|
Zakasrao
| |
| Saturday, September 22, 2007 - 7:57 am: |
| 
|
अरे हो. चुकुन मी त्या पछाडलेला विषयीच लिहिल. फ़ारेंद हो रे. तोच पण त्याच नाव "पछाडलेला" आहे. खबरदार हा निर्मिती सावंत, भरत जाधव आणि संजय नार्वेकर ह्यांची भुमिका असलेला आहे. DJ तु म्हणतेस तोच हा चित्रपट. खबरदार नाही पाहिला अजुन.
|
Amruta
| |
| Monday, September 24, 2007 - 6:50 pm: |
| 
|
होय तोच तो, तेच मी वाचताना विचार करत होते, लक्ष्या फ़क्त खबरदार सुरु होतो तेव्हा फोटोत दिसलाय.. जर लक्ष्या असता तर संजय नार्वेकरचा रोल लक्ष्याच होता. झकासराव पहाच खबरदार, पछाडलेला पेक्षा बरा आहे जरा.
|
Maanus
| |
| Monday, October 01, 2007 - 3:05 am: |
| 
|
आज planet terror नावाचा एक अचाट करुन टाकनारा चित्रपट पाहीला. चित्रपटाला लॉजीक असे काहीच नाही. ७० च्या दशकात आलेल्या sci-fi zombie attack movies सारखा चित्रपट 2007 मधे काढलाय. एका रात्रीची story . texas मधे अचानक खुप सारे zombies येतात आणि मग काही लोक त्यातुन कसे वाचतात. त्यातली हिरोईन म्हणजे रजनीकांत ला मागे टाकणारी आहे. तिचा एक पाय zombies खातात, मग हिरो तिच्या पायाला मशिनगन बांधतो, खोट्या पाया substitute म्हणुन आणि ती त्याचा उपयोग चालायला आणि zombies ला मारायला करते. त्यातला एक अफाट सीन म्हणजे, तिला एका भिंती पलीकडे जायचे असते, तर काय करावे तिने? चालता चालता त्या खोट्या पायातुन ती जमीनीवर गोळ्या मारते, ज्यामुळे rocket effect तयार होऊन तीला भिंती पलीकडे उडी मारता येते. मग हवेत असतानाच ती अजुन काही गोळ्या मारते, ज्यामुळे तिथे असलेले zombies मरतात... हे त्या चित्रपटाचे पोस्टर पहा, त्या हिरोईन ची कल्पना येईल poster
|
Maanus
| |
| Monday, October 01, 2007 - 3:16 am: |
| 
|
धमाल पाहीला. dude, where's my car? एक जुना मिथुन चा बॉन्डपट, मालामाल विकली, आणि जुने पुराने जोक वापरुन काढलेले चित्रपट. सगळी भेसळ असली तरी बघायला हलकाफुलका आहे.
|
जॉनी गद्दार.. चांगल्यापैकी स्लीक, उत्तम हाताळलेला पिक्चर.. महान वगैरे नाही.. पन टोरेंटीनो स्टाइल सिनेमे हिंदी मध्ये येत आहेत हे छानच.. सिनेमा हॉलच्या बाहेर पिक्चर संपल्यावर एका मुला-मुलींच्या ग्रुप मध्ये झालेला हा संवाद्: मुलगी क्र. १ व २: क्या बोअर मूव्ही थी यार.. एकदम बकवास मुलगा: अबे अगर इसी मूव्ही में शाहरुख या अभिशेक नाचता ना तो तुम लोगोंको ये अच्छी लगती..
