|
चिन्या.. आईशप्पथ.. अरे मीपण महेशची एकदा यावरून मुलाखत घेतली होती. पहिलंच वाक्य होतं. I dont give a damn to Oscars. Why should we judge ourseves by that standard.." वगैरे वगैरे. आज घरी गेल्यावर परत एकदा वाचते आणि मग लिहिते.
|
Prajaktad
| |
| Saturday, September 08, 2007 - 6:55 pm: |
| 
|
फ़ारेंड! सही चोपलय! ...श्रने हि मस्त लिहलय..
|
Farend
| |
| Thursday, September 13, 2007 - 10:45 pm: |
| 
|
लोकहो धन्यवाद. पूर्वीचे महेश भट चे चित्रपट चांगले होते पण आता 'भटाला दिली ओसरी...' ही म्हण त्याच्या चित्रपटांना खरोखरच लागू होते. गाणी मला आवडत नसली तरी चांगली आणि लोकप्रिय आहेत हे कबूल. गज़ल न वाटणारी गाणी द्यायचा कथेमुळे एकच चान्स त्याला 'हम है राही प्यार के' मधे होता, पण तेथे नेमका नदीम श्रवण ला पकडला ज्याने आजकालची 'शावा शावा','माहीवे',' You are my sonia ' गाणी सुद्धा गज़ल च्या चालीत रचली असती. आणि विक्रम भट? 'गुलाम' वाला तो हाच का अशी शंका येते.
|
Chinya1985
| |
| Wednesday, September 26, 2007 - 10:38 pm: |
| 
|
महेश भटचा आवारापन हा चित्रपट पाहिला.कुठुन कथा चोरली आहे??त्यामधे एकदा आशुतोश राणाचा मुलगा त्याला जमिनित जिवंत गाडतो वगैरे. मग इम्रान हाश्या परत बाहेर येतो आणि धडाधड मारामारि करतो १०-१५ गुंडांशी. मला एक कळत नाहि की ठिकठिकाणी बंदुकी काढणारे ते गुंड आणि आशुतोश राणाचा मुलगा नेमक्या त्याच वेळी बंदुकी घरी विसरुन येतात का????का भाड्यानी देतात थोड्या वेळापुरत्या???तसेच इम्रान हाश्याचा मित्र मधेच त्याच्या गद्दारी करतो आणि कारण नसताना परत त्याच्याशी मैत्री का करतो??त्यानंतर पुरब कोहली तसेच त्याचा बाप दोघेही डॉन असतात मात्र दोघांकडेही ऐन वेळी बंदुक नसते (परवडत नसावी) !!हाश्याच्या पोटात चाकु घातल्यावर मग तो पुरबला मारतो मग फ़ोनवर बोलत बोलत कोलमडतो मग देवाला प्रार्थना करतो थोडा वेळ जिवंत ठेव रे बाबा (पिक्चर संपायला अजुन थोडा वेळ आहे की) ,मग ढग हलतात आणि हाश्या जणुकाही आपल्याला खरचटलही नाहि अशा पध्दतिने राणाच्या गुंडांना व राणाला मारतो आणि त्यानंतर त्या पोरिला बंदरावर घेउन जातो. हे सर्व होताना त्याने जखमेला मलमपट्टी तर सोडाच फ़िल्मी स्टाईलचा पांढरा शुभ्र रुमालही लावला नसतो. अरे बाबा ब्लीडींग होउन मरशिल की पण नंतर बहुतेक डिरेक्टर विसरलाय की याला भोसकण्याचा सीन झालाय कारण नंतरच्या काळात त्या जखमेचा पत्ताच नसतो.
|
Gajanan1
| |
| Friday, April 04, 2008 - 8:56 am: |
| 
|
खूप हसलो रे बाबा... खरे तर चित्रपट समिक्षेवर एक BB हवाच आहे.
|
Prachee
| |
| Friday, April 04, 2008 - 2:11 pm: |
| 
|
फ़ारेन्ड, 'भटाला दिली ओसरी....'
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|