Swa_26
| |
| Monday, June 11, 2007 - 6:48 am: |
| 
|
अरे त्या झी वरच काल 'इंद्र द टायगर' नावाचा डब केलेला पिक्चर होता.... आयला हसुन हसुन मरायची वेळ!! एक न दोन... सगळा पिक्चरच अचाट आणि अतर्क्य...
|
बरोबर. ती हिरॉईन त्याचे प्रेम नाकारते तर तो ultra romantic रेमो बनून तिला फुले वगैरे पाठवतो असे काहीतरी आहे. एरवी अंबी, हिरॉईनवर imp पाडताना रेमो, गुंडांना मारताना अपरिचित. या माणसाला योग्य त्या वेळी योग्य ते रूप घेता आले म्हणजे मिळवली. 
|
>> या माणसाला योग्य त्या वेळी योग्य ते रूप घेता आले म्हणजे मिळवली. हो ना. पण तमिळ पिक्चरमधे प्रॉब्लेम नसेल येत. आपल्या विनोदी (म्हणजे बावळट) हीरोंची(पहा दादा कोंडके, लक्ष्या, अशोक सराफ आणि आता भरत जाधव) परंपरा असलेल्या मराठी चित्रपटांत नक्की हिरॉईनच्या बापासमोर हीरोचे केस (चुकून) सुटून कुरळे झाले असते. सखे त्या राणी, प्रिती, सलमान कृत(अभिनीत म्हणवत नाहीये.) चित्रपटात मला वाटते राणी खोटी खोटी गरोदर असते गं. म्हणून तिला चालत असेल. हे एक अजून! अख्खं ओटीभरण होतंय तरी घरच्या पोक्त्यापुरवत्या बायकांना कळत नाही की स्वतःची सून खरोखर गरोदर नाहीये ते.
|
Sakhi_d
| |
| Monday, June 11, 2007 - 10:37 am: |
| 
|
>>राणी खोटी खोटी गरोदर असते>> आधी राणीच गरोदर असते पण ती "नेमकी" पोटावरच पडते आणि मग नेहमीचा प्रकार घडतो. नंतर ती खोटी खोटी गरोदर दाखवली आहे. अरे अख्या ओटीभरणामधे घरात कोणालाही कळत नाही आपण जीची ओटी भरतोय ती आपली सुन नाही म्हणुन...
|
त्या दक्षिणेकडिल पिक्चरमधे सगळ्यात height म्हणजे त्याचे केस. ठिक आहे केस समोर येतात कुरळे होउन पण म्हणुन काय क्यामेर्यासमोर केस लावायचे???माझ्या तमिळ मित्राची त्या क्यामेर्यासमोरिल केसांवरुन खुप खेचलेली होती २ वर्षांपुर्वी. त्या फ़िल्ममधे matrix चे सर्व सीन आहेत. १०० वगैरे गुंड येतात कराटेवाले आणि त्यांना तो हिरो आपल्या 'निओ' प्रमाणे बडवतो.
|
Disha013
| |
| Monday, June 11, 2007 - 5:30 pm: |
| 
|
महागुरु, सही ट्रेलर! क्क्स्द क्क ज्न्ज्न्म न्न ज्ज स्क्न्ज्न
|
Mbhure
| |
| Monday, June 11, 2007 - 10:27 pm: |
| 
|
थोडे विषयांतर्; पण अचाटच वीकएंडला सा रे ग म विश्वयुध्द (नावतच अचाट आणि आर्तक्त)पाहिले. त्यात " महान " गायक उस्ताद हिमेश रेशमियाँची गाणी हा विषय होता. प्रत्येक स्पर्धकाचे गाऊन झाले की खुददस्तुर उस्तादजी (वाचताना देखिल दोन्ही कानांना हात लावून मान देणे)विषेश टिप्पणी करायचे. त्यातीलच एकः " मेरा गाने का तरीका बहोत ही अलग और अजिब है. वोह जितना लगता उतना आसान नही है.... " मी चॅनेल बदलला.
|
पुढे ऐकायचं ना हिमेश वर असं पण म्हणाला की 'कुछ लोग कहते है नाक से गाता है कुछ लोग कहते है पता नही ये कहॉंसे गाता है ये 
|
Balaram
| |
| Tuesday, June 12, 2007 - 12:32 am: |
| 
|
काही वर्षापुर्वी मिथुनचा एक चित्रपट आला होता, त्यात एका (तुफान) हाणामारीमधे मधे खलनायकाचा माणुस ह्याच्यावर गोळी मारतो.. पण ह्याच्याकडे फ़क्त एक चाकु असतो..... नन्तर काय होते ते सगळ्यानाच माहीत आहे.. (कोणाला त्या चित्रपटाचे नाव आठवते का?)
|
Mansmi18
| |
| Friday, June 15, 2007 - 4:00 pm: |
| 
|
हिन्दी सारेगमप मधे मला अतिशय वाइट वाटले कि त्यानी हिमेश, इस्माइल याना एक पुर्ण अपिसोड दिला आणि खैयाम आणि राजेश रोशन याना सन्युक्त एक एपिसोड दिला त्यातही खैयाम साहेबान्चे फ़क्त एक गाणे म्हटले. कोणी अमुल वॉइस ऑफ़ ईन्डिया पाहता का? त्यावर जरा बरे गायक असतात.
|
Sas
| |
| Friday, June 15, 2007 - 5:13 pm: |
| 
|
Full n Final = अ. सी. आ. लो. मध्ये मध्ये थोडे फार विनोद जमलेत, आपल्याला डोक आहे हे विसरुन पहावा 
|
Tukaram
| |
| Tuesday, June 19, 2007 - 3:41 pm: |
| 
|
कुमार सानु अलका च्या प्रोग्राम ला कुणी जाणार आहे का कुपरटीनो मधे शुक्रवारी?
|
Vatrat
| |
| Wednesday, June 20, 2007 - 9:21 am: |
| 
|
तुकाराम, तो काय अतर्क्य आणि अचाट प्रोग्राम आहे काय?
|
Farend
| |
| Monday, July 02, 2007 - 5:48 am: |
| 
|
हा चित्रपट वास्तविक या बीबी वर येत नाही, पण नेहमी बघताना मला हा संवाद खटकतो... जेव्हा Titanic मधे कप्तानाला कळते की ते नक्की बुडणार तेव्हा तो त्याच्या साहाय्यकाला विचारतो "how many on board?" नवीन बांधलेल्या जहाजाची इंग्लंड हून अमेरिकेला पहिली ट्रीप, प्रचंड गाजावाजा झालेला असे असताना कप्तानाला जहाजावर किती लोक आहेत हे माहीत नसेल? पण मला आवडणारा दुसरा डायलॉग म्हणजे British Royal लोकांचा स्वभाव अचूक दाखवणारा " are the life boats being seated according to the class? "
|
farend, Titanic काल TBS वर पाहिला कि काय?
|
Farend
| |
| Monday, July 02, 2007 - 10:45 pm: |
| 
|
Rani_2007 हो बरोबर त्यामुळेच एकदम हे आठवले.
|
Asmaani
| |
| Sunday, July 08, 2007 - 11:29 am: |
| 
|
चित्रपट, जुना डॉन. प्राण दोन मुलांना घेउन दोरिवरुन चालत जातो. त्याचे balancing वगैरे अफलातून आहेच पण प्रश्न असा आहे की एका बाजूला दोरीचे टोक प्राण स्वत्: बांधतो. पलीकडचे टोक कोण बांधते?
|
Slarti
| |
| Sunday, July 08, 2007 - 12:06 pm: |
| 
|
त्या दोरीवरुन चालत जाऊन तो स्वतःच बांधतो...
|
Sush
| |
| Monday, July 09, 2007 - 6:25 am: |
| 
|
नाहि, तो पहिल्यान्दा anchor फेकतो (त्याला anchor म्हनतात ना???) समोरच्या building वर. नन्तर त्या दोरिवरुन चालत जातो बहुधा.
|
रजनिकांत आणि न्युटन च्या आत्महत्या चा संबध कसा जोडला आहे Why Newton Committed Suicide?
|