Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 24, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through September 24, 2007 « Previous Next »

Nandini2911
Saturday, September 08, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बेबीमधे तिघे जण त्या लहान बाळाला चर्चच्या दारासमोर नेऊन ठेवतात. आणि मग आपल्याला समजत्न की दुसर्‍या दिवशी ख्रिअसमस आहे.
चर्चमधे midnight mass नव्हती का? आणि ती संपल्यावर बरेचदा चर्चमधे जाग असते... तरीही ते बाळ पावसात भिजेपर्यंत To be more precise, acute pneumonia होईपर्यन्त कुणीच दार उघडत नाही.. !!!!!
त्यामधेच तिघंही जण हे बाळ कुणाचं असावं यासाठी गेल्या वर्षभरात त्याच्या आयुष्यात आलेल्या सर मुलीना विचारत सुटतात.. Did you get pregnant म्हणून... बाळ साताठ महिन्याचं आहे. :-)

आता एक दोनदा भेटलेल्या मुलीना सुद्धा ते विचाअतात. मग जिच्याबरोबर प्रेमाचं इतकं नाटक केलं ऍक्टिंग केली. तिला नेमका अक्षय कुमार विसरतो... त्याला डायरेक्ट ती आल्यावरच आठवतं की अरेच्चा ही आहे होय या बाळाची आई जिला आपण दिल्लीत भेटलो होतो. :-)
तेव्हाच त्याला आपलं खरं प्रेम तिच्यावरच असल्याचं आठवतं...

सर्वच अचाट आणि आचरट..


Chyayla
Monday, September 10, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"लॉर्ड ऑफ़ द रींग" अहाहा हा सिनेमा पाहिला आणी प्रेमातच पडलो. सर्वांगसुंदर, सगळ्याच बाजुनी उत्कृष्ट उगीच त्याला भरपुर ऑस्कर नाही मिळालेत, माझ्यासारख्या युद्धप्रेमी व्यक्तिन्ना नक्कीच आवाडावा व डोळ्याचे पारणे फ़ेडणारा.. जाउ दे किती लिहावे अन किती नाही..

पण हा सिनेमा पाहिल्यावर माझ्या डोक्यात अतर्क्यतेचा किडा वळवळलाच हा किडा त्या दीग्दर्शक पिटर जॅक्सनच्या डोक्यात आला असेल का कुणास ठाउक? असो तर त्यातली जी "रींग" असते ना ती सोरोन सारख्या महाकाय राक्षसाच्या प्रचंड बोटात बसते पण तीच रींग बुटक्या होबिट फ़्रोडोच्याही नाजुक बोटात कशी काय चपखल बसते हे मला अजुनही कळाले नाही.


Mansmi18
Monday, September 10, 2007 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी,

spoiler alert विसरलीस?

आता मी heyy baby कसा enjoy करणार?:-(
(इतका आतुर होतो मी हा सिनेमा पहायला पण आता शेवट कळला आणि....:-)


Apurv
Monday, September 10, 2007 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला... रींग स्वत:चा आकार आणि वजन बदलू शकते... रींग ला स्वत:ची इच्छा असते, मन असते. ती प्रयत्न करत असते sauron कडे जायचा.


Chyayla
Monday, September 10, 2007 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अपुर्व, रींगला स्वता:ची ईछा असते हे माहित होते पण आकार आणी वजन बदलता येत हे कदाचित माझ्या नजरेतुन सुटले असावे.

Nandini2911
Tuesday, September 11, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतका आतुर होतो मी हा सिनेमा पहायला पण आता शेवट कळला आणि
>>>>>
अरे, शेवट कुठे सांगितलाय मी? आणि हे बेबी शेवट समजलातरी enjoy करता येईल. मेंदु घरी ठेवून गेलास तर..

Sadda
Wednesday, September 12, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा सीन काल मराठी मालिका आभिलाषा मधे झाल........
थोड्यावेळानी लग्न असलेली मुलगी भरपुर सारे दागिणे घालुन छोट्या बहिणीबरोबर देवळात जाते आणि तिला पळवतात.... काय हे किती over दाखवतात..
अस लग्न थोड्या वेळानी असणार्‍या मुलीला कोणी एकट पाठवेल का? एकुण ती serial च अतर्क्य आहे :-)


Mansmi18
Wednesday, September 12, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस लग्न थोड्या वेळानी असणार्‍या मुलीला कोणी एकट पाठवेल का?
---------------------------------------------------
१००% बरोबर. हाच प्रश्न मी आणि पत्नी एकमेकाना विचारत होतो. आम्हाला आधी वाटलेले कि "साखरपुडा" होता कि काय. कारण सगळे मिळुन total १० लोक लग्नघरात दिसले.:-)


Farend
Wednesday, September 19, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा स्टंट पाहा, आणि हसून आडवे व्हा :-) आत्तापर्यंतचे रेकॉर्ड असेल बहुतेक

Psg
Wednesday, September 19, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हेही पहा.. Indian Dracula !!!! कोणीतरी त्याचे ईंग्रजी लिरिक्स ही केलेत! धन्य आहे साऊथ ईंडीयन सिनेमासृष्टी! तो हीरो ड्राक्युला बनतो आणि नंतर ताबडतोब हीरॉईनला मारायचे सोडून इतर भूतांबरोबर चक्क नाच करतो!
पहाच!

http://www.youtube.com/watch?v=TtJRNyPK-lc

Dineshvs
Wednesday, September 19, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ार एंड, त्या घोड्यालाच सगळे क्रेडिट द्यायला पाहिजे.
Psg कुणाला दाद द्यायची ते कळत नाही. महान गीतकाराला कि त्याच्या शब्दशः भाषांतरकाराला.


Deepanjali
Wednesday, September 19, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम ,
ती भूतांची idea मायकेल जॅक्सन च्या सुप्रसिध्द video वरुन उचलली आहे .
शाळेत असताना पाहिलं होतं ते गाणं पहिल्यांदा तेंव्हा मज्जा वाटली होती:-)
http://www.youtube.com/watch?v=AtyJbIOZjS8&;mode=related&search=

Sanghamitra
Wednesday, September 19, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे कुणी अजून मनोजकुमारचा कलयुग और रामायण पाहिला नाही तर..
पूर्ण पाहू शकणार नाहीच अर्थात पण कुठलाही पोर्शन बघा आणि जिवाची कर्मणूक करून घ्या. रामसे पेक्षा विनोदी.


Amruta
Wednesday, September 19, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ROTFL फ़ारएंड,पूनम...
stunt तर अफ़लातुन आहे. मला वाटलेला वरुन उडी मारेल. :-)

आणि पुनम आमच्या ईथे जवळ एक तेलगु रहातो तो मागे मला सांगत होता ' chiranjivi dances so good.. you should see his michael jackson dance. He is great' विडीओ पाहिल्यावर हसुन हसुन पुरेवाट झाली त्याला लगेच दोन्ही लिंक्स forward केल्या.
तो चिरंजिवीचा सुपर फॅन आहे. त्याच्या सारखे गाडी चे turns घ्यायला बघत असतो, त्याच्यासारखा नाचतो. त्याला अगदी पुजतोच. :-)


Vijaykulkarni
Wednesday, September 19, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.youtube.com/watch?v=xLYN0DtpW0Y&NR=1

this is far more than rajanikant



Disha013
Wednesday, September 19, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय भारी स्टंट आहे फ़ारेंड! it's different!! बिचारा घोडा!
पूनम,:-)
विजय
असं काहीतरी नवनवीन शोधा म्हणावं बॉलीवूडवाल्यांना. तेच तेच बघुन कंटाळा येतो.


Amruta
Wednesday, September 19, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग दिशा dont worry about घोडा.. त्याच्या खाली trolly आहे.:-)
विजय, super entertaining video, मजा आली पहाताना.


Farend
Wednesday, September 19, 2007 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी वरचे एक पाहताना बाजूला सापडलला हा एक,
डिस्कवरी चॅनेल, रजनीकांत स्टाईल

Ksha
Wednesday, September 19, 2007 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारेंडा,
ती एका सोड्याची जाहिरात होती मला वाटतं. बघितलेली आठवतेय!

बाकी घोड्याचा व्हिडीओ अचाटच! पण हे पण आहे, मोटारसायकली सरपटत जाऊ शकतात, मग घोड्यानेच काय घोडं मारलय!


Sheshhnag
Monday, September 24, 2007 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्णी, मार डाला... हा हा हा हा
अशी एक्शन मी जन्मात बघितली नव्हती...
भारतातले सगळे रजनीकांत याच्या पायाची धूळही नाहीत.
वाह! काय लिंक दिलीत!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators