|
Psg
| |
| Monday, October 08, 2007 - 6:39 am: |
| 
|
(आठवणीतला) पहिला मार! मी लहान असताना आम्ही वाड्यात रहायचो. घरासमोर मोठं अंगण होतं. उन्हाळ्याची सुट्टी होती. आईने भर सकाळी अंगणात साबूदाण्याच्या पापड्या आणि बटाट्याचा कीस असं वाळवण नुकतच घातलं होतं आणि वाड्यातल्या सगळ्या मुलांनाही बजावलं होतं 'इथे यायचं नाही, तुम्हाला जो काय दंगा करायचाय तो लांब करा..' हे सांगून कशीबशी १०च मिनिटं झाली असतील आणि मी जोऽऽऽऽरात धावत आले आणि साबूदाण्याच्या पापड्यांवर सपशेल आडवी.. आणि घसरत पलिकडच्या कीसावरही! वाड्यातली मुलं फ़िदीफ़िदी हसत होती.. त्यांच्यासमोरच त्या बरबटल्या अवस्थेत आईचे जोरदार फ़टके मिळाले होते!
|
Badbadi
| |
| Monday, October 08, 2007 - 1:55 pm: |
| 
|
खि खि खि पूनम पण इथे चर्चा कुठल्या 'किस'ची...तू लिहितेस कुठल्या 'किसा'बद्दल!!! 
|
Amruta
| |
| Tuesday, October 09, 2007 - 4:46 pm: |
| 
|
पहिला विमान प्रवास: विमानात बसायची एके काळी काय प्रचंड इच्छा होती माझी. कधी बसायला मिळेल? वरुन सगळ कस दिसत असेल? ढग कसे दिसतील? हवाई सुंदर्या (आता कळ्ळ कि त्या उंदर्या असतात.) कश्या वागत असतील? अश्या हजारो उत्सुकता होत्या. तर पहिला विमान प्रवास घडला तो direct India to USA सुरवातीला जाम मजा आली. आणि बरोबर किरण असल्याने तर खुपच पण तो प्रवास मेला संपेचना... त्यात आणखिन connecting flight cancel झाल.. अजुन उशिर.... अस करता करता मुक्कामाला पोहचायला चांगले २५ तास लागले. आणि ह्या पहिल्या प्रवासानंतर माझी विमानात बसायची हौस पुरेपुर फिटली.
|
Farend
| |
| Tuesday, October 09, 2007 - 5:51 pm: |
| 
|
अमृता, आम्ही २५ तासांत पोहोचलो तर काय लौकर आलो असे वाटते आम्हाला, तुमची मजा आहे
|
Amruta
| |
| Tuesday, October 09, 2007 - 6:18 pm: |
| 
|
२५ नाही रे ३० लागलेले. आत्ताच किरण जेवायला घरी आला तेव्हा म्हणाला (ह्या वेळी मला delta direct flight ने फ़क्त १६ तास लागले. काय रे फ़ारएनडा तु कुठे इतक्या far end ला राहातोस?)
|
Farend
| |
| Tuesday, October 09, 2007 - 6:58 pm: |
| 
|
सॅन फ्रान्सिको जवळ, म्हणजे पृथ्वीवर भारतापासून जितक्या लांब राहता येणे शक्य आहे तितक्या लांब . कोरियन किंवा लुफ्तांसा २०-२१ तासात नेतात आम्हाला, पण सिंगापूर सुमारे ३२ तास!
|
Ajjuka
| |
| Tuesday, October 09, 2007 - 7:27 pm: |
| 
|
अगं वहिनी आका अमृता, पहिल्या किसाबद्दल लिहिलंय की मी अर्कायव्हात वाच बरं...
|
US मधे पहिल्यांदा COP ने थांबवले तो अनुभव भारतात अनेक पोलिसांनी अनेकदा थांबवलय आणि त्यांच्या हातावर पैसे टेकवून किती तरी वेळा निसटलेय , पण US मधे हे शक्य नसते ना , म्हणून अजुन पर्यंत tkt मिळालं नसलं तरी COP ची उगीचच भीती , अगदी opposite traffic direction मधून एखाद्या COP ची गाडी चालली असली तरी माझ्याच मागे येणार असं वाटतं ! असो , तर त्या दिवशी एका पावसाळी संध्याकाळी मी नवर्याला bart station वर pick up करायला चालले होते , सहज mirror मधे पाहिले तर पोलिस मामाचे रंगीबेरंगी lights!! ते पाहून इतकी गडबड उडाली कि आपण नक्की काय केलय म्हणून हा मागे येतोय , त्या नादात shoulder lane पण सापडेना , शेवटी civic centere च्या Benton Market complex च्या parking मधे गाडी थांबवली . गाडी थांबवून आणि window open करून त्याची वाट पहात बसले . आधी त्या officer नी लगेच गाडी shoulder lane मधे न थांबवल्या बद्दल soffisticated शब्दात समज दिली तो officer इतका handsome-well built होता कि भीती क्षणात गायब झाली माझी पण पुढच्याच क्षणी भानावर आले कारण अजुन पीडा टळली नव्हती ! त्यानी मलाच विचारले कशा साठी थांबवलय त्याचा guess कर म्हणून मी नुसतीच भंजाळल्या सारखी त्याच्या तोंडा कडे पहात बसले , स्पीड वगैरे तर व्यवस्थीत होता , शिवाय wipers पण चालु केले होते , त्यामुळे मी जाम confused ! शेवटी त्यानेच सांगितले head lights आधी ON कर म्हणून ! मी ok म्हणले आणि त्यानी मागितले नसताना उगेचच driver's licence त्याच्या पुढे केले ! तो म्हणला 'OK' म्हणलीस तर आधी lights लाव मग licence दाखव ! तर मी चुकून wipers च ON केले शेवटी त्याने licence पाहिलेच , म्हंटला, Looks like u really have one, but please learn to put lights on first. मनात म्हणला असेल कोणी मूर्खाने हिला licence दिलं ! शेवटी एकदाचे दाखवले त्याला दिवे लाउन !! मग म्हणला , No tkt for u, no fine, but drive safe and start using head lights! असे म्हणून गे ssss ला एकदाचा !! मला एक कोडं उमगलं नाही खूप मुलीं कडून ऐकलं होतं कि अमेरिकन पोलिसां कडून लवकर सुटका करून घेण्या साठी मुली रडायचे वगैरे नाटक करतात ... पण इतक्या handsome cops ना पाहून रडु येतच कसं !!!! * I hope मी त्याला पाहून पहा sssss तच बसले हे त्या COP ला कळले नसावे !
|
US मधले cop मस्त असतातच पण, त्याहूनही female cops जास्त छान वाटतात त्यांच्या त्या गॅजेट्स लावलेल्या युनिफ़ॉर्म मधे. गेल्या महिन्यात रात्री १२ च्या सुमारास मला अशाच एका सॉलीड पोलीशीणीने ऑरेंज लाईटवर कार पुढे नेली म्हणुन पकडून उगाच लेक्चर देऊन सोडून दिलं होतं
|
Asami
| |
| Tuesday, October 09, 2007 - 9:57 pm: |
| 
|
तर पहिला विमान प्रवास घडला तो direct India to USA सुरवातीला जाम मजा आली. आणि बरोबर किरण असल्याने तर खुपच >> म्हणजे किरण पहिल्यांदा बरोबर असल्याने मजा आली असे का म्हणतेयस मामी
|
Savyasachi
| |
| Wednesday, October 10, 2007 - 12:12 am: |
| 
|
पोहणे हा माझा सगळ्यात आवडता छंद पाण्याने भरलेला तलाव दिसला की सूर मारायचा असा खाक्या. तर ५ ६ वर्षाचा असताना बहिणीने पोहायला शिकवायला सुरवात केली. तिसर्या दिवशी तिने मला खोल पाण्यात नेले आणि सरळ हात सोडून देऊन ५ ६ फुटांवर जाऊन थांबली. तेंव्हा ब्रह्मांड आठवले होते. वेड्यासारखा हात पाय मारत होतो. ते ५ फ़ूट जाऊन तिचे हात पकडायला जेंव्हा जमले तेंव्हा झालेला आनंद खरच गगनात मावेनासा होता. मग पुढे माझा मीच सूर शिकायचे ठरवले. ६ ७ फ़ूट उंच खांब होता. त्यावर उभा राहीलो. पायाने जोरात रेटा देऊन उडी मारायची आणि खाली डोके वर पाय अस करायच याची उजळणी केली होती मनात. पण ऐन वेळेला उडी मारल्यावर घाबरून हवेतल्या हवेत पुन्हा सरळ होण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे आडवा झालो आणि तसाच पाण्यावर आपटलो. संपूर्ण छाती लाल लाल झाली होती. भीषण मार बसला होता. म्हणून मग बाहेर काठावर येऊन पालथा पडून होतो अर्धा तास. जो विचारेल त्याला सूर्यस्नान करतो आहे अस सांगत होतो. फार लागल्यानेच की काय, असे आपटणे परवडणार नाही म्हणून दुसरा सूर एकदम बरोबर बसला. लाईफ बन गयी
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|