>>>गिरे तो भी टांग उप्पर... >>>'मला कळलेच होते तू असणार म्हणून... झकास... हे क्रेडीट कार्डवाले भारी पिडतात... तीच्या सोबत माझ्या colleague ने केलेला इब्लिसपणा... " HSBC बॅंकसे आपको personal loan offer किया जा रहा है"... अमुकतमुक फ़ायदे सांगुन झाल्यावर "सर हमारी बॅंक का rate of interest सिर्फ़ 17% है"... मॅडम Interest की क्या जरूरत है... मुझे तो सिर्फ़ loan दे दिजिये... पुराना कर्जा उतारना है...
|
परवाचा हा इब्लिसपणा. माझा एक मित्र कॉल सेंटरमधे "टीम लीडर" म्हणून राबतो. मला वारंवार कुठल्यातरी बॅंकवालीने पिडायला सुरूवात केली. मला पर्सनल लोन नको हे तीनदा सा.ंगितलं तरी त्या मंदाच्या डोक्यात प्रकाश पडेना. शेवटी रेहानने फोन घेतला आणि अस्सल कॉल सेंटरवाल्याच्या भाषेत तिची वाट लावली. वर सांगितलं "हा कॉल तुझे सीनीयर्स ऐकतील तेव्हा दुसरी नोकरी शोधायच्या तयारीत रहा.. हा फोन तिने सकाळी आठ वाजता करायचा उपद्व्याप केला होता...
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 27, 2007 - 8:20 am: |
| 
|
मग कोण होता तो xxxxx इसम>>> गिरि ह्यालाच म्हणतात गिरे तो भी टांग उप्पर. आणि नंतरच्या तपशिलात थोडी चुल आहे. तु ABN amro वरच टिकुन राहिला होता नंतर मात्र HDFC housing loan वर आलास. आणि तुझा आवाज युनिक आहे. तो लगेच ओळखता येतो पण हा अनोळखी नं आणि काय सांगाव तु हा बिजनेस पार्ट टाइम करत असशील तर म्हणुन गप्प बसलो. ह्यालाही गिरे तो भी टांग उप्पर अस म्हणतात. बघ तुझ्या एका भेटीत मी हा गुण शिकुन घेतला. म्हणतात ना " ढवळ्याशेजारि बांधला पवळ्या...."
|
>>>ह्यालाही गिरे गिरी तो भी टांग उप्पर अस म्हणतात... हो ना दिव्याचे खांब पण हेच म्हणतात... 
|
माझ्या जिजाजींना Citibank मधुन सारखा फोन यायचा personal loan साठी... एक दिवस त्यांनीच त्या Citibank वालीला offer दिली... तु ९% ने रू. २ लाख देत आहेस तर मी तुला २% ने रू. २ लाख देतो... तिने परत कधी फोन नाही केला...
|
Chat वर भेटुन cell no मागणारे खुप महाभाग भेटतात... अश्यांसाठी खास.... एकदा एकजण असाच chat वर भेटला होता. सारखा cell no मागत होता. वैतागुन शेवटी दिला no ९८९२०९८९२०... बिचार्याने cell वरुन call केला आणि तो होता पुण्याचा म्हणजे STD call लागला. नाव विचारुन विचारुन हैराण झाला आणि थोड्या वेळाने मला विचारतो कोणता no दिलायस?? लागतच नाहिय... खरतर AIRTEL CUSTOMER CARE चा no. दिला होता मी.....त्या दिवसापासुन त्याने no. मागितला नाही....
|
Chaffa
| |
| Sunday, July 15, 2007 - 6:13 am: |
| 
|
आता वेंधळेपणाच्या BB वर लिहीलेल्या पार्टीतला इरसालपणा, सरप्राइज पार्टी म्हणजे केक वगैरे सगळे आम्हालाच न्यायचे होते. पार्टी सुरु झाली केक कापण्या पुर्वी वर लावलेली एकुलती एक मेणबत्ती पेटवली गेली आणी........... अचानक ती मेणबत्ती सरऽसरऽऽ करत फ़टाक्याच्या वातीसारखी पटापट पेटली ज्या छत्रपती सहकार्याने ही पार्टीची योजना आखली होती त्याचा चेहर्यावर घड्याळातले जितके आकडे असतील तेवढे सगळे वाजुन गेले. बेंबीच्या देठापासुन ओरडला " अबेऽऽ ये केक फ़टनेवाला है". आणि हे तो ईतक्या चिरकलेल्या आवाजात म्हणाला की हसायचे नाही ठरवुन सुध्दा मला ठसका लागेस्तोवर हसु फ़ुटले. मेणबत्ती वाटल्याप्रमाणे फ़ुटली नाही ते पाहुन मग सगळीकडेच हास्यकल्लोळ झाला,पण एव्हाना या प्रकाराचा कर्ता धर्ता कोण ते सगळ्यांनाच समजले होते. मग नक्की काय झाले ते सांगताना पुरेवाट झाली. फ़ार सोपा उद्योग आहे हा मेणबत्तीच्या खालच्या बाजुने एक तार गरम करुन सरळ वरपर्यंत आणायची तिथला दोरा गरम तारेमुळे तुटून निघतो मग त्या जागी एखाद्या फ़टाक्याची वात (फ़क्त वात हं ) सरकवुन द्यायची बऽस!!!!!!!!!!!!!!!!!!!!
|
Zakasrao
| |
| Monday, July 16, 2007 - 3:42 am: |
| 
|
चाफ़्या जनरली फ़क्त वात लावायची आणि बॉसचा बड्डे असेल तर वातीसह अजुन बरच काही लावुन त्याला वात आणता येइल.
|
व्वा चान्गलीच "वाता"हत चाललीये की इथे
|
Manjud
| |
| Monday, July 16, 2007 - 7:18 am: |
| 
|
चाफ्फा, आता हा BB जागृतावस्थेत येईल
|
Itgirl
| |
| Monday, July 16, 2007 - 9:03 am: |
| 
|
office मधे वाचत आहे आत्ता हे सगळे आणि हसता पण येत नाही आहे!!!
|
Runi
| |
| Monday, July 16, 2007 - 8:37 pm: |
| 
|
चाफ़्फ़ा, सहीच फटाकेबाजी केलीस की तू पार्टीत. करुन बघाय्ला पाहिजे. कोणाची पार्टी आहे बरं पुढची... मी स्वतःहुन केक्ची जबाबदारी घेणार आहे
|
Chaffa
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:32 am: |
| 
|
रुनी घे जबाबदारी पण झकास म्हणतो तसं काही करु नको अतिरेकी म्हणतिल तुला. ( तसा माझा तो मित्र मला आता शनिदेव अशी हाक मारतो. काय करेल बिचारा पार्टी 'तिच्या' घरी होती ना!)
|
Ultima
| |
| Tuesday, July 17, 2007 - 11:39 am: |
| 
|
शनिदेव..... हो हो खरच
|
Runi
| |
| Tuesday, July 17, 2007 - 6:10 pm: |
| 
|
शनिदेव, खि खि खि. शनिदेव चाफ्फा. काय अल्टिमा बर्याच दिवसांनी दिसलीस मायबोलीवर?
|
Ultima
| |
| Wednesday, July 18, 2007 - 6:39 am: |
| 
|
हाय रुनि.. अगं थोडी बिझले होते आॅफ़िस च्या कामात तु कशी आहेस.... शनिदेव.. आपण फ़क्त शनिवारीच पावता का ????
|
Sheshhnag
| |
| Saturday, July 21, 2007 - 11:04 am: |
| 
|
हा इब्लिसपणा माझा नाही. मग कोणाचा?! आमच्या घराकडे सकाळी रोज दोन्-चार गाई येत असतात, त्यांना बायको रोज सकाळी काहीना काही खायला घालते, त्यामुळे ती एक सवयच होऊन गेली आहे, दोघांनाही. परवा, सकाळी अशाच त्या गाई चरत चरत आमच्या घराकडे आल्या. सवयीप्रमाणे बायको गोग्रास बाजूला ठेवून वाटच पाहात होती. जशा गाई घरासमोर आल्या, तशी बायको पुढे जाऊन गोग्रास देऊ लागली, एरवी बायको येईपर्यंत घरासमोर घुटमळणार्या त्या गाई बायकोच्या अस्तित्वाची पर्वा न करता पुढे जाऊ लागल्या. बायको चकित होऊन पाहू लागली, तर त्यांच्याबरोबर एक बैलही होता! बायकोने गाईना हाकारायला सुरुवात केली, पण त्या गाई बायकोला दाद अजिबात न देता पुढे निघून गेल्या. हाका मारून दमल्यावर बायकोने तो गोग्रास तसाच ठेवून घरात आली, आणि तो श्वानग्रास झाला. आत आल्यावर मी तिला म्हटले, ``पाहिलंस! गाईसुद्धा कशा नवर्याच्या अगदि आज्ञेत असतात! नाहीतर तू!!'' एवढं मी म्हटलं, आणि पुढचा आमचा प्रेमळ सुसंवाद सुज्ञास सांगणे नलगे!
|
Chyayla
| |
| Saturday, August 18, 2007 - 2:10 am: |
| 
|
पाहिलंस! गाईसुद्धा कशा नवर्याच्या अगदि आज्ञेत असतात! नाहीतर तू! शेषनाग... तुम्ही अस कस म्हणता तुम्हाला जर त्या गाईंसारखी बायको हवी तर तुम्ही पण बैलोबा असायाला हवे ना...
|
Chyayla
| |
| Saturday, August 18, 2007 - 2:39 am: |
| 
|
बरेच दीवस झाले ईथे चक्कर मारुन, आता आलोच आहे तर एक किस्सा हो ज्जाये.. दील्लीतील वास्तव्यात माझा एक रूम पार्टनर हा गुलटी होता त्याच नाव मनू.. हो हो.. मनू हे नाव आपल्याकडे मुलींच असत पण ते त्याच होत. ते त्याला अजिबात शोभत नव्हत कारण हा अगदी मिशीबहाद्दर आणी कमी वयात उजडा चमन झाला होता. थोडक्यात दीसण्याच्या बाबतित एकदम कल्पनेच्या विरुद्ध.... पण एक होत की त्याचा आवाज मात्र मुलींसारखा होता. एकदा आम्ही खोलीच्या बाहेर मोकळ्या छतावर बसुन गप्पा मारत असताना खाली राहणार्या ऑंटी बाहेर आल्या हे बघायला की कोण मुलगी गप्पा मारत आहे. थोड्यावेळ माझ्याकडे संशयाने पाहात आत चालल्या गेल्या. दुसरा प्रसंगात तो एकदा माझ्याकडे अतिशय निरागस व दुखी: चेहरा करुन आला आणी मला विचारु लागला "समीरजी क्या सहीमे मेरा आवाज लडकी जैसा है." त्याच हिंदीपण जबरदस्त होत मला नेहमी येउन विचारायचा "समीरजी तुम क्या करती" आणी तेही त्या अवाजात अगदी क्षणभर मलाच भास व्हायचा मी कोणाशी बोलत आहे. आणी एक दीवस त्याचापण आला मुलीच्या आवाजाचा शाप वरदान बनला. संध्याकाळी ही स्वारी हसतच घरी आली आणी मला ऑफ़िस मधला किस्सा सांगु लागली. त्याने सकाळी भरपुर ऑफ़िशियल झेरॉक्स समोरच्या दुकानातुन काढायला दीले आता त्याला त्या आणायच्या होत्या पण जायचा कंटाळा शेवटी त्यानी तिथल्या मालकाला फ़ोन लावला आणी म्हटले की सबेरे जो ऑफ़िस के झेरॉक्स दीये है ना वो जल्दी भिजवा दो. आणी चमत्कार असा की ५ मिनटात त्या दुकानाचा खडुस मालक कधी नव्हे तर स्वता: झेरॉक्स घेउन हजर आणी ऑफ़िसात विचारु लागला की "यंहासे किसी लडकीने झेरॉक्स मंगवाये थे" पण त्याला कुणीच मुलगी दीसत नव्हती शेवटी गोंधळुन तो निघुन गेला. मनूला याचा आनंद की मुलीच्या आवाजाने माणस बघा कशी पटापट काम करतात मग काय मनू चे ईब्लीसपणाचे किस्से सुरु...
|
Chaffa
| |
| Monday, August 20, 2007 - 4:31 pm: |
| 
|
बोला च्यायला महाराज की जय! बर्याच दिवसांनी का होईना उगवल्याबद्दल! असो हा एक खास इरसाल किस्सा गेल्या शनिवारचा. आमच्या ऑफ़िसमधे मी माझ्या केबिनमधे एका वाटीत दुध ठेवले होते आणि येणार्या प्रत्येक अमराठी सहकार्याला एक चमचाभर देत होतो सगळे बहाद्दर कसलेतरी तिर्थ ( त्यांच्या बोलीत प्रशाद ) समजुन घेत होते दुपारी जरा कहरच झाला कारण आमचे GM येउन गेले आणि मी घाइघाइत वाटी लपवायचा प्रयत्न करताना मला नेमका पकडला गेलो आता यांचीपण ग्रहदशा वाईट होती त्याला मी काय करणार मला म्हणतात" क्यों सबको प्रशाद दे रहे हो और मै क्या पापी हुं?" मनात म्हंटल घ्या बाबा नंतर बोंबलु नका म्हणजे झालं. तो दिवस पार पडला कालचा रविवारही गेला आणि आज दुपारी कॅंटीनमघे मी बॉंब टाकला. बोलता बोलता सहज सांगुन टाकले " अरे यार परसो हमारा त्योहार था नागपंचमी," अर्थात समोरुन प्रश्न आलाच "अच्छा तो इसलिये तुम प्रशाद दे रहे थे, क्या करते है तुम्हारे यहॉं उस दिन?" मी माझा कप उचलला आणि जाता जाता म्हणालो "कुछ नही सिर्फ़ सांपको दुध पिलाते है!" आणि सरळ साइटवर धुम ठोकली. आज पार उशिरापर्यंत हा विषय रंगला होता.
|