|
सारेगमप Challenge 2007 आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे . गेले चार पाच महिने रंगलेले हे ,' संगीत का प्रथम विश्वयुध्द ' आणि इतर reality shows मधल्या episodes बद्दल इथे आपली मतं share करा . हे केवळ मनोरंजनाचे program आहेत हे लक्षात असु द्या . कृपया धार्मिक मतभेद , इस्लामी दहशतवाद , हिंसक भाषा आणि असंबध्द हिंसक photos टाकून या BB ला जातीय दंगलीचे स्वरुप देउ नका . सारेगमप आणि इतर reality shows मधले तुमचे आवडते / नावडते स्पर्धक - judges, त्यांचे आवडलेले / न आवडलेले performances, जमलेच तर जे लोक हे program पहात नाहीत त्यांच्या साठी video links देता अल्या तर जरु share करा .
|
Manuswini
| |
| Monday, October 08, 2007 - 7:11 am: |
| 
|
शेवटी काढलाच का हा बीबी? चला सोय केली. चला मग इथे कुणा स्पर्धकाच्या कपड्याबद्दल,वागण्याबद्दल पण लिहायचे नाही असे नाही का?
|
या वेळी गजेन्द्र सिंग नाही म्हंटल्यावर program कसा असेल याची जरा शंकाच होती ! पण पहिले दोन episodes पाहून पूर्वीच्या गजेन्द्र च्या program पेक्षा हा program सगळ्याच बाबतीत उजवा आणि जास्त वरच्या level चा वाटला ... International singers पहिल्याच performance मधे जाम impress करून गेले .. त्यातले काही singers तर Top 14 पर्यंत जाउ शकले नाहीत पण ते सुध्दा खूप सुरेख गाणारे होते . दुसर्या episode मधे फ़क्त International singers होते , तो episode पाहून तर मी प्रचंड भाराऊन गेले . अमेरिकन मौली दवे चे ' मैय्या मैय्या ' अगदी original गाण्या पेक्षा ही चांगले झाले , त्यातून performance तर असा कि एखादी मुरलेली Pop singer च perform करतेय . पण सगळ्यात थक्क झाले ते पाकिस्तान च्या एक से एक singers चे आवाज ऐकून !! वासि - जुनैद - सिकंदर - मुस्सर्रत म्हणजे चार हुकुमाचे एक्केच काढले एकदम स्पर्धे साठी ! त्या आधी दुबई मधून अला म्हणून announce केलेला अमानत पण फ़ैसलाबाद , पाकिस्तान चाच आहे हे कळलं . तो ही एकदम बाप माणूस च वाटला सूरांचा ! ते कळल्यावर मनातल्या मनात गब्बर सिंग चा डॉयलॉग मारलाच " ये पाकिस्तानी गायक कौनसी चक्की का आटा खाते है रे , बहुत सुरीले है " खरच त्यां सगळ्यांच्या आवाजातली मीट्टी कि खुशबु म्हणायचे कि त्यांच्या उच्चारां मधली , बोलायची तहजीब का काय म्हणायचं कळेना पण वेगळ्याच level चे वाटले सगळे पाकिस्तानी स्पर्धक ! सर्वात प्रेमात पडले ते मुशर्रत आबास च्या सूफ़ी गायकीच्या ! त्याचा पहिलाच performance अज्जुन आठवतोय ... ' पाप ' मधले ' लगी तुमसे लगन ' ऐकून 'divine' एवढी एकच reaction द्यावीशी वाटली कुठल्याही प्रकारे तो स्पर्धक वाटतच नव्हता ... एखादा मुरलेला सूफ़ी गायक मैफ़ील रंगवतोय असं वाटलं ... International singers मधे कॅनडाच्या सुमना गांगुली आणि रिचा त्रिपाठी पण जबरदस्त गयिका होत्या . असो , बाकीचे नंतर लिहिन .. सध्या पहा मुस्सर्रत आणि मौली चा सारेगमप मधला पहिलाच ,better than original आणि solid performance! मौली दवे - माय्या माय्या , http://www.youtube.com/watch?v=Epx-kKavA98 मुस्सरात अब्बास : ' लगी तुमसे मन कि लगन ' http://www.youtube.com/watch?v=V2TCBEddgiU गंमत म्हणजे गजेन्द्र ने स्टार वर सुरु केलेल्या musical program मधे गाजलेला so called famous तोशी हा स्पर्धक पण सूफ़ी गातो , पण मुस्सरात अबास पुढे त्याचा याच गाण्या वरचा performance किती किरको ssssss ळ वाटतो ते ही ऐका , आणि सांगा मुशर्रत च्या आस पास तरी आहे का !! तोशी :' लगी तुमसे मन कि लगन ' http://www.youtube.com/watch?v=Ut6tOtLzLpo
|
lol मनुस्विनी , कपड्यां बद्दल , वागण्या बद्दल लिहा कि .. धर्मिक मतभेत आणि जातीय दंगली नकोत फ़क्त ! 
