Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 13, 2006

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » रोहिडा ( विचित्रगड ) » Archive through July 13, 2006 « Previous Next »

Gs1
Monday, July 10, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोहिडा उर्फ विचित्रगड ..

Gs1
Monday, July 10, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोहिडा उर्फ विचित्रगडाबद्दल पहिल्यांदा ऐकले तेंव्हा मी प्रथम वर्षाला होतो आणि माझे नियमित पदभ्रमणाला जाणारे सिनिअर्स तिथे रात्री राहिल्यास मनात येणाऱ्या सुसाईडल फीलिंगबद्दल (आत्महत्येची उर्मी) चर्चा करत होते. त्यावेळेला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवणाऱ्या एका प्रसिद्ध डोंगरयात्रीची बातमी पण ताजी होती. विचित्रगडाबद्दल चर्चा बरीच होती, पण अशी कोणती घटना नव्हती ऐकली. पण त्यामुळेच त्याचे नाव विचित्रगड असे मात्र ऐकले होते.

तर असा हा रोहिडा सर करायला आम्ही रविवारी सकाळी साडेसहाच्या एस्टीने भोरला निघालो. स्वारगेटला राजगडाला, तोरण्याला, कल्याण दरवाजाने सिंहगडावर निघालेल्या गटांची छानच लगबग चालु होती. आम्ही आठ जण म्जणजे कूल, आरती, मिहिर, भक्ती हे तर होतेच पण राजेश्वरी आणि ऋषीसेन अशी भारदस्त नावे असलेल्या दोन आतल्या माणसांसहित अज्जुकाही आली होती. कात्रजच्या घाटात न अडकता भोरला दीड तासात पोहोचलो. तिकडे पोहे, मिसळ,चहा वगैरे आटोपून एका खाजगी जीपने बाजारवाडी या रोहिड्याच्या पायथ्याच्या गावात पोहोचलो. मानकरवाडी हा गावातलाच किल्ल्याच्या अगदी पायथ्याचा भाग.

गावाला पोहोचायच्या थोडे आधीपासूनच रोहिडा किल्ला दिसू लागतो. सुरेख एकसंघ वाटणारी तटबंदी दोन टोकांना दोन बुरूज आणि कातळभींतीच्या मधोमध एका बुरूजाआड लपलेला दरवाजा अशी रचना खालूनच लक्षात येते. मानकरवाडीतूनच सुरू होणारी एक सोंड थेट त्या दरवाजला भिडली आहे. नऊ वाजता अत्यंत अल्हाददायक वातावरणात चढाई सुरू केली. वाटेत किंवा गडावरही झाड म्हणून नाही. त्यामुळे पावसाळा हाच एकमेव योग्य ऋतू इकडे यायला. किमया हा एकच शब्द पावसाळा महाराट्रात घडवत असलेल्या जादूला वापरता येईल. एरवी रखरखीत असणारा हा प्रदेश नजर जाईल तिथे हिरव्या या एकाच रंगाच्या असंख्य छटांनी रंगलेला होता, आणि वाऱ्याबरोबर खालच्या शेतातली भाताची हिरवीगार रोपेही भक्ती म्हणाली तसे शँपूच्या जाहिरातीतल्या रेशमी केसांसारखी सळसळत होती.

सोंडेच्या माथ्यावर आलो आणि तुफानी वाऱ्याने आम्हाला धडक दिली. एवढा सोसाट्याचा वारा आजपर्यंत अनुभवला नव्हता. कुठे वादळ वगैरे सुरू झाले की काय असा प्रश्न पडला होता. पावला पावलाला तोल जात होता एवढा जोरदार वारा पश्चिमेकडुन येऊन भिडत होता. तशात एक एक पाऊल उचलून चालणे एवढे जड झाले होते की जेमतेम तीन हजार फुटांवर चढतो आहोत की व्हर्टिकल लिमिटमध्ये दाखवले तसे पंचवीस हजार फुटावरच्या के २ वर असा प्रश्न पडावा. पाउस मात्र थोडासाच होता.

थोड्याच वेळात पहिला दरवाजा गाठला, दुसऱ्या दरवाजात पान्याचे एक टाके आहे तर तिसऱ्या दरवाजात दोन शिलालेख आहेत. ते वाचतच गडावर प्रवेश केला. समोरच एक मोठा ध्वजस्तंभ आहे. आणि डावीकडे एक पडझडीच्या मार्गावर असलेले रोहिडमल्लाचे देऊळ आहे. शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली ते रायरेश्वराचे देउळ हे इथुन जवळच असलेल्या रायरेश्वराच्या पठारावर आहे. त्यात आणि रोहिड्यात गल्लत करून अनेक जण रोहिडेश्वर असाही एक उल्लेख करतात. पण तो चुकीचा आहे.

देवळासमोर एक सुंदर तळे आहे. त्यात पाय सोडुन बसायचा मोह आवरत नाही आणि आवरूही नये. गडावर सपाटी नाही, बराच उंचसखल भाग आहे आणि खालून तीनच दिसले तरी तब्बल सात बुरूज आहेत. तटबंदीच्या कडेने या बुरुजांना भेटी देत गडप्रदक्षिणा करणे आणि खालच्या खोऱ्यातले सुंदर दृश्य बघणे ही एक पर्वणीच आहे. नीरा देवघरचे मातकट पाणी एकीकडे चकाकतांना दिसते तर रायरेश्वराचे पठार, केंजळगड मांढरदेवी वगैरेही दर्शन देतात. स्वच्छ हवेत राजगड, तोरणा, पुरंदर दिसू शकतील.

एका ठिकाणी बऱ्यापैकी बांधकाम केलेल्या बऱ्याच किल्ल्यांवर दिसते तशी चुना मळण्याची घाणी पण दिसते. तसेच पुढे गेलो आणि वर खाली असलेली तरि एकात एक गुंफलेली अशी सुरेख पाण्या,ची टाकी दिसली एकातून पाणी वहात दुसऱ्यात, जात होते मग अजून खालच्या टाक्यात आणि असे करत शेवटी किल्ल्याच्या कातळावरून खाली उडी घेत होते. अशाच एका टाक्यात एक इतका मोठा बेडूक पाहिला की हाच तो त्या बैलाशी स्पर्धा करू पहाणारा असे वाटावे. बऱ्याचशा गडांवर पाहण्यासारखे काहीच उरलेले नसते, तिथे जायचे ते मुख्यतः गडावरून पहाण्यासारखे बरेच काही असल्याने. पण रोहिड्यावर मात्र गडावरही असे बरेच काही पहाण्यासारखे मिळाले. शिवाय हिरवा गालिचा अंथरलेला होताच, त्यावर सुंदर फुले यायलाही सुरूवात झाली आहेच.

एकुणच तृप्त होउन खाली उतरायला सुरूवात केली. खालून एक गट वर येतांना दिसत होता. त्यांचीही वाऱ्यामुळे कशी दारू प्यायल्यासारखी चाल होत आहे ते वरुन बघतांना गंमत वाटत होती. एकमेकांना चला चला म्हणत खाली उतरत होतो, तर बुरूजावर एक मनुष्य बसलेला होता. त्याने मला विचारले, 'अरे तू मायबोलीवरचा जीएस का <?>' मी थक्कच झालो. मला माझे वृत्तांत आपल्या मिल्याच्या विडंबनांसारखे जगभर फॉरवर्ड होत आहेत, आणि ते सुद्धा माझे नाव न वगळता अशी सुखद शंका आली. पण कसचे काय<!> तो आपलाच एक मायबोलीकर महेश वठारकर निघाला, तो आपल्या ऑफिसमधल्या मित्रांबरोबर आला होता.

त्याच्याशी ओळख, पुढच्या ट्रेकचे त्याला आमंत्रण आणि निरोप घेणे असे तिन्ही कार्यक्रम लगेच करून भराभर खाली उतरलो. भोरला जायला जीप वाटच बघत होती. एक छोटासा, खर म्हणजे सहलच म्हणता येईल असा आणि कोणालाही विशेष कष्ट न करता सहज जाता येईल असा ट्रेक करून साडेतीनला पुण्यात पोहोचलो सुद्धा.

फोटो या ट्रेकचे आणि मागचे सुद्धा बरेच द्यायचे आहेत. सध्याची सबब माझ्या कॅमेऱ्याची युएसबी केबल सापडत नाही ही आहे.



Limbutimbu
Monday, July 10, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय लेको मस्त ट्रेकवर ट्रेक करताय तुम्ही! :-) वा वा

Giriraj
Monday, July 10, 2006 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे चांडाळा,परवाच केबल सपडली म्हणून सांगत होतास ना? आता काय पैसे घेऊनच फ़ोटो दाखवणार आहेस का?
मी आलो असतो पण तुमचा आग्रह कमी पडला!:-)


Limbutimbu
Monday, July 10, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> आता काय पैसे घेऊनच फ़ोटो दाखवणार आहेस का?
मला लहानपणी कधीतरी पाहीलेला खोक्यातला शिनेमा आठवला! :-)
खोक्याच्या भोकात तोन्ड घालून भिन्गातुन बघायचे नि तिकडे तो खोकेवाला निरनिराळे फोटु एकामागोमाग एकेक दाखवित रहायचा अन एकिकडे घन्टा वाजवित गाणे बडबडायचा! आम्हाला लई आश्चर्य वाटायच की खोक्यातल्या खोक्यात वेगवेगळी चित्तर फोटु येतात कसे! :-)
तर अस हे की आता जीएस खोक घेवुन युनिव्हर्सिटी चौकात कोपर्‍यात उभा हे अन घन्टी वाजवित काही बाही गाणी म्हणतो हे अन गिर्‍या खोक्याच्या भोकात तोन्ड खुपसुन उकिडवा बसला हे अस चित्र माझ्या नजरे समोर तरळले! :-) वेळ मिळाला की काढीन!
:-)

Dineshvs
Monday, July 10, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 चे बर्‍याच गडांवर बघण्यासारखे काहिच नसते, या वाक्यातले वास्तव, मला खुपच जाचते.
लिंबु, तसे एखादे चित्र काढ कि,

कसा दिसत असेल का किला नांदता असताना, याची कल्पनाच करायची का ?


Ajjuka
Monday, July 10, 2006 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचित्रगडावर तो नांदता होता याचिही काही खूण दिसली नाही. लढण्यासाठीच असावा फक्त तो.
जी एस सर आपल्याला शिव्या घाल्यण्याची order आलिये काही लोकांकडून... आपण म्हणे अशीच काही कारणे देऊन कैक गडांचे फोटो ढापलेत..
हे बरं नाही राजे!
आणि ए ते ऋषीसेन नाहीये वृषसेन आहे.


Kedarrp
Tuesday, July 11, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा घ्या रोहिड्याचा फोटोः



Kedarrp
Tuesday, July 11, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिरके दृश्यः



Indradhanushya
Tuesday, July 11, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार Google Earth वरून टिपलेस का हे छायाचित्र?
वरकरणी तरी तिकोना गडासारखाच दिसतो...

GS , पायपीट कमी झाल्यामुळे शिव्याही कमीच मिळाल्या असतील ना...
August मधे भेटू परत... :-)

गिरी... लिंब्याने काढलेल्या फ़ोटोवरच समाधान मान...


Itsme
Wednesday, July 12, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, आग्रह कमी पडला, की आग्रह थोडा जस्तच झाला ?

आणि तु काय आमचा जावई आहेस प्रत्येक वेळी आग्रह करायला


Dineshvs
Thursday, July 13, 2006 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरती, १०० टक्के अनुमोदन.
पण बिच्चारा अजुन कोणाचाच जावई नाही ना !!!


Kedarrp
Thursday, July 13, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहयाद्रि मधील बहुतेक सर्व किल्ल्यांचे ठिकाण दाखवणारी वस्तूः
http://amitkulkarni.info/Google-Earth-Treks-Fort-India.kmz

वि.सू. ही वस्तू गूगल अर्थ मधे उघडावी.

Giriraj
Thursday, July 13, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरति,तुझा जावई व्हायचं तर मला सासरा शोधण्यापासून तयारी करावी लागेल..

Gs1
Thursday, July 13, 2006 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अज्जुका, आता या रविवारी जरा ट्रेक वाटेल असा ट्रेक करूया..
सकाळला आज परिक्षण आहे आतल्यासहित माणूसचे.


Limbutimbu
Thursday, July 13, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> अज्जुका, आता या रविवारी जरा ट्रेक वाटेल असा ट्रेक करूया..
आणि २३ च्या रविवारी लोणावळा ते कर्जत असा ट्रेक करुयात! ट्रेक परी ट्रेक होइल अन वविला देखिल हजरी! DDD

Ajjuka
Thursday, July 13, 2006 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>अज्जुका, आता या रविवारी जरा ट्रेक वाटेल असा ट्रेक करूया<<
कोणाला ट्रेक वाटेल असा? तुला की आम्हाला?
सकाळी सकाळी नाश्ता करायला मिळणे म्हणजे आमचे लाड झाले म्हणतोस तू.. भिती वाटते..
या रविवारी मी नसेन बहुतेक पुण्यात. कुठे जाणारात?

आणि २३ च्या रविवारी लोणावळा ते कर्जत असा ट्रेक करुयात! ट्रेक परी ट्रेक होइल अन वविला देखिल हजरी! DDD
लिंब्या, तू जा हं वविला.. काय आहे ना की आम्हाला ५ तास सांस्कृतिक शिस्तपालन करून मजा येत नाही रे..

Limbutimbu
Thursday, July 13, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> काय आहे ना की आम्हाला ५ तास सांस्कृतिक शिस्तपालन करून मजा येत नाही रे..
अग मग तीन तासाच्या नाटकाची सान्स्कृतीक शिस्त पाळणे म्हणजे तुला सजाच होत असेल की! DDD

Dhumketu
Thursday, July 13, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gs धुळ्याला नाही गेलास?

सकाळचाच नाश्ता काय... दुपारचे जेवणही मिस झाले की त्याला ट्रेक म्हणता येईल... :-)


Ajjuka
Thursday, July 13, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मला काय करणार्‍यांनाही होत असेल म्हणूनच तर हल्ली ९० मिनिटाच्या आसपासचे दीर्घांक वाढलेत.. म्हणूनच माझा प्रयोग ७५ मिनिटात आटोपता घेते ना मी. :-)

बापरे धूमकेतू.. तुला पण अनुभव दिसतोय..काय हे जी एस सर!

अरे हा मला एक कारण मिळलं... आधीच्या ट्रेक चे फोटो बघितल्याशिवाय मी पुढच्या ट्रेक ला येणार नाहीये.. :P


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators