|
Asami
| |
| Saturday, August 18, 2007 - 6:21 pm: |
| 
|
मला वाटते बरान Majid Majidi चा आहे. अप्रतिम एव्हढेच म्हणता येइल. It's an experience to watch his movies बरानचा अर्थ The Rain . एव्हढ apt title कि बस.
|
Aktta
| |
| Saturday, August 18, 2007 - 6:58 pm: |
| 
|
Chain Kulii Ki Main Kulii NOT BAD http://www.videoduniya.com/index.php?option=com_content&task=view&id=2180&Itemid=27 पोष्ट क्रमांक १००० एकट्या कडुन....
|
केदार मी पण ते नाटक VCD वर पाहिलय. ठिक आहे. एव्हढ भारि पण नाहि. नथुराम गोडसेची बाजु समजण्यासाठि ठिक आहे. राहिलि गोष्ट 'हे राम'बद्दलची तर कोण खर सांगण कठिण आहे. गोडसेने फ़क्त ते बोलले नाहित म्हटल असत तर खर वाटलही असत पण गोडसेचे वक्तव्य असे की 'त्यांना म्हणायचेच असते तर त्यांनी त्यांच्या प्रिय मुस्लिमांचे नाव घेतले असते'. त्यामुळे हे वक्तव्य खरे आहेच असे वाटत नाहि. मुळात गांधीजींनि स्वत्: म्हटले होते की 'जर मृत्युच्या वेळी परमेश्वराचे नाव माझ्या तोंडी असेल तरच मी खर्या दृष्टीने महात्मा ठरेल'
|
Manuswini
| |
| Saturday, August 18, 2007 - 7:53 pm: |
| 
|
बुध्धा मर गया : दुसरा एक कचर्याच टाकण्यासारखा movie
|
Aashu29
| |
| Saturday, August 18, 2007 - 8:40 pm: |
| 
|
मनुस्विनी, तू पाहिलास कि काय? त्यात राखि सावंत आहे म्हणे!!
|
Manuswini
| |
| Saturday, August 18, 2007 - 10:20 pm: |
| 
|
पाहेल्याशिवाय लिहित नाही, एकदम कंडम मूवी. ते पण थेटरात जावून.
|
Upas
| |
| Monday, August 20, 2007 - 4:21 am: |
| 
|
चिन्या, तुम्ही गोड्सेंचं statement प्रत्यक्ष वाचलय का? नाटकातल्या वाक्यांप्रमाणे नथुरामने म्हटलय, 'ज्या माणसाने कधीही राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम ह्यात भेद समजला नाही तो माणुस मरताना फक्त रामाचच नाव घेईल? राम आणि रहीम दोघांच घेईल नाही का? आणि एकाचच नाव घ्यायचं असेल तर रहीम्चं घेईल, कारण राम त्यांच्या ह्रुदयात होता आणि रहीम ओठात.. ' तुमचं वरचं विधान हे तोडलेलं आहे ज्याने अर्थ बदलतो.. गांधी, नथुराम ह्यांच्या विचारांचा आणि चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय असं विधान करणं धाडसाच नव्हे काय? रॉबीनहूड साहेब, नथुरामने कोर्टासमोर दिलेला कबुलीजबाब वाचावयास मिळेल का हो कुठे? नथुराम इतका हुश्शार होता की त्याला पूर्णपणे जाणीव होती की त्याच्या बलिदानाचा खरा अर्थ लपवलाच जाणार.. म्हणूनच त्याने स्वतचं वकीलपत्र दिलं नाही कोणाला, वधामागची भूमिका स्वतःच मांडली.. एकंदरच तरीही ह्या बाबतीत कॉंग्रेसींनी बरीच लपवालपवी केलेय हे उघड आहे.. माणसाला देव बनवण्याची आणि व्यक्तीला देशापेक्षा मोठ्ठ बनवण्याची ही त्यांची वृत्ती गांधींबाबत येथे दिसून येते.. केदार, अनुमोदन नाटकाचं लिखाण अतिशय आवडलं.. तात्यारावांनी एका पिढीला कसं भारून टाकलं होतं ते जाणवतं... ते दुबारा ऐकून सणसणीत चीड आली सरकारची!
