुनही मला व्हिओआयच आवडतो (मी दोन्ही प्रोग्रम बघते)
तरीही सारेगामाचे काही parformaces खुप सुंदर होते..
अमानतचा रिसेंट तुझसे नाराज नही जिंदगी... too good ..
मुस्सरत्: all सुफ़ी सॉन्ग खुपच सुंदर..ते सोडुन सगळे गाणी अतिशय वाईट..
पुनम्: avg सिंगर
मौली: एकच गाणे उत्तम गाईले.. नंतर आवडेल असा एकही performance नाही
ऑनिक्: flaless singer पण,टोटल कॉपी ऑफ़ सोनु.ऽतिशय irritating लव्ह अफ़ेअर च्या चर्चा..त्यामुळे माझ्यामते बाद
राजा: सिंगर म्हणुन उत्तम, गाण शिकलेला नाही त्यामुळे perfection नाही..पण, विनर झाला तर छानच..
या सगळ्यात हिमेश ने इतके irritate केले पहिले मुस्सरत प्रेम..मग,ऑनिकच खोट्या प्रेमाची नाटक...आता तर इतका बरळतो त्याच्या तोंडाला मीटर लावल बिल येईल..

स्टार व्हिओआय विशयी...ब्रेक के बाद..





Deepanjali
Tuesday, October 09, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारेगमप मधले माझे आवडते Top 6 episodes:
कव्वाली episode
15th/14th Aug episode
लालुजी स्पेशल hardcore folk episode
पावसाच्या गाण्यांचा episode
जगजीत सिंग - पं . जसराज episode
सलमान खान special: ( या episode मधली फ़क्त गाणी , सलमान खान नाही )
आशा भोसले असताना सगळेच episodes पहायला आवडायचे , गाणारे कोणीही असले तरी आशा ताईंना बोलताना ऐकणे , तिच्या commnets ऐकायला जाम मजा यायची !
माझ्या दृष्टीने top 5 rankings
१ . मुस्सर्रत
२ . राजा / अमानत
३ . हरप्रीत / अनिक
४ . सुमेधा
५ . जुनैद


Pallavi_pune
Tuesday, October 09, 2007 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

According to me winners are
१) अमानत
२) आनीक
३) राजा


Chetu08
Tuesday, October 09, 2007 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prajakta,
I agree to u completely. aamhala pan tya Himesh ne vaitag aanlay. Kiti badbad karto. Kadhi kadhi watat saral uthun java aani yachya tondala tape lavun yava.last 2005 chya saregamapa madhye suddha tya Vinit chya premprakranabaddal sarkha bolat asaycha aani aata ya veles Anik.
Ek goshta matra samjat nahi female participants ya goshtinna kadhich oppose ka karat nahit. Anik chi ti aani koni nasun SUMEDHA hoti he kalatach hota pan tilahi ya prakarabaddal kahi aakshep asel asa watlach nahi kadhi ticya vagnyatun.
Sorry ha ek totally vegla mudda aahe. ya BB war takayla nako hota pan kharach rahavla nahi.

Tiu
Tuesday, October 09, 2007 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Infact इथे असे मुद्दे मांडायला काही हरकत नसावी!

आपापसात भांडण्यापेक्षा आणी एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा त्या लोकांना नावं ठेवु! :D

मला singers पैकी अमानत आणी judges पैकी विशाल-शेखर आवडतात. sensible comments देतात ते. त्या हिमेश आणी दरबार सारखे स्वत:च्या contestants चं कौतुक नाही करत नेहमी!

हिमेश तर वेडा होणार आहे लवकरच!


Deepanjali
Tuesday, October 09, 2007 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण विशाल शेखर आवडतात , कधीच biased नसतात आणि किती sensible बोलतात !
हिमेश - इस्माईल सारखे love stories, मा कि दुवा , रोटी , बिर्याणी असल्या emotional dramas ना कधीच support करत नाहीत , infact जेंव्हा इतर लोक असा ड्रामा अकरतात तेंव्हा विशाल च्या चेहेर्‍या वरची expressions पहाण्या सारखी असतात !
हिमेश चे उच्चाटन काही करणार नाही झी असं दिसतय:-(
हिमेश ला आणि बहुदा झी लाही वाटतय कि highest TRP त्याच्या मुळेच मिळतय या program ला म्हणून !
खरं तर गेल्या वर्षीचा विनित आणि या वेळी अनिक यांना हिमेश च्या या असल्या publicity चा तोटाच झाला आहे .
मुस्सर्रत पण हिमेश मुळेच बाहेर पडला असं मला वाटतं .
मौली पण लायकी नसताना हिमेश च्या ड्राम्यामुळेच final 14 मधे आली , श्रेष्ठा ऐवजी .


Deepanjali
Wednesday, October 10, 2007 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

As always, या ही वेळी grand finale एकदम flop होणार असं दिसतय , वाचा , पुन्हा तीच ती गाणी ..
आणि अमानत ला उगीचच dance numbers दिले आहेत !
राजा सध्या तरी बराच पुढे आहे:-) पण अमानत bottom ला:-(

http://www.saregamapachallenge2007.com/spoiler-grand-finale-performances-and-challenger-leading.html

Aashu29
Wednesday, October 10, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्या वेळचि अशी स्थिती होती कि मला विनित जास्त आवडायचा आनि देबाशिश कमि, पण अगाउ हिमेशमुळे देबाशिश लाच जास्त votes दिले गेले लोकांकडुन .
जर हिमेश विनर झाला असता तर त्याचा माज बघायलाच नको!!

Prajaktad
Wednesday, October 10, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Anik chi ti aani koni nasun SUMEDHA hoti he kalatach hota pan tilahi ya prakarabaddal kahi aakshep asel asa watlach nahi kadhi ticya vagnyatun.
>>>>>>>>>ऑनिकची कुणिच नव्हती / नाही हा सगळा त्या हिमेशचा ड्रामा आहे.. थोडाफ़ार निर्मात्याचाही... कारण असली प्रकरण टिन एज पब्लिकला attract करतात.पर्यायाने trp आणि वोट सुद्धा
ऑनिक-अमानत सुमेधा प्रेमप्रकरण , पुनम च्या गरिबिचा ईशु..(ति खरच गरजवंत असेल ही..)पण, मग जिच्या स्वताच्याच future चाच पत्ता नाही तिने एक मुलगी कशाला दत्तक घ्यावी..???
विशाल-शेखर ने या सगळ्या प्रकरणापासुन स्वतला दुरच ठेवले..
देबोजित पेक्षा विनित खुप ऊजवा होता पण, हिमेशने त्याला इतके चढवले कि तो पडलाच... पण, खरी क्लुप्ती वेगळिच आहे.. पब्लिक कुणा एकाला आपलस करते त्याच्यासाठी वोटसचा पाऊस पडते..मग, त्याच्या विरोधात एकही comment आली लोक त्याला elimination पासुन वाचवण्यासाठी वोट करत सुटतात..आणी अलगद जाळ्यात अडकतात.
२००५ मधे तो देबोजित होता(वोटेड आणी विन बाय आसाम जनता)
२००७ मधे तो राजा असेल..
विनर ' राजा ' च असेल हे नक्की...



Chinya1985
Wednesday, October 10, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे गाणं ऐकताना डोळ्यांची तशीही गरज नसतेच ना !
Btw, तू इथे फ़क्त माझ्या मुस्सर्रत बद्दल च्या comments वर personal remarks मारायला आलास का ?
I guess तुम्ही लोकांनी already दुसर्या BB वर केल्या आहेत , तेंव्हा इथे माझ्या आवडीवर commnets करण्या पेक्षा तुम्हाला जर सारेगमप किंवा इतर shows मधल्या तुमच्या आवडत्या performances बद्दल चर्चा करायची असेल तर लिहा , otherwise कोणाच्या आवडीवर personal remarks मारण्या साठी हा BB नाही .
I hope u get it!

घाव वर्मावर बसलेला दिसतोय!!!
असो.
मुसर्‍या काही चांगला गायक नव्हता कॉंटेस्टसाठी. ग्रेट वगैरे तर नाहिच. त्याने हिम्याच म्हटलेल 'चकणा चकणा' गाण तर इतक फ़ाल्तु होत की त्याच वेळी तो बाहेर जायला हवा होता. एक गाण म्हणता म्हणता अडखळला, मग हिम्या म्हणाला बिना म्युझिकच म्हण त्यानंतर अर्धी ओळ बेसुरपणे म्हटली. तो पाकी होता म्हणुनच झीवाल्यांनी त्याला वर आणला. जुनैद तर त्याहुन बक्वास. अमानत ठिक आहे.

आपला अभिजीत चांगला गायक होता पण गाण्याची चॉईस बरोबर नसायची आणि तो गाण म्हणुन शांतपणे निघुन जायचा इतरांसारखी नाटक करायचा नाही त्यामुळे तो फ़ारसा लक्षात रहायचा नाही.

राजा चांगला गायक आहे तो जिंकायला हवा. त्याने म्हटलेल वंदे मातरम सर्वात जास्त लक्षात रहात,मौलीनी नो एंट्री गाण सही म्हटल होत,सुमेधा पण चांगली गायची,पुनम फ़ायनल ३ मधे असायला हवी होती असे वाटते,हरप्रित इतका पुढे कसा आला हेच कळले नाही(म्हणे नेहमी आजारी असायचा,अरे मग वर्षभर आजारपणानी गाण नीट म्हणता येत नसेल तर काय उपयोग??),अनीक ठिक आहे,जॉय पण चांगला होता.

(दीपांजलीला मी या वर आलेल आवडत नसेल तर तस लिहाव,मी इथे येण टाळेल)


Uday123
Wednesday, October 10, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमानत
ऑनीक
राजा
असा क्रम मी लावेल.

अमानत छानच गातो, हिमेश स्वत:च्या चेल्याच नको तेवढं कौतुक करतो (त्यामुळे त्याचा चेला गोत्यात पण येऊ शकतो). "मेरे सब चाहते इसे वोट दे..."-- हिमेश, मग ऑनीक ला किती वोट मिळतील?

विशाल्-शेखर खुप मोजके, कमी पण मुद्याचं बोलतात, त्यामुळे चांगले वाटलेत.


Uday123
Wednesday, October 10, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑनिक-अमानत सुमेधा प्रेमप्रकरण , पुनम च्या गरिबिचा ईशु..(ति खरच गरजवंत असेल ही..)पण, मग जिच्या स्वताच्याच future चाच पत्ता नाही तिने एक मुलगी कशाला दत्तक घ्यावी..???

--प्रसिद्धी साठी काही (नसलेली) इशु देखील तयार करावे लागतात.

पुनम चे या क्शेत्रात बस्तान नसेल बसले पण कुठे तरी स्थीर झाली असेल. ज्या परिस्थितीतून ती ईथवर आली, आणी गाण्याची चमक दाखवली... देव जाणे काय सुविधा/ प्रोत्साहन मिळाले असेल? म्हणुन तिला मानावे लागेल.

दत्तक विषई- तिच्या मनाचा मोठे पणा आणी सामाजीक बांधिलकीची जाणीव दिसुन येते. आज स्वत:चीच मुलगी देखील नको आहे अशा वेळी तिच्यातील वेगळेपणा चांगलाच जाणवतो


Deepanjali
Wednesday, October 10, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम च्या आणि last season मधे राजीव च्या गरीबीचे उगीचच प्रदर्शन मांडले होते , खूप irritate झालं ते !
पण btw, ते पूनम नी मुलगी adopt करण्या विषयी कुठे तरी वचलं होतं कि तिच्याच गली मधल्या कोणी तरी ' मुलगी झाली ' म्हणून त्या पोरीला अक्षरश : रस्त्यावर टाकले होते , म्हणून पूनम ने तिला घरी आणले म्हणे !
खरे खोटे माहित नाही , कदाचित ही पण मनघडन कहानी असेल लिहिणार्‍याची !


Deepanjali
Wednesday, October 10, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुसर्‍या काही चांगला गायक नव्हता कॉंटेस्टसाठी. ग्रेट वगैरे तर नाहिच. त्याने हिम्याच म्हटलेल 'चकणा चकणा' गाण तर इतक फ़ाल्तु होत की त्याच वेळी तो बाहेर जायला हवा होता. एक गाण म्हणता म्हणता अडखळला, मग हिम्या म्हणाला बिना म्युझिकच म्हण त्यानंतर अर्धी ओळ बेसुरपणे म्हटली. तो पाकी होता म्हणुनच झीवाल्यांनी त्याला वर आणला. जुनैद तर त्याहुन बक्वास. अमानत ठिक आहे.
आपला अभिजीत चांगला गायक होता पण गाण्याची चॉईस बरोबर नसायची आणि तो गाण म्हणुन शांतपणे निघुन जायचा इतरांसारखी नाटक करायचा नाही त्यामुळे तो फ़ारसा लक्षात रहायचा नाही.
<<<<<मुस्सर्रत सूफ़ी मधेच master आहे आणि तो त्याने त्यातच career केले तर नक्कीच त्याचे future bright आहे .
तसे स्पर्धे मधल्या top 3 singers नी पण कधी ना कधी weak performances दिलेच आहेत , मुस्सर्रत ने ही दिले आहेत पण जे काही solid performance दिले आहेत ते मात्र winner ला शोभेल असे होते , अर्थात हे माझं मत:-)

