|
Vishee
| |
| Friday, September 14, 2007 - 1:32 pm: |
| 
|
उपास, ते चकटफु एकदम साॅल्लिड....संदिप खरे बद्दल बरच ऐकलेलं पण आज त्याला ऐकलं. बाकी पण बरीच मेजवानी आहे. ...खुप धन्स...
|
Amruta
| |
| Friday, September 14, 2007 - 3:16 pm: |
| 
|
कालच schindler's list पाहिला. इतक क्रुरपणे माणुस कसा वागला काही कळत नाही. बघताना जे डोक दुखु लागल ते झोपे पर्यंत थांबल नव्हत.
|
क्षण : खूप ऐकलं होतं या बद्दल ! पण अगदीच हिंदी filmy ईष्टाईल मधे घेतलाय , एकदम predictable आणि typical. दीपा परब ऐश्वर्या राय ची वाईट कॉपी मारायचा प्रयत्न करते ! प्रसाद ओक आणि तो दुसरा कोण हीरो आहे , ते दोघे मराठीच्या मानाने खूपच चांगले दिसतात , पण त्या प्रसाद ओक ला जवळपास सगळेच shirts, kurtis गुलाबी shade मधेच का दिलेत गाणी चांगली आहेत आणि cinematography पण . दीपा परब साठी बनवलेले outfits पण चांगले आहेत . एकदा पहायला हरकत नाही पण nothing special ! .
|
Farend
| |
| Saturday, September 15, 2007 - 12:33 am: |
| 
|
shirts, kurtis shade दीपाली, मराठी चित्रपटाला क्लोजेट मधून बाहेर काढलाय का?
|
Asmaani
| |
| Saturday, September 15, 2007 - 5:06 am: |
| 
|
काल pirates of caribbean ( कदाचित spelling चुकले आहे) the curse of black pearl पाहिला. (हिंदीतून). मस्त आहे. पायरेट्स ऑफ़ करिबिअन ही series आहे ना त्यातला १ ला सिनेमा कुठला आहे? आणि आतापर्यंत किती आलेत? and which one is the latest? कुणी सांगेल का pls ?
|
Dineshvs
| |
| Saturday, September 15, 2007 - 5:12 am: |
| 
|
काल डिस्कव्हरी चॅनेल वर, द फ़्लाईट दॅट फ़ॉट बॅक, नावाचा दोन तासाचा कार्यक्रम दाखवला. नाईन एलेव्हन ला, व्हाईट हाऊस वर धडकु पाहणार्या विमानातील प्रवाश्यानी दिलेल्या लढ्यावर हा कार्यक्रम होता. मृत व्यक्तींच्या आठवणीतुन व प्रत्यक्ष रेकॉर्डिंग वरुन हा कार्यक्रम तयार केलेला होता. त्यातील नातेवाईक खरे होते पण जे कलाकार घेतले होते, त्यांचा अभिनयही सरस होता. कुठलेही स्पेशल इफ़ेक्ट्स नसुनही, हा कार्यक्रम एका चित्रपटाच्या तोडीचा होता. याच चॅनेलवरती डेव्हीड अटेन्बरोच्या काहि मालिका चालु आहेत. त्यातली वॉटर तर भन्नाटच होती. इग्वासु ह्या नायगार्याच्या अनेकपटीने मोठ्या असलेल्या धबधब्याच्या एरियल शॉट तर मस्तच होता. परवा याच मालिकेतली माऊंटन्स हि फ़िल्म दाखवली. निव्वळ सौंदर्य, दुसरा शब्दच नाही.
|
Dineshvs
| |
| Saturday, September 15, 2007 - 2:58 pm: |
| 
|
अलिकडे अक्षय कुमारचे भुल भुलैया सिनेमातले, हरे कऊश्णा हरे राम असे एक गाणे दाखवतात. त्यात हरे राम लिहिलेला केशरी झब्बा ( नुसताच झब्बा, खाली दिसण्याजोगे काहि नाही ) घालुन काही मुली अत्यंत हिडीस हालचाली करताना दाखवल्या आहेत. मी एरवी कडवा वैगरे नाही, पण हा प्रकार खरेच असह्य आहे.
|
Ajanukarna
| |
| Saturday, September 15, 2007 - 3:15 pm: |
| 
|
जाऊद्या दिनेशराव, यावर उपाय म्हणजे टीवीचे बटण बंद करणे.उगा आपल्याला का त्रास करून घ्यायचा.
|
Yog
| |
| Saturday, September 15, 2007 - 10:36 pm: |
| 
|
धमाल: एकदम फ़ूल टू धमाल.. ... 
|
Dineshvs
| |
| Sunday, September 16, 2007 - 11:54 am: |
| 
|
अजानुकर्ण, जाऊ द्यायचेच. काळ सोकावलाय. योग सगळ्या पेपर्सनीही चांगले लिहिलेय. तसा तो मॅड मॅड मॅड वर्ल्ड ची कॉपी आहे. बहुतेक सीन्स तसेच आहेत. अगदी W ची खुण सुद्धा. हिरॉईन का घेतली नाही कुणास ठाऊक ? मूळ सिनेमात आहेत कि, बाया. त्यानीही धमाल केलीय.
|
अजानुकर्ण, मायबोलीवर स्वागत! 
|
Amruta
| |
| Sunday, September 16, 2007 - 11:40 pm: |
| 
|
अस्मानी, मलापण pirates of the caribbean मुव्ही आवडलेला. मुख्य म्हणजे त्यातला captain Jack Sparrow सहि आवडलेला. त्याच्या ३ series आहेत. पहिला curse of the black pearl दुसरा dead mans chest आणि तिसरा At World's end . मी पहिले २ पाहिलेत ३रा अजुन पहायचाय. तो आता DVD वर आल्या शिवाय काही पहायला जमणार नाही.
|
Farend
| |
| Monday, September 17, 2007 - 12:18 am: |
| 
|
Wild Hogs एकदा पाहायला चांगला आहे. बर्यापैकी कॉमेडी. 'समर' मधे अमेरिकेत असा एकतरी चित्रपट येतोच, तसाच आहे, पण थोडा Three Amigos ची अमेरिकन आवृत्ती.
|
अहो मी आधी सदस्य होतो. yogy नावाने... पण त्या अकाउंटचा गोंधळ झाला म्हणून हे घेतले आहे. तरी पण स्वागत समिती कडून पुष्पगुच्छ घेतो बरंका. शेवटी पुणेकर ना आम्ही
अहो दिनेश दादा, त्या संजय दत्त ला कोर्टाने दोषी ठरवून देखील त्याला हस्तांदोलन करायला आपले हवालदार पुढे जातात. "धमाल" हा चित्रपट संजूबाबामुळे किती चांगला आहे हे लिहिले जाते. आता भूलभुलैया किती मस्त आहे हेही लिहिले जाईल. अजून काळ किती सोकावायचा राहिला आहे? btw काल मराठी वाहिन्यांवर सचिन-अशोक सराफ उत्सव होता वाटतं... नवरी मिळे नवर्याला, आमच्यासारखे आम्हीच आणि गंमत जंमत बघून मजा आली.
|
Manuswini
| |
| Monday, September 17, 2007 - 7:40 am: |
| 
|
यंदा कर्तव्य आहे पाहीला बर्याच वर्षाने मराठी चित्रपट पाहीला. आवडला. लई शिकण्यासारखे आहे बाईऽऽ. काही गोष्टी अजूनही तश्याच होतात हो असे वाटले. तरी बरेच काही शिकण्यासारखे आहे हो आमच्यासारख्यांना धमाल वाटली पहिल्या भागात. अगदी मज्जा आली. it took me back to my first cousins typical arranged marriage 13 years ago in same situation where his mom was not well and through paper ad my cousin got married. . बिचारे बळीचे बकरे होते एकदम,आज आम्ही ती video cassett बघीतली जाम चिडवतो त्यांना. आणि स्वःताचा टेमा मिरवायला जीजु तुम्हा लोकांना त्यातले मजा नाही करणार असे म्हणतात. तुम्ही अगदी पारखून घेणार ना मुलाला असे म्हणून आमचे तोंड गप्प करणार. आम्हाला कसली अक्काल होती ताईच्या लग्नात पण जवळपास असेच Scene नी situation होती. त्यात पडले कोब्रा Vs रा सा ब्रा ह्यांचात लग्न. जिथुन तिथुन नवर्याकडची लोकांचा नाक चढेल पणा म्हणजे तशी वाईट नाहीत ताईची माणसे पण आपण वेगळे आहोत दाखवलेच. या picture मध्ये तो आजीबरोबरचा Scene काय मजा आली. अगदी सेम सेम. ताई तिच्या होणार्याला सासुला अशीच भेटली होती. ती अंगठी पडल्यावर बायकोच्या आताच पाया पडणार comments धमाल scene पण आताच्या काळात पण अशी लग्न होतात ह्याचे जरा आश्च्रय वाटले. थोडे पटत नाही असे आता होते का कुठे की मुलगा, मुलगी बोलत नाही? बाकी जवळपास सगळीकडे सेमच गोंधळ असतो अजूनही लग्नात. ताईला पण धुराने नकोसे झाले. नवर्याकडची लोकांना वैदीक विवाह हवा होता होम वगैरे करून. सारखी डोळे चोळून लाल लाल, त्यात घरातील पहीलेच लग्न म्हणून ही जनता काकांनी बोलवलेली. सारखी तहान लागत होती ताईला ते हसून बोलणे, हजारो लोकांना भेटणे, नवरा नी नवरीचा उपवास. बाकी आमी ताव मारत होतो. काय विचित्र प्रथा ना त्यांनी उपवास करायचा. माझे अतीशय fav गाणे 'सप्तपदी मी रोज चालते'. मग 'जा मुली तु' ताईच्या video मध्ये पण घातले होते. पण जा मुली जा ह्या गाण्याने खरेच डोळे भरतात. माझ्या आईला माझ्या स्वःताच्या बहिणीच्या लग्नात चक्कर आली ती निघाली तेव्हा. आणि मी आईला,आई एवढे काय त्यात, इथेच तर जवळ राहणार ना ती वगैरे वगैरे. ह्यातील नायक काही दिसायला खास नाही पक्का मालवणी नाहीतर मराठा ९६ कुळी असणार चेहर्यावर छाप आहे तशी त्याच्या(जातीयवाद करत नाही पण आम्ही कुठलाही मराठी चित्रपट बघितला की हीच चर्चा करायचो college मध्ये असताना. एखादा नाजूक पांढरा सचिन सारखा नट जसे काय भटुरडा आहे, मालवणी दिसतो ना, पक्का वाणी असणार,गावठी looks , घाटावरचा वाटतो ना वगैरे वगैरे. तसे मराठीत कमीच चांगले दिसणारे नट आहेत. सगळ्यांन अशी नावे ठेवत चित्रपट बघायचो. मग इतके पकाव मूवी आली नी त्यात अशोक सराफ़ एकदम बोर.. मग मराठी मूवी बगणे सोडून दीली. असो. नायिका गोड आहे. बहुतेक मुलांना आवडेल अशी. सगळे(मुलगे) दुजोरा देतील इथे. ते कृत्रीम पणे फोटो काढणे, घास भरवणे जाम मज्जा, अगदी सेम सेम. ताई जाताना ढसाढसा रडत होती आणि आम्ही दात काढून हसत होतो. मी करवली असल्याने माझी पाठवणी तिच्या सासरी त्या रात्री, वैतागले तिच्या सासुच्या बाजूला झोपयला. रात्रभर घोरत होत्या त्या मला तरी आवडला. बहुतेकसे Scene माझ्या ताईला तीच्या लग्नातील आठवणी काढून देतील असे आहेत. तीला फोन करून सांगीतले की बघ हा मूवी तु.
|
Aashu29
| |
| Monday, September 17, 2007 - 9:47 am: |
| 
|
मनु, मलाहि आवडला हा मुवि!! पण हिरो काहि इतका वाईट नाहि ग, आत तो जाडा झालाय, अन्कुश चौधरी आहे त्याचे नाव!! आधि छान दिसायचा!!
|
हसा चकटफू मध्ये होता त्यावेळी मस्त होता तो!
|
Manuswini
| |
| Monday, September 17, 2007 - 8:14 pm: |
| 
|
चकटफ़ु काय movie आहे मराठी? मला कोणी link देईल का?
|
Disha013
| |
| Monday, September 17, 2007 - 8:40 pm: |
| 
|
चकटफ़ु मुवी नाही. मनुस्विनी, जरा मागच्या पानावर जा आणि तिथली उपासने दिलेली लिंक बघ. तिचे नाव चकटफ़ु दिलेले आहे. आणि आ.कर्ण जे म्हणतोय ती 'हसा चकटफ़ु' नावाची विनोदी सिरियल आहे. BTW उपास,साईट मस्त आहे.सगळे पिक्चर बघायला वेळ काढावा लागणार आता. हे बेबी बघितला. काय खास नाय. विद्या बालनचे प्रायवेट विमान? एकच सीन आवडला. ते तिघे मुलींची माफ़ी मागत फ़िरतात तो. Mr. bean's holiday : ४,५ वर्षाची मुले enjoy करतील फ़क्त.
|
Manuswini
| |
| Monday, September 17, 2007 - 9:22 pm: |
| 
|
दिशा थांकू पण मला चकटफू नाही मिळाले. ते कुठया भागात आहे? जरा सांग ना.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|