|
Psg
| |
| Monday, August 20, 2007 - 6:03 am: |
| 
|
'चक दे इंडीया' पाहिला. छान आहे चित्रपट. कथा खर्या घटनेपेक्षा थोडीशी बदलली आहे, पण अर्थ तोच. शाहरुखनी प्रथमच इतकी non-glamourous भूमिका केली आहे. अगदी 'स्वदेस'मधेही प्रेमाचा angle होता, तोही इथे नाही. त्या भूमिकेत शिरला आहे त्यामुळे तो! चित्रपटाच्या casting director चा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे! परफ़ेक्ट मुली शोधल्या आहेत त्यानी! मुलींचे स्वभाव, हेवेदावे, घरच्या परिस्थितीचे मनावर असलेले दडपण.. सर्व व्यवस्थित दाखवले आहे. World Cup Hockey हा त्याच status चा दाखवला आहे, तिथे उगाचच्याउगाच बजेटमधे कापाकापी नाही केली हे बरंय! क्रिकेटवर व्यवस्थित ताशेरेही आहेत! ब्रेव्हो! एक मात्र अगदी जाणवलं- 'लगान' पाहताना थियेटरमधेही जल्लोष होता.. एक रन किंवा झेल घेतलाकी.. पण हॉकीचे गोल होत होते, अनेक happy moments आहेत, पण प्रेक्षकांची open involvement नव्हती थियेटर फ़ुल होते, पण तो जोश नव्हता.. आणि शेवटचं.. 'चक दे' चा अर्थ काय आहे नक्की? 'जय हो', किंवा 'हिंमत ठेवा' असा काही आहे का?
|
Badbadi
| |
| Monday, August 20, 2007 - 7:21 am: |
| 
|
'चक दे' चा अर्थ काय आहे नक्की? >> पूनम, त्याचा अर्थ 'पटक दे' असा आहे.. हे बघ
|
मी असं ऐकलं की, 'चक दे' म्हणजे to buck up. म्हणजे पूनमने लिहिलेल्या 'हिंमत ठेवा' सारखे. CBDG 'पटक दे' म्हणजे 'पटकना' या क्रियापदाच्या अर्थाने की आणखी कोणत्या? 'पटक दे' चा अर्थ काय?
|
Psg
| |
| Monday, August 20, 2007 - 10:06 am: |
| 
|
जीडी, 'पटक दे' म्हणजे खास हाणामारीची टर्म आहे खाली खेचून मारणे, उलथवून टाकणे या अर्थी.. असं मला वाटतं
|
आमच्या हापिसच्या शेजारच्या स्टुडिओत शूटिंग साठी शाहरुख आलाय ही बातमी कळताच लोक जमेल तिथून त्याला पहायला धावले. आता इतक्या लांबून आणि वरून कुणीही शाहरुख म्हणून कुठलाही गॉगलवाला दाखवला तरी कळणार होतं का? म्हणून त्या रेसमधे भाग न घेता मी फक्त मूव्हीचं नाव विचारलं. आणि हसू आलं. चक दे इंडीया. पुन्हा एकदा कुठल्या तरी पंजू NRI राहूल, रोहित किंवा राज ची कहाणी असणार. ओढून ताणून आणलेली ग्ल्यामरस दुःखं, त्या अतीव दुःखातही चित्रातल्यासारख्या दिसणार्या हिरॉईन्स आणि इंग्लिश मॅगेझिन्स च्या कव्हर्स सारख्या गुळगुळीत फ्रेम्स मधली सो कॉल्ड फ्लॉलेस फोटोग्राफी. म्हणून झटकून विसरून गेले. थोड्या दिवसांपूर्वी ट्रेलर पाहिला टिव्हीवर तेंव्हा हे काहीतरी छान असेल असं वाटलं आणि नाव वाचल्यावर एकदम आठवलं. ट्रेलर पाहून हुरळून मूव्ही पहायचा आणि तो ट्रेलर पेक्षा चांगला निघायचा योगायोग बहुतेक पहिल्यांदाच. (चक दे चा अर्थ तोडून टाक असा होतो असे फार पूर्वी अपाचे इंडीयन ने सांगितले होते कुठे तरी. त्यावरून अवधूत च्या " तोडलंस रे मित्रा " ची आठवण झाली.) तर.. हा शाहरुखचा सगळ्यात उत्तम अभिनय असलेला चित्रपट असे म्हणता येईल. तरीही कधीकधी " ये हक तुमसे कोई नही छीन सकता. कोई नही! " छाप डायलॉग्स आहेतच. पण तरीही.. सगळ्यात मोठी स्क्रीन स्पेस अर्थातच त्याचीच. सोळा मुलींनी मिळून एक अस्सल टीम दाखवलीय. त्यातल्या दोन तीन (विद्या, प्रिती आणि बिंदिया) सोडल्या तर इतर खर्या हॉकी प्लेयर्स आहेत असे ऐकले. त्या तशा वाटतातही. त्यांचे एकमेकांशी असलेले रिलेशन्स सुरुवातीपासूनच अगदी खरे वाटतात. नुसत्या ग्राऊंडवरच नाही तर बरॅक्स आणि लॉकररूममधल्या सीन्स मधूनही ते क्लियर होत जातात. आणि शेवटी एका क्षणापुरते फिल्मी वाटले तरी तेच अपेक्षित आणि हवेसे असल्याने तेवढे माफ. बाकी वास्तववाद प्रत्येक ठिकाणी टिकवून ठेवण्यात दिग्दर्शकाने कुठेच कसूर ठेवलेली नाही. प्रत्येक मायन्युट डीटेल कव्हर केलेय. मुली किंवा शाहरुख कुणालाच मेकप वापरला नसावा इतके ते खरे दिसतात. शाहरूख हा फक्त कबीरच वाटतो शेवटपर्यंत. ते बेअरींग कधीच सुटले नाहीये. अगदी सात वर्षांमधला फरकही दिसण्याजोगा. खूप सोसलेला वाटावा असा दिसतो. पान किंवा गुटखा खात असावा असा एक पस्तिशी चाळीशीचा हॉकी कोच सोडून तो इतर काहीच वाटत नाही. सोळा मुली असूनही प्रत्येकीचे स्वभाव ठळकपणे समजतात. टीमची मॅनेजर कृष्णा, तिथला केअरटेकर सुखलाल आणि मॅनेजिंग कमिटीच्या मेंबर्स चे सुद्धा. आता यातल्याच एखाद्या मुलीचे भावनिक बंध कबीर शी जोडून देतात की काय अशी मला सारखी भिती वाटत होती. एखाद्या संध्याकाळी प्रॅक्टीस संपल्यावर एखादी ओव्हरसिन्सियर मुलगी परत प्रॅक्टीस करायला येते आणि मग... छाप प्रसंगातून. खरे तर तसे करणे टाळणेच फार अवघड होते. तो संयम आणि धाडस निर्माता दिग्दर्शकाने दाखवलेय. गेला बाजार हॉकीस्टिक्स हवेत उडवत एखादे समरगीत टाईप गाणे ग्राऊंडवर असणार याची तर खात्रीच होती. बॉईज टीमबरोबरची मॅच आता पुढे चित्रपट चालू रहावा यासाठी धडाधड अविश्वसनीय गोल्स करून जिंकलेली दाखवतात की काय ही अजून एक. वर्ल्ड कप्च्या एकूण एक मॅचेस जिंकलेल्या दाखवतात की काय हीही. या आणि अशा सगळ्याच भित्या (ज्या इतक्या वर्षांच्या हिंदी चित्रपटानुभवामुळे तयार झाल्यात त्या) खोट्या ठरवत आणि तरीही लॉजिकल कलाटण्या देत हवे ते सुखद माईलस्टोन्स कव्हर करत गाडी योग्य स्टेशनात पोचते. मॉब सायकॉलॉजी च्या एक दोन झलका अगदी सही आहेत. विशेषतः आजतक आणि मोहल्लेवाले. एका खास समारंभात साड्या नेसलेल्या आणि साडी कशाला म्हणून कुरकुरणार्या पोरी जाम क्युट दिसतात. प्रितीला मीडिया समोर प्रपोज करण्याचा प्रसंग सही आहे. अभिमन्यू सिंग एकूणच भारी आहे. तीन सुंदर पोरी असूनही सगळ्यात भावून जातात त्या कोमल आणि बलबीर. रजिस्ट्रेशन च्या वेळचा सीन फारच जमलाय. मणीपूरच्या मुलीला उत्तरपूर्वी मेहमान म्हटल्यावर ती जे बोलते ते फारच खास. टाळ्या, शीट्ट्या आणि ओह नो च्या गोंधळात वर्ल्ड कप पाहिला जातो. अविश्वसनीय रिझल्टस तरीही एवढी सूट देऊ शकतो. इतके सोपे नसते हे आपल्याला कळते तरीही ते आवडते. एकूण काय तर नक्की पहा. एकदा तरी आणि बडे पर्देपर.
|
अनुमोदन सन्घमित्रा. स्वदेश नंतर शाहरुख मला या पिक्चर मध्ये आवडला. (नाहीतर शाहरुख आहे हे बघुन ते पिक्चर मी बघत नाही). आवडला आपल्याला. या वर्षीशा तो बेष्ट चित्रपट व्हायला पाहीजे. पण राहुन राहुन एकच वाटले की त्यात थोडे अग्रेशन त्याने दाखवायला पाहीजे होते. (जे प्रेमकथा करुन निघुन गेले). कदाचित अनिल कपुर या रोल मध्ये जास्त शोभुन दिसला असता. ( IMO)
|
Zakki
| |
| Monday, August 20, 2007 - 1:43 pm: |
| 
|
मी 'चक दे' सिनेमा बघितला नाही, पण वरची वर्णने वाचून वाटते की इकडे एक असाच सिनेमा होता. टॉम हॅंक्स त्यात बायकांच्या बेसबॉल टीमचा कोच बनतो. त्या बायका निरनिराळ्या ठिकाणी जाऊन बेसबॉल खेळतात. त्यातहि असेच काही काही होते!
|
Tiu
| |
| Monday, August 20, 2007 - 1:54 pm: |
| 
|
परवा चक दे India बघितला...त्यात subtitles मधे 'चक दे India ' साठी ' Go on India ' असं लिहिलेलं होतं.
|
अहो झक्की, हिंदी मूव्ही म्हणजे कॉपी तर असणारच की मी कालच पाहीला. झकास आहे. कोमल आणि बलबीर सही. रजिस्ट्रेशनचा सीन खलास. हो sss ?
|
Anjali28
| |
| Monday, August 20, 2007 - 3:52 pm: |
| 
|
झक्की, तो ' A League of Their Own. Gena Davis, Rosie O'Donell, Madonna वगैरे लोक आहेत त्यात. खूप छान आहे हा movie
|
Amruta
| |
| Monday, August 20, 2007 - 4:26 pm: |
| 
|
yes, chuck de - india is worth watching on big screen मस्त आहे एकदम. मुली तर एकदम fantastic आहेत. बलबिर जाम आवडली. end पण मस्त केलाय. मुलींमधे झालेले फ़रक पण छान दाखवलेत.
|
Slarti
| |
| Monday, August 20, 2007 - 4:43 pm: |
| 
|
stardust पाहिला. neil gaiman च्या समनामी कादंबरीवर बेतला आहे. जादूची अद्भुत दुनिया आणि आपले जग हे एका साध्या भिंतीने विभागले आहेत. आपल्या जगातील एक तरूण पोरगा एका मुलीवरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी भिंतीच्या पल्याड पडलेला तारा (उल्का) आणायला जातो, पण त्या तार्याच्या मागावर वेगवेगळ्या कारणांसाठी बाकीचेही लोक आहेत अशी कथा. standard special effects , पण danes, pfeifer, de nero बघायला मजा येते. विशेशतः de nero ची gay air pirate ची व्यक्तीरेखा भन्नाट आहे (मी ऐकले की मूळ पुस्तकात ही व्यक्तीरेखा नाही)... थोडक्यात, खूप महान नसला तरी एक आर्बिट टाइमपास म्हणून छान.
|
Disha013
| |
| Monday, August 20, 2007 - 7:20 pm: |
| 
|
संघमित्राला अनुमोदन. अगदी बघावाच असाच आहे चक दे इंडिया. शाहरुख कुठच स्टार शाहरुख वाटत नाही. त्या पोरींची कामेही मस्त झालीत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|