|
Farend
| |
| Friday, June 29, 2007 - 8:36 pm: |
| 
|
Arch तू Pune University होतीस? मग सद्ध्या कोणती University आहेस j/k ती पूर्वीची २८ नंबर का? नंतर बहुधा ९२. काहीतरी अंधूक आठवते. मॉडेल कॉलनी वरून मग दीप बंगल्याला उजवीकडे जावून बाहेर पडायची का ती बस? मी काही वेळा गेलोय (आणि २९ ने पण) पण खूप वर्षे झाली.
|
Farend
| |
| Friday, June 29, 2007 - 8:49 pm: |
| 
|
अरे त्यावरून आठवले. आमच्या घराजवळ राहात असलेल्या एका मुलीवर एक जण खूप 'मरायचा'. त्याच्या एका मित्राची रिक्षा असल्याने तो त्यातून बर्याच वेळा मोठमोठ्याने गाणी लावून तिच्या दारासमोरून जायचा. नंतर त्याने आम्हाला एकदा सांगितले की (ती मुलगी खूप गोरी असल्याने) "रिक्षातून 'गोरे रंग पे न इतना गुमान कर' हे गाणे मोठ्याने वाजवत तेथून गेलो, ती असली वैतागली (त्यांच्या भाषेत 'करपली')..." वगैरे वगैरे. हे हिरो लोक जी गाणी लावत ती तिला उद्देशून असत, त्यांच्या दृष्टीने. आणि मग तिच्या कोणत्याही हालचाली त्याची reaction म्हणून झालेल्या आहेत असं समजायचे. वास्तविक ती मुलगी (अगदी त्याच्या प्रेमात पडली होती असे गृहीत धरले तरी) अशा गोष्टी समजण्याबद्दल आणि तिची एकूण गाण्याची समज वगैरे पाहता ती याबाबतीत एकदम माठ होती. आणि मुळातच तिला त्यांच्यात काहीही इंटरेस्ट नव्हता हे आम्हाला माहीत होते. तिला यातली काही कळलेही नसणार हे नक्की Dumb and Dumber मधे They killed our bird because we killed theirs आठवत असेल (आणि ज्यांना नसेल त्यांनी जरूर पाहा तो), तर हे साधारण तसेच होते.
|
Aktta
| |
| Friday, June 29, 2007 - 9:57 pm: |
| 
|
मी शाळेत अस्तांना माझा एक गोड गैरसमज होता "रीक्षात जर एखादी पोर्गी एकटी बसली असेल म्हन्जे ती पोर्गी त्या रीक्षावाल्याची छावी आहे." माझा लेटेस्ट क्रश इमा ह्या पोरीच हसन एक्दम वेगळ आहे...... फ़टक्यात घायाळ कर्ते..... काही कळायच्या आतच मी खलास..... आनी ते पन रोज.....
|
Zakasrao
| |
| Saturday, June 30, 2007 - 5:44 am: |
| 
|
ती पोर्गी त्या रीक्षावाल्याची छावी आहे." >>> एकट्या तु सोलापुरचा आहेस ना? आणि मी पण इन्द्रधनुश्य म्हणजे काय? इथे तुझे सात रंग आहेत की काय?
|
Aktta
| |
| Saturday, June 30, 2007 - 12:37 pm: |
| 
|
झकासराव रीक्षा काय फ़क्त सोलापुर मधेच आहेत का.... आम्च्या गावात शहरात पन रीक्षा आहेत हो... आनी इन्द्रधनुश्य म्हंजे फ़क्क्त रंग नसतात.... आपली आपली समज़ आहे... एकटा....
|
फ़टक्यात घायाळ कर्ते>>> एकट्या मलमाचा ट्युबा आहेत ना जवळ. अन फटके खान्याच्या थोड दुर उभा राहात जा म्हणजे फटका नाही मिळनार. त्या बस ९१ नी ९२ (अमोल २९ नाही बहुतेक). दोन्ही डेक्कन वरन सुटायचा (आताही असतील).
|
Aktta
| |
| Saturday, June 30, 2007 - 3:13 pm: |
| 
|
ह्रदयाच्या जख्मा मलम लाउन नाह बर्या होत यार... त्याना फ़्कत र्स्पश लागतो प्रेमाचा.... आनी तसा पन मी दूरू आहे म्हनून फ़क्क्त घायळ होतो... जवळ गेलो तर खलासच होईल.... एकटा....
|
Manuswini
| |
| Thursday, August 30, 2007 - 10:50 pm: |
| 
|
ही माझी अगदी नवि कोरी crush कित्येक महीन्यांत. माझा नवीन बॉस काय गोड आहे दिसायला तसेच overall personality पण काय झकास आहे. काय presentation असते त्याचे. meeting मध्ये बोलताना, आह अहा बघत रहावे नी एकावे सुद्धा. नुसता group capture करतो, the way he tells and captures if he has to get the work done. शेवटी गोड हसून. काय खळी पडते. सुदैवाने पंजाबी नाहीय. ससुरा राजस्थानी आहे women collegue शी पण एकदम total gentlman सारखे वागणे. परवा dinner party होती तेव्हा बीचारा सगळ्या आम्ही बायका आत शीरे पर्यन्त दरवाजा पकडून. सगळ्या गोर्या बायका पण फ़ीदा आहेत माझ्या बाजुच्या cubicle मधल्या, म्हणतात मॅण(त्यांच्या भाषेत), your boss is handsome, you lucky! दिसण्या बाबतीत सतत बघावे असे. सुंदर cute से हसणे. सरळ नाक, ६ फूटी उंची. दंतपक्ती एकदम रेखीव,डोळ्यात जरासा खट्याळपणा. हाय हाय मी तर चक्क stare करत रहाते त्याच्याशी बोलताना. तोच उलट असे वाटते मध्येच खाली बघतो. बिचार्याचे लग्न झाले आहे मी एकदम लट्टू आहे. यार असा एखादा मिळाला तर........ मी तर आईला इतके वर्णन केले, ती सुरवातीला अगदी कान देवून एकत होती. आणि शेवटी जेव्हा हळुच सांगीतले आई त्याचे लग्न झालेय. आईचा एकदम सूर बदलून, मग कशाला ते रामायण सांगत होती. कामावर लक्ष दे.(हा उगाच खोटा राग देवून फोन एकदम खाली ठेवते म्हणत I am sure he is aware of his crushes in office, looks like
|
Maanus
| |
| Thursday, August 30, 2007 - 11:38 pm: |
| 
|
अरे वा वा वा... हा BB active आहे होय... मणे...नाव अवघड आहे लिहायला winter crushes ची सुरवात का. आणि आता परत dress लिहुन ठेवायला लागणार आहेस का काय? यार असा एखादा मिळाला तर.... तर तुला सारखे त्याच्या मागे फिरावे लागेल.
|
Manuswini
| |
| Friday, August 31, 2007 - 12:00 am: |
| 
|
अय्या हे कसे ओळखलेस? माझे लक्ष असते ना त्याच्या dress कडे. he is always well dressed. blue,dark blue shirt looks good on him बघ मी कसा जिवंत केला हा मेलेला BB . तु सुरु कर आता तुझे winter crushes लिहून. असा एखादा मिळाला तर joking बाबा, डोक्याला कोणाला त्रास हवा.
|
Maanus
| |
| Friday, August 31, 2007 - 12:25 am: |
| 
|
त्याचे नाही ग... तुझा dress repeat नाही ना करत week मधे ref: तुझा पहीला crush माझे crushes ... ह्या लोकांनी मला *** harassment policy चा supervisor बनवुन ठेवलेय. त्यामुळे ऑफीस मधे उघड उघड असे काही करता येत नाही आजकाल काहीतरीच प्रकार आहे हा... कुणाला चांगला dress/hairstyle वैगेर म्हणायला पन भिती वाटते त्यामुळे. आता permanent crush शोधावा म्हणतोय.
|
Zakki
| |
| Friday, August 31, 2007 - 12:32 am: |
| 
|
त्यातून एकदा, एका मुलीने एका जीभ जड असलेल्या जाट मुलाला काहीतरी कॉंप्लिमेंट दिला त्यावर तो तिला म्हणाला, You have nice teeth , फक्त त्याचा उच्चार जरा चुकला(!) त्यामुळे ती मुलगी अशी भडकली, मला म्हणाली त्या माणसाबरोबर मला काम करायचे नाही! कशीबशी समजूत घालून तिला पुन: कामाला लावले.
|
Aktta
| |
| Friday, August 31, 2007 - 9:22 pm: |
| 
|
---सुदैवाने पंजाबी नाहीय. ---ससुरा राजस्थानी आहे ह्याने काय फ़रक पडतो का........ एकटा....
|
Storvi
| |
| Friday, August 31, 2007 - 9:55 pm: |
| 
|
एकटा असेल तर काही फ़रक पडणार नाही.. 
|
Amruta
| |
| Friday, August 31, 2007 - 10:17 pm: |
| 
|
वा वा आयती ही link सापडली. कधी पासुन वाचायचाय हा BB
|
Aktta
| |
| Friday, August 31, 2007 - 10:17 pm: |
| 
|
--एकटा असेल तर काही फ़रक पडणार नाही.. होका.... मला माहीतच न्हवत.... आनी समजा नसेल एकटा तर काय फ़रक पडतो.... एकटा....
|
झक्की , हा किस्सा खरा कि तुम्ही तयार केलेला आहे ? 
|
Zakki
| |
| Saturday, September 01, 2007 - 4:23 pm: |
| 
|
माझे डोके एव्हढे सुपीक नाही. हेच काय याहूनहि कितीतरी गमती ऐकायला येतात, जरा कान उघडे ठेवून ऐकले तर. शिवाय सध्या आमचे ऑफिस हे हिटॅची कं चे अमेरिकन इंजिनीयरिंग ऑफिस आहे. त्यात जपानि, पूर्व युरोपियन, नि भारतीय (गुजराती, बंगाली, पंजाबी) लोक ८० टक्के. त्यामुळे मज्जाच मज्जा! आमच्या ग्रूप मधे तीन जपानि, एक चिनी, एक मी, नि दोन अमेरिकन आहेत. आम्हा तिघांचे बोलणे आम्हाला समजते. जपानी मात्र कधी कधी जपानीत बोलतात की काय अशी शंका येते. सुदैवाने इंजिनियरिंगमधले शब्द इंग्लिश असल्याने थोडे तरी समजते. सुपीक डोके नसले तरी थोडी फार विनोदबुद्धी हवी. आयुष्य अत्यंत सुखकारक होते. राग येण्या ऐवजी हसू येते. ते सर्वच दृष्टीने चांगले.
|
Yashwant
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:15 am: |
| 
|
मी एफ़ वाय ला असतान्ना मला अकराव्वीतली एक मुलगी खुप आवडायची. कसेतरी एका मित्रानी ते ओळखले आणि सगळ्या ग्रुप ला सान्गितले. सगळ्यानी मला तिला भेटुन "फ़्रेन्डशिप" मागायला ???? सान्गितले. मला ते शक्य न्हवते पण ग्रुप ऐकायला तयार न्हवता. शेवटी एकदा ती घरी चालली असतान्ना तिला गाठले. लाम्बुन सगळा ग्रुप बघत होता. मागुन तिला आवाज़ दिला तशी ती थाम्बली. फ़ारच गोड मुलगी होती ती. तिला विचारले "इथे रस्त्यात तुम्हाला केमिस्ट्री चे जर्नल सापडले का?". तिने पन भोळेपनाने नाही म्हनत मोठ्याने नकारार्थी मान हलवली. कसाबसा तिला थॅन्क्यु म्हणुन परत ग्रुप मध्ये आलो. सगळ्याना सन्गितले अरे ती नाही म्हनाली. तिने हलवलेली नकारार्थी मान सगळ्यान्नी बघितली होतिच. आज पर्यन्त तरी माझी बायको सोडुन इतर कुनाला खर काय घडले ते माहीत नाही.
|
Aktta
| |
| Thursday, September 06, 2007 - 11:17 am: |
| 
|
माहित नाही खोडुन माहित न्हवत कर आता..... एकटा.....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|