|
Farend
| |
| Tuesday, September 11, 2007 - 9:29 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्रद्धा एकदम सही. तू नवीन असे चित्रपट काढणार्यांसाठी एक specification करून दिले आहेस हा सत्तरीच्या दशकातला 'नागीन' ना? आता शेषनाग वगैरे ते इतर सिनेमे बघायला पाहिजेत. पण पहिल्या नियमाला अपवाद आहेत, कारण डिम्पल सुद्धा एकदा नागीण झाली होती अशीच कलाकारांची भरताड असलेल्या त्याच वेळच्या 'जानी दुश्मन' मधे सुद्धा नागिणीसंबंधीच काहीतरी होते बहुतेक, का भुता संबंधी, लक्षात नाही. या सर्व नागीण किंवा भूत झालेल्या हिरॉइन्स बदल्याच्या वेळी एक रागावलेला 'लुक' देतात, आता 'भूत लुक' आणि 'नागीण लुक' मधे फरक करतात का बघायला पाहिजे. श्रद्धा: तुझा आधीचा 'नगिना' चा रिव्यू पण याच फोल्डर मधे टाक, कारण तो त्या 'जनरल अचाट आणि अतर्क्य' मधे कोठेतरी आहे. मैत्रेयी: 'आयी रात मिलन की' म्हणजे गुलशन कुमारपटांचे पेव फुटले होते त्यातील एक का? मग शेवटी त्या डिस्ने च्या mermaid सारखा काही तोडगा काढतात का? आणखी एक अनुराधा पौडवाल ची गाणी असलेला 'नागमणी' पण आहे बहुतेक.
|
फरेन्ड, नागमणी हा गुलशनपटच. त्यावेळी आमच्या गावात फक्त दूरदर्शन दिसे. रोज रोज ऐकून नागमणी च्या ग़ाण्याने काव आणला होता. रात्री तो नाग अन ती बाई अन दिवसा ती नाग अन तो माणूस!! कुणाला कुणाचा उपयोग नाही
श्र, "आपका सुरूर" आणी "आग" चे परिक्शण लिहाच तुम्ही एकदा.
|
Chinnu
| |
| Tuesday, September 11, 2007 - 9:41 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्र अजूनही हसु थांबले नाहीये!
|
मैत्रेयी: 'आयी रात मिलन की' म्हणजे गुलशन कुमारपटांचे पेव फुटले होते त्यातील एक का? मग शेवटी त्या डिस्ने च्या mermaid सारखा काही तोडगा काढतात का? आणखी एक अनुराधा पौडवाल ची गाणी असलेला 'नागमणी' पण आहे बहुतेक हो गुलशन कुमार factory मधलेच हे पीक ! आणि नाही नाही , डिस्ने सारखा तोडगा वगैरे काही नाही ! दिवसा तो अविनाश वाधवान आणि रात्री शाहिन हे नगाला कुरवाळत गाणं म्हणतात " कसमसे कसमसे हो रब्बा कसमसे अब ना जुदाई सही जाए हमसे " ![](/hitguj/clipart/lol.gif)
|
Farend
| |
| Tuesday, September 11, 2007 - 10:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ओ ते त्यातलेच होते का? काय महा-इरिटेटिंग गाणे, (बहुधा) मो अज़िज़ काय ओरडतो मग हे तेव्हढेच महा-इरिटेटिंग गाणे सुद्धा बहुधा त्यातीलच असावे: तूने प्यार की बीन बजायी मै भागी चली आयी मै दौडी चली आयी विजय बरोबर दूरदर्शन मुळे ती T-series फेम गाणी फारच सहन करावी लागली.
|
Deepanjali
| |
| Tuesday, September 11, 2007 - 10:13 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो मुन्ना अझीज आणि अतिशय असह्य अनुराधा बाई ! बोबडी अनुराधा तोंडात गोळी चोखत गाते बहुतेक .. तू ला ' त्यू ' म्हणाते . थुंकतान थू ऐवजी ' थ्यू ' करत असणार !
|
Slarti
| |
| Tuesday, September 11, 2007 - 10:13 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>>> दिवसा तो अविनाश वाधवान आणि रात्री शाहिन हे नगाला कुरवाळत गाणं म्हणतात " कुठल्या नगाला ? हे दोन सोडून अजून कोणी नग आहे की काय त्यात ? नाचे नागीन गली गली... मीनाक्षी शेषाद्री नागीण म्हणून एकवेळ ठिक आहे पण नितीश भारद्वाज हा नायक ???!!! नाग / गारुडी / मांत्रिक यापैकी काहीही असला तरी तो कृष्णाचाच अवतार वाटणार...
|
Slarti
| |
| Tuesday, September 11, 2007 - 10:46 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नागीनमधले 'तेरे इश्क का मुझ पे' गाणे बघाच. ती पहिलीच ओळ म्हणताना अतीप्रौढ दत्तच्या चेहर्यावर जे एरंडेली भाव आहेत ते पाहून त्या असरबद्दल भलतेच विचार येतात. रेखाला दारूच्या ग्लासात थुंकताना पाहून हॉस्टेलवरच्या अनिष्ट पण व्यवहार्य प्रथा आठवल्या. नृत्यदिग्दर्शनपण काय आहे ! पूर्ण गाणेभर ती नुसती 'वळवळत' आहे... निदान धडाडीचा प्रयत्न करत आहे अन् त्या प्रयत्नात स्वतःलाच पार्श्वभागावर लाथा मारते... शेवटी दत्तच्या पाठीवर चढून उभेपणी वळवळ करते, दत्तच्या कंबरेचा टाका ढिला कसा झाला नाही कोणास ठाऊक !! >>> तू ला ' त्यू ' म्हणाते . थुंकतान थू ऐवजी ' थ्यू ' करत असणार !
|
Farend
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:17 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो तो त्यू आठवला , विशेषत: या गाण्यात तो जास्त जाणवायचा: सारी दुनिया प्यारी पर त्यू है सबसे प्यारा तेरे लिये something something (काहीतरी आसमां से धरती पर है उतारा वगैरे)
|
पुर्वी फक्त दूरदर्शन असे. झी वगैरे काहीही नव्हते. त्यावेळी अनुराधा गुलशन कुमार, मो अजीज आणी गुलशन चा भाऊ कोण तो त्यानी भयन्कर वैताग आणला. ( जित्तेन्द्र चा मुलगा पण परवडला, म्हणजे कल्पना येइल त्या गुलशन च्या भावाची. )
|
Deepanjali
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:57 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
lol फ़ारेंडा .. अगदी अगदी !!!!! ते सारी दुनिया प्यारी पर त्यू है मधे सर्वात जास्त जाणवतो ' त्यू '
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 12, 2007 - 12:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>>> दिवसा तो अविनाश वाधवान आणि रात्री शाहिन हे नगाला कुरवाळत गाणं म्हणतात " कुठल्या नगाला ? हे दोन सोडून अजून कोणी नग आहे की काय त्यात ? slarti, त्या movie ची थीम च अशी भारी आहे , कि दिवसा शाहिन नागीण आणि रात्री अविनाश नाग !! त्यामुळे ही रात्रं दिवस अशी साप कुरवाळण्याची गाणी ! तो गुलशन चा भाउ किशन कुमार !! त्याचं ती गाणं इष्क मे हम तुमेह क्या बताये, किस कदर चोट खाए हुए है आज ही हमने बदले है कपडे आज ही हम नहाये हुए है !! आणि ते सर्वात भारी आणि सगळी कडे वाजणारं गाणं अगदी लग्नाच्या बॅंड मधेही ' अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का' यार ने ही लूट लिया घर यार का !! आजा मेरी जान मधली गाणीही सारखी वाजायची !
|
इष्क मे हम तुमेह क्या बताये, किस कदर चोट खाए हुए है आज ही हमने बदले है कपडे आज ही हम नहाये हुए है जाता जाता, हा शेर वाटतो तसा विनोदी नाही. मुस्लीम समाजात म्रुत देहाला आन्घोळ घालून नवे कपडे घालायाची प्रथा आहे त्याचा हा सन्दर्भ.
|
Farend
| |
| Wednesday, September 12, 2007 - 1:18 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विजय मलाही ते नंतर कळाले (आणि आधीचे वाक्य वेगळे आहे, ते त्याचा संदर्भ देते बहुतेक. आत्ता आठवत नाही), पण त्याचा ते गाताना चेहरा बघून 'आजही हम नहाये हुए है' यावरही विश्वास बसत नाही
|
Farend
| |
| Wednesday, September 12, 2007 - 1:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्रद्धा सॉरी, आम्ही चर्चा भलतीकडेच नेली, पण याला 'आयी मिलन की रात' जबाबदार आहे
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 12, 2007 - 2:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
त्या आजही हमने बदले है कपडे च्या आधी असं काहीतरी आहे , ए लहर अपनी कश्ती से कह दे दाग लगने ना पाए कफ़न को पण किशनकुमार बिन आंघोळीचा दिसतो म्हणून त्या ओळीचं जाम हसु येतं ! ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Shraddhak
| |
| Wednesday, September 12, 2007 - 5:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. चर्चाही धमाल चालू आहे. आधीचं नगीनाचं पोस्टही इथे कॉपी करत आहे. नगीना लहानपणी attend केलेल्या प्रत्येक लग्नात वाजणारं ' मै तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा... ' हे गाणं ऐकून ( ती नवरी उगीच मधूनच सापासारखा फूत्कार करेल असंच वाटायचं.) नगीना पाहायची कैक वर्षं इच्छा होती. तो योग अखेर शनिवारी आला. आणि इतकी वर्षं वाट पाहण्याचे सार्थक झाले. :-P आपल्या कुलदैवताची पूजा करायला पडक्या पुरखोंकी हवेलीत जावे लागते हे माहीत असूनही त्या हवेलीची डागडुजी हे लोक का करून घेत नाहीत बरं? मग तिथे साप न रहायला आले तरच नवल. बरं आता असल्या हवेलीत पूजा करायला जाताना, आपला मुलगा उचापतखोर आहे हे जाणून त्याच्यावर नजर ठेवावी ना... पण नाही. तो मुलगा अनवाणी पायाने ( इथे आपली आई, कार्ट्या, चप्पल घाल नाहीतर पायाला काच, काटा लागला तर आधी दोन फटके देईन म्हणाली असती.) हवेलीत फिरतो आणि सापावर पाय देतो. ( ह्यांच्या आया यांना समोर नीट पाहून चालायचं हेदेखील शिकवत नाहीत.) साप चावून मुलगा मरतो. आता त्या मॉंचा आक्रोश. लगेच अमरीश पुरी तिथे हजर. ( तो जितक्या लगेच तिथे येतो त्यावरून तो ' फिरता सापविष उतरवणारा ' आहे असंच वाटतं.) तर अमरीश पुरी पुंगी वाजवून वाजवून त्या सापाला नकोसे करून सोडतो आणि तो साप ' जीव देतो, पण पुंगी आवर ' असे म्हणत त्या मुलाला जिवंत करतो आणि सापाचे प्राण जातात. इकडे सापीण विधवा. ( सापाचे स्त्रीलिंग काय हो?) लंडनला साप नसतात असे कायसेसे हिरोच्या आईने फ़ेमिना मासिकात वाचल्याने ती त्याला उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवून देते. आता हिरो तरूण होऊन त्याच गावात परत येतो. त्यापेक्षा आईला तिकडे न्यायचे ना! असो. सापीण त्याच वाड्यात वाट बघत असते. ( प्लीज नोट, अजूनही त्या वाड्याची डागडुजी केलेली नाही.) हिरोचे लग्न व्हिलनच्या मुलीशी ठरलेले. सापिणीला आपल्या नवर्याला जिवंत करायचे असते. त्याचे प्राण हिरोमध्ये. हिरो मेला की साप जिवंत होणार. ( प्राण इतके सहजी transferrable असतात?) सापीण इच्छाधारी असते. ती श्रीदेवीचे रूप घेऊन हिरोला प्रेमात पाडते. थोडाफार घरच्यांचा ( पक्षी: आई) विरोध मोडून हिरो सापिणीशी लग्न करतो. संसार सुखाने चालू होतो. ( हेच का सापिणी तुझं त्या सापावरचं प्रेम?) सापीण दोन रक्षक सापांच्या मदतीने छोट्या व्हिलनला धडा शिकवते. अब आई बडे व्हिलनकी बारी! हा व्हिलन म्हणजे तोच तो अमरीश पुरी. रहस्योद्घाटन होते की, अमरीश पुरीने ज्या सापाला मारले आहे त्याच सापाला अमरीश पुरीला हव्या असलेल्या नागमण्याचे डिटेल्स माहीत. ( सापाला मरता मरता एवढाही वेळ मिळत नाही की तो बिळात येऊन सापिणीला सांगू शकेल, ' अगं माझे फार थोडे फूत्कार शिल्लक राहिले आहेत. नीट लक्ष देऊन काय सांगतो ते ऐक. उजवीकडच्या बिळात ठेवलेला नागमणी अमरीश पुरीला दे. ' ) तर मग आता हिरोला मारून सापामध्ये त्याचे प्राण transfer करणे आले. इकडे अमरीश पुरी सापिणीच्या सासूला तिची सून सापीण असल्याचे सांगून तिच्या मनात अक्षरशः विष कालवतो. मात्र सापीण सासूला अभय देते की, तुझ्या मुलाला मी काही होऊ देणार नाही. ( हेच का सापिणी तुझं त्या सापावरचं प्रेम?) आता अमरीश पुरी आणि सापिणीची फ़ाईट. नांदी म्हणून ' मै तेरी दुश्मन ' गाणे होते. सापिणीने या गाण्यासाठी एक पांढरा ड्रेस कपाटात इस्त्री करून तयार ठेवलेला दिसतो. बरं हिला नवराही विचारत नाही की तू सदैव साड्या नेसतेस, मग हा असला ड्रेस कधी घेतलास? नाच झाल्यावर त्याच त्या पडक्या वाड्यात त्रिशूळांनी मारामारी. हिरोवर व्हिलन प्राणघातक हल्ले करतोय म्हटल्यावर त्याला वाचवायचा एकच उपाय असतो. सापिणीने सापाच्या इतके वर्षं सांभाळलेल्या मृतदेहाचे दहन करायचे. बरं त्या सापाचा मृतदेहही एकदम सुस्थितीत राहिलेला असतो. ( सापिणीला ममीफ़िकेशन करणे येत असावे.) तर ती त्याचे दहन करते. आणि व्हिलनची नागमणी मिळवण्याची आशा संपते. थोड्या वेळाने तोही संपतो. ( साप चावून!) साप उतरवणार्या मांत्रिकाचा साप चावून मृत्यू पाहून एकदम ' अच्छा तैराकही पानीमे डूब मरता है ' वगैरे आठवलं.) मध्ये हिरोला लागणार असलेला एक त्रिशूळ स्वतः झेलून हिरोची आईही गेलेली असते. श्रीदेवीचे घारे डोळे कायमचे काळे होतात ( येस... दरवेळी ती सापीण व्हायला लागली की तिचे डोळे रंग बदलून घारे होत असतात.) आणि They lived happily everafter अशी पाटी येते. सिनेमा ' क्लासिक ' आहे यात वादच नाही. :-P अजून पाह्यला नसेल तर नक्की पहावा. वि.सू.: हा पाहिलेल्यांनी ' तो नागमणी ' नक्की कुठे असतो, हे जाणून घेण्यासाठी निगाहे उर्फ नगीना पार्ट २ पहावा. दोन्ही पाहिलेल्यांनी सर्पमित्र व्हायला हरकत नाही. :-P
|
Shraddhak
| |
| Wednesday, September 12, 2007 - 5:16 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विशेष सूचना: अधिक अभ्यासाअंती नगीनामध्येही साप आणि सापीण हे नाग नागीणच असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी वरच्या लेखात नाग नागीण असेच वाचावे. :-P farend जानी दुश्मन भुतावर आहे. आणि त्यात बाईचं नव्हे तर माणसाचं भूत आहे. त्याची entry टाकते ' अचाट आणि अतर्क्य ' मध्ये वेळ झाला की. इतर कुणाला माहीत असेल तर त्यांनीही लिहायला हरकत नाही नवीन BB उघडून. त्यात एका माणसाला ( रझा मुराद) त्याची बायको लग्नाच्या पहिल्या रात्री विष देऊन मारते. मरता मरता तिने घातलेल्या लाल कपड्यांची छबी त्याच्या डोळ्यांत उमटते. :-P ( याचे पूर्वज नाग असावेत.) मग कुणीही लाल कपड्यांतली नवरी दिसली की तो आत्मा संजीव कुमारमध्ये शिरून तिचा जीव घेत असतो. आता 'भूत लुक' आणि 'नागीण लुक' मधे फरक करतात का बघायला पाहिजे<<<<< हो... भूत लुक मध्ये डोळे कुठल्याही रंगाचे चालतात. फक्त ते menacing दिसले पाहिजेत. लाल रंग असा effect देऊ शकतो; म्हणून तोही वापरला जातो. कधीकधी लाल रंगाचा अतिरेक झाला तर भुताचे डोळे आल्यासारखे वाटू शकतात. पण ते असो. नागीण लुक मध्ये घारे डोळे आणि मस्कारा या गोष्टींना महत्त्व असते. काजळालादेखील. डोळ्यांचे घारेपण हे कायम highlight करण्यात येते.
|
Sadda
| |
| Wednesday, September 12, 2007 - 7:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नाग्- नागिण वाला एक नवा जानी दुश्मन पण आहे...... मनिषा कोयराला वाला.... त्यात असच काही तरि भनाट दाखवलय कि गळ्यात cross ओम आणी चंद्र घातला कि तो नाग काहि करु शकत नाहि यात फक्त नाग बद्ला घेतो आणि नागिण एकदा मरुन ( natural death )मनुष्य योनित जन्मला येते.. आणी नाग बिचार वाट बघत असतो (ती मरुन परत जन्म घेते २२-२३ वर्षाची होते तरि हा तेवढाच..) ती ला गाण म्हणुन बोलवत असतो.. आणी finally तीला कळत कि आपण नागिण आहे आणि नेमक तेव्हाच तिचे दोन मित्र तिला फसवुन मारतात मग ति भुत आणी तो नाग सगळ्यांनाच मारतात........
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 12, 2007 - 7:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि They lived happily everafter अशी पाटी येते. सिनेमा ' क्लासिक ' आहे यात वादच नाही. :-P अजून पाह्यला नसेल तर नक्की पहावा. वि.सू.: हा पाहिलेल्यांनी ' तो नागमणी ' नक्की कुठे असतो, हे जाणून घेण्यासाठी निगाहे उर्फ नगीना पार्ट २ पहावा. दोन्ही पाहिलेल्यांनी सर्पमित्र व्हायला हरकत नाही. :-P <<<<आणि They lived happily वाचून निर्धास्त होउ नका ! कारण ती ' एप्रिल फ़ूल ' ची पाटी आहे . लगेच निगाहे मधे दाखवलय कि ते lived happily ever after वाले ऋशी कपूर आणि श्री लवकरच accident मधे मरतात ! ![](/hitguj/clipart/proud.gif)
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|