Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अचाट आणि अतर्क्य गाणी अथवा चाली... ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » अचाट आणि अतर्क्य गाणी अथवा चाली... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 15, 200720 10-15-07  5:47 am
Archive through October 17, 200720 10-17-07  9:29 am
Archive through October 19, 200720 10-19-07  6:22 pm

Ajjuka
Saturday, October 20, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच ऐकलेलं ताजं ताजं..
बढते चलो रे माताके मंदीरमे
बढते.. चलो बढते.. चलो बढते.. चलो हाय हाय हाय
बढते चलो रे...
जय मातादी..

ओळखा..

हिंट आहे..
बढते.. चलो बढते.. चलो बढते.. चलो हाय हाय हाय
ही ओळ..


Kanak27
Monday, October 22, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१० दिवसाचा त्रास संपला. आमच्या घराच्या जवळच देविच मन्दिर आहे. सकाळि ४ ते रात्रि १२ अशिच भन्नाट गाणी काल तर अमुक अमुक माणसाने १० रु. दिले, अमुक अमुक ने १००रु अस दिवस भर चालु होत.


Ajjuka
Monday, October 22, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथलाही त्रास संपला एकदाचा..
दिवसरात्र गाणी नाहीतर कसल्या कसल्या पूजा घालत होते लोक. पूजा सांगणारे गुरूजी अत्यंत ठार चुकीचं पठण, mike वरून रेड्याच्या आवाजात रेकत होते. (ज्ञानेश्वरांच्या रेड्यानंतर हेच बहुधा..)

अरे पण वरचं गाणं नाही ओळखलं कुणी...


Tiu
Monday, October 22, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका...कुठलं गाणं आहे ते? काही ध्यानामंदी नाय येउन राह्यलं!

सकाळपासुन तीच ओळ म्हणुन बघतोय सारखी...वेगवेगळ्या चाली लावुन!


Yogesh_damle
Monday, October 22, 2007 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधनाची बुगडी सांडलीय त्या गाण्यात!!

Prajaktad
Monday, October 22, 2007 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधनाची बुगडी सांडलीय त्या गाण्यात!! >>>


झुमका गिरा रे बरेली के बाजार मे!

Tiu
Monday, October 22, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधनाची बुगडी सांडलीय त्या गाण्यात!!


अरेरे!!! इतकं सोप्पं होतं का? ;-)
स्वप्या अरे जीव दे लेका! :-)


Ajjuka
Tuesday, October 23, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योडा आणि प्राजक्ता,
एकदम बरोब्बर!!
जाउदे टिउ तू पुढच्या वर्षीपर्यंत प्रॅक्टीस कर. पुढच्या वर्षी पण आम्ही याच ऑफिसमधे आहोत आणि हे देऊळही तिथेच असणारे..


Aashu29
Saturday, January 12, 2008 - 10:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मराठी सिरिअल यायचि पूर्वी hello inspector त्याचे टायटल होते रात्रंदिनी संरक्षणी पोलिस हा वगेरे
आणि आत आलेल्या डॉनमधले आजकी रात होना है जो ची चाल अगदी सेम वाटते, त्यावरुनहि घेतली असावी.
ऐकलय का कुणि?

Mi_anu
Monday, January 14, 2008 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते गाणं असं...
हलो हलो हलो...इन्स्पेक्टर..इन्स्पेक्टर..
रात्रंदिनी.. हो हो हो संरक्षणी..
पोलीस हा.. हो हो हो पोलीस हा..
सुरक्षित देशाशी जागरुक हा आ आ हो ओ ओ ओ...
हलो हलो हलो...इन्स्पेक्टर..इन्स्पेक्टर..
रमेश भाटकरच्या या आणी कमांडर नावाच्या अशाच एका मालिकेची शीर्षकगीते 'अनेट' नावाची गायिका इंग्रजाळलेल्या आवाजात गात असे हेही आठवते.


Bhidesm
Wednesday, January 23, 2008 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी गणेशोत्सवाच्या सुमारास गणपतीवरील मराठी गाण्यांच्या कॅसेट यायच्या. त्यात बरीचशी गाणी शांताराम नांदगावकर यांनी लिहीलेली होती व ती सर्व गाणी त्यावेळच्या सिनेमातील गाण्यांच्या चालीवर होती.
अशीच दुसरी आठवण मी दादरला काकूकडे राहिलो असतानाची. समोरच जैन मंदिर होते. सकाळी उठल्यावर एवढ्या मोठ्या आवाजात सिनेमातील गाणी कोणी लावली असे मी काकूला विचारले. ती म्हणाली, नीट ऐक. ती जैनांची भजने आहेत. सिनेसंगीताच्या चालीवर भजने तेव्हा पहिल्यांदा ऐकली होती.


