Shyamli
| |
| Sunday, July 01, 2007 - 1:06 pm: |
| 
|
ट्रकची मागची बाजू वेगवेगळ्या रंग-बिरंगी कथनांनी सजवलेली एका गड्डीच्या मागे लिहिलेले होते ते वाचून ह.ह.मु.वळली.- “देखता क्या है ? मेरा पिछवाडा तेरे पिछवाडे से रंगीन है "
**** म.रा.प.म. च्या एका बसवर “तुम्ही वाहून नेता केळी नी कणसं; आम्ही मात्र लाख मोलाची माणसं !” असे लिहिल्याचे मला आठवते. **** “तितलियॉं रस पिती है, भवरें बदनाम होते है । दुनिया शराब पिती है; ‘डिरायवर‘ बदनाम होते है ।“ **** ह्या blog वरुन साभार http://shabdaankure.wordpress.com/
|
Athak
| |
| Sunday, July 01, 2007 - 3:47 pm: |
| 
|
आज इकडे फिरकलो अन हसुन हसुन .... मस्त बीबी आहे देखो मगर प्यारसे बुरी नजरवाले तेरा मुह काला मै तो चली बाबुलके गाँव
|
Zakasrao
| |
| Monday, July 02, 2007 - 4:06 am: |
| 
|
सगळेच जबरी आहेत. एक तरुणी एका झाडाखाली बसली आहे अस वैश्विक चित्र आणि "कब आओगे" असा डायलॉग. हा प्रकार मी ट्रक वर पाहिलाय. सेम चित्र पण ओळ बदलली "वाट पाहिन पण ST नेच जाइन." कोल्हापुरात एका अतिहुशार आणि क्रियेटिव्ह माणसाणे सेम चित्र काढुन घेतलय त्याच्या ट्रॅक्सवर आणि लिहिलय "वाट पाहिन पण वडापनेच जाइन." वडाप्= कोल्हापुरात जो लोक वाहुन नेण्याचा खाजगी व्यवसाय आहे त्याला वडाप म्हणतात. माझे शब्द कोष मध्ये सापडेल हा शब्द.
|
>> एक तरुणी एका झाडाखाली बसली आहे अस वैश्विक चित्र यावरून आठवले. अगदी पुलंच्या पानवाल्याच्या वर्णनात बसेल असे एक चित्र एका कंपनीच्या कॉंट्रॅक्ट बस मधे लावलेले. पुलाच्या कठड्याला टेकून एक मुग्ध तरुणी उभी. पुलाखालून नदी वाहतेय. तिला प्यारलल रेलवेचा रूळ. त्यावरून रेलवे जातेय धूर सोडत. प्रपोर्शन नावाच्या काही एक पदार्थाचे चित्रकलेत भान ठेवावे लागते याचा पत्ता नाही. रेलवे, नदी आणि कठडा एकाच मापाचे. चित्रातली सगळी जान फक्त ती तरुणी चितारण्यात लावलीय. खाली गालीबला लाजवेल असे काव्य : कितने दिन महिने हमारा इंतेजार करती हो. खुदा भी शरमा जाता है जब तुम श्रींगार करती हो. याच कंपनीची दुसरी बस चित्र बासरीवाला कन्हैया. आणि शेजारी शेर : रहते है दिल्लीमे(बस मुंबईची) खाते है केले. तुम्हारी याद आती है तो सो जाते है अकेले.
|
Orchid
| |
| Monday, July 02, 2007 - 5:07 pm: |
| 
|
मस्त आहे हा बी. बी. एका ट्र्क मागे लिहील होत... मामा ९ टन मामी टनाटन
|
Storvi
| |
| Monday, July 02, 2007 - 8:40 pm: |
| 
|
मी पुण्यात एक scooter पाहिली त्यावर लिहिले होते "right hand drive" 
|
ती नक्कीच लेल्यांची असनार.
|
Yashwant
| |
| Monday, July 23, 2007 - 8:33 am: |
| 
|
आज एका सॅन्ट्रो वर वाचले. एल चा मोठा बोर्ड आणि Thank you for your patience.
|
Dakshina
| |
| Monday, July 23, 2007 - 10:24 am: |
| 
|
परवा पाहीलेल्या एका गाडीवर लिहीलं होतं की "बघतोस काय? मी यांचीच आहे.."
|
Badbadi
| |
| Monday, July 23, 2007 - 12:14 pm: |
| 
|
बाप रे....जबरी बीबी आहे हा!!! ह. ह. पु. वा.
|
Chyayla
| |
| Monday, July 23, 2007 - 2:07 pm: |
| 
|
"बघतोस काय? मी यांचीच आहे.." मामा ९ टन मामी टनाटन तसेच जागा देणे, ओव्हरटेकच्या सम्बम्धातही बरेच वाक्य लिहिलेले आठवतात. "जगह मिलनेपर पास दिया जायेंगा" "जलो मत, बराबरी करो" "मै जिंदगीभर साथ दुंगी, पीकर मत चलाना"
|
Adi787
| |
| Wednesday, July 25, 2007 - 1:45 am: |
| 
|
"बघतोस काय? मी यांचीच आहे.." हे एकदम जबरीच... 
|
महाभारत में मख्खन, रामायण में घी कलयुग में दारू, सोच समझ के पी आणखीन एक ... चलेगी गाडी, उडेगी धूल जलेंगे दुश्मन, खिलेंगे फूल
|
Maudee
| |
| Monday, July 30, 2007 - 11:32 am: |
| 
|
नादच ख़ुळा..... अर्थ काय कोण जाणे
|
Ajai
| |
| Monday, July 30, 2007 - 11:51 am: |
| 
|
येका जुन्या fiat च्या पाठी लिहलेले palio version 1.0
|
माउडी अग नादच खुळा ला कोल्हापूरच्या भाषेत एक वेगळाच अर्थ आहे तिथे असे म्हन्टले जाते "अमूक अमूक च्या नादाला लागू नका लागेल तो खुळा" या सगळ्यासाठी एकत्रित "नाद खुळा" असे वापरले जाते. हा तिथला अगदी सर्रास वापरला जाणारा शब्द आहे.
|
Dakshina
| |
| Tuesday, July 31, 2007 - 8:02 am: |
| 
|
साधारण वर्षभरापुर्वी कोल्हापूरात पाहीलेली रिक्षा. 'नाद खुळा, गणपतीपुळा..'
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 3:32 am: |
| 
|
काल एका रिक्षाच्या मागे बघितले, अशीच जळत राहु दे तुझी, ( आणि पुढे पणतीचे चित्र. )
|
Maanus
| |
| Wednesday, August 08, 2007 - 3:34 am: |
| 
|
धमाल BB आजच मी एका van च्या मधे हे पाहिलेली पाटी W A R N I N G ----------------------- Bandukicha Chitra I don't call 911
|
Hkumar
| |
| Wednesday, August 29, 2007 - 11:12 am: |
| 
|
काही वर्षांपूर्वीचे वाक्य: सौ मे से ९९ बेइमान फ़िर भी...... मेरा भारत महान ( सांगा पाहू तेव्हाचे पन्तप्रधान ! )
|