|
एक रामसेपट. बाबा ( म्हंजे तोच तो लगानमधला गुरन) आणि नकिता ( उच्चारी नकिता, मूळ निकिता असावे.) यांची प्रेमकहाणी. :-P विजयेंद्र घाटगे त्याच्या पुतणीला मसुरीला होस्टेलवर सोडायला निघतो. बरं स्वतःच्या कारने जाताना हा माणूस दिवसाढवळ्या प्रवास का करत नाही, देव जाणे. तर ते प्रवास करताना कशाला कोण जाणे पण वीरान्यामध्ये जातात. हा वीराना म्हणजे बाबा आणि नकिताचे हक्काचे स्थान असते. ते दोघे तिथे राहून, मन लावून काळी विद्या शिकत असतात. ( काळी विद्या हे बहुधा त्या काळ्या मांजरीचे नाव असावे, तो बाबा पुढे सतत तिला सोबत घेऊन फिरतो. विद्यार्थी लोक पुस्तक घेऊन फिरतात तसे.) विजयेंद्र घाटगे नकिताला मारतो, बाबा संतापून त्याला कैद करतो आणि त्याच्या पुतणीचे थोडेसे केस आणि फ़्रॉकचा तुकडा कापून एक बाहुली बनवतो ( बाबा हा कलाकारही असावा.) आणि ती नकिताच्या कबरीत ठेवतो. म्हणजे नकिताचा आत्मा त्या मुलीचा ( नाव जास्मिन) कधीही ताबा घेऊ शकतो, म्हणे! आता ती मुलगी झपाटली गेल्यामुळे एकामागोमाग एक खून पाडायला लागते. लहानपणी एक खून करते, मोठी झाल्यावर अनेक! दोन वेळेला तर दोन अनोळखी माणसांना वीरान्यात नेऊन मारते. ( उसे वीराने खा गये, वो वीरानोंसे वापस लौटी, असे डायलॉग वाचून वाटलं की बाबा आणि नकीताच्या जागेचे नावच वीराना व्हिला वगैरे असावे.) त्यात तिची एक चुलत बहीण दाखवलीये. ( हम आपके है कौन? मधली ती सलमान खानच्या मागे लागलेली.) ती पूर्ण सिनेमाभर अतिशय विसंगत कपडे घालून हिंडते. म्हंजे बाबाच्या अड्ड्यात शेवटली मारामारी करायला जाताना इव्हिनिंग गाऊनसदृश्य काहीतरी घालून जाते. तर ते असो. बाबा जास्मिनच्या घरी नोकर म्हणून राहतो. जास्मिनमध्ये नकिताचाच आत्मा असतो आणि जास्मिन ही नकितापेक्षा लाख पटीने सुंदर दिसत असताना बाबा जास्मिनशीच लग्न करण्याचा विचार मनातही आणत नाही. ( तात्पर्य: प्यार अंधा होता है.) तिकडे नकिताही जास्मिनच्या तोंडून ' साथी रे... तू कहा है? ' असली गाणी गाते. पंधरा वर्षांनंतर म्हणे बाबाला अमावसच्या एका specific रात्री जास्मिनचा बळी देऊन नकिताला जिवंत करायची संधी मिळणार असते. त्याप्रमाणे मग तो तिचा बळी द्यायची तयारी करतो. कबरीतून नकिताला हडळ फ़ॉर्ममध्ये बाहेर काढतो. पंधरा वर्षं कबरीत आखडून राहिल्याने नकिताला आर्थरायटिस झालेला असतो. त्यामुळे ती तिरकी तिरकी चालते. मग विजयेंद्र घाटगे ओम अक्षराच्या सहाय्याने बाबाला मारतो. नकिताला त्याच पेटीत बंद करून शंकरासमोर नेतात. तिथे तीही नष्ट होते. अशा रीतीने बाबा आणि नकिता शेवटी एकमेकांना नरकात भेटून सुखी होतात. And they live happily everafter... यात कुलभूषण खरबंदा हा जास्मिनचा बाप दाखवला आहे. तो बर्याच सीनमध्ये नुसता वेंधळ्यासारखा, आता काय बोलू किंवा काय करू असा प्रश्न पडल्यासारखा मख्ख उभा राहिलेला दाखवलाय. मध्ये मध्ये तर त्याच्या वागण्याने तोच या सगळ्या कारस्थानांचा सूत्रधार आहे की काय अशी शंका आली. पुन्हा झी सिनेमावर लागला तर चुकवू नका. :-P
|
Farend
| |
| Monday, August 27, 2007 - 7:06 am: |
| 
|
श्रद्धा या बीबी ला पुन्हा जिवंत ( no pun )केल्याबद्दल धन्यवाद! वीराना! पूर्वी खूप ऐकले होते याबद्दल. झी वर दाखवला वाटतं. मला तर कधी कधी या बीबीवर लिहिण्यासाठी असे चित्रपट पाहावे असे वाटते. त्या गुरन चे तो रोल मिळण्या आधी असले रोल म्हणजे राखीव कुरण होते. 'तिरकी तिरकी चालते' या सर्व चित्रपटांवर पूर्वी बहुधा V Channel वर एक कार्यक्रम असे, नाव आठवत नाही, पण ९९ साली पाहिल्याचे आठवते. धमाल होता. सद्ध्या जिस्म बघतोय (चित्रपट! ), बघून झाला की लिहितो
|
श्रद्धा, रामसेपट लागला की फ़ुल्ल करमणूक असतेच. तसेच ते देवावरचे पिक्चर. काल झी सिनेमावर "भक्ति की शक्ती" म्हणून एक अचाट पिक्चर लागला होता. एकदम सही लिहिलं आहेस... असेच पिक्चर बघत जा (आणि इथे लिहत जा...)
|
मला तर कधी कधी या बीबीवर लिहिण्यासाठी असे चित्रपट पाहावे असे वाटते.<<<< अगदी अगदी farend . त्यादिवशी म्हणूनच मी झोप येत असतानाही हा सिनेमा पूर्ण पाह्यला. झी सिनेमा अशा सिनेमांना उदार आश्रय देत असतो. हातिमताईदेखील मी झी सिनेमावरच पाहिला. त्या गुरनखेरीज एक भयंकर दगडी चेहर्याचा, प्रचंड उंचीचा एक माणूसही होता. तोही बर्याच रामसेपटांमध्ये आहे. वीराना बघायला मिळाला तर नक्की पहा. बाबाच्या वीरान्यातली शेवटची मारामारी जबरी. त्याच्या सगळ्या guards ना काळे गाऊन घालायला दिलेत. ते घालून उडी मारतानाच कित्येकजण धडपडलेले दिसतात. :-P बाय द वे, सिनेमाचा सुरुवातीचा काही भाग मिस केला मी. त्यामुळे काही गूढ तसेच आहे. उदा. खरेच बाबा आणि नकीताचे प्रेमप्रकरण असते का की ती फक्त त्याची शैतानी साथीदारीण असते? मी त्या प्रेमप्रकरणाचा अंदाज उर्वरित सिनेमावरून लावलाय. अजून एक. इथे जाणवलेले आणि सगळ्या हिंदी सिनेमांचे वैशिष्ट्य म्हणजे शंकराच्या कुठल्याही देवळात शिवलिंग नाहीच, सगळीकडे शंकराची मूर्ती. हे असे प्रत्यक्ष कुठे असते का?
|
बरं स्वतःच्या कारने जाताना हा माणूस दिवसाढवळ्या प्रवास का करत नाही, देव जाणे, मला तर थियेटर मध्ये उभे राहून ओरडावेसे वाटते कि अरे बाबानो, एवढा रात्रीचा जन्गलातून प्रवास करताय तर गाडीत पेट्रोल, पाणी व्यवस्थीत भरून घ्या
|
Aashu29
| |
| Wednesday, September 05, 2007 - 10:04 am: |
| 
|
अजुन एक सिन असतो कि रात्रि काहितरी चाहुल लागल्याने नवरा बायको पैकी एका कोणाला तरी जाग येते आणि दुसर्याला न उठवताच ती व्यक्ति अन्धारात एकटीच सत्याचा शोध घ्यायला जाते!!
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 12, 2007 - 7:24 am: |
| 
|
वीराना मधली लाल बाई फ़ार popular होती तेंव्हा ! 
|
Shraddhak
| |
| Wednesday, September 12, 2007 - 8:03 am: |
| 
|
लाल का पांढरी, DJ ? ती जास्मिन कोण हिरॉईन होती देव जाणे! आपल्याकडची नव्हती नक्की! आणि भूतपट असला तरी पाण्यातले गाणे वगैरे दाखवून, तिचे कपडे भिजवून, तिच्याकडून यथास्थित अंगप्रदर्शन करून घेतले होते.
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 12, 2007 - 4:25 pm: |
| 
|
अरेच्या , तो लाल बाई वाला ,' शैतानी इलाका , वीराना नाही .., माझा गोंधळ झाला . शैतानी इलाका पण बघ ग श्र त्यातल्या vamp चे नाव ,' लाल बाई ' आहे
|
Amruta
| |
| Wednesday, September 12, 2007 - 4:51 pm: |
| 
|
पुरानी हवेली कुणि पाहिलाय का? फ़ार फ़ार पुर्वी शाळेत असताना हा पाहीलेला. आता काही आठवत नाहीये. पुन्हा पहायला मिळाला तर मजा येइल. कुणितरी लिहारे त्यावर.
|
Asami
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:24 pm: |
| 
|
भूतपट असला तरी पाण्यातले गाणे वगैरे दाखवून, तिचे कपडे भिजवून, तिच्याकडून यथास्थित अंगप्रदर्शन करून घेतले होते. >>हा सर्वच horror movies चा formula आहे. हिंदी असो वा english . तमाम male भुते लाल, हिरवी, पांढरी बाई /heroine/side actress etc shower घेताना, कपडे बदलताना, bedroom मधे असतानाच येतात. भुतांच्या role ला ह्यामूळेच एव्हढी demand असते का बहुधा अंगभर कपडे घतलेल्या बाईच्या पाठी लागलेल्या भुतांचे हडळींवर impression पडत नसावे. ह्याउलत चुडैल, हडळी, जखिणी etc मात्र पूर्ण कपडे घातलेल्या बाप्प्याच्याच पाठी दिसतात
|
Mi_anu
| |
| Thursday, September 13, 2007 - 4:36 am: |
| 
|
हो हे मात्र अगदी खरे. एका रामसेपटात तर स्त्री भूतं एकदम एस इ एक्स वाय दिसत होती. (सॉरी हां! आक्षेपार्ह वाटल्यास हे वाक्य काढून टाकावे.)भूतांनी पांढरे अतिपारदर्शक झगे घातले होते. तसेच या हॉररपटात लोकांनी चित्रपट पहावा यासाठी नायक नायिकेची शय्यादृष्ये आणि नायिकेची किमान एक आंघोळ असतेच असते. हे पण वाचा: http://anukulkarni.blogspot.com/2007/03/blog-post_9756.html
|
Chchotu
| |
| Monday, October 08, 2007 - 3:24 am: |
| 
|
पण मला एक गोस्ट कळालि नाहि, विजय अरोरा ला मारायचेच होते त्या जास्मीन ला तर त्याला (भरभरुन) सुख देवुन मारण्यात काय हेतु होता?
|
Mansmi18
| |
| Monday, October 08, 2007 - 9:13 pm: |
| 
|
त्याला (भरभरुन) सुख देवुन मारण्यात काय हेतु होता? ------------------------------------------------ तुम्हाला तुमचे तिकिटाचे १० रुपये वसूल करुन देण्याचा
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|