|
Sandu
| |
| Friday, August 31, 2007 - 1:43 pm: |
| 
|
हे मी पहिल्यांदाच ऐकतोय...कपामध्ये आधी कोफीसाखर घालून ठेवायची? मी तर नेहमी दुध कपात ओतुन त्यात साखर्कोफी घालतो. लोकं कोणच्याही क्रमाने काहिहि करतात
|
Mahaguru
| |
| Friday, August 31, 2007 - 3:03 pm: |
| 
|
असला वेंधळेपणा कुणी केला नसेल... http://www.youtube.com/watch?v=xSDtH1GlMPA
|
Storvi
| |
| Friday, August 31, 2007 - 9:57 pm: |
| 
|
>>लोकं कोणच्याही क्रमाने काहिहि करतात >>
|
Maanus
| |
| Saturday, September 01, 2007 - 12:06 am: |
| 
|
हाहा... जेव्हा नविन नविन cd drive आले होते तेव्हा एक program आलेला free cup holder म्हणुन... when you click on get me free cup holder, it used to open the cd driver... this video reminded me of that माझा नाही, पन माझ्या जुन्या roommate चा वेंधळेपणा (विसराळुपना?) म्हणजे कहर होता. तो gas on करायचा आणि विसरुन जायचा की आपन gas on केलाय. lights चालुच ठेवणार... दार पन बंद नाही करायचा... hight म्हणजे आंघोळ झाल्यावर shower बंद करायला विसरायचा... कसकाय लोक असतात असे काय माहीत. नंतर त्याला city त एक अमरु भेटली तेव्हापासुन तो तिकडेच रहायला लागला... पन तरीही न विसरता rent चे पैसे पाठवायचा.
|
Chaffa
| |
| Monday, September 17, 2007 - 2:20 pm: |
| 
|
गणपतीच्या आधल्या दिवशी आरास जोरदार चालु असते रात्री उशीरापर्यंत. रात्रीचा चहा करायला सांगीतल्यावर चाफ़्फ़ीने जर चुकुन आराशीसाठी ठेवलेला, पाणी घातलेला फ़ेव्हीकॉल जर दुध म्हणुन चहासाठी वापरला तर हा वेंधळेपणा थोडाच होतो?. आणि त्या तसल्या चहाचा घोट गेईपर्यंत मला पत्ता लागत नाही तर मी थोडाच वेंधळा आहे? उगीच कुणी काही बोलतं!
|
Zakasrao
| |
| Tuesday, September 18, 2007 - 3:38 am: |
| 
|
चाफ़्या गावाकडे एक म्हण आहे "सारख्याला वारख" चाफ़्या आणि चाफ़ी दोघे मिळुन घाला गोंधळ तरी बर आहे चाफ़ीच्या वेंधळेपणामुळे तुला तुझ्या वेंधळेपणासाठी जास्त बोलणी नाही खावी लागत. बर चव कशी होती चहाची? नको असलेले पाहुणे आले की द्यावी अशी आहे का? 
|
Chyayla
| |
| Tuesday, September 18, 2007 - 9:54 pm: |
| 
|
चाफ़्फ़ी हुषार हो... मला वाटत चाफ़्याच तोंड बंद करवुन चुप बसवायचा हा जालीम उपाय असावा. आणी वरुन हा झकास त्याला चव विचारुन जखमेवर मीठ चोळतोय. येइल हो तुझी पण पाळी येइल.
|
Maanus
| |
| Friday, September 28, 2007 - 3:33 am: |
| 
|
माहीत नाही हे आधी लिहीले आहे का, पण विनोद सेक्श्न मधले विनोद वाचुन आठवले. एकदा मला सर्दी ताप आला होता आणि घरात कोणी नव्हते. नेहमीचा डॉ कडे एकट्याने जायची ताकद नव्हती म्हणुन मी घराजवळच्या एका दवाखान्यात गेलो. त्यानी विचारले काय झालेय. घरातले कुठे गेलेत. एकटा का आला. नेहमीचे डॉ कडे का नाही गेलास. बर औषध लिहुन देतो, माझ्याकडचा stock संपलाय. काय लिहुन द्यावे त्या पठ्याने, crocin . वर २० रु फी देखील घेतली. नंतर घरातले आल्यावर त्यांनी विचारले कोणत्या दवाखान्यात गेलो होतो. मी म्हणालो तो नाही का कोपर्यावर आहे शेजारच्या ईमारतीत. आईने डोक्याला हात लावला. मग मी दवाखान्याची पाटी वाचुन आलो. "कुर्तकोटी प्रसुती दवाखाना" कुर्तकोटी दवाखाना, पहीले छोटासा होता एका shop मधे, तेव्हाची गोष्ट आहे ही
|
Maanus
| |
| Friday, September 28, 2007 - 3:39 am: |
| 
|
वरचे पोस्ट वाचा हा वेंधळेपणा नाही, पण कुठे लिहु कळत नाही. ८ वी का ९ वीत असताना मला एकदा शाळेच्या गॅदरींग मधे गाणे म्हणायची हौस आली. आमच्या बाई. "हम्म एखादे कडवे म्हण पाहु" "आवारा हु.... ऊ ऊ ऊ आवारा हूऊऊऊउ यागर्दीश मै हु आसमान का तारा हूऊऊऊऊउ" बाईंनी त्यांची गॅदरींगच्या कार्यक्रमाची वही काढली, काहीतरी बघतायत असे केले. "सागर, अरे ह्यावर्षीचे बहुतेक प्रोग्राम ठरलेत, काही जागा शिल्लक आहे असे दिसत नाही. तु पुढच्या वर्षी लवकर येऊन मला भेट"
|
Maanus
| |
| Friday, September 28, 2007 - 4:00 am: |
| 
|
वरचे पोस्ट वाचा माझा पहील्या जॉब चा पहीला दिवस. इन मीन चार टाळकीच होतो आम्ही. त्यात मुख्य मानसाचे नाव होते अब्दुल. मला त्या दिवशी दुपारी काय झाले काय माहीत. एक दिड तास एकच ओळ बरळत होतो. बेगानी शादी मै अब्दुला दिवाना बेगानी शादी मै अब्दुला दिवाना बेगानी शादी मै अब्दुला दिवाना शेवटी शेजारचा आला, अबे काय करतोयस पहील्याच दिवशी?? ------------------------------------------------------- जेव्हा मी माझा तिसरा जॉब सोडला तेव्हा माझा मॅनेजर प्रचंड खुष झाला होता. मला तेव्हा एक वाईट सवय होती, सगळी हिंदी गाणी मराठीत translate करुन म्हणायची. उ.दा. प्रेमाच्या होडीत, लाटांच्या मस्तीवर चाललो आम्ही लांब लांब.... आकाशापासुन दुर तिथे काय प्रेम मिळेल, हृदयाचे कमळ उगवेल. हाय रे माझ हृदय, चोरुन घेउन गेली चोरानारी माझी हत्यारीण उडुन जा काळ्या कावळ्या, तुह्या तोंडात देतो लवंग. and the very special one वाळवंटातल्या त्या काळ्या रस्त्यावरुन मी चाललो होतो. निवडुंगाचा गरम वास माझ्या नाकात जात होता. तेवढ्यात दुर कुठेतरी मला, चिमणी मीनमीनताना दिसली. माझे डोके जड झाले, माझे डोळे मंदायला लागले... ... .. .. तुमचे स्वागत असो कॅलीफोर्नीया खानावळीत दिवसभार हाच उद्योग, ऐकल एखाद गाण की कर translate आणि ते गुणगुणत बसायचे, त्यात तो मॅनेजर माझ्या शेजारी बसायचा, तो राजस्थानी, त्याला काही मराठी येत नव्हते व त्यात माझा गळा. त्यामुळे त्याचे जाम डोक दुखायचे (हाच सध्या परत माझा मॅनेजर आहे)
|
Zakasrao
| |
| Friday, September 28, 2007 - 5:31 am: |
| 
|
कुर्तकोटी दवाखाना, पहीले छोटासा होता एका shop मधे, तेव्हाची गोष्ट आहे ही >>>>>>>>>.. हा पौड रोडवरचा का रे??
|
Badbadi
| |
| Friday, September 28, 2007 - 7:09 am: |
| 
|
हा पौड रोडवरचा का रे?? >> असं वाटंतय को. डेपो च्या समोरच्या बाजूला आहे तोच ना!!! भारी आहेस माणसा तू 
|
Zelam
| |
| Friday, September 28, 2007 - 12:38 pm: |
| 
|
माणसा धन्य आहे तुझी
|
Disha013
| |
| Friday, September 28, 2007 - 5:24 pm: |
| 
|
अरे माणसा! 'वरचे पोस्ट वाचा'...... विनंती की धमकी म्हणाय्ची ही? हे असं भाषान्तर करुन गाणी आम्ही भावंडही म्हणाय्चो. 'नाच रे मोरा' चं 'डांस रे पिकॉक मॅन्गोच्या वनात' हे अजुनही आम्हा सर्वांचं तुफ़ान आवडतं आहे.
|
Maanus
| |
| Saturday, September 29, 2007 - 12:44 am: |
| 
|
विनंती हो, एकदम रतिब टाकल्यासारखो तीन पोस्ट टाकले... म्हणुन सांगीतले
|
Sush
| |
| Monday, October 01, 2007 - 6:02 am: |
| 
|
माणसा एक सांग, ते वाळवन्टाचे गाणे कोणते? बाकि गाणि ओळखु आली पण ते नाहि ओळखले
|
Mandard
| |
| Monday, October 01, 2007 - 6:06 am: |
| 
|
ते hotel california गाणे आहे eagles चे.
|
Sunidhee
| |
| Monday, October 01, 2007 - 5:43 pm: |
| 
|
आधीच सॉरी लिहिते माणसा, पण त्याला मराठी येत असते तर अशी रूपांतरे ऐकून नुसते डोकेदुखीच काय, त्याला तर migrane चा त्रास कायमचा सुरु झाला असता.
|
Maanus
| |
| Monday, October 01, 2007 - 6:17 pm: |
| 
|
हो तेव्हा खुप लोकांना माझ्यामुळे त्रास व्हायचा... अता ती सवय मोडली गेलीय, त्यामुळे आजुबाजुचे लोक वाचलेत. सध्या मी आपला शहान्या मुलासारखा कानात कर्णयत्रे घालुन शांतपने गाणी ऐकत असतो
|
२ दिवसापुर्वीचा शहाणपणा.. एक call आला होता. बोलता बोलताच PC shut down झाला आपोआप.तशीही त्याला सवय आहे अशी झटके द्यायची.म्हटल IT वाल्याना call करुन बोलावण्यापेक्षा स्वत: check करु. RAM check केली २ वेळा. चालु केला तरी ही होईना. आणि माझ्या इथे सगळ्यांचे laptops आहेत.ते चालु होते.मैत्रिणीकडे पण जाउन आली पण लक्षच नाही की त्यांचे ही PC बंद आहेत ते. हा सगळा खटाटोप करुन झाल्यावर कळळे की office मध्ये power नव्हती ते. छान पोपट झाला ऐकल्यावर power नाहिय हे..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|