Sanghamitra
Wednesday, January 23, 2008 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशी सिनेमाच्या गाण्यांच्या चालीतली देवाची गाणी ही फ्याशन सगळीकडेच आहे.
मी ती जोतीबाला पण ऐकलीयत.
(तेंव्हा काला कौआ काट खायेगा असे एक चीप गाणे होते त्याच्या चालीवर शंकराचे गाणे ऐकले होते.)
आणि बापूभक्तांच्या घरी पण.
(वंदे मातरम च्या चालीवर मेरा बापू अनिरुद्धा असे काहीसे.)
जैन गाणी पण ऐकलीयत.
शेवटी मासेस ना आवडते ते खपते. आणि त्यांना सहज समजते म्हणून सिनेमाची गाणी. शेवटी देवातही गरीब श्रीमंत असते म्हटल्यावर आवडनिवड आणि पॉप्युलॅरिटी पण महत्वाची असणार ना. भक्ताच्या हातात देवाचे भाग्य. :-)


Yogesh_damle
Thursday, January 24, 2008 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"दिल्-ए-बरबाद से निकला नहीं है अबतक कोई,
इक लुटे घर पे दिया करता है 'दत्तक' कोई!!"

:-)


Mitraa
Thursday, February 07, 2008 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दत्तक? ...
दस्तक असेल ते.


Yogesh_damle
Saturday, February 09, 2008 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहितेय गं मित्रा!! तीच तर गम्मत आहे!! :P

Rajya
Tuesday, February 12, 2008 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ऐकलेलं एक गाणं

चाँद को तोड दुंगा
सुरज को मोड दुंगा
अगर तु हा कर दे
तो पहलीवाली छोड दुंगा


Tiu
Tuesday, February 12, 2008 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात एक अतिशय सुंदर गाणं अजुन कुणीच कसं टाकलं नाही!

टेलिफोन धुनमे हसने वाली,
मेलबोर्न मछली मचलने वाली,
डिजिटल सुर है तराशा,
मडोना है या नताशा,
झाकिर हुसेनका तबला तु है क्या?
सोना सोना सेल्युलर फोन तुम तो हो ना,
कॉम्प्युटरको लेकर ब्रहमा ने रचाया क्या,

पुढे पुढे तर गीतकाराच्या कल्पनाशक्तीने फारच भरारी घेतलीये...बघा...म्हणजे वाचा!

तो: नाम तेरा किसी को लेने नहि दुंगा, वो सुख भी नही दुंगा,
ती: मेरे अलावा किसी औरत को ना पास बुलाना,
तुम कभी भी mother teresa को छोड के नाम ना लेना,
तो: तेरी गलियोमे कोई मर्द ना छोडुंगा, औरत भी ना छोडुंगा

तो आणि ती असे बराच वेळ एकमेकांशी प्रेमानी भांडतात...कधी वेळ मिळाला तर ऐका नक्की...

अरे याला म्हणतात प्रतीभा! लोक उगीच जावेद अख्तर आणि गुलजारचं कौतुक करत असतात!
या तोडीचं एक गाणं तरी लिहिलंय का त्यांनी कधी???


Mi_anu
Wednesday, February 13, 2008 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच चित्रपटातले माया मच्छिंदर मुझपे मंतर मत करना हे अगम्य आणि गूढरम्य गाणेही ऐकण्यासारखे आहे.
ए आर रहमान ची गाणी आणि ती गाणी असलेले चित्रपट मूळ तमिळ इ. मधून हिंदीत डब केलेले असल्याने आधी गाणी बनलेली असतात तमिळ मधे, त्यात हिंदीतले शब्द वृत्तात चपखल बसतील असे कोंबण्याच्या नादात हा असला गोपालकाला बनत असावा.


Dakshina
Wednesday, February 13, 2008 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा हा काला बनवून झाला की रेहमान कुणालातरी तो गायला सांगतो...
आणि गायकाला जमलं नाही की स्वतः गातो.

तुम्ही अनुभवलय की नाही महीत नाही, पण रेहमानच्या ८०% गाण्याचे बोल सहजासहजी कळत नाहीत.


Ballalsachin
Wednesday, February 13, 2008 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्ताफ़ राजा नावाचा एक प्राणी एकेकाळी खुप गाजला (आणी वाजला) होता. त्याचे सगळेच शेर ऐकुन खुप जोरजोरात हसायचो आम्ही मित्र.

इस शहरे-नामुराद की ईज्जत करेगा कौन
अरे हम भी चले गये तो मोहोब्बत करेगा कौन..
घर की देखभाल को विरानियां तो हों,
जाले हटा दीये तो हिफ़ाज़त करेगा कौन.

असं काहीतरी असायचं.

आणी एक..
वोह बर्फ़ पे चलते हैं, हम आग मे जलते हैं..
...
...
छत पर न सुला देना, हम नींद मे चलते हैं


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators