|
Peshawa
| |
| Friday, April 27, 2007 - 5:38 pm: |
| 
|
बर्याच्वेळेस काही घटना भयपटातील घटनांसारख्या अनुभव देउन जातात. आणि कितीही तार्कीक विचार जोपासणारे असलो तरी क्वचित वेळा आपला विश्वास हलवून सोडतात कींवा भयाची नव्याने जाणिव करून देतात. अशा छोट्या मोठ्या रामसे moments साठी हा BB आहे ------------------------------------------ माझा कालचा अनुभव... रात्रि बेरात्रि काम उरकून घरि जाणे नित्याचे आहे. काल देखील पहाटेच्या दोन वाजता घरी जायला निघालो. नेहमीसारखी SP ground इतक्या मोठ्या पार्कींग लॉट वर माझी गाडी एकटी उभी होती. Tom Cruse च्या वॅनेला स्काय ह्या चित्रपटा सारखे शहराच्या निर्मनुश्य रस्त्यावर एकट्याने उभे असणे किंवा रात मधल्या रेवती सारखे खेडेगावात एकटे असणे हा अनुभव तर रोज ह्या वेळेस ह्या गावत त्यातुनही जास्त ह्या university मधे मिळतो... आख्या department मधे माझ्या शिवाय कोणीच नाही झाडलोट करून जानीटर मण्डळी गेलेली आहेत आणि नेमका अशावेळेस माझ्या लॅब मधला airconditioner electronic कोल्हेकूई वाटावा असा आवाज करायला लागतो. चार cubicals सोडुन असलेल्या cubicals मधून खुर्ची हलल्यासारखा आवाज येणे हे तर नित्याचे... ह्या आवाजानी पहील्यांदा दिलेले शहारे अजुनही स्मरणात आहेत...(मी उठुन तिथे कोण आहे का ह्याची खातर्जमा करुन घेतली होती) गाडी घेउन गॅस भरून निघालो होतो. तेंव्हा मागून येणारी काळी मोटर (मामाची नक्कीच नव्हती) माझ्या मागे येतेय असा मला संशय आला. म्हणुन मी एका गल्लित गाडि वळवली आणि माझा संशय खरा ठरला त्यानंतरची पुढची प्रत्येक गल्ली ती गाडि मला follow करत राहीली खरेतर त्याला सगळे गाव हिंडवायचा विचार मनात आला होता मी मझी गाडि पुन्हा department कडे आणली आणि ह्या ठिकाणि ती गाडि थांबली rear view मधुन बघताना जाणवले ती एका रस्त्याच्या फ़ाट्यावर "आता ह्याला follow करु का नको" ह्या विचारत असल्या सारखी एखद मिनीट उभी होती आणि मग ती निघून गेली... अर्थात तो " साध्या गाडितला मामा " होता अशी स्वत्:ची समजूत मी काढली पण इतक्या बेरात्रि निर्मनुश्य रस्त्यावरून तुम्हाला कुणितरी काटेकोर follow करते होते हे feeling घेउन मी घराकडे निघालो. कुणी पाठलाग करणे (तसे वाटणे) ही काही फ़ारशी रामसे moment म्हणता येणार नाही पण ह्याच गोष्टिचा विचार करत घरी पोचलो. स्वयम्पाकाची तायरी केली आणी common kitchen मधे जाउन microwave मधे भात लावला. पुन्हा room वर आलो. लक्षात आले की बाथ्रूम मधे पंख्याच्या आवाजा व्यतिरिक्त अजुन कसला तरी आवाज येतोय.... नळ full force मधे चालू होता तो घट्ट बंद केला आणी भात झाला का हे बघायला परत common kitchen मधे जाऊन आलो. ( kitchen common असल्याने दुसरीकडे आहे). घरी आलो आणि पुन्हा लक्शात आले बाथ्रूम मधून पुन्हा फ़ॅन बरोबर नळाचाही आवाज येतोय this was my रामसे moment बाथरूमचे दार उघडले तर जो नळ मगाशी मी घट्ट बंद करून गेलो होतो तो पुन्हा full force मधे चालू होता... कसा? मी पुन्हा नळ बंद केला आणि तो पुन्हा कधी चालू होतोय ह्याची वाट पहात बसलो :-) पण ही वाट पहाताना झोप कधी लागली ते कळाले नाही... अर्थात ह्याला अनेक logical explanations आहेत जि मी स्वत्:ला दिली पण ती moment अनुभवताना suddenly झालेली भीतीची जाणिव काही औरच होती...
