|
Manuswini
| |
| Saturday, August 25, 2007 - 5:19 pm: |
| 
|
heyy babyy: चुकुनही वाटेला जावु नका. तद्दन बेकाऽऽऽ र चित्रपट. तेच ते रोजचे आपले कुठल्याही english movie वरून उचलायचे नी भेसळ करायची. वैताग नुसता...............
|
Farend
| |
| Saturday, August 25, 2007 - 7:12 pm: |
| 
|
बुड्ढा मर गया, Hevvy Babyy , मनुस्विनि? बाकी सगळे बघून झाले काय? The American President बघितला, मस्त आहे. Nicholas Cage चे 8mm, The Lord Of War, The Family Man कोणी बघितले आहेत का? कसे आहेत?
|
Mansmi18
| |
| Saturday, August 25, 2007 - 7:35 pm: |
| 
|
8 mm मी पाहिला आहे. अतिशय dark आणि depressing वाटला मला. मला त्याचा The Rock अतिशय आवडला.
|
Upas
| |
| Sunday, August 26, 2007 - 6:36 am: |
| 
|
चक दे पाहीला.. मनापासून आवडला.. theatre मधे पाहाण्यात विशेष मजा... शहारुख कधी नव्हे तो बरा वाटला.. आणि त्या मुली आवडल्या.. काही मुली अगदी माझ्या कॉलेज मधे होत्या असं उगीच वाटतय.. आणि तो हॉटेलचा scene ओढल्यासारखा वाटला एवढच काय ते.. असो! चक दे........... इंडीया
|
Shyamli
| |
| Sunday, August 26, 2007 - 4:15 pm: |
| 
|
चक दे ..............बघावाच आणि तेही थेटरमधेच बघावा एकही गाणं नाही नेहमीचा मसाला नाही पण एकदम सहि कोमल ,प्रीती, आणि ती पंजाबण मस्तच SRK acting करतोय असं कुठेही जाणवत नाहि हे विशेष
|
Tiu
| |
| Sunday, August 26, 2007 - 4:59 pm: |
| 
|
एकही गाणं नाही..>> आहेत की ३ ४ गाणी. फक्त background ला चालतात ती... that's another reason that I liked the movie. India vs Australia match चालु आहे आणी शाहरुख खान ground च्या बाहेर उभा राहुन गाणं गातोय असं दाखवण्यापेक्षा बरंय!
|
Shyamli
| |
| Sunday, August 26, 2007 - 5:02 pm: |
| 
|
गाणं नाही म्हणजे typical style नी गाणं नाही असं म्हणायचं होतं मला 
|
Jadhavad
| |
| Monday, August 27, 2007 - 2:59 am: |
| 
|
हे बेबी बघितला, ओके, ओके वाटला. not so good, not so bad . २०डॉलर वसुल नाही झाले पन sat eve वाया पण नाही गेली. नाव ठेवण्यासारखा नाहीये पन डोक्यावर घेण्यासारखा सुध्दा नाहीये. 3 men & baby चि कॉपी वाटतो पण अन्नु मलीक ट्रीट्मेंट आहे. (बोतल नयी, माल पुराना.) एकच गाण चांगल वाटत, लहान मुली सोबत असणार. Foreign background असणार्या मुव्ही काढायची एक हौस असते, हा त्या category मधला. अजुन एक्-दोन friends दाखवीले असते, किंवा असणार्यांपैकी एकाला कमी केल असत तरी स्टोरी ला फ़रक पडला नसता. सिडनी, ऑस्ट्रेलीया एवजी न्युझीलंड किंवा लंडन जरी दाखविल असत तरी भाजी अळणीच लागली असती. साजीद खान ठरला फ़ालतु जोक्स चा encyclopedia, , त्यातच सध्या sony & zee वर movie promotion साठी येवुन गेलेला, पण नो फ़ायदा. ता.क.: शाहरुख फ़क्त १ मिनिटासाठी असल्याने त्याच्या साठी मुव्ही बघणे, म्हणजे मुर्खपणाचा कळस. कालच दुबाई १०६ FM मधील एक R.J. तिच्या ह्याच मुर्खपणाचा कळस करताना एकले. म्हणे हे बेबी फ़क्त SRK ला पहायलाच बघीतला. अमित
|
Maanus
| |
| Monday, August 27, 2007 - 3:16 pm: |
| 
|
एकही गाणे नसलेला जितेद्र चा एक चलचित्रपट त्याच्या तरुण पनी आला होता... कुणाला नाव आठवतेय का त्याचे. त्यात तो journalist असतो बहुतेक आणि नेहमीप्रमाणे पांढरा सदरा आहेच.
|
चक दे india पाहीला इथले एवढे वाचून, worth watching once. शाहरुख too good . नाहीतर त्याचे प्रेम सिनेमे बघवत नाहीत. मुली तर the Best! सर्व आपापल्या परीने सुंदर आहेत. कोमल,बलबीर rocks . साडी सीन एकदम झकास. ultimately women power rocks!
|
Mansmi18
| |
| Tuesday, August 28, 2007 - 1:43 am: |
| 
|
माणुस, that movie was "new delhi"
|
Jadhavad
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:20 am: |
| 
|
मनस्वी, बरोबर, न्यु दिल्ली हा जीतेंद्र चा बिन्-गाण्याचा चित्रपट. सगळी साउथ ची पब्लिक होती त्यात. त्यात तो तरुण असताना ज्या मुली वर तो प्रेम करत असतो, तिचा बलात्कार होतो पण राजकारणी आणि पोलीस यांच्यामुळे त्याला जेल मध्ये जावे लागते. तिथे त्याला त्रास देवुन एक हात व एक पाय निकामी करतात. पुढे त्याच जेल मध्ये त्याला ४ कैदी मिळतात. जीतेंद्र जेल मधुन सुटल्यानंतर ४ कैदी मित्रांना पळुन जाण्यास मदत करतो. तो स्व्:ताचा न्यु दिल्ली टाइम्स चालु करतो आणि पेपरच्या पहील्याच दिवशी बलात्कार्यांपैकी एकाचा खुन करुन बातमी छापवुन आणतो. असे सगळ्यांचे खुन होतात आणि ह्याच्याच पेपरमध्ये पहीली बातमी छापुन येते. पण शेवटच्या खुनाच्या वेळेस त्याचे ४ कैदी मित्र मारले जातात आणि तो सापडतो. गाणे नव्हते पन सस्पेंस चांगला होता.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:49 am: |
| 
|
न्यु देलही टाईम्स असाही एक सिनेमा होता. त्यात शशि कपुर आणि शर्मिला टेगोर होते. बर्यापैकी सिरियस सिनेमा होता तो.
|
Madhavm
| |
| Tuesday, August 28, 2007 - 9:05 am: |
| 
|
मनुस्विनी, अग ARE चं spelling POWER अस चुकीच का लिहील आहेस? मोठ्ठा दिवा घे
|
Maanus
| |
| Tuesday, August 28, 2007 - 1:48 pm: |
| 
|
हो तोच तो... चांगला सिनेमा होता. काल अजुन एक गाणे नसलेला चित्रपट पाहीला. Mr. & Mrs. Iyer मस्तच आहे हा चित्रपट... राहूल, सेन (हिचे नाव कसे लिहीतात) आणि संतानम चित्रपटाचा शेवट काही निट कळाला नाही... पन अदर द्यान द्याट ग्रेट मुव्ही. संतु ला दाखवायला पाहीजे सस्पेंस वर मला एक सिनेमा आवडलेला... (त्याचे पन नाव आठवत नाही) पन मेहमुद होता त्यात बहुतेक आणि तो पुलावर उभा असताना कोणत्यातरी खुनाचे प्लानीग ऐकतो आणि मग त्या नावाच्या सगळ्या लोकांना फोन करुन तुमचा खुन होणार आसे सांगत सुटतो... चित्रपटाच्या शेवटी कळते की त्याने जे ऐकले होते ते radio वरचे नाटक होते.
|
Slarti
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:51 pm: |
| 
|
अहो, कोणतीही कथा सविस्तर शेवटासकट सांगायची असेल तर SPOILER WARNING द्या हो कृपया !!!! नेमस्तक, तुम्ही काही सुचवू शकाल काय ? विशेषतः, चित्रपट रहस्यप्रधान आहे हे माहिती असूनदेखिल शेवट सांगणे म्हणजे...
|
Yashwant
| |
| Wednesday, August 29, 2007 - 10:44 am: |
| 
|
चक दे आवडला. आमच्या कम्पनी ने सगळ्या स्टाफ़ ला लीडरशीप कशी असावी याचा नमुना म्हनुन हा सिनेमा दाखवला. अनेक लोकान्ना एकत्र बरोबर टीम मध्ये घेवुन काम कसे करायचे याचे उत्तम उदहरण. बिन्दीया सारखी बरीच व्यक्तिमत्व आपल्या आसपास असतात. त्यान्च्यामधील चान्गले गुण हेरुन त्यान्च्याकडुन काम करुन घेणे महत्वाचे आहे.
|
Aktta
| |
| Wednesday, August 29, 2007 - 12:24 pm: |
| 
|
मराठी सिनेमाची सायबर भरारी [ Wednesday, August 29, 2007 12:27:29 am] - दिनेश कानजी मराठीत हल्ली चांगले सिनेमे तयार होताहेत , पण , वितरण यंत्रणेअभावी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. काही मोजक्या ' हमखास यशस्वी ' सेण्टर्सवर सिनेमा लावण्यातच निर्मातेही धन्यता मानतात. त्यामुळे , दर्दी रसिकांपर्यंत मराठी सिनेमा पोहोचत नाही. आता उद्यापासून मात्र हे चित्र बदलणार असून जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना एका क्लिकसरशी मराठीतले दजेर्दार सिनेमा बघता येणार आहे. यासाठी खास बनवलेली वेबसाइट उद्यापासून सुरू होतेय. अनिवासी भारतीयांना नेटवर इथले दजेर्दार सिनेमे बघता यावे यासाठी अनिल अंबानींच्या रिलायन्सने ही नवी वेबसाइट बनवली आहे. या वेबसाइटवर सुरुवातीला राष्ट्रभाषा हिंदीसह मराठी , तामिळ , तेलगु या प्रादेशिक भाषांतले सिनेमे पाहता येतील. त्यात मराठी सिनेमे मोफत पाहता येणार आहेत. गेल्या काही वर्षांत हिट झालेल्या बऱ्याच मराठी सिनेमांचे हक्क ताब्यात असलेल्या नानूभाई जयसिंघानिया यांच्याशी रिलायन्सने तसा करारच केला आहे. नानूभाई म्हणाले , ' ही वेबसाइट बनवण्याचं काम सुरू असताना रिलायन्सच्या अधिकाऱ्यांशी माझी तीन-चार महिने चर्चा सुरू होती. ' पक पक पकाक ', ' खबरदार ', ' जत्रा ', ' धुमधडाका ', ' नवरी मिळे नवऱ्याला ' अशा बऱ्याच हिट सिनेमांचं माझ्याकडे कलेक्शन आहे. सचिन , महेश कोठारे , केदार शिंदे यांच्यासह मराठी सिनेमातल्या हिट दिग्दर्शकांचे सिनेमे माझ्याकडे आहेत. या वेबसाइटमुळे मराठी सिनेमाचा जगभरात हक्काचा प्रेक्षक निर्माण होईल या विचाराने मी त्यांना होकार दिला. ' ही वेबसाइट तयार झाल्यानंतर पहिल्या महिन्यात मराठी प्रेक्षकांना दहा सिनेमे बघता येतील. सिनेमा डाउनलोड करायचा असेल तर त्याला ४ डॉलर ४९ सेण्ट इतका खर्च येईल. डाउनलोड केलेल्या सिनेमांची पिक्चर क्वालिटी डीव्हीडीइतकीच दजेर्दार असेल. किंबहुना , ज्या सिनेमांची प्रिण्ट क्वालिटी चांगली आहे , त्यांचीच आपण या साइटसाठी निवड केल्याचं नानूभाईंनी सांगितलं. हिंदी , तामिळ आणि तेलुगु सिनेमाचे प्रोमोज पाहण्यासाठी एक डॉलर आणि तो पाहण्यासाठी दोन डॉलर असे चाजेर्स असले तरी मराठी सिनेमा मात्र फुकटात पाहता येणार आहे. मराठी सिनेमाच्या वितरणाचं क्षेत्र विस्तारणाऱ्या या वेबसाइटमुळे निर्मात्यांना उत्पन्नाचा नवा राजमार्ग मिळाला आहे. मराठी सिनेमा ग्लोबल करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
|
Disha013
| |
| Wednesday, August 29, 2007 - 6:24 pm: |
| 
|
एकटा,ही तुझी पहिलिच भली मोठ्ठी पोस्ट वाट्टं! पण ती साईट कोणती, तिचे नाव काय ते नाय कळलं मला.
|
Farend
| |
| Wednesday, August 29, 2007 - 8:03 pm: |
| 
|
हो आणि खाली signature नाही? एकटा आता एकटा राहिला नाही का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|