Sheshhnag
| |
| Wednesday, August 01, 2007 - 8:48 am: |
| 
|
हसता हसता बद्लून टाकलेत की रुतु हिरवा आहे हो..बरवा नव्हे.. वाह! आणखी एक वेंधळेपणा.
|
Tukaram
| |
| Wednesday, August 01, 2007 - 7:25 pm: |
| 
|
आज घाइघाईत विमानतळावर उतरलो आणि TAXI चे दार लावायला विसरलो. ड्रायव्हर गेला की. आणि दार दुसर्या गाडीला धड्कुन बन्द झाले. त्यानी फोन करुन य ओरडा आरडा केला.. ये इन्डीया नही अमेरीका है म्हणाला. नशीबाने तेवढ्यावरच निभावले....
|
घडलं घडलं काहीतरी माझ्या आयुष्यात या बीबीवर सान्गण्यासारखं!! (अर्थात ही काही फ़ार अभिमानाची गोष्ट नाहीये.. आम्ही रोजच सन्ध्याकाळी व्हाॅलीबाॅल खेळतो. काल सुरुवातीला आम्ही चार जणच फक्त सराव करत होतो. नंतर मी आणि माझा एक कलिग खूपच दमलो नी त्याला हाताला थोडे खरचट्ल्यासारखे झालेले म्हणून आम्ही ठरवले की डाॅक्टरकडे जायचे.. मी माझी बॅग आणि तिथे असलेली त्याची बॅग पण उचलली.. आम्ही नंतर डाॅक्टर (कंपनीमध्येच) , कॅन्टीन असे करत आमच्या डेस्क कडे निघालो.. हा पठ्ठ्या बॅग माझ्या हातातून घ्यायचे सौजन्यच दाखवेना.. शेवटी मीच म्हंटले "अरे आता तरी लाजेकाजेस्तव उचल ना बॅग" तर हा तेव्हा म्हणतो "ही माझी कुठाय पण??मला वाटल तुझ्याकडे आज दोन बॅग आहेत." आणि वर मी कुणाची बॅग उचलून आणली म्हणून अख्ख्या कंपनीला ऐकू जाईल इतक्या जोरात हसला..!! झाले!! मी माझा चेहेरा शक्य तितका शांत ठेवत आमची जोडी पुन्हा मैदानाकडे..मझ्या कलिगला हसू दाबणे अशक्य होत होते.. तिथे मैदानावरून मी ज्या माणसाची बॅग खाकोटीला मारून आणली होती तो "धिनक धिन धा" करत होता..
|
तांत्रिक चोरवाटा ह्या न्यूज़ चनल्समध्ये मोठं वरदान आहेत. ब्रेकिंग न्यूज़ किंवा खराब फुटेजवरून आयत्या वेळेला बातम्या कापतांना बर्याच गमतीजमती होतात. कमेरा गंडला असेल, तर मधूनच आवाज रेकाॅर्ड होणं बंद होतं... अशावेळी दुसर्या वीडिओचे आवाज आपल्या वीडिओत टाकायची परवानगी असते (उदा. ब्ल्यूलाईन बसच्या जमावाला चर्चगेट स्टेशन च्या बाहेरचे आवाज लावले तरी कुणाला कळणार आहे?) पण घाईत एकदा एका सरकारी आॅफ़िसाच्या चित्राला असेच कुठूनतरी साउंड्स उचलून लावले होते... तपासतांना एडिटरने असल्या रागाने माझ्या कानात हेडफोन कोंबले की बास!! त्यातल्या चौकीदाराने जांभई द्यायला तोंड उघडलं की एक गाय हंबरल्याचा आवाज येत होता, आणि पंखे-टाईपरायटर्स च्या पार्श्वभूमीवर शेतातल्या पंपाचे, चिवचिवाटाचे आणि वार्याचे आवाज येत होते... ... दीड-एक वर्षापूर्वी अशाच एका फ़शनपरेडच्या visuals ना कुणितरी Punjab village protest नामक फ़ाईलमधून आवाज काॅपी-पेस्ट केले होते. सगळ्या गोर्यापान माॅडेल्स पण आवाज येतांना "हॅंऽऽऽ अस्सी-तुस्सी" सारखे आवाज येत होते. (आणि ही बातमी on-air गेली म्हणे!!)
|
Zakasrao
| |
| Monday, August 06, 2007 - 4:08 am: |
| 
|
योगेश ऋतु तु बहुतेक बक्षिस पटकवणार अस दिसतय.
|
झकास अरे पण मला बक्षिस देणार तरी कोण? इथे येणारी समस्त वेंधळी जनता??
|
Maanus
| |
| Thursday, August 16, 2007 - 12:01 am: |
| 
|
आता हे ऑर्कुट मधे टाकायचे का माझा वेंधळेपणा मधे कळत नाहीय.. anyway आपल्या मायबोली च्या सभासद, janhavi_m ह्यांना मी आधिपासुन ओळखत होतो. ओळख म्हणजे त्या माझ्या मित्राच्या भावाच्या बायकोच्या भावाची mrs. आहेत. त्यामुळे त्यांचे नाव कधी विचारयचा संबध आला नव्हता. पन तोडओळख होती. आणि मायबोली वर त्यांचे दोन id आहेत, माझ्या मित्राच्या भावाच्या बायकोला सगळे जन पुजा नावाने ओळखतात. त्यामुळे आजप्र्यंत मला त्यांचे खरे नाव माहीत नव्हते. तर झाले काय मधे शिल्पा नावाने मला त्यांनी add केले. आडनावावरुन मला वाटले की त्या म्हणजे janhavi_m च असतील, त्यांनी स्वत चा एकपन फोटो नव्हता लावला. काल मी त्यांना NJ च्या GTG चे invitation पाठवले तेव्हा मला scrap आला, अरे मी नाही maayboli ची member सुनिता आहे. धत्त, इतके दिवस मी त्यांनाच सुनिता समजत होतो. आणि तश्याच प्रकारे msgs टाकत होतो... एकदा तर म्हणालो आहो नंदेच्या घरातले का फोटो लावलेत सगळे... जरा तुमचा पन टाकाकी. बहुतेक पुजा वहीनी पन तेव्हा confuse झाल्या असतील, हा असा का बोलतोय...
|
Disha013
| |
| Thursday, August 16, 2007 - 7:17 pm: |
| 
|
माणसा, post डोक्यावरुन गेली रे....
|
Maanus
| |
| Thursday, August 16, 2007 - 7:46 pm: |
| 
|
मला वाक्यरचना जमत नाही बहुतेक. काही नाही गेले दोन तिन महीने मी एका व्यक्तीशी ऑर्कुट वर बोलत होतो. ईतके दिवस मला वाटत होते की ती व्यक्ती म्हणजे maayboli.com वरची janhavi_m आहे. पन काल कळाले की ती व्यक्ती janhavi_m च्या नवर्याची बहीन आहे.
|
Manjud
| |
| Friday, August 17, 2007 - 6:57 am: |
| 
|
माझ्या मित्राच्या भावाच्या बायकोच्या भावाची mrs. अहो सागर जरा शुद्धलेखन बघा ना हो तुमचे पोस्ट करायच्या आधी. एवढ्या ६०० ७०० पोस्ट्स झाल्या तरी अजुन आनि-पानी का बरं? ह्यामुळे तुमच्या पोस्ट्स वाचाव्याशा वाटत नाहीत.
|
Chaffa
| |
| Friday, August 17, 2007 - 1:03 pm: |
| 
|
बरेच दिवसांनी मायबोलीवर आलो, मधे एकदा मायबोलीवर येतच होतो पण घोटाळा!!!!!!!!!!! त्याचं झालं काय की घरी होतो आणि मोकळा वेळही होता म्हंटल चला मायबोलीवर चक्कर मारु बसलो PC चालु करुन, एक पोस्टही टाकले आणी दुसरीकडे जाण्यासाठी क्लिकायला गेलो आणि हात सणसणीत भाजला. नेमका प्रकार झाला असा होता की मी टायपत होतो तेव्हढ्यावेळात चाफ़्फ़ी येउन गरमागरम चहाचा कप माउसजवळच ठेउन गेली जाता जाता ईथे कप ठेवलाय हे पण सांगुन गेली पण.... लिहीताना मान हलवुन पहायचेही कष्ट न घेता टायपत बसलो अन, नेहमीच्या सवयीप्रमाणे न पहाताच माउस वर हात टाकला!!!!!!!!!
|
Maanus
| |
| Friday, August 17, 2007 - 1:07 pm: |
| 
|
अहो सागर कवळा तरुण आहे ग मी आजुन, लहान आहे तुझ्यापेक्षा. ईतके सुबक रेखिव मोत्यासारखे अक्षर हाताने पेपर वर कधी जमलेच नव्हते, त्यामुळे शुद्धलेखनाच्या चुका नजरेस नाही पडल्या. बघु आता हळु हळु सुधारता आल्या तर.
|
Yashwant
| |
| Monday, August 27, 2007 - 9:27 am: |
| 
|
टीव्ही नीट दिसत नाही म्हनुन अन्टीनाची वायर जरा हलवली तर ती सरळ नीसटुन हातात आली. आता ही वायर खालुन परत टेरेस वर कशी न्यायची याचा मी खुप विचार करत होतो. (तानाजी मालुसरेन्ची घोरपड आठवायला लागली). बायकोने विचारले कशाची काळजी करताय तेन्व्हा तीला सन्गितले तर ती म्हनाली "एवढेच ना मग वायर आधी अन्टेना ला फ़िट करा आणि वरुन सोडुन द्या. खिडकीतुन मी ओढुन घेते.
|
Tiu
| |
| Monday, August 27, 2007 - 9:53 pm: |
| 
|
यशवंत...सही किस्सा आहे. जे लोक खुप हुशार असतात त्यांना असल्या साध्या साध्या गोष्टी सुचत नाहीत! जसं Einstein चा तो मांजरीच्या पिल्लांचा किस्सा! असं आपणच म्हणुन स्वत:ची समजुत काढायची...आणी बायकोला पण सांगायचं!!! म्हणजे गिरे तो भी टांग उपर...
|
मांजरांचा किस्सा आइनस्टाइनचा की न्यूटनचा?? (बहुतेक न्यूटनच्या नावावर पण तो खपवलाच असेल कुणितरी)
|
Sush
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:38 am: |
| 
|
बहुधा तो किस्सा आइन्स्टाइन चा आहे. पण कसं होतं काहि लोक मोठ्या जोशात किस्सा सान्गायला सरसावतात पण अचानक नाव न आठ्वल्यावर तो कोणत्याहि शास्त्रज्ञाच्या नावाखालि चिपकवतात. (तो खरा आइन्स्ताइनच होता कि आणखि कोण हे कोणास ठावुक?)
|
मांजराचा किस्सा हा न्युटनचाच आहे.. आईन्स्टाईनचा नाही... छत्री, आणि बुटाच्या मापाचा किस्सा ही त्याचाच... http://numericalmethods.eng.usf.edu/anecdotes/newton.html शेवटचा परीच्छेद....
|
यशवंत सही आहे. अगदी अस्संच होतं नै आपल्यासारख्या हुष्षार माणसांचं. माझं तर नेहमी. त्या दिवशी तापत ठेवलेले दूध चहात घालायला चिमट्याने उचलले. मगमधे टाकले, पातेले ओट्यावर ठेवले आणि चहाचा मग गॅसवर.... ठेवणार होते. हुश्श!
|
मी आमची बोका-बखर वाचली. त्यानुसार तो किस्सा Newton चा आहे, असे समजले.
|
Sush
| |
| Wednesday, August 29, 2007 - 5:15 am: |
| 
|
चलो ज्ञान मैं बढोतरि हुइ आज्पर्यंत मी समजत होते कि तो आइन्स्टाइन होता.
|