|
Gs1
| |
| Saturday, April 28, 2007 - 7:50 am: |
| 
|
तरी सांगत होतो उगाच बापूंची चेष्टा करू नकोस.. आभोआकफ
|
अरे, असं काहीतरी नको रे बोलू. मी एकटी राहते. उगाच घाबरवू नका मला.
|
Giriraj
| |
| Saturday, April 28, 2007 - 9:38 am: |
| 
|
पेशव्या,अभिनंदन रे.. इतकं सगळं समजेल इतपत देवनागरीत लिहिलेस त्याबद्दल! नाही तर खुपदा तुझे देवनागरी वाचणे हाच एक 'रामसे अनुभव' ठरतो! नंदिणी,नामस्मरण करत जा ना मग!आणि स्मरत नसेल तर लिहून काढ किमान हजार वेळा.. चल लिही.. 'गिरी'... }
|
Sakhi_d
| |
| Saturday, April 28, 2007 - 10:07 am: |
| 
|
>>चल लिही.. 'गिरी'... >> नंदिनी हे लिहिताना गिरु नकोस म्हणजे झालं..... पेशवा छान लिहिले आहेस... पण जरा तु लढवलेली लोॅजिक पन सांग ना. मजा येईल...
|
maajhyaa baapaache naam vaheet lihile ki kitti bare vaatate mhanun saangu. tumhi pan asech lihat raha aani parat asech bhetat raha adani maanasache aiku naka. maajhaa 100 sqftcha flat aahe.. to he dharavesarakhya thikani,,, samajale? >>>>>>>>> गिरी, हा घे माझा रामसे अनुभव.
|
वीज गेल्यावर मी अंधारात एकटाच बसतो. एकांताचं जितकं आकर्षण तितकीच भीति सुद्धा. घरी एकटा असतांनासुद्धा मला कित्येक वेळा अशावेळी शेजारी कुणितरी असल्याचं जाणवलंय. भीती वाटतेय, पण त्या अज्ञाताशी पंगा नको म्हणून तसाच बसून राहिलोय. हाॅस्पिटल्स च्या माॅर्च्युअरीज़ जवाळ पण अपल्याभोवती कुणीतरी वावरत असल्याचं जाणवलंय. हीच जाणीव देवळात, किंवा कधी एकटा देवघरात असलो तरी झालीय. अंधाराचीच गंमत्- व्हायोलिन वाजवत असताना वीज गेली, तर मी 'कहीं दीप जले कहीं दिल' 'काजल रातीनं ओढून नेला' किंवा 'झी हाॅरर शो' ची सिग्नेचर ट्यून वाजव्तो आणि आईचा ओरड खातो! ;)
|
Bsk
| |
| Saturday, April 28, 2007 - 5:05 pm: |
| 
|
माझा नेहमीचा रामसे अनुभव! झोपताना खोलीचे दार जर पुर्ण लोटले नसेल,तर त्या फटीतून दिसणार अंधार पाहून मला कायम असा भास होतो, की तिथे कुणी काळा-कुट्ट माणुस उभा आहे.. आणि खूप भिती वाटायची.. आता सवय झाली... अजूनही आठवून लिहीन... रामसे मोमेंट्स कायमच येत असतात!!
|
Sush
| |
| Monday, April 30, 2007 - 6:32 am: |
| 
|
माझाहि एक अनुभव्; असेन साधारण मी १२-१३ वर्षाॅची. आम्हि ३ र्या मजल्यावर रहायचो. एकदा एका मध्यरात्रि मी उठले आणि मेन डोअर ओपन करुन बाहेर जाउ लागले. कारण दिवाण दारपाशीच ठेवला होता. मी पहिल्या मजल्यावर आल्यावर कोणितरि पठिमागुन माझ्या खान्द्यावर हात ठेवला. मी दच्कुन जागि झाले. मग कळाले कि मी झोपेत चालत चालत १ ल्या मजल्यावर आले होते. पण मग माझ्यामागे कोण होत? अजुनहि आठवतो तो अन्गावर आलेल शहारा. पण मागे पहायचा धीर होत नव्हता. मग ओळखिचा आवाज आला थोडा धीर केला आणि मागे वळुन पाहिले तर माझी आई उभी होती. खरतर आई त्याचवेळी जागी झाली होती. आणी माझ्या मागे आली होति मी कुठे निघले म्हणुन. नन्तर कित्येक दिवस आमच्या दाराला आई खुर्च्या लावायची. कोण जणो परत झोपेत मी कुठेतरि चालत जायची. दरवेळि थोडिच आईला जाग येणर
|
Monakshi
| |
| Monday, April 30, 2007 - 10:59 am: |
| 
|
मी एकदा रात्री टि.व्ही. बघत होते. एकटीच घरी होते. नवरा टूरवर गेला होता. एच.बी.ओ वर कुठलातरी हॉरर पिक्चर लागला होता, एक भयानक सीन चालू होता आणि अचानक माझी ख़िडकी थरथरायला लागली. कसली घाबरले मी! ताड्कन उठून बसले. मग लक्षात आलं की कुठेतरी जोराने म्युझिक लावले होते आणि त्याच्या इफेक्ट मुळे ख़िडकी थरथरत होती. नंतर रात्री बराच वेळ झोपच आली नाही.
|
Shrini
| |
| Wednesday, May 02, 2007 - 7:10 am: |
| 
|
interesting... माझेही दोन अनुभव : मी एकदा रात्री कुशीवर झोपलो असताना, दोनच्या आसपास, माझ्या खांद्यावर कुणीतरी 'टकटक' केलं होतं, एखाद्या पाठमोर्या व्यक्तीचं लक्ष वेधून घ्यायला आपण करू तसं... मी वळून पाहीलं तर कुणीच नव्हतं... मग कितीतरी वेळ मला झोप आली नाही... दुसरा अनुभव : पेशव्या सारखाच मी ही रात्री २ ला काम आटोपून घरी जायला निघालो होतो. घरी जायचे दोन रस्ते होते, एक निर्जन आणि एक गावातून. मी गावातला रस्ता घेतला होता. साधारण निम्मे अंतर आलो असेन, तेव्हा माझ्या डोळ्यासमोरचे दृष्य पाहता पाहता बदलले आणि तिथे तो निर्जन रस्ता आला. आता हा निर्जन रस्ता सरळसोट होता, आणि गावातल्या रस्त्याला वळणे होती. मी गाडी कडेला घेऊन थांबवली, २ एक मिनिटे शांत बसलो. तोपर्यंत अर्थात सगळे ठीक झाले होते. मग गाडी सुरु करून घरी आलो. समजा मी त्या वळणाच्या रस्त्यावर सरळ गेलो असतो तर एखादा मोठा अपघात अटळ होता...
|
Sakhi_d
| |
| Wednesday, May 02, 2007 - 8:31 am: |
| 
|
माझाही एक अनुभव.... असेच एकदा मी आणि माझा नवरा एकमेकांच्या समोर बसलेलो. अचानक जाणावले की आपल्या मधुन कोणीतरी गेले म्हणुन. त्याला विचारले तर आधी तो नाही म्हणाल पण नंतर त्याच्या मित्राला सांगताना मी ऐकले. त्यानंतर कितीतरी दिवस मला तिथे बसायची भिती वाटत होती...
