|
Shraddhak
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हिंदी सिनेमांच्या डायरेक्टर्सना reptile गटातल्या साप ( आणि मगर... आठवा ' खून भरी मांग ' ) या प्राण्याबद्दल विशेष जिव्हाळा असल्याचं निदर्शनास आलंय. नाग या विषयावरचं त्यांचं ज्ञान तर कहरच! लहानपणी जळगावला राहात असताना पावसाळ्यात घराच्या आसपास दोन तीन तरी साप निघायचे आणि अतिउत्साही मंडळी त्या सापांना काठ्यांनी मारायचीही. तरीही त्यापैकी कुणालाही एखादी सुंदर इच्छाधारी नागीण शोधत आली नाही ( बदला घेण्यासाठी) आणि नाग इच्छाधारी होता हेही अनुभवाला आलं नाही. तर ते असो. फार पूर्वीचा कृष्णधवल ' नागिन ' सोडल्यास मी बरेच नागपट बघितलेयत. त्यातून काढलेले निष्कर्ष येणेप्रमाणे १. जे नाग किंवा नागीण दिसायला बरे असतात त्यांनाच इच्छाधारी होता येते. बहुधा त्यांच्यात ' मि. नाग आणि मिस नागीण ' स्पर्धा होत असावी. त्यातले विजेतेच केवळ इच्छाधारी बनू शकतात. २. यच्चयावत नागकुलीन लोकांचे डोळे घारे असतात. कधी कधी ते डोळे पाहून ' बाबांनो, ते नागकुळातील आहेत. मार्जारवर्गातले नाहीत. ' असे सांगावेसे वाटते. ३. इच्छाधारी बनायची परवानगी फक्त नाग जमातीला आहे. अजगर वगैरेंना इच्छाधारी होता येत नाही. ४. नागांकडे सासरी जाताना मुलीला नागमणी देतात. तो फारच मौल्यवान असतो. जावयाने तो मणी नागिणीसकट सांभाळायचा असतो. बहुतेकवेळा ह्या मण्यामुळे इच्छाधारी नाग जोडीतल्या नराचे प्राण मांत्रिकांच्या हातून गेलेले आहेत. ५. नागाला नैसर्गिक मृत्यू न आल्यास मरताना त्याला मारणार्याची छबी नागाच्या डोळ्यात उमटते. नंतर तिथे ती छबी पाहून नागीण खुन्यांचा तपास लावू शकते. ( उप निष्कर्ष: म्हणजेच कॅमेर्याचा शोध लागण्याआधीही इच्छाधारी नागांनी त्याला पर्याय शोधला होता. तसंही ते कॅमेरा ' हातात ' कसे पकडणार?) ६. नाग मेल्यावर नागिणीला पांढरी वस्त्रे घालावी लागतात. यात फक्त कपड्यांच्या रंगाचे बंधन पाळायचे असते. कपडे ultra modern असू शकतात. ७. नागाचे पुंगीच्या आवाजाने डोके उठते. ( ती एकच ट्यून सतत ऐकून कुणाचेही डोके उठेल.) त्याने ते बरोबर ताब्यात येतात. ' वाटेल ते करतो / ते, पण पुंगी आवर ' हा विचार त्या कृतीच्या मुळाशी असावा. ८. इच्छाधारी नागीण कुणाचेही रूप घेऊ दे, आरशात मात्र ती आपल्या मूळ नागीण रूपातच दिसते. ( हे कालच्या नागीन सिनेमावरून!) ९. नाग हे सतत वळवळतानाच दिसतात. फणा काढला तरच त्यांना स्थिर राहता येते. १०. नाग कुणाकडेही रोखून बघून ( पक्षी: डोळ्यांत डोळे घालून) infrared सदृश तंत्रज्ञानाने माहिती ट्रान्सफर करू शकतात. ( आठवा, निगाहे) ११. नाग नागिणीने एकत्र असताना एखादे तरी गाणे म्हटलेले असते. त्यातला एकजण मेल्यावर उरलेला / ली ते गाणे वेळीअवेळी आळवते. १२. नागिणींना वश करणारे तांत्रिक काळे कपडेच घालतात. दुसरा रंग त्यांना वर्ज्य असतो. १३. आणि कालच्या सिनेमातलं हे एक भलतंच! नागिणीला ओम अक्षराच्या ताईताच्या जवळ जाता येत नाही. अर्रे! ती नागीण आहे, भूत नाही. तिला ओम ची कसली भीती? आता थोडं कालच्या सिनेमाविषयी. रीना रॉय आणि जितेंद्र ही नागकुलीन जोडी. त्यातल्या जितेंद्रचे प्राण सहा लोक घेतात. ( हा भाग पाह्यला मिळाला नाही.) एका जितेंद्रला मारायला सहा लोक????? नागांतला अभिमन्यूच हा... तर अर्थातच जितेंद्रच्या डोळ्यांतली छबी पाहून नागीण त्या सहा लोकांना संपवायच्या कामगिरीवर निघते. बहुधा त्या सहांमधल्या एकाने नागाला मारण्यात