|
काल नन्हे जैसलमेर पाहिला. खूप दिवसानी एक "भोळाभाबडा" पिक्चर पाहिला. एका दहावर्षाच्या मुलाचं हीरो प्रेम आणी त्याला तो भेटल्यावर काय होतं असा आशय. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दिग्दर्शक "ही लहान मुलाच्या POV ने सांगितलेली कथा आहे" याचं शेवटपर्यंत भान ठेवतो. बर्याचा फ़िल्मी लाईन्स घुसडल्या असल्या तरी पिक्चर फ़िल्मी होत नाही. मला आवडलेली बाब म्हणजे नन्हेचं काम करणारा द्विज. काय काम केलय या मुलाने. जबरदस्त. त्याच्यासमोर बॉबी पण फ़िका पडतो. (तसा बॉबी लाकडी कपाटासमोर पण फ़िका पडतो. ) प्रतिक्षा लोणकर आणी नन्हेची मोठी बहीण इतक्या खर्याखुर्या वाटतात. मधेच हिमेशची एक दोन गाणी येतात. त्याचा वैताग येतो. पण आयटेम अजिबात नाही. समीर कर्णिकने क्यु हो गया ना? मधे हात चांगलेच भाजून घेतले आहेत. त्यामुळे आता त्याने स्टार कास्टपेक्षा content वर मेहनत घेतली आहे. याच पिक्चरमधे बॉबी ऐवजी आधी सलमान खान होता. विवेक ऍश प्रकरणामधे समीर कार्णिकचा बराच "हातभार" असल्याची खबर होती. त्यामुळे सलमान त्याच्याबरोबर काम करणार हे ऐकून बर्याच जणाच्या भुवया उंचावल्या होत्या. दुर्दैवाने सलमानचं काळवीट प्रकरण आडवं आलं आणि रोल बॉबीला मिळाला. पण सलमान त्या रोलमधे (अर्थात सलमान खानच्या) खूप शोभला असता. पिक्चर खूपच प्रेडिक्टेबल आहे. पण नन्हेचं जग खूपच सुंदर साकारण्यात आलेलं आहे. लहान वयात घरची जबाबदारी उचलणारा कर्ता पुरुष आनी रात्रशाळेत जाणार नाही म्हणून रडणारा इतका फ़रक त्याच्या कामातून जाणवतो. फ़क्त त्या नन्हेच्या कामासाठी एकदा बघायला हरकत नाही.
|
Sampadak
| |
| Monday, October 01, 2007 - 11:06 am: |
| 
|
नमस्कार मित्रहो, आपल्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायचे लक्षात आहे ना? कथा, कविता, ललित, विनोदी, रांगोळ्या, चित्र, छायाचित्र- सर्व प्रकारच्या साहित्याचे स्वागत आहे. तुम्ही लिहा, तुमच्या अन्य मायबोलीकर मित्रमैत्रिणींनाही सांगा. नवीन मायबोलीत साहित्य पाठवायच्या लिंक्स तयार आहेत. तुमच्या साहित्याची वाट पहात आहोत. साहित्य पाठवायचे नियम व सूचना तुम्हाला इथे सापडतील /hitguj/messages/34/131137.html?1191068395 संपादक मंडळ तुम्हाला सर्व प्रकारची मदत करायला तत्पर आहेच. साहित्य पाठवायची तारीख आहे २४ ऑक्टोबर... तेव्हा त्वरा करा..
|
Sashal
| |
| Monday, October 01, 2007 - 5:44 pm: |
| 
|
'चक दे' बघितला .. चांगला आहे पण तरिही .. कबीर खान स्वतःला prove करण्यासाठी women's hockey team चा coach का बनतो आणि ते सुध्दा सात वर्षांनी हे एक कोडं वाटलं .. म्हणजे story कबीर ची हॉकी बद्दलची पॅशन दाखवताना मार खाते असं वाटलं .. आणि शेवटी world cup जिंकल्यावर नेहमीचा रडणारा शाहरुख दिसलाच .. हे सोडल्यास अगदी छानच आहे पिक्चर, खूप आवडला ..
|
Manuswini
| |
| Monday, October 01, 2007 - 9:18 pm: |
| 
|
ढोल : tp आहे एकदम. खुप काही छान नाही पण त्या रद्दड धमाल पेक्षा बरा. आता ओम शांती ओम बघायचाय. कीती ती Advertising होती सारे ग म पा मध्ये. हिमेश तर इतका funny वाटतो ना मिनीटाला एकाची लाल करेल दुसर्या मिनीटाला खाली परत लाल. बहुधा स्वताःचे दिवस खराब आले तर काम मिळेल म्हणोन तो कधी विशालची,कधी शेखरची तर कधी इस्माईलची. असो, विषयांतर झाले.
|
Sunidhee
| |
| Monday, October 01, 2007 - 9:40 pm: |
| 
|
मनस्विनि, सेम, मला पण ओम्** पहायचाय. मात्र मला दिपीका खुप सुंदर वाटली आणि खुप आवडली. 'सावरीया' मात्र काय असेल की. अनिल कपुर ची मुलगी रुपवान नाही. आता वडिलांचा वारसा आहे का पाहु तिच्यात.
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 02, 2007 - 1:53 pm: |
| 
|
नो स्मोकिंगच्या प्रोमोज मधे जे गाणे दाखवतात. ( लाल काळ्या ड्रेसमधले, ती बाई कोण ते मला ओळखता आले नाही ) थेट शिकागो सिनेमामधल्या, कॅथरीनच्या एका गाण्याची कॉपी आहे.
|
झुम बराबर झुम पाहिला. रद्दडपणाची हद्द आहे पिक्चर म्हणजे. आणि सारख सारख काय 'झूम बराबर झुम'???अरे बाबांनो दुसर गाण लिहा की!!!
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 03, 2007 - 4:33 pm: |
| 
|
काल मंगळवारी रात्री ८ ते १०, डिस्कव्हरी चॅनल वर MAN VS. WILD नावाचा अप्रतिम कार्यक्रम दाखवला. अपुर्या साधनानिशी जर आपण एकाकी जागी अडकलो तर जवळच्या वस्तीपर्यंत कसे पोचावे वा मदत कशी मिळवावी, आणि त्या अवधीत स्वतःचा जीव कसा वाचवावा यावर तो कार्यक्रम होता. त्या भागात अलास्का मधील एका शिखरावरुन समुद्रापर्यंत आणि उताह प्रांतातल्या अतिउष्ण वाळवंटातुन एका वस्तीकडे प्रवास दाखवला होता. त्या तसल्या ठिकाणी पाणी कसे मिळवावे, अन्न कसे शोधावे, निवारा कुठे घ्यावा, दिशा कश्या ओळखाव्यात, अश्या अनेक गोष्टींचे मार्गदर्शन होते. यात केवळ एकच सर्व्हायव्हल एक्स्पर्ट होता. पण जे काहि दाखवत होते ते सिनेमापेक्षाही उत्कंठावर्धक होते. हा एक टिव्ही वरचा प्रोग्रॅम आहे, त्यामुळे त्याच्या सोबतीला दिग्दर्शक, कॅमेरा क्रु असणार याची कल्पना असुनदेखील, ते विसरायला होत होते. सर्व चित्रण प्रत्यक्ष प्रसंगाचेच असावे असे वाटत होते. त्या माणसाचा अभिनय, हा अभिनय वाटु नये इतका अस्सल होता. एरवी अप्रतिम निसर्गदृश्ये म्हणुन आपण ज्याची संभावना केली असती, तसली ठिकाणे जगण्यासाठी किती संघर्ष करायला भाग पाडतात याची कल्पना येत होती. त्या माणसाकडे एक पाण्याची बाटली, एक चाकु आणि चकमक एवढेच होते. हि एक सिरीज आहे, पुढच्या मंगळवारी रात्री आठ वाजता, बघायला विसरु नका.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 04, 2007 - 3:53 am: |
| 
|
तमाम नागपट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. झी वर लवकरच इच्छाधारी नागिणीची सिरियल येतेय. निळ्या निळ्या नागिणबाईंची पोस्टरं सगळ्या स्टेशनवर लागलीत.
|
Dhumketu
| |
| Thursday, October 04, 2007 - 4:57 am: |
| 
|
झालेला भाग कुठे पाहता येईल? मी आत्ताच साईटवर जाऊन पाहतो...
|
Dineshvs
| |
| Friday, October 05, 2007 - 5:42 am: |
| 
|
http://dsc.discovery.com/fansites/manvswild/manvswild.html धुमकेतु, इथे पहा.
|
Mrinmayee
| |
| Friday, October 05, 2007 - 2:43 pm: |
| 
|
काल राजश्री डॉट कॉम वर (चकटफ़ु) 'भेजा फ़्राय' बघीतला. दीड तासाचा, हलका फुलका मस्त चित्रपट! बर्याच वर्षांनी सारीका दिसली स्क्रीनवर. स्मार्ट दिसतेय. काम बरं केलय.
|
Disha013
| |
| Friday, October 05, 2007 - 4:56 pm: |
| 
|
पार्टनर कसला डब्बा मुवी आहे........ अजिबात आवडला नाही. नुसता आचरटपणा. गोविंदा अजागळ दिसतो आता. सलमान झोपेतुन उठल्यासारखा दिसतो पुर्ण पिक्चरभर. काय ती कल्लुछाप गाणीनि डान्स! एक मुलगी आवडणे आणि तिला पटवणे या थीमवर किती वेळा पिक्चर निघणार आहे देव जाणे! कंटाळा आलाय त्या प्रकारचा!
|
Dineshvs
| |
| Saturday, October 06, 2007 - 5:12 am: |
| 
|
धुमकेतु, काल शुक्रवारी रात्री ११ वाजता हा कार्यक्रम परत दाखवला. अर्थातच मी तो परत बघितला.
|
Dhumketu
| |
| Monday, October 08, 2007 - 5:47 am: |
| 
|
हो मी पण पाहीला..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|