|
Samrya
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:21 pm: |
| 
|
पेशव्या, jara changli pustaka vaachat ja re, ata tari :-) असेच एकदा मी आणि माझा नवरा एकमेकांच्या समोर बसलेलो.>> mala vaatle hya pudhe tu lihinaar "hach majha ramse moment" :-D
|
Me_sakhi
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:26 pm: |
| 
|
माझ्या या अनुभवाला रामसे moment नाहि म्हणता येणार कदाचित.पण तरिहि सांगते...........! ९७सालच्या मे महिन्यातिल घटना आहे.माझ्या दिराने नाट्यस्पर्धा आयोजित केली होती ज्याचे परीक्षक पुण्याहुन यायचे होते. ज्या दिवशी ते येणार होते त्यादिवशी दिवस मावळत आला तरी त्यांचा काहिच पत्ता नव्हता. पुण्याला फोन केला असता ते ठरलेल्या वेळेस ठरलेल्या गाडीने निघाल्याचे सांगण्यात आले.शेवटी रात्री ८ वाजता त्यांचे आगमन झाले. घरात आल्यावर मी त्यांना दिवाणखान्यात बसवुन पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेले.बाहेर आले तर त्यांच्यापैकी ज्या बाई होत्या त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता समोरच्या भिंतिवर असलेल्या फोटोकडे त्या एकटक बघत होत्या.मला काहिच कळेना.मी त्यांना पाणी दिल्यावर त्यांनी फोटोकडे बोट दाखवुन हे कोण असे विचारले?माझ्या सासर्यांचा फोटो असुन ते आता हयात नाहित असे मी त्यांना सांगितले.ते ऐकुन त्या एकदम अवाक झाल्या. मी एकदम बुचकळ्यात पडले...................!शेवटि न रहावुन मी काय झाले तुम्ही असे का विचारताय मला?असे म्हणाले असता त्यांनी मला जे सांगितले ते ऐकुन मला देखिल आश्चर्य वाटले. त्या मला म्हणाल्या गाडीला घाटात उशिर झाल्यामुळे गावात पोहोचायला रात्रा झाली आणि आम्ही गावाची काहि माहिति नसताना चुकुन एस टि स्टॅड वर न उतरता चुकुन गावाबाहेरच्या रस्त्यावर उतरलो.समोर मिट्ट काळोख़ होता.कसे तरी अंधारातुन वाट काढत आम्ही मुख्य रस्त्याला लागलो.तिथे एक वयस्कर गृहस्थ आम्हाला भेटले.आम्ही त्यांना तुमचे नाव व पत्ता विचारला असता ते दाखवतो म्हणाले आणि आंम्हाला त्यांच्या मागुन येण्यास सांगितले. आम्हि त्यांच्या मागुन चालत राहिलो. अंधारातुन बराच वेळ चालत राहिलो तुमच्या घराजवळ आल्यावर त्यांनी घराकडे बोट दाखवत हेच घर असे सांगितले, त्यांचे आभार मानुन आम्ही इथे आलो. घरात प्रवेश करत असताना मी मागे वळुन बघितले तर ते गृहस्थ तिथे नव्हते. आणि आत येवुन स्थिरावतेय नाही तर या फोटोवर नजर गेली...................... मला तर काहिच कळेना कारण त्यांच्या बोलण्याचा मला संदर्भच लागत नव्हता. माझ्या चेहर्यावरिल प्रश्नचिन्ह बघुन त्या म्हणाल्या कि अहो! ज्यांनी आंम्हाला तुमच्या घरी आणुन सोडले ते हेच गृहस्थ होते. माझा क्षणभर विश्वास बसेना. पण ते सत्य होते. आज इतक्या वर्षांनंतरही मला माझ्या सासर्यांचे अस्तित्व त्या घरात नेहमीच जाणवते. सखि"
|
Chyayla
| |
| Thursday, May 03, 2007 - 3:09 pm: |
| 
|
पेशवा सहीच, मस्त थरारक गोष्टी वाचायला मिळायला असो माझा पण हा भारतातला किस्सा... मी सावनेरजवळ मन्गसा नावाच्या जवळ निर्जन ठिकाणी एका टेक्स्टाईल मील मधे सुपरवाईजर होतो. मशिनीत काही बिघाड झाला तर रात्री बेरात्री कधीही बोलावण यायच. तिथेच २ किलोमीटर दुर कम्पनीच्या क्वार्टरमधे रहायचो माझ्या अख्या बिल्डिन्गमधे पुश्कळदा मीच एकटा भुतासारखा रहायचो कारण ईतर मित्र कामावर किन्वा नागपुरला गेलेले, पण असल्या गोष्टीन्चा कधी विचार वा भिती डोक्यात नव्हती आली. या बिल्डीन्गपासुन मील पर्यन्त पैदलच जायचो रस्त्याच्या दुतर्फ़ा झाडी शेते पुर्णता निर्मनुश्य, खरे म्हणजे खडबडीत गावातली पायवाट. (रामसे सीन) एका रात्री असाच २ वाजताच्या सुमारास निरोप आला एक मशीन मधे बिघाड झालाय लवकर पोहोचा. मी डोळे चोळत कपडे घालुन निघालो मला त्याची सवय पण होती कित्येकदा रात्री बेरात्री एकटे जायला झोपायला कधीच काही वाटत नव्हते. तर त्या रात्री गडद अन्धार अमावस्या असावी पाउस नुकताच पडुन गेलेला त्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचलेले सोबत बेडकान्चा ओरडा. मधुनच वीज चमकुन जायची शिवाय माझ्या कडे टॉर्च पण नाही व पायवाटेवर कसले आले दीवे. पण रस्ता पाठ असल्याने काही अडचण नव्हती. गेटच्या बाहेर पडल्या बरोबर थोड्याच वेळात वीजेच्या लखलखाटात एक सर्पराज रस्त्यावरुन लगबगीने पार होताना दीसले ते सर्पही सवयीचे झालेले. ईथपर्यन्त सगळ ठीक होते. अर्ध्या रस्त्यावर पोचलो आता क्वार्टरही दुर व मीलपण दुर होती, कोणीच आजुबाजुला नाही कदाचित मीच भुतासारखा एकटा शान्तपणे जात होतो.. आणी अचानक... एक मोठा भयन्कर आवाज माझ्या डाव्या बाजुनी आला घुSSSS... मी अक्षरषा: १ मिनीट तिथेच थीजलो, सिनेमात, पुस्तकात भयकथान्मधे भीतीने शहारुन जाणे म्हणजे काय असते त्याचा पुर्ण अनुभव आलेला. हे काय? म्हटल आज आपली भुताशी गाठ आहे म्हटल. मी खुपच म्हणजे साहसाची परमसीमा गाठुन धीर एकवटुन डाव्या बाजुला वळुन पहायचे ठरवले आणी वळलो, त्या गडद अन्धारात शेतामधे काहीच दीसेना मी पहातच राहीलो म्हटले हा आवाज कशाचा? आणी तित्क्यात तोच आवाज परत आला आणी रस्त्याच्या कडेला एका तुटलेल्या झाडाच्या खोडावर एक पीन्गळा बसलेला दीसला व वीजेच्या लखलखाटात खात्री पटली व आवाजाच रहस्य समजले. व स्वताशीच हसत पुढच्या रस्त्याला लागलो. बस या नन्तर अजुन तरी असले रामसे मोमेन्टस आले नाहीत.
|
Parya
| |
| Thursday, May 03, 2007 - 3:14 pm: |
| 
|
हा आमच्या एका ओळखिच्या डॉक्टरांनी सांगितलेला प्रसंग, अतर्क्य असा आणि पुण्यातच घडलेला. एके दिवशी सकाळी ९.०० च्य सुमारास नेहेमि येणार्या पेशंट्स पैकी एक आजीबाई आल्या आणि त्यांना म्हणाल्या की त्यांच नातू खूपच आजारी आहे आणि डॉक्टरांनी शक्यतो घरिच तपासायला यावे. दवाखान्यात खुपच गर्दी होती, त्यामुळे डॉक्टरांना लगेच जाणे शक्य झाले नाही. परत त्याच आजीबाई १०.३० च्या सुमारास परत आल्या, तरिही थोडे पेशंट्स राहिले होतेच, त्यामुळे डॉक्टरांना ते पेशंट्स आटोपुन त्या घरी जायला ११.१५ झाले. जेव्हा ते त्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घराबाहेरच गर्दी दिसली. त्यांना वाटले कि त्यांना तेथे पोहोचायला उशिर झाल्याने बहुदा त्या नातवाचेच काही बरे-वाईट झाले असणार. त्यांनी घरातल्या माणसांना सांगितले कि आजीबाई सकाळीच २ वेळा येवुन गेल्या मात्र डॉक्टरांनाच यायला उशिर झाला. ती माणसे आता डॉक्टरांकडे चक्रावुन बघू लागली. हे बोलणे चालु असतानाच डॉक्टर आत गेले आणि आता हबकण्याची पाळी डॉक्टरांची होती कारण ती मृत व्यक्ती बाकी कोणी नसून स्वत: आजीबाई होत्या. मग घरातल्या व्यक्तींनी सांगितले कि नातू कालपासुन आजारी होता हे खरे आहे, मात्र आजीबाई सकाळी ८.०० लाच गेल्याने कोणालाही त्याला डॉक्टरांकडे नेणे जमले नाही. हा किस्सा अनेक वर्षांपुर्वी घडला, मात्र तरिहि आज तो सांगताना त्यांच्या अंगावर काटा येतो. त्यांचा स्वत:चा भूत-प्रेतावर विस्वास नाहिये, मात्र तरिही ते स्वत: हा प्रसंगाचे स्पष्टीकरण देवू शकत नाहीत.
|
Uchapatee
| |
| Thursday, September 06, 2007 - 8:32 am: |
| 
|
माझी ही पहिलीच पोष्ट आहे. चू. भू. द्या. घ्या. त्या वेळी मी कॉलेज शिक्षणाकरिता होस्टेल वर रहात होतो. पहिल्या सत्राची सुट्टी संपून जेमतेम आठवडा झाला होता. शनीवारचा दिवस होता. दुपारी गावातल्या नातेवाइकांच्या घरी त्यांना भेटण्यास गेलो. त्यांच्या घरी यशवंत रांजणकरांचे एक पुस्तक वाचनालयातून आणलेले होते. मला भूतकथा, गूढकथा, कूटकथा इ. वाचायला खूपच आवडायचे. नारायण धारप, यशवंत रांजणकर, रत्नाकर मतकरी इ. आवडते लेखक. परत येताना दोन दिवसात परत करण्याच्या बोलीवर पुस्तक होस्टेलवर वाचायला आणले व होस्टेलवर आल्याआल्या पुस्तक वचावयास सुरूवात केली. पुस्तक अर्धवट वाचून झाले तोच दुसर्या होस्टेलवर रहाणारा मित्र आला. दुसर्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने तो रात्री माझ्या रूम वर रहाण्याचा प्लॅन करूनच आला होता. पुस्तक अर्धवट सोडायचे जिवावर आले होते पण इलाज नव्हता. संध्याकळी मित्र व होस्टेल वरील ग़ॅंग बरोबर भरपूर टवाळक्या केल्या आणी नेहेमीच्या वेळेवर म्हणजे रात्री 11:30 च्या सुमारास झोपायला आलो. शेवटच्या वर्षाला असल्याने सिंगल रूम मिळाली होती त्यामुळे खोलीत आम्ही दोघेच. मी पलंगावरती व तो खाली गादी घालून अशी व्यवस्था केली आणी आडवे पडलो. संध्याकाळी अर्धवट राहीलेले पुस्तक झोप येउ देइना. मित्राला तशी कल्पना देउन मी पुस्तक उचलले आणी रात्री 12 पर्यंत संपवूनच झोपलो. मित्र आधिच झोपला होता. त्या पुस्तकात एक गोष्ट होती, नाव काहीतरी पंजा/वैरी किंवा सूड असे असावे (आता नीट आठवत नाही). गोष्ट सधारणपणे अशी. नायक एका श्रीमंत पण विक्षिप्त म्हातार्याला भेटतो. तो म्हातारा त्याला आपल्या जवळील जमवलेल्या चित्रविचित्र गोष्टी दाखवतो. त्या मध्ये एक शिसवी पेटी असते. पेटीत एक मनगटा पासून तोडलेला मानवी पंजा असतो. पंज्याच्या तळहातातून एक खिळा आरपार ठोकून तो पंजा पेटीच्या तळाशी जखडलेला असतो. म्हातार्याच्या म्हणण्या नुसार तो त्याच्या हाड्वैर्याचा असून म्हातार्याचा सूड घेण्यास टपलेला असतो. नंतर तो पंजा निसटतो आणी म्हतार्याचा जीव घेतो. सूड पंजाने घेतला हे नायकाला रिकाम्या पेटी वरून कळते. ग़ोष्टीत पंजाची काळी वाळकी बोटे, वाढलेली नखे, बोटांची सूक्ष्म वळवळ व पेटीतून निसटल्या नंतरची खेकड्या सारखी चाल यांचे वर्णन अगदी मनाची पकड घेणारे होते.
|
Uchapatee
| |
| Thursday, September 06, 2007 - 8:40 am: |
| 
|
त्या रात्री दीड-दोनचा सुमार असेल. सर्व होस्टेल गाढ झोपेत होते. मला खोलीच्या दारावर काही तरी खरवडल्या सारख्या आवाजाने जाग आली. दारा खालच्या फटीतून बाहेर कशाची तरी सावली हलल्या सारखे दिसले. नीट निरखून बघतोय तोपर्यंत पंजा (तोच तो) दाराखलच्या फटीतून सरपटत आत आला. माझी सॉलीड तंतरली. मित्राला जागे करावे म्हणून मी त्याला “अरे उठ, तो बघ पंजा” असे काही बाही ओरडायला लागलो. पण तोंडातून शब्द फुटेना. तो पर्यंत लक्षात आले की पंजा भिंतीच्या कडेने माझ्याच पलंगाकडे येत आहे. मी “वाचवा - धावा” असे ओरडायला लागलो. मधेच पंजाला “अरे पण मी काय केले?, मला का मारतोस?” असेही ओरडत होतो पण आवाज घशातून फुटत नव्ह्ता. तो पर्य़ंत पंजा पलंगाच्या पायावरून चढून माझ्या पायथ्य़ाशी आला होता. मी पाय झटकायचा / अवरून उठायचा प्रयत्न केला पण कोणताही अवयव मेंदूचे हूकुम ऐकत नव्हता. पंजा माझ्या पायावर चढून वरवर येउ लागला. माझी तगमग वाढली होती, छाती तिप्पट/चौपट वेगाने धडधडत होती. माझे ओरडण्याचे, उठून बसण्याचे, पंजा हातांनी झटकून टाकण्याचे निष्फळ प्रयत्न सुरूच होते. झोपेत बनियन थोडे वर सरकले जाउन पोटाचा खालचा भाग उघडा पडला होता. पंजा पोटाच्या त्या उघड्या भागावर आला. पंजाची नखे पोटाला टोचली. आता अगदी प्राणाशीच गाठ पडल्याने म्हणा, पण अवयवांनी मेंदूचे ऐकायचे ठरवले. मी पंजाला पकडून ओरबाडूनच पोटावरून खेचले, दूर भिरकावून दिले व खच्चून किंकाळी मारत उठून बसलो. जाग येउन हे सर्व स्वप्न असल्याचे लक्षात आले. मित्रही गादीवर उठून बसला होता. त्याला काहीच समजले नव्ह्ते. त्याला वाटले मला देखील “त्या किंकाळीने” जाग आली आहे. त्याने मलाच “कोणी किंचाळले का रे?” असा प्रश्न केला. मी पण साळसूदपणे “हो बहुतेक” असे उत्तर दिले. तोपर्यंत त्या किंकाळीने जाग येउन कोण किंचाळले ते बघायला/शोधायला होस्टेलमधील आजूबाजूच्या रूम्स उघडल्या होत्या. मित्रानेही आमच्या खोलीचे दार उघडले व त्या शोधात सामील झाला. दोन-तीन मिनिटातच शोध न लागल्याने किंचाळणार्याला शिव्या घालत सर्व झोपायला गेले. मित्रही आडवा होउन घोरू लागला. मी पण हूश्श्य़ केले व फुटलेला घाम पुसुन झोपायला आडवा झालो. आत्ता पडलेले स्वप्नच होते या जाणिवेने सुटल्यासारखे वाटले. बनियन नीट करण्यासाठी मी तो थोडा खाली सरकवला तेंव्हा पोटावर थोडे दुखल्यासारखे जाणवले. क़ाय आहे ते बघण्यासाठी पडल्या-पडल्याच उघड्या पोटावरून हात फिरवला, आणी तोंडातून बाहेर पडणारी किंचाळी मोठ्य़ा मुष्किलीने आवरली. पोटावर सुमारे आठ-नउ इंच लांबीचा ओरखडा उठला होता. हाताच्या बोटांना होणारा त्याचा ओलसर स्पर्षच तो ताजा असल्याचे सांगत होता. मी पुन्हा उठून बसलो. मला जबरदस्त घाम फुटला व छातीची धड्धड पुन्हा वाढली. मी पुन्हा पुन्हा हे स्वप्न नसल्याची खात्री केली. पण हे स्वप्न नव्हते. तो ओरखडा खराच आणी नुकताच उठलेला होता.
|
Uchapatee
| |
| Thursday, September 06, 2007 - 8:45 am: |
| 
|
पुढची पोष्ट थोड्या वेळाने. आत्ता सारखा error येतो आहे.
|
Monakshi
| |
| Thursday, September 06, 2007 - 8:58 am: |
| 
|
आईशप्पथ, सॉलीडच. कसला भयानक अनुभव आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|