बाकी मला तर वाटलं कि पाकिस्तानी आहे म्हणून त्याला लवकर घालवलं ,final मधे दोन पाकिस्तानी आणि राजा हे झी ला किंवा कुठल्याही भारतत होणार्या finals मधे शक्य झालं नसतं कदाचित . :-)
अभिजित कोसंबी चा आवाज चांगला आहे पण अगदीच avg performances दिले त्याने .
शेवटी eliminate होतानाचं ' प्रेयसी,' छान च गायला पण !
Anyways, पण इतके सगळे great singers स्पर्धेत असताना तीन चार avg performances महागात पडले त्यात काही नवल नाही , त्यातून अभिजित उशीरा आला स्पर्धेत , त्याचे तसे fan following तयार झाले नसेल इतक्या कमी वेळात .
अभिजित ला stage presence नव्हते हे ही खरेच , पण ते तर सुमेधा - मौली - राजा - जुनैद सोडून कोणा कडेच नाहीये , जर तितका extra ordinary गायला असता तर नक्की टिकला असता अभिजित .
पण खूपच साधा होता बिचारा , eliminate होताना सुध्दा किती polite होता , dignity दाखवून दिली त्यानी .
Btw, चिन्या
तू कुठे यावस कुठे नाही ते सांगणारी मी कोण :-)
मी फ़क्त तुला सांगितलं कि माझ्या choice वर personal remark मारण्या पेक्षा तुझ्या favorites विषयी लिही .


Amol_amol
Friday, October 12, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत गायक??? मराठीत कसा काय जिंकला कोण जाणे...

Pallavi_pune
Friday, October 12, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येस्स्स्स्स्स्स्स्स्स
उद्या फ़ीईनल


Z war ratri 8 la repeat pan ahe ani sakali 10-30 la live ahe.

Tanya
Friday, October 12, 2007 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks दिपांजली. मस्त बीबी आहे, इतके दिवस लक्षच गेल नाही :-(
माझे फ़ेव. १)अमानत २) राजा ३) ओनिक (असच तो हिमेश नाकात म्हणतो.)

पण झींच देशप्रेम असेल तर राजा किंवा औनिक प्रथम येतील.

फ़ेव जज: विशाल शेखर. उगाच त्या हिमेश किंवा हिमेशचमच इस्माईल प्रमाणे biasd decisions नाही. उलट सगळ्याच contestant मस्त cheerup करतात.

त्या हिमेशने एवढा पकवला आहे तो शो, एकसारखी फालतु बडबड. त्यात त्याच औनिकप्रेम, as if बाकीचे गायक

मिकाने अमनतकडुन माईक ओढुन म्हंटलेल गाण इथे दाखवल नाही :-(


Manuswini
Friday, October 12, 2007 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर विशाल शेखर कडून जी sensibility वागण्यात,बोलण्यात दिसते ती जरा बाकिच्यांने उचलली तर बरे.


Gajanandesai
Saturday, October 13, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.loksatta.com/daily/20071013/ch01.htm
.... .... ....

Kedarjoshi
Saturday, October 13, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरतर मलाही पुनमच जास्त आवडायची. तिच्यात जबरदस्त एनर्जी होती. आशा भोसले, जसराजजी सारख्या दिग्गजानी तिला शाबासकी दिलीय, अशी शाबासकी माझ्यामते कोणालाही मीळाली नाही. राजाला पण नाही. ति गेल्या मलाही वाईट वाटले. लता व जसबिंदर नरुला चा आवाज तिला खरच सुट होत होता.
लता ही म ला सा मानते व त्यावर गाते माझ्या मते पुनम मध्ये तशी एनर्जी आहे ती ते सहज गत्या गाउ शकते हे कुहु कुहु अन वंदे मातरम वरन सिध्द होत. आज परत एकदा तिच वंदे मातरम ऐकायला मिळनार बहुतेक.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators