|
Shyamli
| |
| Friday, August 10, 2007 - 3:10 pm: |
| 
|
अनु जबरीच आहे हे गाण (त्या मौलीच्या आवाजात ऐकायला मस्त वाटेल ) योगेश अरे पुरे पुरे........... काहिही 
|
Dakshina
| |
| Tuesday, August 14, 2007 - 8:47 am: |
| 
|
आज सकाळीच रेडिओ मिर्चीवर 'कल हो ना हो' मधलं सोणी सोणी आजा माहीवे.... हे गाणं ऐकत होते तेव्हा मला ते गाणं नीट कळलं. पुर्वी मी 40-20-6 सोणी सोणी.. असं ऐकायची... म्हटलं की 40-20-6 ही काय भानगड आहे? मग विचार केला असेल, कहीतरी sign अपण नाही का लहान मुलांना सांगत की 'मी साडे - माडे, तीन म्हणलं की मगच उडी मारायची बर का..' तसं हा गायक यानं 40-20-6 म्हणलं की मग मागच्यांनी 'सोणी सोणी' म्हणायचं
|
Zakki
| |
| Tuesday, August 14, 2007 - 6:11 pm: |
| 
|
मग ते नक्की काय आहे?
|
Tiu
| |
| Tuesday, August 14, 2007 - 11:54 pm: |
| 
|
मग ते नक्की काय आहे? every body sing, soni, soni, aaja mahi ve... every (40) body (20) sing (6)!!!
|
Anjut
| |
| Wednesday, August 15, 2007 - 5:20 am: |
| 
|
पुर्वी एक गाण होत अपनी कहानी छोड जा कुछ तो निशानी छोड जा ............मौसम बीता जाय ते मी ऐकायचे मोसम्बी ताजा है
|
Rajya
| |
| Friday, August 24, 2007 - 10:07 am: |
| 
|
एक गाणं आहे आऽऽऽऽऽऽ जुन से पहली मुलाकात होगी फिर होगा क्या, क्या पता, क्या खबर मला नेहमी प्रश्न पडायचा जुन महीन्याच्या आधी यांची मुलाकात होणार आहे तर हे साहेब कुठल्या महीन्यात गाणं म्हणत असतील? नंतर कळलं ते आज उनसे पहली मुलाकात होगी असं आहे.
|
Ana_meera
| |
| Saturday, August 25, 2007 - 11:01 am: |
| 
|
युं हसरतों के दाग मुहोबत से छीन लिए खुद दिलसे दिलकी बात करी और रो लिएSSSSS nantar kaLle kee te muhobat me Dho liye aahe!!!!
|
Zakasrao
| |
| Monday, August 27, 2007 - 4:34 am: |
| 
|
काशी, काल कुठला तरी अवार्ड चा प्रोग्राम पाहताना गोविंदा आणि सलमान यानी त्या पार्टनर अधल्या गाण्यावर डान्स केला. ते गाण मला आई शप्पत परत तु बोलल्या प्रमाणेच ऐकु आल. तस बायकोला बोललो तर ती प्रचंड हसली आणि मग योग्य शब्द सांगितले तिने. अरे हा त्या गाण्याच्या सुरवातीला जे म्हणतात ना ते "ओ पार्टनर" ते मला वाटत की रस्त्याच्या खाली टाकण्यासाठी ज्या जलवाहिन्या असतात मोठ्या मोठ्या, त्यात तोंड घालुन म्हणलय त्यामुळे तो आवाज तसा घुमुन येत असावा राज्या तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाण म्हणत असेल. म्हणजे कस पगार झालेला असतो, दिल खुश असत वै.....
|
Kashi
| |
| Monday, August 27, 2007 - 8:03 am: |
| 
|
झकस.... चला म्हणजे मीच चुकीचे एकत नाही तर..... हा मी लहान असतांनाचा कीस्सा- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...कर कटावरी ठेवोनीया... हे मी कर्कटा वरी ठेवोनीया.. असे एकायचे...कर्कटक घेवुन सुंदर असणार्याचे 'ध्यान' करतायत असे वाटे...
|
Mahesh_k
| |
| Friday, September 14, 2007 - 12:26 pm: |
| 
|
मी लहान असताना 'लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची' हे गाणे 'लेक लाडकी या घरची, होणार सून मी दहा घरची...' असे ऐकू यायचे.. ;-)
|
123098
| |
| Friday, September 14, 2007 - 8:00 pm: |
| 
|
माझी एक मावसबहीण लहान असताना 'लिखे जो खत तुझे' हे गाणे असे म्हणायची-- लिखे जो खत तुझे वो तेरि याद मे हजारो रंग के नजारे बन गये सबेरा जब हुआ तो फूल बन गये जो रात आयी तो लुटेरे बन गये मी तिला नेहमी सांगायची की ते लुटेरे नाहीये पण ती म्हणायची की छे छे रात्र झाल्यावर लुटेरेच येणार ना. आणि ती बरीच मोठी होइपर्यन्त ते तसेच म्हणायची.
|
Zakki
| |
| Saturday, September 15, 2007 - 1:49 pm: |
| 
|
मी लहानपणी 'हवा सतू' असे ऐकत असल्याने मला प्रशन पडायचा की सतू म्हणजे काय? सतीश ला सतू म्हणतात का? मग कळले की ते 'हवास तू' असे आहे.
|
Manuswini
| |
| Saturday, September 15, 2007 - 6:08 pm: |
| 
|
मला खरे तर अजूनही ह्या गाण्यात गोंधळ होतो नक्की काय कुठे घालायचे ते, कधी कुठे ते, मुझे छू रही है तेरी नर्म सांसे... मग ती म्हणते तेरी गर्म सांसे... मी आलटून पालटून पाहीजे तिथे पाहीजे तेव्हा नर्म, गर्म टाकून म्हणत असायचे. मग थोडेसे डोक लढवून कळले की जवळ आल्यावर सांसे तापणारच ना body heat हो....... मग ती मुलगी नर्म का म्हणते सांसे गर्म असल्यावर? हे गाणे एकताना खरेच गोंधळ होतो......... एकून बघा. एकदा गर्म, एकदा नर्म...........
|
हवा के साथ साथ घटा के संग संग ओ साथी चल या जुन्या गाण्यात पुढे असे आहे- मुझे लेके साथ चल तू यूँ ही दिनरात चल तू संभल मेरे साथ चल तू ले हाथों में हाथ चल तू यातला साथ हा शब्द मला दोन्ही ठिकाणी 'सास' असा ऐकू यायचा. अर्थ अर्थातच लागायचा नाही. इथे आता हिची सासू कुठून आली? पण वाटायचे- काही का असेना.. अरे तुरे करतेय खरी, पण सासूला बरोबर घेऊन, सांभाळून चालतेय, बरी आहे!
|
Chchotu
| |
| Tuesday, September 25, 2007 - 6:04 pm: |
| 
|
मी बरेच दिवस "झाल्या तिन्हिसान्जा" य गान्याचि पुढिल ओळ "करुन शिरा आनी सान्जा" असे म्हणत होतो.
|
Chchotu
| |
| Tuesday, September 25, 2007 - 6:08 pm: |
| 
|
इश्क दी गली विच कोइ कोइ "लन्गडा" म्हनजे काय? प्रेम केल्यावर मार खावुन झाला असेल का "लन्गडा"?
|
Maanus
| |
| Tuesday, September 25, 2007 - 9:51 pm: |
| 
|
दादा कोंडके ला चक्कर यायची. ह्या गाण्यातली नायीका कोण? त्या उषा पेक्षा बरीच (लै) चांगली आहे दिसायला
|
Chchotu
| |
| Wednesday, September 26, 2007 - 4:01 am: |
| 
|
मेरे सामने वाली खिडकी मे....... कुछ उघडा उघडा रहता है. (असे लहानपनी म्हनायचो.)
|
Chchotu
| |
| Thursday, September 27, 2007 - 11:03 am: |
| 
|
मानुस, त्या नायिकेचे नाव अन्जना मुम्ताज असे ऐकले आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, September 27, 2007 - 4:20 pm: |
| 
|
आंधळा मागतो डोळा, सिनेमातली नायिका का ? ती अंजना च होती. पुढे मला वाटतं लग्नानंतर ती मुमताज लावु लागली. मेहमुदच्या पण एका सिनेमात होती ती. बहुदा दो फ़ुल मधे. मग टिपिकल माँच्या भुमिकात दिसु लागली. मैने तेरे लिये रे जग छोडा, तु मुझको छोड चली, हे नागोबागाणे पण तिच्यावरच चित्रीत झालेय. गाणभर ती मेलेली असते, मग शेवटीशेवटी जिवंत होते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|