फारसा सहभाग घेतला नसावा. म्हणून सहांमधून फक्त तो जिवंत राहणार हे ओघाने आलेच. नागीण पहिले दोघांचा बळी घेते. उरलेले चार मग मांत्रिकाकडून ओम असं लिहिलेले आणि होमाची रक्षा घातलेले ताईत गळ्यात घालून घेतात. नागीण युक्तीप्रयुक्तीने त्यांना ताईत काढायला लावते आणि त्यांचा जीव घेते. प्रत्येक व्यक्तीला मारताना नागीण त्याच्या प्रेयसीचे रूप घेते. आता नेहमी सोज्वळ कपडे घालणारी आपली प्रेयसी एकदम revealing कपडे घालून आलीये आणि उगीचच उन्मादक हावभाव करतीये म्हटल्यावर कळायला हवं ना की ती नागीण आहे म्हणून ( नागीण मूळ नागीण रूपात असताना कपडे घालत नाही म्हणून मनुष्यरूपातही ती कमीत कमी कपडे घालते.) पण छे! माणूस आणि तोही हिंदी सिनेमाचा नायक असला की त्याचा पाय घसरायचाच... नागीण पाच जणांना मारायला फार वेळ दवडत नाही, कारण ती ज्यांचे ज्यांचे रूप घेते त्या सगळ्या ( अनुक्रमे योगिता बाली, मुमताज, रेखा) या फारच गुटगुटीत असल्याने तिला झटपट हालचाल करणे अवघड होत असावे. ( वळवळणे तर दूरच!) शेवटी सुनील दत्त नागिणीला उंचावरून खाली पाडतो तर ती नेमकी टोकेरी कुंपणावर पडते नि मरते. पण मरताना ती रीना रॉयच्या रुपात परत येते आणि आजूबाजूला जमलेली गर्दी ' हे नेहमीचंच आहे ' अशा आविर्भावात त्या नागिणीचे बाईत रुपांतर होणे बघत उभी! रीना रॉय आधी जितेंद्रसोबत असताना तिचे केस एकदम लांब, दाट ( त्यावरूनच मन सिनेमातले ' काली नागिन के जैसी जुल्फ़े तेरी काली काली.. ' हे गाणे आलेय म्हणे!) आणि सिनेमाच्या शेवटी शेवटी एकदम evening gown सदृश ड्रेस आणि केसांचा बॉबकट???? बहुधा बदला घेण्यात गुंतल्यामुळे तिला लांब केसांतला गुंता काढायला वेळ होत नसावा. सहाव्या माणसाला मारायला ती सरळ त्याचं पिस्तुल वापरू बघते. बाई, तुला दात आहेत नं? मग ते वापर की! आणि बदला घेताना रीना रॉयच्या रुपात राहण्याचा अट्टाहास कशाला? नागीणरूपात काम लौकर झालं असतं आणि हालचालीही जलद करता आल्या असत्या. सध्या तरी हे एवढंच नागपुराण माझ्याकडून! आता निगाहे, शेषनाग, नाचे नागिन गली गली बद्दल लिहा कुणीतरी.
|
Monakshi
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्र, कसलं बुंगाट लिहिलं आहेस. जाम धमाल आली. च्यायला आता तो पिक्चर चुकून जरी बघितला तरी तुझं हे पोस्ट मार्टेम आठवून आणखीनच मजा येईल.
|
Zakasrao
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:24 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पहिला भाग पहायला हवा होतास. तो नाग हा नाग रुपात आणि नागिण ही मानव रुपात (रिना रॉय) असते आणि ते गाणे म्हणत असतात.मग तस बघुन कोणालाही असेच वाटेल ना की तो नाग त्या बाइला चावेल. म्हणुन एक जण त्या नागावर गोळी मारतो.(काय नेम आहे सॉलिड. ह्याला ऑलंपिकला का नाही पाठवल??? ) मग ते सगळे ती बाइ कुठे गायब झाली हे पहाय्ला जातात आणी नाग मरता मरता त्यांचे फ़ोटु काढतो (सगळ्यांचे क्लोज अप बरका. आणि विथ digital zoom ) असा आहे तो सुरवातीचा रोमहर्षक भाग.
|
Itgirl
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:25 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मोनाला अनुमोदन!! हापिसात हसत सुटले वाचता वाचता मस्तच जमलय श्रद्धा!!
|
Psg
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:30 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बदला घेण्यात गुंतल्यामुळे तिला लांब केसांतला गुंता काढायला वेळ होत नसावा.
जबरी लिहिलं आहेस.. तुझे टीपिकल पंचेस आहेत. मस्त!
|
Swa_26
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:35 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुफान लिहिलयस गं श्र!! ![](/hitguj/clipart/lol.gif)
|
Kandapohe
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:49 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्र!! नेहेमीप्रमाणेच जबरी! मजा आली. ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Rajya
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:57 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे काय काय लिहिता ![](/hitguj/clipart/lol.gif) ![](/hitguj/clipart/rofl.gif) ![](/hitguj/clipart/lol.gif) ![](/hitguj/clipart/rofl.gif) ![](/hitguj/clipart/lol.gif) हे असं सुचतं कसं म्हणतो मी श्र, साॅलिड आहे!!!
|
श्र.. मार डाला... आयला मार डाला..
|
Princess
| |
| Tuesday, September 11, 2007 - 1:22 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आई ग.. काय धम्माल लिहिलय. सॉलिड मज्जा आली. तो सिनेमा सारखा झी सिनेमा वर लागत असतो. त्यामुळे पाहुन पाहुन पाठ झालाये. तुझे हे लिहिलेले वाचुन सगळा पिक्चर पुन्हा एकदा पाहिला.
|
वा वा श्रध्दा मजा आ गया.....लगे रहो
|
Amruta
| |
| Tuesday, September 11, 2007 - 2:20 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ओ हो ओ ओ हो ओ तेरे संग प्यार मै नही छोडना हेच गाण आहे न ते? बाकी जबरी लिहिलय
|
Mahaguru
| |
| Tuesday, September 11, 2007 - 2:31 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चांगले लिहले आहे. नागिन,नगिना / निगाहे वगैरे चित्रपटातील स्पेशल नागिन डान्स मुळे तमाम जनतेला गणपतीच्या मिरवणुकीत नाचायला एक स्टाईल मिळाली. ही नाग वाल्या चित्रपटाकडुन मिळालेली सामाजिक देणगी आहे.
|
Maitreyee
| |
| Tuesday, September 11, 2007 - 2:31 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि तो नागपट कोणता, 'आयी रात मिलन की' की असाच काहीतरी त्यात सही आयडिया आहे. कसल्याश्या शापाने त्या जोडीची कायम चुकामूक! रात्री तो नाग अन ती बाई अन दिवसा ती नाग अन तो माणूस!! कुणाला कुणाचा उपयोग नाही ![](/hitguj/clipart/lol.gif)
|
Maanus
| |
| Tuesday, September 11, 2007 - 2:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वाटेल ते करतो / ते, पण पुंगी आवर ![](/hitguj/clipart/proud.gif)
|
Shyamli
| |
| Tuesday, September 11, 2007 - 3:14 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मैत्रेयी ![](/hitguj/clipart/lol.gif) श्र, सही पोस्टमार्टम येकदम झक्कास आमिर खानचा पण एक मुव्ही होता असलाच काही तरी
नाव नाही आठवत नाव सापडवलं "तुम मेरे हो" अती भयंकर होता पण आमिरसाठी पाह्यला होता त्यावेळी
|
Mbhure
| |
| Tuesday, September 11, 2007 - 3:52 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्रध्हा, Too Much . फक्त एव्हढेच विचारायचे आहे, की आधी नागिन आता हा चित्रपट...... तू ईच्छाधारी वगैरे... वाटल्यास आणि जमल्यास तुझे आग वरील विचार वाचण्याची ईच्छा आहे. जेंव्हा शोले आला होता त्यावर्षी आवाज ह्या दिवाळी अंकात त्याची सही खिल्ली उडवलेली होती.
|
Aashu29
| |
| Tuesday, September 11, 2007 - 6:06 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
एकदम श्र शैली!! काय मज्जा आलि वाचुन!! श्र, तुझ्यासारखे लोक जगात असतान हसण्याला काय तोटा?
|
Prajaktad
| |
| Tuesday, September 11, 2007 - 6:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आजूबाजूला जमलेली गर्दी ' हे नेहमीचंच आहे ' अशा आविर्भावात त्या नागिणीचे बाईत रुपांतर होणे बघत उभी! >>>> खि खि खि.![](/hitguj/clipart/rofl.gif) ![](/hitguj/clipart/rofl.gif) ![](/hitguj/clipart/rofl.gif) ...श्र तुफ़ान लिहलयस...जाम हसले..
|
Tulip
| |
| Tuesday, September 11, 2007 - 7:57 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कारण ती ज्यांचे ज्यांचे रूप घेते त्या सगळ्या ( अनुक्रमे योगिता बाली, मुमताज, रेखा) या फारच गुटगुटीत असल्याने तिला झटपट हालचाल करणे अवघड होत असावे. ( वळवळणे तर दूरच!) >> full hhpv .. सही लिहिलय मैत्रेयी
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|