|
Tiu
| |
| Monday, October 08, 2007 - 2:34 pm: |
| 
|
तो मिका कसला सरदार आहे ना? परवा अमानत 'तुझसे नाराज नही जिंदगी' गात असतांना स्वत: stage वर आला आणी अमानतचा mike हिसकावुन गायला लागला. आणी इतकं चांगलं गाणं 'सावण मे लग गयी आग' type गायला! बरं झालं संजय गुप्ता बोलला की 'हम एक बार फ़िर ये गाना सिर्फ़ अमानतकी आवाजमे सुनना चाहते है'. आणी काय amazing गायला तो. मागे जगजितच्या episode मधे पण गझल फ़ार सुंदर गायला होता अमानत. 'हंगामा है क्यु बरपा!'
|
दीपांजलीच मुसर्रत प्रेम परत सुरु झाल वाटत. चांगल आहे. पण अस कळल की तो बाहेर पडला कधिच.तो दिवस बहुदा दीपांजलीच्या आयुष्यातला सर्वात दु:खद दिवस असेल नाहि?? बर,आता कोण कोण राहिल आहे सरेगमापा मधे???
|
Maitreyee
| |
| Monday, October 08, 2007 - 4:01 pm: |
| 
|
चिन्या : १ पाकिस्तानी, २ मुस्लीम अन एक बंगाली. तर सांग पाहू किती लोक राहिले अमानत ने गझल अन सेमि क्लासिकल मधे बाजी मारली! काय उच्च गायला तो. त्या genre मधे best आहे तो, उगीच ते लाल पॅंट घालून कोई मिल गया मेरा दिल गया वगैरे त्याचा प्रांत नाही आणि त्या मिका ला वेड लागलेय. ते एक सावन मे लग गयी आग आणि ए गणपत ही दोन गाणी त्याने इतक्यातल्या इतक्यात आयडॉल, सारेगम, बुगी वुगी, झलक दिखला जा, आणि पार कॉमेडी सर्कस मधे पण म्हटलीयत!!हाकला आता
|
म्हणजे अमानत,राजा,अनिक आणि चौथ कोण राहिलय??
|
तो दिवस बहुदा दीपांजलीच्या आयुष्यातला सर्वात दु:खद दिवस असेल नाहि?? <<<<दु : ख कसलं त्यात ,reality shows मधले results किती real असतात याची कल्पना आहे . मला काय नक्कीच आवडलं असतं मुस्सर्रत - अमानत - राजा हसन top 3 मधे असते तर !! पण झी टी . व्ही . वर अशी final होणे का practical नाहीये ते पण माहित आहे मला , त्यामुळे दु : ख कसले अन काय माहितच होतं मुस्सर्रत जाणार ते ! अत्ता पर्यंत तो जे काही गायला त्याच्या जवळ पास देखिल जायची स्पर्धे मधल्या एकाही singer ची पात्रता नाहीये असं माझं मत ! प्रत्येकाचे आवडते स्पर्धक असतात , माझय दृष्टिने मुस्सर्रत winner आहे , infact स्पर्धा वगैरे या सगळ्या गोष्टीं च्या खूप वरच्या level चा आहे !
|
Manuswini
| |
| Monday, October 08, 2007 - 4:54 pm: |
| 
|
चौथे कोण नाहि तीनच आहेत. बघितली ती देशातलि link काय तो उद्धट मिका. हे काय माईक ओढून गायचे. ठिक आहे त्याला control नाहि झाले म्हणून गायला पण मला तो उर्मटपणा वाटला. त्याच part मध्ये आंनद राज अमानतला म्हणाला की मी तुला गाणी देईन तर मिका लगेच मला आधी chance द्या. कुस्कट एकदम. मासूम मधले ते गाणे एकदम emotion ने भरून आहे. मला ही जेव्हा तेव्हा एकले की खरोखर डोळे भरून येतात. काहि कळत नाही का ते. जेव्हा हा मूवि पाहीला तेव्हा मूवी मध्ये cute हंसल कडे पाहून इतके रडायला येते ह्या गाण्यात. specially तो नसरूद्दिन्ला innocently म्हणतो क्या मै तुम्हे पापा कह सकता हू? anyways, this is my very fav song
|
Bsk
| |
| Monday, October 08, 2007 - 6:59 pm: |
| 
|
बरं झालं हा बीबी काढला ते.. मी आधीपासून पाहात नाही आहे, पण अमानत, आनिक,राजा खरंच छान गातात.. अमानत माझा fav!! खरंच ती गज़ल काय सुंदर गायली त्यानी! फार फार वरच्या लेव्हलवरचा वाटतो तो.. आनिक पण छानच गातो.. लागा चुनरी मे दाग, आणि ज़िंदगी मे कोई कभी आये ना रब्बा, अफ़लातुन गायली त्यानी! फायनल ला मजा येणारे! मस्त चाललय सद्ध्या सारेगमप..
|
Princess
| |
| Tuesday, October 09, 2007 - 4:25 am: |
| 
|
मनु, हंसल नाही ग... जुगल हंसराज बाकी चालु द्या
|
Manuswini
| |
| Tuesday, October 09, 2007 - 5:19 am: |
| 
|
अग तेच ग डोक्याला खुप ताण दीला तरी आठवत न्हवते हंस का ते पण इतकेच आठवले की हंस होते त्यात
|
अत्ता पर्यंत तो जे काही गायला त्याच्या जवळ पास देखिल जायची स्पर्धे मधल्या एकाही singer ची पात्रता नाहीये असं माझं मत ! प्रत्येकाचे आवडते स्पर्धक असतात , माझय दृष्टिने मुस्सर्रत winner आहे , infact स्पर्धा वगैरे या सगळ्या गोष्टीं च्या खूप वरच्या level चा आहे ! याला म्हणतात आंधळ प्रेम!!!
|
Aashu29
| |
| Tuesday, October 09, 2007 - 1:14 pm: |
| 
|
बघितली ती देशातलि link काय तो उद्धट मिका.>>>> kuthaay ti link?
|
Chandya
| |
| Tuesday, October 09, 2007 - 4:39 pm: |
| 
|
राजा जिंकावा असे मला वाटते . अमानतच्या आवाजात वेगळपण आहे आणि एक मिठास आहे. आणि त्याची गायकी तयारीची जाणवते. राजाच्या आवाजात सुखविन्दरची झाक जाणवते तर अनिकच्या बाबतीत सोनु निगमची . हरप्रीत, पूनम आणि सुमेधा चांगले गायक आहेत. त्यांना पार्श्वगायनाची संधी मिळायला हवी. पूनमने काही गाणी अतिशय उच्च गायली - वंदे मातरम, तारे है बाराती, ताल मधली. पण तिच्याकडे चांगला stage presence नाही. नेहमी अवघडल्यासारखी वाटायची. consistently near-perfection singing - सुमेधा आणि अनिक आणि पुढच्या वर्षी त्या हिमेश ला फुटाची गोळी द्यावी हि झी कार्यकारणीला नम्र धमकी - हुकुमावरुन
|
Chandya
| |
| Tuesday, October 09, 2007 - 4:46 pm: |
| 
|
indian idol उर्फ़ हौसे-गौसे-नवसे सन्गीत बारी मध्ये फक्त दिपाली consistently चांगले गात होती. बाकिचे आज 'हा' तर उद्या 'ना' प्रकारचे वाटले.
|
याला म्हणतात आंधळ प्रेम!!! <<<चिन्या , अरे गाणं ऐकताना डोळ्यांची तशीही गरज नसतेच ना ! Btw, तू इथे फ़क्त माझ्या मुस्सर्रत बद्दल च्या comments वर personal remarks मारायला आलास का ? I guess तुम्ही लोकांनी already दुसर्या BB वर केल्या आहेत , तेंव्हा इथे माझ्या आवडीवर commnets करण्या पेक्षा तुम्हाला जर सारेगमप किंवा इतर shows मधल्या तुमच्या आवडत्या performances बद्दल चर्चा करायची असेल तर लिहा , otherwise कोणाच्या आवडीवर personal remarks मारण्या साठी हा BB नाही . I hope u get it!
|
Amruta
| |
| Tuesday, October 09, 2007 - 5:37 pm: |
| 
|
आशु, हि घे link http://www.youtube.com/watch?v=KpMYe8G_pcc काय सुंदर गायलाय अमानत. माझ अतिशय आवडत गाण. काय तो बावळट मिका. किती मुर्खासारखा गायला.
|
My preference for winner १. अमानत, २. आनीक, ३. राजा हसन बघुया कोण जिंकतोय ते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|