|
Maanus
| |
| Thursday, August 16, 2007 - 8:23 pm: |
| 
|
चायनीज लोकांना ऑफिशली दोन नाव असतात. एक चायनीज, आणि एक ईग्लिश. माझ्या एक चायनीज मैत्रिणीचे चायनीज नाव आहे bing-bing
|
Dineshvs
| |
| Friday, August 17, 2007 - 5:22 am: |
| 
|
कधी कधी एकाच नावाची साथ येते. वीस पंचवीस वर्षांपुर्वी, कोल्हापुरात विशाल, आणि गोव्यात सागर नावाची लाट होती. त्यापुर्वी राहुल नावाची साथ आली होती. माझ्या शालेय जीवनात राजेश नावाची साथ होती. आमच्या वर्गात दोन राजेश कुलकर्णी होते.
|
Mahaguru
| |
| Friday, August 17, 2007 - 6:15 am: |
| 
|
हिमेश रेशमिया च्या मुलाचे नाव म्हणे 'स्वयम' असे आहे. काय सांगावे पुढे त्वयम, वयम असली पण नावे येतील
|
Ajjuka
| |
| Friday, August 17, 2007 - 9:22 am: |
| 
|
अहम् आवाम् वयम् प्रथमा त्वाम् त्वा युवाम् वा युष्मान वः द्वितीया (इतकेच आठवतेय.. बरोबर असण्याची gurantee शून्य पण बरोबर असण्यानसण्याची हिमेशला थोडीच पडलीये!!) अश्या क्रमाने २१ मुलगे आणि ७ मुली होऊ शकतात त्याला. दर ३ मुलांच्यानंतर १ मुलगी...
|
अज्जुका? त्वाम त्वा अस आहे? की माम मा आवाम नौ अस्मान न्: द्वितिया कोणी टाकेल का? मया आवाभ्याम अस्माभी: मम मे आवयो: नौ अस्माकम न: मत आवाभ्याम अस्मत मह्यम मे ?????
|
Ajjuka
| |
| Friday, August 17, 2007 - 4:14 pm: |
| 
|
बरोबर आहे तुझं.. मी अहं आणि त्वं एकत्र केलं.
|
Slarti
| |
| Friday, August 17, 2007 - 4:52 pm: |
| 
|
>>> दर ३ मुलांच्यानंतर १ मुलगी...
अहम् / आवाम् / वयम् माम्, मा / आवाम्, नौ / अस्मान्, नः मया / आवाभ्याम् / अस्माभिः मह्यम्, मे / आवाभ्याम्, नौ / अस्मभ्यम्, नः मत् / आवाभ्याम् / अस्मत् मम, मे / आवयोः, नौ / अस्माकम्, नः मयि / आवयोः / अस्मासु शिवाय अगदी नियमितपणे जुळी होणार त्याला
|
Zakki
| |
| Friday, August 17, 2007 - 5:06 pm: |
| 
|
slarti , सव्यसाचि, मला दिनेश च्या संस्कृत श्लोकांचे भाषांतर करायला मदत कराल का? धन्यवाद.
|
अहम् / आवाम् / वयम् माम्, मा / आवाम्, नौ / अस्मान्, नः मया / आवाभ्याम् / अस्माभिः मह्यम्, मे / आवाभ्याम्, नौ / अस्मभ्यम्, नः मत् / आवाभ्याम् / अस्मत् मम, मे / आवयोः, नौ / अस्माकम्, नः मयि / आवयोः / अस्मासु.. मग त्या नंतर मोठ्ठ्यानं म्हणायचं... "सर्वनाम् संज्ञक: संबोधनम् नास्ती"!!
|
Slarti
| |
| Friday, August 17, 2007 - 6:43 pm: |
| 
|
मृ, अगदी... संस्कृत शिकण्याच्या सुरुवातीच्या दिवसात एका वर्गबंधूने सप्तमीपर्यंत पोहोचल्यावर त्या inertia मध्ये बेभान होऊन 'भो त्वम्' वगैरे केले होते... म्हणजे आम्हाला असे वाटले. खरी बात वेगळीच होती. संस्कृतात आदरार्थी सर्वनाम नाही इंग्रजीसारखेच. हे तसे भारतीय भाषेच्या संदर्भात विचित्र आहे. तर त्याला वाटले की 'भो त्वम्' म्हणजे 'अहो, तुम्ही' अशा अर्थाने वापरत असतील... झक्की, मदत करायला नक्की आवडेल.
|
झक्की, मला संस्कृत येत नाही हो हे आपले उगाच पाठ आहे. अज्जुका, 'मी'पणा विसरलीस की काय? (योगीलोकांसारख)
|
Nakul
| |
| Friday, August 17, 2007 - 11:02 pm: |
| 
|
संस्कृतचा एक वेगळा बा.फ़. उघडला पाहिजे. मला अहम ची तृतिया कधीच लक्षात नाही रहात बाकी सगळे अजूनही पाठ आहे
|
Manuswini
| |
| Friday, August 17, 2007 - 11:44 pm: |
| 
|
सोहम माझ्या भावाच्या मुलाचे आहे. सोहम म्हणजे मी स्वःत. स्वामी समर्थांचा मंत्र आहे तो.
|
Manuswini
| |
| Friday, August 17, 2007 - 11:46 pm: |
| 
|
हिमेश रेशमियाला मुलगा आहे?????? मग एकदा काय तो माझी gf मला अतीशय प्रिय आहे असे काहीतरी म्हणाल्याचे आठवते मागे सा रे ग म मध्ये.
|
Psg
| |
| Saturday, August 18, 2007 - 6:24 am: |
| 
|
मनु, त्याचा मुलगा दिड वर्षाचा आहे, बायको सरळसाधी मुलगी आहे, म्हणून त्यांना publicise करत नाही तो असे त्याचे म्हणणे आहे. आणि gf प्रिय असतेच की सगळ्यांना
|
Avv
| |
| Saturday, August 18, 2007 - 9:25 am: |
| 
|
मुलांची नावे: जक्षय, जशन, उर्मील, हेतल, भाविन, केतू, आकार (बहिणीचे नाव आक्रुती) मुलींची नावे: उश्मा, उझ्मा, टिंकल, आस्था, मरिना, अनिना घरांची नावे: येना, शैवल, कौसंबी, आलाप,
|
Avv
| |
| Saturday, August 18, 2007 - 9:34 am: |
| 
|
नावांची लाट येते खरंय अगदी. काही वर्षापूर्वी सातारा भागात पल्लवी आणि राहूल याचा सुळसुळाट होता. मग क्षितिज क्षितिजा, प्रियांका, सई. पुण्यात अथर्व, वेदांत, सिद्धी, साक्षी, सलोनी ई.
|
कौसंबी>>> अभिजीत च्या घराचे नाव आहे की काय? 
|
Manuswini
| |
| Saturday, August 18, 2007 - 7:50 pm: |
| 
|
पूनम, हो काय, मला वाटते हे डंबीस नी अत्ती शहणे लोक सरळ साधी मुलगी करतात वाटते त्याच लबाडपणा लक्षात येत नाही. मला तो(हिमेश रेशमिया) बोक्या सारखा वाटतो. लबाड माणसाला आम्ही 'बोका' म्हणतो.
|
Lajo
| |
| Sunday, August 19, 2007 - 2:23 am: |
| 
|
कालच ऐकलेले मुलाचे नांव - 'टप्पा' - का तर म्हणे आयुष्यातला महत्वाचा टप्पा.... मग मुलीचे नांव काय पायरी ठेवणार का???
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|